Agriculture story in marathi, sugarcane fodder processing | Agrowon

उसाच्या वाढ्याची पौष्टिकता वाढवा
डॉ. सचिन रहाणे, डॉ. शरद लोंढे
बुधवार, 16 जानेवारी 2019

जनावरांच्या आहारात सतत वाढ्याचा समावेश केल्यामुळे शरिराला आवश्यक असणाऱ्या घटकांची कमतरता निर्माण होऊन दुग्धोत्पादन व प्रजनन क्षमता कमी होते. जनावरे गाभण राहत नाहीत व वारंवार उलटतात. त्यामुळे वाढे किंवा निकृष्ट चाऱ्यावर चुन्याची प्रक्रिया करावी.

जनावरांच्या आहारात सतत वाढ्याचा समावेश केल्यामुळे शरिराला आवश्यक असणाऱ्या घटकांची कमतरता निर्माण होऊन दुग्धोत्पादन व प्रजनन क्षमता कमी होते. जनावरे गाभण राहत नाहीत व वारंवार उलटतात. त्यामुळे वाढे किंवा निकृष्ट चाऱ्यावर चुन्याची प्रक्रिया करावी.

ऊस हे महाराष्ट्रातील प्रमुख पीक मानले जाते. त्यामुळे उसाच्या वाढ्याचा जनावरांच्या चाऱ्यात मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. दुष्काळात चारा छावण्यात वाढ्याचा व उसाचा स्वस्त आणि एकमेव उपलब्ध चारा म्हणून वापर होत असतो. वाढ्याचा मोठ्या प्रमाणावर व सातत्याने चारा म्हणून वापर केल्याने जनावरांच्या प्रकृतीवर व दुग्धोत्पादनावर अनिष्ट परिणाम दिसू लागले आहेत. त्याचे कारण म्हणजे वाढ्यामध्ये आॅक्झालेट नावाचा घटक मोठ्या प्रमाणावर असतो. हा घटक जनावरांकडून पचवला जात नाही, तसेच शरीरातून बाहेर पडताना कॅल्शियम बरोबर कॅल्शियम आॅक्झालेट नावाचे संयुग बनवून कॅल्शियमलाही बाहेर घेऊन जातो. अशाप्रकारे शरीरातील कॅल्शियम कमी झाल्याने आतड्यामधून फॉस्फरस नावाचा घटकही कमी प्रमाणात शोषला जातो. परिणामी शरीराला आवश्यक असणाऱ्या दोन्हीही क्षार घटकांची कमतरता होते. त्यामुळे दुग्धोत्पादन व प्रजनन क्षमता कमी होते. जनावरे गाभण राहत नाहीत व वारंवार उलटतात. आॅक्झालेट चाऱ्यातून कमी करण्यासाठी चाऱ्यावर चुन्याच्या निवळीची प्रक्रिया करणे उपयुक्त ठरते.

१) चुन्याच्या निवळीची प्रक्रिया
साहित्य ः कळीचा चुना, मीठ, झारी, पाणी साठविण्याचा पिंप, उसाचे वाढे इ.
प्रक्रिया

 • दोन किलो कळीच्या चुन्यात १५ ते २० लिटर पाणी टाकून मातीच्या रांजणात किंवा प्लॅस्टिकच्या कॅनमध्ये ठेवावे. त्यातून दर बारा तासांनी ३ लिटर पर्यंत निवळी काढता येईल. त्याचबरोबर मिठाचे २ टक्के द्रावण स्वतंत्र बनवावे.
 • स्वच्छ व टणक जमिनीवर वाढ्याचा एक थर पसरावा व झारीच्या सहाय्याने त्यावर चुन्याची निवळी व मिठाचे द्रावण फवारावे. त्यावर दुसरा थर देऊन पुन्हा द्रावण फवारावे. असे थरावर थर रचून ठेवावेत किंवा कुट्टी करूनही त्यात द्रावण फवारून २४ ते ४८ तासांनी हे वाढे जनावरांना खाऊ घालावेत.
 • वाढे वाळवून साठवायचे असल्यास सुद्धा अशी प्रक्रिया करून साठवून ठेवता येइल.

प्रक्रिया केल्याने होणारे रासायनिक बदल

 • निवळीतील कॅल्शियम वाढ्यातील आॅक्झालेट बरोबर जोडले जाऊन कॅल्शियम ओक्झालेट नावाचे संयुग तयार होते.
 • शरीरात होणारी क्रिया चाऱ्यावर प्रक्रिया केल्याने शरीराबाहेरच होते व शरीरातील कॅल्शियमवर काहीही परिणाम होत नाही.
 • आॅक्झालेट बरोबर प्रक्रिया होऊनही काही कॅल्शियम शिल्लक राहिल्यास त्याचा जनावरांना फायदाच होतो.

प्रक्रियेचे फायदे

 • अतिशय स्वस्त व सोपी प्रक्रिया असल्यामुळे निकृष्ट वाढ्याची पौष्टिकता वाढते.
 • शरीरातील क्षार खनिजांचे प्रमाण टिकून राहिल्याने दुग्धोत्पादन टिकवून ठेवण्यास मदत मिळते तसेच प्रजनन क्षमता सुधारते.

२) वाढ्याचा मुरघास
ऑक्झालेट हा घटक अधिक असणे, प्रथिने कमी असणे तसेच पाचकता कमी असणे यामुळे वाढे चारा म्हणून योग्य नाही. यावर उपाय म्हणून वाढ्याचा मुरघास बनविताना खालील गोष्टी केल्यास त्याचे पौष्टिक चाऱ्यात रुपांतर होऊ शकते.

