agriculture story in Marathi, success story of young farmer Sandeep Bhagwat from yerandgaon | Agrowon

नोकरीपेक्षा शेतीच यशस्वी करण्याचा ध्यास

सूर्यकांत नेटके
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

एरंडगाव (ता. शेवगाव, जि. नगर) येथील संदीप प्रभाकर भागवत यांनी काही काळ खासगी कारखान्यात नोकरी केली. मात्र नोकरीपेक्षाही शेतीतूनच अधिक उत्पन्न मिळवण्याचा ध्यास त्यांनी घेतला. शेतीला भांडवल उभे करण्यासाठी सुरवातीला काही वर्षे दुग्धव्यवसाय सुरू केला. भाऊ अविनाश यांच्या मदतीने पडीक शेती वहिती करत डाळिंब आणि उसाची लागवड केली.  आज हीच दोन मुख्य पिके त्यांच्या शेतीचे मुख्य आधार बनले आहेत. 

एरंडगाव (ता. शेवगाव, जि. नगर) येथील संदीप प्रभाकर भागवत यांनी काही काळ खासगी कारखान्यात नोकरी केली. मात्र नोकरीपेक्षाही शेतीतूनच अधिक उत्पन्न मिळवण्याचा ध्यास त्यांनी घेतला. शेतीला भांडवल उभे करण्यासाठी सुरवातीला काही वर्षे दुग्धव्यवसाय सुरू केला. भाऊ अविनाश यांच्या मदतीने पडीक शेती वहिती करत डाळिंब आणि उसाची लागवड केली.  आज हीच दोन मुख्य पिके त्यांच्या शेतीचे मुख्य आधार बनले आहेत. 

न गर जिल्ह्यात शेवगाव तालुक्‍याच्या उत्तर भागातील गावांना जायकवाडी मध्यम प्रकल्पाच्या पाण्याचा आधार आहे. त्यामुळे या भागातील बहुतांश शेतकरी ऊस घेतात. एरंडगाव (ता. शेवगाव) येथील संदीप आणि अविनाश हे दोघे भागवत बंधू आपली २४ एकर शेती सांभाळतात. 

संदीप यांनी दहावीनंतर ‘आयटीआय’चे प्रशिक्षण घेतले. आजोबा किसन बाजीराव भागवत हे जुन्या पिढीतील प्राथमिक सेवानिवृत्त शिक्षक. त्यामुळे शेतीकडे लक्ष द्यायला त्यांना तुलनेने वेळ कमी मिळे. बाजरी, ज्वारी, तूर अशी पिके घेतली जायची. अर्ध्याहून अधिक शेती पडीक होती. संजय यांनी पडीक शेतीला वहिती केले. पाणी उपलब्धतेसाठी तीन विहिरी आहेत. शिवाय जायकवाडी प्रकल्पातून दोन पाइपलाइन केल्या आहेत.

