दोन आंतरपिकांसह रसायनमुक्त वांग्याचे एकरी २० टन उत्पादन

आपण श्रीमंत कधी होऊ? शर्मा म्हणतात की, एक झाड चार ते पाच किलो उत्पादन देत असेल व किलोला १० रुपये दर मिळाला तर एक झाड ४० ते ५० रुपये देऊ शकते. एकरात पाच हजार झाडे असतील तर या हिशेबाने त्याचे दोन ते अडीच लाख रुपये मिळतात. पण आपण गट तयार केला. सेंद्रिय, आरोग्यदायी वांगे असे त्याचे मार्केटिंग केले व सामूहिकरीत्या २० रुपये दर निश्‍चित केला तर हेच वांगे एकरी दुप्पट म्हणजे चार ते पाच लाख रुपये देऊ शकते. श्रीमंत होण्याचा हाच मार्ग आहे. मिळणाऱ्या एकूण उत्पन्नात ४० टक्के खर्च असतो.
दोन आंतरपिकांसह रसायनमुक्त वांग्याचे एकरी २० टन उत्पादन
दोन आंतरपिकांसह रसायनमुक्त वांग्याचे एकरी २० टन उत्पादन

बाजारपेठेतील मागणीनुसार व्यावसायिक पीक पद्धतीची रचना हे सुभाष शर्मा यांच्या शेतीचे वैशिष्ट्य आहे. जमिनीची सुपीकता, सेंद्रिय कर्ब वाढविण्याबरोबर आर्थिकदृष्ट्या सधन होण्यावर शर्मा यांचा भर असतो. वांगे हे बहुतांशी शेतकऱ्यांचे मुख्य वा सामाईक पीक आहे. शर्मा यांचेही ते हुकमी पीक. कोणतीही रासायनिक खते, कीडनाशके यांचा वापर न करता केवळ नैसर्गिक शेतीच्या आधारे हे पीक कमी खर्चात यशस्वी करण्याची किमया त्यांनी घडवली आहे. मागील वर्षी (२०१८) एक एकरात वांगी प्लॉट होता. त्याचे प्रातिनिधिक उदाहरण अभ्यासूया. आदर्श वांगी व्यवस्थापन  लागवडपूर्व तयारी शर्मा सांगतात की, वांगी घेण्यात येणारी जमीन आम्ही आधीच चांगली सुपीक करून घेतलेली असते. वांग्याआधी या जमिनीत सोयाबीन तर त्याआधी तूर होती. हिरवळीचे खत होते. सोयाबीन लावले त्या वेळी एकरी चार ट्रॉली शेणखत टाकले होते. एवढ्या सगळ्या पौष्टिक खाद्यावर पोसलेली ही जमीन वांग्याचे चांगले उत्पादन देणार याची आम्हाला खात्री असते. लागवडीची वेळ शर्मा म्हणतात की, नैसर्गिक शेतीचे शास्त्र सांगते पावसाळा हा वांगी लागवडीसाठी अजिबात अनुकूल काळ नाही. कारण त्या काळात त्यावर प्रचंड कीड येते. त्याची योग्य वेळ ऑक्टोबर हीच आहे. ऑक्टोबरच्या अखेरीस (पिकाच्या नैसर्गिक वेळेत) आम्ही वांगी लावतो. त्यासाठी १५ सप्टेंबरच्या दरम्यान रोपे तयार करतो. आंतरपिके

  • वांग्याची सरी चार फुटांची ठेवण्यात येते. त्यातील तीन फुटांच्या जागेत मेथी लावण्यात येते.
  • मेथीचे फायदे
  • जमिनीत नत्र स्थिरीकरण करते.
  • एक महिन्यात पीक निघते.
  • -एकरी २५ क्विंटल उत्पादन देते. त्यास २० रुपये प्रति किलो दर मिळतो.
  • मेथीनंतर कोथिंबीर

  • फायदा- कोथिंबिरीला विशिष्ट गंध असल्याने रसशोषक किडी या प्लॉटपासून दूर पळतात. उन्हाळ्यात हे पीक काढणीस येते, त्या वेळी चांगला दर मिळण्यास सुरवात होते.
  • उत्पादन एकरी ३५ क्विंटल मिळते. दर ८ रुपये प्रति किलो मिळतो.
  • हेदेखील ४५ ते ५५ दिवसांचे पीक आहे.
  • ही दोन्ही आंतरपिके वांग्याचा बराचसा उत्पादन खर्च कमी करतात. त्यामुळेच वांगे नफ्यात येते.
  • उत्पादनाचे गणित

  • चार बाय दोन फुटांवर लागवड म्हणजे आठ चौरस फुटांत एक झाड होते. एकरी झाडांची संख्या सुमारे पाच हजार धरूया.
  • आमच्याकडे प्रत्येक झाडाला फुले, फळे भरपूर लगडतात. सुरवातीला अर्धा, एक किलो वजनाचे तर झाडाची उंची वाढल्यानंतर प्रति झाड ४ ते ५ किलो फळ मिळत राहते.
  • एकरी उत्पादन- २० ते २५ टन.
  • एवढ्या उत्पादनाची अपेक्षा ठेवताना पर्यावरणाचा कोणता विनाश केला नाही. ग्राहकांसाठी आरोग्याला पुरेपूर पोषकद्रव्ये या वांग्यात आहेत. कारण लाभदायक जीवाणूंचे अवशेष, बायोमास, शेणखत याद्वारे अन्नद्रव्ये जमिनीला मिळतात. त्यातून ती वांग्यात उतरतात
  • उत्पादन व ताजा पैसा यांचा मेळ