 • ऑक्झालेट कमी करण्यासाठी वाढयाचा मुरघास बनविताना त्यात बॅसिलस सबटीलीस हे महत्त्वाचे व इतर जिवाणू असलेले मुरघास कल्चर वापरावे.
 • एका टनास ५ किलो युरिया वापरल्यास प्रथिनांत ७ टक्के पेक्षा अधिक वाढ होते तसेच ऑक्झालेट कमी होण्यासही मदत होते.
 • झायलानेज सारखे विकर व बाजारातील काही उत्पादनांमध्ये या विकराचे काम वाढवणारे घटक (Xylanase potentiating factor) उपलब्ध आहेत त्यांचा वापर वाढयाचा मुरघास बनविताना केल्यास त्याच्या पेशिभित्तिका मधील लिग्निन सारखे कठीण कर्बोदकांचे हेमीसेल्युलोज बरोबर असलेले घट्ट बंध तुटण्यास मदत होते. त्याच्या आवरणाच्या आतील बाजूस असलेले सेल्युलोज व हेमीसेल्युलोज रुमेन मधील सूक्ष्म जिवाणू कडून पचविण्यास उपलब्ध होऊन त्याची पचनियता मोठ्या प्रमाणात वाढते.
 • या समजण्यास क्लीष्ट; परंतु वापरण्यास सोप्या व स्वस्त तंत्रज्ञानाचे एका कंपनीकडे अमेरिकन पेटंट सुद्धा आहे. वरील प्रक्रिया वाळलेल्या चाऱ्याच्या बाबतीतही करता येते व त्यातील एरव्ही अपचनिय असलेले बहुमूल्य पौष्टीक मूल्ये पाचक बनवून जनावराच्या रक्तापर्यंत पोचवीता येतात.

संपर्क ः डॉ. सचिन रहाणे, ७०३८५३५१८१
डॉ. शरद लोंढे, ९६०४३७६२११
(पशुधन विकास अधिकारी, आणि सदस्य ‘चारा साक्षरता अभियान’ समन्वय समिती, पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन)

 

इतर कृषिपूरक
शिंगांच्या कर्करोगाकडे नको दुर्लक्ष शिंगांचा कर्करोग साधारणपणे ५ ते १० वर्ष वयोगटातील...
आंत्रविषार,प्लेग आजारावर प्रतिबंधात्मक...आंत्रविषार आजार प्रामुख्याने शेळ्या, मेंढ्यांना...
संसर्गजन्य आजारांबद्दल जागरूक रहापावसाळी वातावरणात जनावरांना साथीच्या आजारांचा...
पूर परिस्थितीमधील जनावरांचे व्यवस्थापन महापुराच्या प्रलयामुळे जनावरांचे आरोग्य अडचणीत...
दुभत्या गाई-म्हशींची जैवसुरक्षितता...दुभत्या गाई-म्हशींमधील रोगांचा प्रादुर्भाव...
जनावरांतील विषबाधा टाळाशेतात बियाणे प्रक्रिया करताना नजरचुकीने काही वेळा...
शेळ्यांचे आरोग्य, प्रजनन महत्त्वाचेशेळीपालनाद्वारे चांगले उत्पादन मिळविण्यासाठी...
गाई, म्हशींच्या प्रजननावर द्या लक्षवेगवेगळ्या ऋतूंमध्ये गाई, म्हशींच्या व्यवस्थापनात...
जनावरांतील पोटफुगीकडे नको दुर्लक्षपोटफुगीने त्रस्त असलेले जनावर सारखे ओरडते....
जनावरांना होते घाणेरीची विषबाधा मोकळ्या कुरणात जनावरे चरताना घाणेरी वनस्पती...
‘पोल्ट्री वेस्ट’ने भागवली विजेची...परभणी येथून पशुवैद्यकशास्त्राची पदवी, त्यानंतर...
गोठ्याची स्वच्छता ठेवा, माश्यांवर...गोठ्यामध्ये अस्वच्छता असल्यास माश्यांचा...
गाभण जनावरांकडे द्या लक्षपावसाळी काळात वातावरणात बदल होत असतात....
जनावरांच्या आरोग्याकडे द्या लक्ष गोठ्यातील ओलसर व कोंदट वातावरणामुळे जनावरांच्या...
प्रक्रियेतून वाढवा कोरड्या चाऱ्याची...निकृष्ट दर्जाच्या कोरड्या चाऱ्यावर प्रक्रिया करून...
चिकन, मांस विक्रीसाठी गुणवत्ता नियमचिकन, मांस विक्रेत्यांना परवाना घेण्यासाठी...
निवड दुधाळ गाई, म्हशींची...दुग्ध व्यवसायासाठी गाई, म्हशींची निवड करताना...
कोवळ्या ज्वारीच्या विषबाधेपासून जनावरे...कोवळ्या ज्वारीची पाने अधिक प्रमाणात खाल्ल्याने...
कोंबड्यांच्या आरोग्याकडे द्या लक्षपावसाळ्यात मुख्यतः शेड, खाद्य,पाणी आणि लिटरचे...
पशुआहारात वापरा शतावरीजनावरांच्या स्वास्थासाठी वनौषधींचा उपयोग फायदेशीर...