परिश्रम, सूक्ष्म नियोजनातून शोभिवंत मत्स्यपालन 

शोभीवंत माशांना मार्केट सावंत यांनी आपल्या माशांच्या विक्रीसाठी मुंबईतील व्यापाऱ्यांचा शोध घेतला. त्यांच्याशी बोलणी केली. बहुतांश मार्केट तिथेच असल्याचे ते सांगतात. या व्यतिरिक्त पुणे, कोल्हापूर, पणजी, बेळगाव आदी ठिकाणीही देखील मत्स्यविक्री केली जाते. काही वर्षांपासून या व्यवसायात असल्याने अनेकांपर्यंत व्यवसायाची ओळख झाली आहे. काही व्यापारी शोधत शोधतही खरेदीला येतात.
सावंत यांच्याकडील शोभिवंत मासे
सावंत यांच्याकडील शोभिवंत मासे

नवे प्रयोग करण्याची वृत्ती, मेहनत, सूक्ष्म नियोजन आणि विक्री व्यवस्थेचा अभ्यास याद्वारे नाधवडे (जि. कणकवली) येथील सुहास सावंत यांनी शोभिवंत मत्स्यपालन उद्योग यशस्वी केला आहे. दहा ते पंधराहून अधिक प्रकारच्या माशांची विविधता त्यांच्याकडे आढळते. मुंबईसह, पणजी, कोल्हापूर आदी भागांतही त्यांनी आपल्या शोभिवंत माशांना मार्केट मिळवून आर्थिक उत्पन्नाचा चांगला स्रोत तयार केला आहे.  कणकवली जिल्हा म्हणजे कोकणभूमीचा परिसर. भातशेतीसह आंबा, काजू, नारळ आदी फळबागांनी समृध्द असलेला हा जिल्हा आहे. जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात नाधवडे गाव आहे. येथील सुहास शशिकांत सावंत यांची देखील आंबा, काजू आदींची शेती आहे. नव्या प्रयोगांची आवड असलेल्या सावंत यांनी भाजीपाला व अन्य पिकांचीही शेती केली. यात भेंडी, काकडी, कलिगंड, सूर्यफूल, झेंडू असे प्रयोग केले. बांबूचीही त्यांनी अलीकडेच लागवड केली आहे. सुमारे पाच वर्षांपूर्वी गावातीलच एका तरुणाने शोभिवंत मत्स्यपालन व्यवसाय केला होता. तो पाहिल्यानंतर सावंत यांना देखील त्याकडे वळावयाचे वाटले. त्यांनी या तंत्राचा तसेच बाजारपेठेचा अभ्यास केला. सर्व माहिती संकलित झाल्यानंतर त्यादृष्टीने पाऊले टाकण्यास सुरवात झाली.  शोभिवंत मत्स्यपालनाची तयारी  या व्यवसायासाठी गुंतवणुकीची गरज होती. त्यासाठी केंद्र शासनाच्या मरीन प्रॉडक्ट एक्सपोर्ट ॲन्ड डेव्हलपमेंट अर्थात एमपेडा या संस्थेकडे १५ लाख रुपये गुंतवणुकीचा प्रकल्प अहवाल सादर केला. संस्थेने सर्व माहिती व तपासणी केल्यानंतर सुमारे सहा लाख रुपये मंजूर केले. सन २०१३ मध्ये प्रकल्पाची आखणी सुरू केली. तरी प्रत्यक्ष सुरवात २०१४ मध्ये नाधवडे सरदारवाडी येथील आपल्या स्वमालकीच्या जागेत तीन गुंठे जागेपासून झाली. शोभिवंत मत्स्यपालन हा व्यवसाय कोकणात तसा नवा असल्यामुळे या व्यवसायातील खाचखळगे फारसे कुणाला माहीत असण्याची गरजच नव्हती. त्यामुळे सावंत यांना त्यातील संघर्षातून जावे लागले. मात्र प्रचंड काम करण्याची क्षमता, त्यातील सातत्य आणि चिकाटी यातून व्यवसायात टिकून राहणे शक्य झाले. जसजसा अनुभव तयार होऊ लागला तसतशी  व्यवसायावर पकड येऊ लागली. आज पाच वर्षांच्या कालावधीनंतर त्यातील यश अनुभवण्या, येऊ लागले आहे.  व्यवसायातील व्यवस्थापन 

