माती, पाणी, पर्यावरण संवर्धनासह बहुविध पीक पध्दती

शर्मा यांची शेती का अभ्यासायची? ती व्यावहारिक, व्यावसायिक आहे. -शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास शिकवते. आतबट्ट्याची शेती उपयोगाची नाही असे शर्मा सांगतात. कर्जबाजारी होण्याची गरज नाही. उधार कोणाकडून घेण्याची गरज नाही.
माती, पाणी, पर्यावरण संवर्धनासह बहुविध पीक पध्दती
माती, पाणी, पर्यावरण संवर्धनासह बहुविध पीक पध्दती

अनेक वर्षांपासून नैसर्गिक शेतीचे विविध प्रयोग करून यवतमाळ येथील सुभाष शर्मा यांनी आपली माती अत्यंत कसदार, सुपीक बनवलीच. शिवाय बाजारपेठांचा अभ्यास, मागणीनुसार वर्षभर बहुविध पिकांच्या आधारे व्यावसायिक वा नफ्याच्या शेतीचा आदर्श तयार केला. कंटूर पध्दतीचा वापर करून शेतात पाणी मुरवले. विविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण शाश्‍वत शेतीचे हे गुरुकुल प्रत्यक्ष जाऊन अनुभवण्यासारखेच आ हे.   यवतमाळ येथील सुभाष शर्मा यांची शेती म्हणजे नैसर्गिक शेतीचे गुरुकुलच तयार झाले आहे. अनेक वर्षांपासून नैसर्गिक पध्दतीचे प्रयोग करीत त्यांनी माती, पाणी, पिके व त्याचबरोबर पैसा या चार घटकांची उत्पादकता वाढविणाऱ्या शेतीचा प्रत्यय घडवला आहे. आज वयाच्या ६७ व्या वर्षीही एखाद्या तरुणालाही लाजवेल, अशा कमालीच्या ऊर्जेने पहाटेपासून ते रात्रीपर्यंत शर्मा एक ध्यास, एक व्रत घेऊन शेतीशी एकरूप झालेले असतात. गुरुकुल अन्‌ प्रयोगशाळा यवतमाळ शहरापासून सुमारे २० किलोमीटरवरील तिवसा येथे शर्मा यांची वडिलोपार्जित १० एकर शेती आहे. त्याच ठिकाणी सात एकर शेती भाडेतत्त्वावर घेतली आहे. हे संपूर्ण १७ एकर क्षेत्र शेतीचे मोठे गुरुकुलच आहे. यवतमाळपासून सुमारे चार किलोमीटवरील पारवा येथेही मित्राची शंभर एकर शेती शर्मा यांनी कसण्यास घेतली आहे. त्यांची ही प्रयोगशाळा आहे. इथं जमिनीची सुपीकता बळकट केली जातीय. त्यातून पुरेपूर उत्पादन व त्याचे पैसे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोणत्याही रासायनिक फवारण्यांशिवाय पीक अवशेषांचा भरपूर वापर करून पहिल्याच वर्षी तुरीचं एकरी सहा क्विंटल उत्पादन त्यांनी घेतलं. हळूहळू ही जमीन सुपीक होत जाईल तसं हे उत्पादन १२ ते १५ क्विंटलपर्यंत पोचेल. कंटूर पध्दत आणि छोटे वाफे करून मेथी व चारा पिके घेण्यात आली आहेत. कमी पाण्यात येणाऱ्या व जमिनीची सुपीकता टिकवणाऱ्या ऊस शेतीच्या मॉडेलवरही याच क्षेत्रात चाचण्या सुरू आहेत. शर्मा यांची शेती का अभ्यासायची?

  • ती व्यावहारिक, व्यावसायिक आहे.
  • -शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास शिकवते.
  • आतबट्ट्याची शेती उपयोगाची नाही असे शर्मा सांगतात. कर्जबाजारी होण्याची गरज नाही. उधार कोणाकडून घेण्याची गरज नाही.
  • पर्यावरणप्रधान शेती

  • वृक्षसंपदेतून नैसर्गिक अधिवास जपला. एकूण क्षेत्रापैकी १० टक्के क्षेत्रात विविध वन्यझाडे.
  • शंभर एकरांवरील जागेत १२ ते १५ हजारांपर्यंत विविध झाडांची संपदा. जणू विविध पक्ष्यांचे अभयारण्यच. त्यांच्याद्वारे किडींचे नियंत्रणही होते.
  • पीक पध्दती

