agriculture story in marathi, sugarcane inter cropping farming, profitable ridge gourd farming, | Agrowon

उसातील आंतरपिकांतून उंचावले शेतीचे अर्थकारण

संदीप नवले
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

 वढू बु. (ता. शिरूर) येथील अनिल भंडारे यांनी उसात फ्लॉवर, दोडका यांसारखी आंतरपिके घेण्याची पद्धत अवलंबून मुख्य पिकातील खर्च कमी केला आहे. सोबतच कारले, टोमॅटो आदी भाजीपाला पिकांची जोड देत त्यांनी शेतीचे अर्थकारण उंचावले आहे.
 

 वढू बु. (ता. शिरूर) येथील अनिल भंडारे यांनी उसात फ्लॉवर, दोडका यांसारखी आंतरपिके घेण्याची पद्धत अवलंबून मुख्य पिकातील खर्च कमी केला आहे. सोबतच कारले, टोमॅटो आदी भाजीपाला पिकांची जोड देत त्यांनी शेतीचे अर्थकारण उंचावले आहे.
 
पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यातील वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी आहे. यामुळे या गावची ओळख राज्यभर झाली आहे. गावची लोकसंख्या सुमारे सहा हजारांच्या आसपास असून, मुख्य पीक ऊस आहे. मागील काही वर्षांपासून उसातून मिळणारे उत्पन्न व वाढता खर्च लक्षात घेता शेतकरी भाजीपाला व वेलवर्गीय पिकांकडे वळले आहेत. गावात आज जवळपास ३० ते ४० एकरांवर भाजीपाला पिके घेतली जातात.

भंडारे यांची पीकपद्धती
गावात अनिल व नवनाथ या भंडारे बंधूंचे एकत्रित कुटुंब आहे. त्यांची एकूण सहा एकर शेती आहे. बागायती असल्याने तेदेखील मुख्य पीक ऊसच घेतात. मागील चार-पाच वर्षांपासून त्यांनी पीकबदल करण्यास सुरुवात केली. यात टोमॅटो, कारले, ऊस व त्यात प्लॉवर, दोडका, लसूण, हरभरा अशी विविध आंतरपिके ते घेतात. को ८६०३२ या जातीच्या उसाचे उत्पादन घेताना आडसाली व सुरू अशा दोन्ही हंगामांचा विचार असतो. जातेगाव येथील व्यंकटेशकृपा शुगर मिलला ते ऊस पुरवतात. आडसालीचे एकरी ६० टनांपर्यंत तर सुरू हंगामाचे ४५ ते ५० टनांपर्यंत उत्पादन मिळते. अनेक शेतकरी आंतरपीक पद्धतीचा चांगला उपयोग करून घेतात. भंडारे यांनादेखील उसातील दोडका चांगलाच फायदेशीर ठरतो. लागवडीनंतर सुमारे दोन महिन्यांनी उत्पादन सुरू होते. ते पुढे दोन महिने चालते. या पिकाचे एकरी पाच टनांपर्यंत उत्पादन मिळते. दोडक्याला किलोला २५ रुपये दर मिळतो. या पिकाला बाजारात मागणीही चांगली असते. सुमारे एक लाख रुपयांचे उत्पन्न हे पीक मिळवून देते. दिवसाआड काढणी सुरू असल्याने घरखर्चाला लागणारा ताजा पैसाही त्यातून मिळतो. दोडक्याशिवाय फ्लॉवरचा अन्य पर्याय असतो. त्याचे एकरी ८ ते १० टन उत्पादन मिळते. त्याला किलोला १० रुपयांपर्यंतचा दर मिळतो. हे पीक खर्च वजा जाता सुमारे ५० हजार रुपयांचे उत्पन्न कमी कालावधीत देऊन जाते. आंतरपिकांमधून उत्पादन खर्च फार मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याने ऊस हे पीक आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते. एकूणच ऊस व आंतरपीक पद्धतीतून वर्षाला दोन ते सव्वादोन लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळते.

वेलवर्गीय पिकांचा अवलंब
चार ते पाच वर्षांपासून उसाव्यतिरिक्त वेलवर्गीय व भाजीपाला पिकांवर भर देण्यास भंडारे यांनी सुरुवात केली आहे. पंधरा ऑगस्ट ते एक सप्टेंबर आणि १५ ते ३० मार्च अशा दोन वेळेस त्यांची लागवड होते. दोन्ही कालावधीत वेलवर्गीय पिकांना चांगला दर मिळतो असा अनुभव आहे. यंदा नव्यानेच कारल्याची लागवड केली असून, त्यातूनही चांगले उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे.

मंडपाचा आधार
वेलवर्गीय पिकांत लोखंडी तारा व बांबूंचा वापर करून मंडप तयार केला जातो. त्यामुळे वाढीच्या अवस्थेत असताना आधार मिळून वेलांची वाढ चांगली होते. परिणामी फुलांची संख्या वाढून मोठ्या प्रमाणात फळे लागण्यास मदत होते.

ठिबकचा अवंलब 
शेतात विहीर असल्याने पाण्याची मुबलकता आहे. तरीसुद्धा जवळपास सर्वच पिकांसाठी ठिबक सिंचन केले आहे. त्यामुळे पाण्याची मोठी बचत झाली असून, पिकांच्या गरजेनुसारच पाणी दिले जाते.