नोकरीपेक्षा शेती भली 
संदीप १९९८ मध्ये ‘आयटीआय’मधून इलेक्‍ट्रीशियन झाले. त्यानंतर नगर ‘एमआयडीसीमध्ये खाजगी कंपनीत नोकरी स्वीकारली. दोन वर्षे तेथे काम केले. मात्र नोकरीपेक्षाही गावची आणि शेतीची अोढ अधिक होती. शिवाय शेतीत चांगले करिअर केले तर नोकरीपेक्षा चांगले उत्पन्न मिळण्याची संधी होती. अखेर २००३ मध्ये नोकरी सोडून ते गावी परतले. क्षेत्र बरेच असले तरी हलक्‍या प्रतीची आणि ओबडधोबड जमीन होती. ती पिकाऊ करण्यासाठी पुरेसे भांडवल नव्हते. मग २००६ मध्ये सात गायी  घेऊन दुग्धव्यवसाय सुरू केला. तो दोन वर्षे जोपासला. त्या काळात जवळपास शंभर लिटर दूध संकलित व्हायचे. पुढे खर्च, मजूरबळ आदी समस्या वाढल्या. अखेर व्यवसाय बंद करत गायींची केली. त्यातून साडेतीन लाख रुपये उत्पन्न मिळाले. त्यातून २००८ मध्ये जुना टॅंकर खरेदी केला. दोन वर्षांनी त्याची विक्री करून नवा ट्रॅक्‍टर खरेदी केला. 
पीक पद्धती विकसित केली 
पूर्वी अवघ्या तीन एकर क्षेत्रावरच पिके घेतली जात. उर्वरित क्षेत्र पडीकच होते. संदीप आणि अविनाश यांनी शेतीची सूत्रे २००८ मध्ये हाती घेतली. सध्या ऊस व डाळिंब अशी दोन पिके त्यांनी निश्चित केली आहेत. आठ एकर डाळिंब; तर १२ एकरांवर ऊस आहे. सुरवातीला तीन एकर उसाची लागवड केली. टप्प्याटप्प्याने क्षेत्र वाढवले. जोड अोळ पद्धतीचा ऊस आहेच. शिवाय पट्टा पद्धतीनेही लागवड सुरू केली. सध्या तीन एकर जोड अोळ; तर नऊ एकर पाच फूट सरी पद्धतीची लागवड आहे. सुमारे सात एकर क्षेत्रावर ठिबक आहे. सुरवातीला एकरी २५ ते ३० टन  उत्पादन मिळायचे. आता ते ४५ ते ५५ टनांपर्यंत मिळते. पाण्याचे नियोजन आणि शेणखताचा वापर हे दोन मुख्य बदल केले आहेत. 

टप्प्याटप्प्याने डाळिंब लागवड 

 •    जायकवाडी प्रकल्पामुळे पुरेसे पाणी उपलब्ध असलेल्या एरंडगाव परिसरात बहुतांश शेतकरी उसाचे पीक घेतात. या शिवारात केवळ एकाकडे एक एकर डाळिंब होते. मात्र काही कारणामुळे ते यशस्वी होऊ शकले नाही.
 •    भागवत बंधूंनी उसाबाबत डाळिंब लागवडीचा निश्‍चय केला. त्यासाठी पाच सहकाऱ्यांना घेऊन डाळिंब शेतीतील सल्लागारांचे मार्गदर्शन घेतले.
 •    तीन लाख खर्च करून जमीन चांगली बनवली. सन २०११ मध्ये अडीच एकरांवर भगवा डाळिंबाची लागवड केली. अडीत एकरांत पहिले उत्पादन आठ टन मिळाले. 
 •    विक्री व्यवस्थापनाचा अनुभव नव्हता. मात्र अभ्यास करून राहाता बाजार समितीत विक्री केली.
 •    सन २०१३ मध्ये पुन्हा अडीच एकरांवर डाळिंब लावले. चाळीस रुपये प्रतिकिलो दराने राहात्यातील व्यापाऱ्यांनी जागेवरूनच खरेदी केली.
 •    आत्मविश्‍वास वाढल्याने पुन्हा २०१५ मध्ये तीन एकरांवर लागवड केली.  
 •    यंदा आठ एकरांत ६८ टन उत्पादन मिळाले आहे. ए प्रतिच्या उत्पादनाला ३८ रुपये प्रतिकिलो दर मिळाला. मात्र सध्या किलोला २० ते २५ रुपये एवढाच दर सुरू असल्याचे संदीप यांनी सांगितले.

बहर धरण्यात केला बदल
सुरवातीच्या काळात हस्तबहर धरला जायचा. फळे मार्च-एप्रिलमध्ये विक्रीस यायची. आता आंबेबहर धरण्यात येतो. जुलै-ऑगस्टमध्ये डाळिंबे विक्रीस येतात. या हंगामात मागणी तुलनेने चांगली असल्याने दर बऱ्यापैकी मिळतो, असा संदीप यांचा अनुभव आहे.  