  • मुख्य पिके- -तूर, हरभरा, सोयाबीन, कांदा, कांदा पात, वांगी, टोमॅटो, कोथिंबीर, धने (बीजोत्पादन), मेथी, कोहळा, आंबा, पेरू, चारा पिके
  • बहुविध पीक पध्दती. वर्षभर आठ ते दहा पिकांहून अधिक पिके
  • सन १९९४ पासून म्हणजे सुमारे २४ वर्षांपासून शंभर टक्के नैसर्गिक शेती. रासायनिक खते, कीडनाशके यांचा वापर नाही.
  • फवारणी हा शब्दच कोषातच नाही. अगदी दशपर्णी अर्काची देखील फवारणी नाही.
  • शेतावरच सेंद्रिय खते तयार करायची. स्वतः तयार केलेले अलौकीक नावाचे व जीवामृत खत यांचाच केवळ वापर
  • पीक अवशेष, हिरवळीची खते अर्थात बायोमासचा भरपूर वापर
  • देशी बियाणे वापरायचे. आपल्याच शेतात ते तयार करायचे. म्हणजेच बियाण्यात स्वयंपूर्णतः
  • त्यातून संकरित बियाणांवरील मोठा खर्च वाचवला जातो.
  • जे पीक यापूर्वी कधी घेतले नाही त्याबाबत काहीही माहिती नसल्याची प्रांजळ कबुली देण्याचा मनाचा प्रामाणीकपणा.
  • लागवडीचे अंतर, एकरी झाडांची संख्या, प्रत्येक झाडाला फुले, फळे, शेंगा वा घाटे किती असा प्रत्येक इंचावरचा उत्पादनाचा व गणीतीय हिशोब
  • मातीची सुपीकता, सेंद्रिय कर्ब

  • माती प्रचंड सुपीक, मजबूत, निरोगी करा. ती सर्व काही द्यायला समर्थ आहे ही धारणा.
  • काही वर्षांपूर्वी विकाव्या लागलेल्या मूळ जमिनीत २००४ मध्ये सेंद्रिय कर्ब तब्बल १.६२ ते २.४८ टक्के आढळला. तर २०१४ मध्ये तीवसा इथल्या जमिनीतही हे प्रमाण ०.९ ते १ टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात आढळले. पाणी व्यवस्थापन
  • कंटूर पध्दत हा शर्मा यांच्या शेतीचा आत्मा. जवळपास सर्व पिके याच पध्दतीने. त्यात
  • उत्पादन दुपटीने वाढण्याची क्षमता.
  • खरिपात पावसाचे पाणी जागेवर अडवायचे, ते शिवाराबाहेर जाऊ द्यायचे नाही. भूगर्भात मुरवायचे. त्यावर रब्बी व उन्हाळा असे दोन्ही हंगाम चालवायचे.
  • पाण्याची उत्पादकता वाढवणारी शेती.
  • काही वर्षांपूर्वीची वाळलेली आंब्याची बाग चरी खोदून वा ट्रेंचिंगद्वारे ओलावा तयार करून पुनरूज्जीवित केली. त्यातून झाडे मोहोरली असून नंदनवनात फळे लगडतील.
  • मजूर व्यवस्थापन.

  • मजुरांचे सक्षम व्यवस्थापन. मजूरवर्ग हा आपली मुलेच किंवा कुटूंबाचा भाग आहे असे समजून त्यांच्याशी वागणूक. त्यांना दरवर्षी अन्य राज्यांच्या सहलींचा अनुभव.
  • सुमारे १३ मजूर कायमस्वरूपी. त्यांच्यासाठी घरे व गरजु सुविधा
  • तापमान कोणती पिके कोणत्या तापमानाला कसा प्रतिसाद देतात याचा चांगला अभ्यास. त्यानुसार विविध कालावधीत लागवड व फेरपालट मार्केटिंग

  • बाजारपेठांचा प्रचंड अभ्यास. त्यानुसार प्रत्येक पीक निवडावे.
  • दर अभ्यासून बीजोत्पादन वा मालाचे मूल्यवर्धन
  • भाजीपाला मालाची यवतमाळला व्यापाऱ्यांना विक्री
  • कडधान्यांची ग्राहकांना थेट विक्री
  • शेती तंत्रज्ञानाचा प्रसार

  • ज्ञान आपल्यापुरते सीमित न ठेवता प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे देशभरातील हजारांहून अधिक शेतकऱ्यांत त्याचा प्रसार
  • स्वतःच्या शेतावर दोन दिवसीय सातत्याने प्रशिक्षण. प्रतिबॅच शेतकऱ्यांची संख्या ५० पर्यंतच ठेवण्यावर भर.
  • केरळ, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, जम्मू- काश्‍मीर, गोवा आदी राज्ये वगळता देशातील बहुतांश
  • राज्यातील शेतकऱ्यांना प्रशिक्षण किंवा ज्ञानाचे बिजारोपण
  • हजारो शेतकऱी प्रयोग पाहण्यासाठी शर्मा यांच्या शेतीला भेटी देतात. या व्यतिरिक्त कृषी शास्त्रज्ञ, कुलगुरू, जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांनीही शेताला भेट दिली आहे.
  • पुरस्कार

  • कृषिभूषण पुरस्कार (२०१२), शेतीनिष्ठ
  • -सन २०१८ मध्ये मराठी साहित्य संमेलनात पुरस्काराने गौरव
  • सर्व काही निसर्गाने, आईने भरभरून दिले आहे. त्याहून मोठा पुरस्कार तो कोणता? असे शर्मा म्हणतात.
  • संपर्क -  सुभाष शर्मा-८८३०१७४६६१, ९४२२८६९६२०

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com