पॉली मल्चिंगचा वापर
भंडारे प्लॅस्टिक मल्चिंगचा वापर करतात. त्यामुळे पांढऱ्या मुळांची वाढ चांगली होऊन उत्पादनात वाढ होते. याशिवाय पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेगही मंदावून कमी पाण्यात चांगले पीक घेता येते.

रासायनिक खतांचा कमी वापर
सेंद्रिय घटकांचा वापर वाढवून रासायनिक खतांचा वापर कमी करण्यावर भर दिला आहे. साहजिकच खर्चात बचत होते. याशिवाय ग्राहकांनाही चांगल्या प्रतिचा माल देता येतो. जीवामृत व गोमूत्राचा वापर केल्याने रोग-किडींचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. याशिवाय आंबट ताकाची फवारणी होते. सेंद्रिय निविष्ठा उपलब्ध होण्यासाठी तीन खिलारी गायींचा सांभाळ केला आहे.

विक्री व्यवस्था
वाहतूक करताना दोडक्याची प्रत खराब होऊ नये म्हणून विशेष काळजी घेण्यात येते. कारण डाग पडल्यास त्याला कमी दर मिळतो. ग्रेडिंग करून क्रेटमध्ये भरून मगच बाजारपेठेत तो पाठवण्यात येतो. गावापासून पुणे शहर जवळ असल्याने शहरांच्या उपनगर परिसरातच विक्री करण्यावर भर असतो. परिसरातील चंदननगर, मोशी, कोरेगाव भिमा येथे ग्राहकांना थेट जागेवर ताजा माल उपलब्ध होतो. टोमॅटो प्रतिकिलो ४० रुपये, दोडका ३५ ते ४० रुपये, कारले ४० ते ४५ रुपये, कोबी व फ्लॉवर २५ ते ४० रुपये असा दर असतो.

संपर्क- अनिल भंडारे- ९५५२९८५९६५, ७७०९१३०३३३.


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
सणांच्या हंगामात भाव खाणारी गाडे यांची...कांजळे (ता. भोर, जि. पुणे) येथील विलास गाडे यांनी...
संकटकाळात श्री ब्रॅण्डद्वारे दर्जेदार...नाशिक जिल्ह्यातील वनसगाव येथील शैलेश व संदीप या...
संशोधनवृत्तीला सातत्याची जोड शेतीउपयोगी...प्रत्येक माणसात एक संशोधक दडलेला असतो. अगदी खेळणी...
पशुपालनाने दिली आर्थिक प्रगतीला साथकोळन्हावी (ता. यावल, जि. जळगाव) येथील देवानंद...
दुग्ध व्यवसायातून अल्पभूधारक शेतकऱ्याची...वडिलोपार्जित पाच एकर शेतीमध्ये कुटुंबाचा...
चटणी, मसाल्याचा बनविला ब्रॅण्डकोल्हापूरची खाद्य संस्कृती म्हटलं की, तिखटाबरोबर...
शेती, आरोग्य अन् महिला विकासाची शक्तीगोमेवाडी (ता. आटपाडी, जि. सांगली) येथील ग्रामीण...
लोकसहभागाच्या बळावर मुळेगाव बनले...पाणी, वीज, रस्ते या मूलभूत सोई-सुविधा...
हिवरेबाजार शिवारात सीताफळांचा गोडवाआदर्श गाव हिवरेबाजार (ता.जि. नगर) गावासह...
बारमाही भाजीपाला उत्पादनातून नियमित...सततच्या दुष्काळी स्थितीमुळे शेतकऱ्यांच्या...
शाश्वत उत्पन्नासाठी फळबाग ठरतेय फायदेशीरकेवळ पारंपरिक पिकातून शाश्वत उत्पन्न हाती येत...
शेतीला मिळाली पूरक उद्योगांची जोडभोके (ता. जि.रत्नागिरी) या दुर्गम गावातील देवयानी...
लोकसहभागातून हिंगणगाव झाले ‘पाणी’दारपाणीटंचाई आणि कित्येक वर्षांपासून दुष्काळाशी...
देशी गोपालनाचा शेतीला मिळाला आधारकातरखडक (ता. मुळशी, जि.पुणे) येथील राणी संतोष...
फळबागेने दिली आर्थिक स्थिरतासुदाम देवराव शिंदे यांनी वरुडी (जि. जालना) येथील...
कृषी पर्यटन केंद्र बनलंय तंत्रज्ञान...कुंभारगाव (ता.इंदापूर,जि.पुणे) येथील प्रयोगशील...
आग्या मधमाशी संवर्धनासोबतच स्थानिकांना...परागीकरणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मधमाशांचे...
महिला गटांना मिळाली 'प्रेरणा'रामनगर (ता.जि.जालना) येथील सौ.उषा संदीपान चव्हाण-...
रेशीम शेतीने दिली आर्थिक साथपळासखेडा (ता.जामनेर, जि.जळगाव) येथील राहुल पाटील...
मिश्र पीक पद्धतीतून सावरले बरडे कुटुंबीयजेव्हा यश येते, तेव्हा सर्वजण आपल्या आनंदात सामील...