  • सध्या मोठे २२ सिमेंट टँक तर लहान सिमेंट टँक २० आहेत. काचेचे टँक ९० आहेत. 
  • लोखंडी स्टँन्ड सुमारे १५ आहेत. 
  • टँकची एकूण क्षमता २० हजार मासे इतकी आहे. आणलेल्या मत्स्यबिजांमध्ये माशांची मरतूक १० टक्के तरी धरावी लागते. 
  • शोभिवंत प्रकारातील कोणत्या माशांना मागणी आहे? कोणते खाद्य घातल्यानतंर चांगली वाढ होते याचा अभ्यास सावंत त्यांनी स्वतःहून केला. आज विविध प्रकारच्या माशांचे संगोपन ते करीत आहेत. मुंबई परिसरात या माशांची पैदास करणाऱ्या व्यक्ती आहेत. त्यांच्याकडून गरजेनुसार ५००० ते १० हजार या प्रमाणात मत्स्यबीज आणले जाते. प्रतिनग त्याची किंमत चार ते पाच रुपये असते. 
  • ते सुरवातीला काचेच्या टँकमध्ये सोडण्यात येते. माशांची ठरावीक वाढ झाल्यानंतर म्हणजे १५ दिवसांनंतर त्यांना सिमेंटच्या टँकमध्ये सोडले जाते. सुमारे तीन महिन्यांच्या काळात मासा सरासरी दीड ते दोन इंचाचा होतो. साधारण या अवस्थेतील मासा विक्रीयोग्य असतो. 
  • वर्षभरात सुमारे तीन बॅचेसमध्ये उत्पादन घेतले जातात. 
  • सावंत यांच्याकडील माशांच्या काही जाती  डिसकस, एंजल, मार्बल एंजल, वेलटेल एंजेल, स्कार मार्बल, ब्ल्यू एंजल, प्लॅटिनम एंजल, गौरामी, ब्ल्यू गौरामी, पर्ल गौरामी, सिल्व्हर डॉलर, गोल्ड फिश, फ्लॉवर हॉर्न, ऑस्कर, मॅंडॅरीन, ब्ल्यू डायमंड आदी.  मार्केट  सावंत यांनी आपल्या माशांच्या विक्रीसाठी मुंबईतील व्यापाऱ्यांचा शोध घेतला. त्यांच्याशी बोलणी केली. बहुतांश मार्केट तिथेच असल्याचे ते सांगतात. या व्यतिरिक्त पुणे, कोल्हापूर, पणजी, बेळगाव आदी ठिकाणीही देखील मत्स्यविक्री केली जाते. काही वर्षांपासून या व्यवसायात असल्याने अनेकांपर्यंत व्यवसायाची ओळख झाली आहे. काही व्यापारी शोधत शोधतही खरेदीला येतात.  अर्थकारण  सुमारे तीन गुंठ्यातील या जागेत अनुदानाचे सहा लाख रुपये वगळता ९ लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागली. दहा टक्के मरतुकीचा खर्च जमेत धरावा लागतो. माशांना मिळणारा दर त्यांचा आकार, जात व रंगांनुसार असतो. दीड ते दोन इंचाच्या माशांना १५ ते १८ रुपये प्रतिनग दर मिळतो. डिसकस जातीच्या एक ते तीन इंचाच्या माशांना हाच दर सर्वाधिक म्हणजे ४०० रुपयांपर्यंतही मिळतो. एका बॅचमध्ये म्हणजे चार महिन्यांच्या कालावधीत सुमारे ७५ हजार ते एक लाख रुपये उत्पन्न मिळू शकते. सावंत स्वतः या व्यवसायात राबतात. त्यांच्या व्यतिरिक्त एक मजूरही मदतीस असतो. वीज, मजूर, माशांचे खाद्य असा खर्चही जमेत धरावा लागतो.  शेतीकडे अधिक लक्ष  सावंत यांची काजूची ८००, आंब्याची १०० तर बांबूची ४०० झाडे आहेत. बांबूपासून मागील वर्षी त्यांनी ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले. दरवर्षी कमीत कमी १०० बांबू झाडांची लागवड करण्याचा त्यांचा मानस आहे. सावंत संजय गांधी निराधार योजनेचे तालुका अध्यक्ष, तसेच प्रतिभा फेशरीज को. ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष आहेत. दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे शिक्षण विस्तार परिषदेचे सदस्य म्हणूनही ते कार्यरत आहेत.  सावंत यांच्या टीप्स  शोभिवंत मासेपालन व्यवसायासाठी मत्स्यबीज चांगले असणे गरजेचे असते. पाण्याची चांगली सुविधा हवी. एरिएशन तंत्र हवे. या व्यवसायात संयम हवा. त्वरित फायदा होण्याची अपेक्षा बाळगू नये. सातत्य, एकाग्रता, पूर्णवेळ गुंतवून घेणे हे गुण अंगी हवेत.  संपर्क-सुहास सावंत- ९८५०३५४७५६   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com