  • एका एकरात एका तोडणीत १५ पन्न्या निघाल्या. एक पन्नी १२ किलोची म्हणजे एक क्विंटल ८० किलो माल तोडला. एकाच तोडणीत वीस रुपये प्रति किलो दराने त्याचे ३६०० रुपये मिळाले. आठवड्याला दोन तोडणी होतात. हाच क्रम काही काळ पुढे चालतो.
  • प्रत्येक झाडावरील फळांची संख्या मोजली तर ती ३० च्या वर पोचली. म्हणजे इथेच ते एक किलो झाले. झाडाची फळे व फुले धरून त्यांची संख्या १०० पर्यंत होती. म्हणजेच किमान तीन किलो उत्पादन देण्यासाठी झाड सज्ज आहे. आंतरपीक कोथिंबीर निघून जाईपर्यंत त्याची विक्री होते.
  • कोथिंबिरीची काढणी केल्यानंतर त्याला एक ट्रॉली अलौकीक खत देण्यात येते. एकरी तीनशे लिटर गोसंजीवक खत तर यापूर्वी दिलेले असते. याच खतांच्या भरवशावर वांग्याचे उत्पादन जून-जुलैपर्यंत मिळत राहते. अखेरच्या टप्प्यात वांगे दोन ते अडीच किलोपर्यंत उत्पादन देण्यास सुरवात करते.
  • नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यांत वांग्याची महत्त्वाची वाढ होते.
  • आपण श्रीमंत कधी होऊ? शर्मा म्हणतात की, एक झाड चार ते पाच किलो उत्पादन देत असेल व किलोला १० रुपये दर मिळाला तर एक झाड ४० ते ५० रुपये देऊ शकते. एकरात पाच हजार झाडे असतील तर या हिशेबाने त्याचे दोन ते अडीच लाख रुपये मिळतात. पण आपण गट तयार केला. सेंद्रिय, आरोग्यदायी वांगे असे त्याचे मार्केटिंग केले व सामूहिकरीत्या २० रुपये दर निश्‍चित केला तर हेच वांगे एकरी दुप्पट म्हणजे चार ते पाच लाख रुपये देऊ शकते. श्रीमंत होण्याचा हाच मार्ग आहे. मिळणाऱ्या एकूण उत्पन्नात ४० टक्के खर्च असतो. शंभर नाकवाल्यांत एकच नकटा या आंतरपिकांत मक्याची ५० झाडे लावली असती तर वांगे अजून सुरक्षित झाले असते. आमच्याकडे किडके वांगे शक्यतो पाहायला मिळायचे नाही, असे सांगताना शर्मा उपमा देतात. शंभर नकट्यांत एकच नाकवाला अशी म्हण आहे. पण आमच्या इथे तर शंभर नाकवाल्यांत एकच नकटा दिसतो. इथं मी झाडं, पाखरं, मित्रकीटक जगवली. त्यांच्या माध्यमातून किडींची अंडी खाल्ली गेली. पाखरांनी किडींचे पतंग खाल्ले. नैसर्गिक शेती फायद्याची करायची असल्यास ज्ञान पणाला लावायला लागेल. योजकता अचूक करावी लागेल. श्रमाचा भरपूर वापर करावा लागेल.

    प्रतिक्रिया  श्रम करणारे केवळ मालक आणि मजूर नाहीत, तर जीवजंतू, बैल, गायी, पक्षी या सर्वांनी कष्ट केले तेव्हा कीड नियंत्रण झाले. जेव्हा त्यांना आपण जगू देऊ तेव्हाच ते घाम गाळतील. -सुभाष शर्मा

    शर्मा यांच्या महत्त्वाच्या टिप्स

  • अनेक जण म्हणतात की, फवारण्यांशिवाय वांगी येत नाहीत. पण आम्ही जैविक, रासायनिक कीडनाशके तर सोडाच, साध्या पाण्याचीदेखील फवारणी केलेली नाही. पूर्ण नैसर्गिकपणे त्याला जोपासले आहे. एकाही फळाला छिद्र नाही. चकाकी आहे. एकसमान आकार आहे.
  • आपण चुकीच्या दिशेने शेती केली तर फवारणी हा शब्द येतो. मग फवारण्यांवर फवारण्या सुरू राहतात. हे चक्र थांबतच नाही.
  • पिकाची नैसर्गिक वेळ निवडली. जमिनीची सुपीकता निर्माण केली व शेतात पर्यावरणीय (इकॉलॉजिकल) वातावरण तयार केले. कोणती बांधणीही केलेली नाही.
  •  शेती हा हातबट्ट्याचा व्यवसाय नव्हेच. उत्पादनाला सन्मान मिळालाच पाहिजे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com