शेळ्यांना आहे वर्षभर मार्केट

शेळ्यासाठी हवेशीर गोठ्याची सोय.
शेळ्यासाठी हवेशीर गोठ्याची सोय.

सांगली जिल्ह्यातील बामणी (ता. खानापूर, सांगली) येथील तरुण शेतकरी तेजस लेंगरे यांनी कष्ट आणि योग्य व्यवस्थापनातून बंदिस्त शेळीपालन व्यवसाय यशस्वी केला आहे. खानापूरसारख्या दुष्काळी भागात शेतीतून फारसे काही उत्पन्न हाती लागत नाही, असे लक्षात आल्यानंतर त्यांनी शेळीपालन व्यवसायाला सुरवात केली. त्यांच्या शेडमधील शेळ्यांना वर्षभर जागेवरच मार्केट तयार झाले आहे. सन २००६ पासून त्यांचा शेळीपालन व्यवसाय यशस्वीरीत्या  सुरू आहे. केवळ शेळीपालनाकडे लक्ष केंद्रित न करता त्यांनी वाया जाणारा चारा आणि लेंडीखतापासून गांडूळ खतनिर्मिती केली आहे. असा आहे गोठा 

  •    सध्या २५० आफ्रिकन बोअर शेळ्या आणि १०० बिटल शेळ्यांचे व्यवस्थापन.
  •    गोठा क्र.१ः  १५० फूट लांब बाय ५० फूट रुंद
  •    गोठा क्र.२ ः १८० फूट लांब बाय ५५  फूट रुंद
  •    लोखंडी पट्ट्यांच्या साह्याने प्रत्येक गाळा बंदिस्त.
  •    चारा कुट्टी देण्यासाठी गव्हाणीची सोय. त्यामुळे चाऱ्यामध्ये बचत.
  •    प्रत्येक गाळ्यात सिमेंटच्या खांबाजवळ शेळ्यांना पाणी पिण्यासाठी लहान बादलीची व्यवस्था. पुरेसे पाणी उपलब्ध होण्यासाठी नळाची जोडणी.
  • गांडूळ खतनिर्मिती 

  •    ५० फूट बाय ५० फूट आणि २० फूट बाय ७० फूट गांडूळ खतनिर्मितीच्या दोन शेड. 
  •    शेडमध्ये व्हर्मीवॉश गोळा करणे सोपे जाण्यासाठी लोखंडी बेड तयार केले आहेत.
  •    बंदिस्त शेळीपालनातून महिन्याला १० टन गांडूळ खतनिर्मिती.
  •    रोज २० किलोच्या २० बॅगांची विक्री
  •    २० किलोची बॅग ३०० रुपये दराने विक्री.
  • खाद्य नियोजन 

  •    सुका चारा म्हणून तुरीचा भुसा दिला जातो.
  •    सकाळी १० ते ११, दुपारी ४ ते ५, संध्याकाळी ७ ते ८ या वेळेत ओला चारा. मोठ्या शेळ्यांना चार ते पाच किलो व लहान पिलांना दीड ते दोन किलो चारा दिला जातो.
  •    मका व गोळी पेंड मिक्‍स करून दिली जाते.
  •    प्रथिनांसाठी पावडर पाण्यातून दिली जाते.
  • दैनंदिन व्यवस्थापन 

  •    शेडमध्ये शहाबादी फरशी बसविलेली आहे. सकाळ-संध्याकाळ शेडची स्वच्छता.
  •    गव्हाणी स्वच्छ करून शिल्लक चारा बाहेर काढला जातो. गांडूळ खतासाठी वापरला जातो.
  •    पिण्याचे पाणी बदलले जाते. 
  •    दहा दिवसातून एकदा शेड निर्जंतुक केली जाते. त्यामुळे आजारांचे प्रमाण कमी राहते.
  •    सुमारे तीन एकर क्षेत्रावर शेळ्यांसाठी लसूण घास, शेवरी, मका, तुती या चारा पिकांची लागवड.
  •    दर महिन्याला शेळ्यांचे वजन घेतले जाते.
  •    दिवसाला साधारण २०० ग्रॅम वजन वाढ मिळते.
  • आरोग्य व्यवस्थापन

  •    शेळ्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली. लहान करडांची विशेष काळजी घेतली जाते. 
  •    सकाळी गोठा साफ करताना शेळीच्या माजाची लक्षणे ओळखणे गरजेचे असते.
  •    लाळ्या खुरकत, घटसर्प त्याचबरोबर पीपीआर, एफएमडी रोग नियंत्रणासाठी शिफारशीनुसार लसीकरण.
  •    पोट फुगणे, हगवण, जीभेला काटे येणे या बाबींवर विशेष लक्ष दिले जाते.
  • वजनावर होते विक्री

  •    बकरी ईदसाठी मोठ्या नरांना चांगली मागणी
  •    आफ्रिकन बोअर ः मादी- १५०० रुपये किलो
  •    आफ्रिकन बोअर ः नर- १००० रुपये किलो
  •    बिटल ः ५०० रुपये किलो 
  •    दीड वर्षात नराचे वजन १०० किलोपर्यंत होते. सरासरी ७० हजारांपर्यंत दर मिळतो.
  •    पैदासीसाठी नर व मादीची विक्री.

  •    संकरीकरणासाठी दरवर्षी नवीन नर खरेदी केला जातो.
  •    काही वेळा गाभण शेळीलाही शेतकऱ्यांकडून मागणी.
  •    बहुतांशी शेळी, बोकडांची विक्री जागेवरून होते. करडे, बोकडाच्या बरोबरीने शेळ्यांनाही चांगली मागणी आहे.
  •  ः तेजस लेंगरे, ९८८१२१३०००

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com