व्यवस्थापनातील मुद्दे 

 •    घरातील सुमारे सहा सदस्य शेतीत राबतात. त्यामुळे मजूरबळ व त्यावरील खर्चात बचत केली आहे.                      
 •    डाळिंबाच्या प्रति झाडाला दहा किलो शेणखत, एक किलो निंबोळीपेंडीचा वर्षातून एकदा वापर 
 •    एरडंगाव परिसरात मुबलक पाणी उपलब्ध असले तरी सर्व आठ एकराला ठिबकचा वापर
 •    उन्हाळ्यात पश्चिमेकडून पूर्वेकडे वारे वाहतात. यामुळे पश्‍चिम व दक्षिण बाजूकडे पाण्याचे बाष्पीभवन होण्याचे प्रमाण जास्त असते. याच काळात झाडाला फळे लागतात. त्यामुळे झाडाला पाणी कमी पडू नये व पुरेसे पाणी नियोजन यासाठी डबल लॅटरल पद्धतीचा वापर केला आहे. 
 •    रानडुकरांचा त्रास टाळण्यासाठी जागोजागी प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर केला आहे. 

  संपर्क  : संदीप भागवत, ९८८१०८११८२,  : अविनाश भागवत-९८८१६८२३५६


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
शेतकरी सक्षमीकरण हेच असावे धोरण यावर्षी पावसाळा वेळेवर सुरू झाला. बेताबेताने...
अवजारे, अनुदान अन् अनागोंदीअवजारे अनुदानाच्या योजना आणि त्यातील अनागोंदींचे...
कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी...पुणे ः मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा,...
निम्म्या महाराष्ट्रातून मॉन्सूनची माघार पुणे : परतीच्या मॉन्सूनने गेल्या आठवड्यापासून...
‘जाॅइंट अॅग्रेस्को’ आजपासून अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व...
निकृष्ट सोयाबीन बियाणे प्रकरणी ...अकोला ः खरीप हंगामात सोयाबीन बियाणे उगवले...
कांदा दरात एक हजारापर्यंत घसरण, शेतकरी...नाशिक: कांद्याच्या वाढत्या दरावर नियंत्रण...
पावसाने सोयाबीनचे आगार उद्ध्वस्त वाशीमः वेळ दुपारची...काही भागात ऊन होते...काही...
प्रदूषणावर तोडग्यासाठी लवकरच कायदा :...नवी दिल्ली : शेतातील काडीकचरा जाळण्याचे प्रकार...
राज्यात १०८ कोटी लिटर इथेनॉल निर्मितीचे...पुणे: राज्यात यंदा जास्त ऊस उत्पादनाची शक्यता...
शरद पवार यांच्या उपस्थितीत ऊसतोडणी...नगर ः ऊसतोडणी मजुरांच्या प्रश्‍नावर तोडगा...
बारकाईने जाणून घ्या शेतकरी अपघात विमा...राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेली गोपीनाथ मुंडे...
पिंपळगावला आडत्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक: निफाड तालुक्यातील कारसूळ येथील शेतकरी...
अवजारे अनुदानाचे निकष वाढवलेपुणे : राज्यात कृषी अवजारे अनुदानासाठी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका...
बदल्या, मारहाण, लाचखोरीने गाजतेय राहुरी...पुणे: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आवारात...
मॉन्सूनच्या माघारीस पोषक वातावरण पुणे : मॉन्सून दोन दिवसांत उत्तर महाराष्ट्र व...
काही ठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कमी झाला...
व्यापाऱ्यांवरील कांदा साठा...पुणे/नाशिक: पुरवठा कमी असल्याने देशभरात कांद्याची...
पावसानं पांढऱ्या सोन्याची झाली माती !औरंगाबाद: यंदा पाऊस चांगला सांगितल्याने शेतीच्या...