agriculture story in marathi, Suraj Shinde from Satara Dist. has started a unit to produce silk thread. | Agrowon

रेशीम उत्पादकाने सुरू केली कच्चा धागा निर्मिती

विकास जाधव
बुधवार, 24 मार्च 2021

सातारा जिल्ह्यातील अंतवडी येथील सूरज महेंद्र शिंदे हा युवा शेतकरी तीन वर्षांपासून रेशीम शेतीत कार्यरत आहे. दर्जेदार कोषनिर्मिती करण्यासह कामाचा परीघ व क्षमता वाढवताना प्रक्रिया युनीटद्वारे कच्चा धागा निर्मितीही सुरू केली आहे. त्यास परराज्यातील बाजारपेठ मिळवली आहे.

सातारा जिल्ह्यातील अंतवडी येथील सूरज महेंद्र शिंदे हा युवा शेतकरी तीन वर्षांपासून रेशीम शेतीत कार्यरत आहे. दर्जेदार कोषनिर्मिती करण्यासह कामाचा परीघ व क्षमता वाढवताना प्रक्रिया युनीटद्वारे कच्चा धागा निर्मितीही सुरू केली आहे. त्यास परराज्यातील बाजारपेठ मिळवली आहे.

सातारा जिल्ह्यातील अंतवडी, रिसवड (ता. कऱ्हाड) भागात शेतीला पूरक म्हणून मोठ्या प्रमाणात रेशीम शेती केली जाते. अंतवडी भागातच ३५ हून अधिक शेतकरी त्यात गुंतले असावेत. येथील सूरज महेंद्र शिंदे हा तरुण कला शाखेचा पदवीधर शेतकरी. कुटुंबाकडे पाच एकर शेती असून त्यात ऊस तसेच हंगामनिहाय पिके घेतली जातात. शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीच्या मागे न लागता सूरजने शेती करण्यास सुरवात केली. गावपरिसरात रेशीम शेतीचा बोलबाला असल्याने रेशीम शेती करण्याचा निर्णय घेतला. सन २०१७ मध्ये एक एकरात तुतीची लागवड केली. दोन वर्षे रेशीम शेतीचा अनुभव घेत असताना कोष विक्रीसाठी कर्नाटकातील रामनगर, अथणी येथे जाणे व्हायचे. या परिसरात रेशीमच्या कच्च्या धागा निर्मितीचे रिलिंग युनिट पाहण्यात आले. त्यातील संधी व अर्थकारण सूरज नी अभ्यासले. त्या दृष्टीनेही आपणही केवळ कोषनिर्मितीपुरते न राहाता पुढचे पाऊल टाकावे असे त्यांना वाटले. त्यापूर्वी अनुभव म्हणून वाठार येथील समीर पाटील यांच्या रिलिंग युनिटमध्ये सहा महिने प्रशिक्षण घेतले. त्यातून आवश्यक तंत्रज्ञान समजून घेतले.

रिलिंग युनिट उभारणी
रिलिंग युनिट उभारणीसाठी प्रथम पाच लाख रुपयांचे कर्ज सैनिक सहकारी बँकेकडून घेतले.
त्यातून बाराशे चौरस फुटाचे शेड व लागणारी यंत्रणा खरेदी केली. व्यवसायासाठी लागणारा सर्व प्रशिक्षित कामगार कर्नाटकातून आणला. सात ते आठ जण कामगार सध्या कार्यरत आहेत. सुरूवातीच्या काळात स्वतःकडील कोषांपासून धागा निर्मिती सुरू केली. त्यानंतर जिल्ह्यातील माण, खटाव, कऱ्हाड तालुक्यातील शेतकऱ्यांकडून कच्चा माल म्हणजे कोषांची खरेदी सुरू केली. रेशीम शेतीतील तीन वर्षे तर प्रक्रिया व्यवसायाला सहा महिने असा अनुभव तयार झाला आहे.

अशी होते धागानिर्मिती

  • शेतकऱ्यांकडून प्रतवारीनुसार कोषांची खरेदी होते. त्यास कमाल ४०० रुपये, किमान ३०० रुपये प्रति किलोप्रमाणे दर दिला जातो.
  • हे कोष तीन दिवसांच्या आत उष्णता देऊन ड्रायरमध्ये ठरावीक काळासाठी सुकविण्यात येतात.
  •  त्यामुळे ते खराब होण्याचा धोका टळतो.
  •  त्यानंतर पाण्याच्या वाफेद्वारे हे कोष शिजवले जातात. ( सुमारे १०० अंश सेल्सिअस तापमान)
  • त्यानंतर हे कोष रिलिंग यंत्रावर आणून बॅाबीनवर भरले जातात.
  • साधारणपणे तीन तासांत ४० बॅाबीन्स भरल्या जातात. दिवसातून तीन वेळा ही प्रक्रिया होते.
  • -त्यानंतर ‘रिरिलिंग’ यंत्रावर धागा वेगळा केला जातो.
  • वेगळ्या केलेल्या धाग्याची १२० ग्रॅमची लडी तयार होते.
  • प्रति सहा किलो कोषांपासून एक किलो धागा निर्मिती होते.
  • दिवसाकाठी १५ ते १८ किलोपर्यंत धागा निर्मिती होते.

बाजारपेठ व अर्थकारण
सूरज सांगतात की सध्या कच्च्या रेशीम धाग्यांची निर्मिती करतो आहे. हैदराबाद, बंगळूर व
येवला येथे पक्का रेशीम धागा तयार करणारे व्यावसायिक आहेत. ५० किलोचे पॅकिंग करून वाहतुकीद्वारे त्यांना पुरवठा होतो.
महिन्याला सुमारे ४०० ते ५०० किलो धाग्यांची निर्मिती होते. एक किलो धागानिर्मितीसाठी
यंत्रणा,‘कुकर’साठी जळण, वीजबिल असा सर्व मिळून २५०० रुपये खर्च येतो. बाजारपेठेत त्यास वार्षिक २८०० ते २९०० रुपये दर (प्रति किलो) मिळतो.
अर्थात दरांत चढउतारही होतात. त्यातून प्रति किलो निर्मितीमागे तीनशे रुपयांपर्यंत नफा मिळू शकतो.
स्वतःकडील रेशीम शेतीतील कोषांचे प्रमाण अजून वाढवल्यास नफ्याचे प्रमाण वाढण्यास मदत होते असे सूरज सांगतात.

रेशीम उत्पादकांचा फायदा
माण, खटाव, फलटण आदी दुष्काळी पट्ट्यातील रेशीम उत्पादक रामनगर (कर्नाटक) येथे रेशीमकोष पाठवतात. सूरज यांच्या व्यवसायामुळे त्यांना स्थानिक बाजारपेठ मिळाली आहे. सध्या सूरज अशा ६० ते ७० शेतकऱ्यांकडून रेशीम कोषांची खरेदी करतात.
सूरज यांनीही आपल्या रेशीम शेतीसाठी ५० बाय २० फुटाचे शेड उभारले आहे. वर्षांतून ते सुमारे पाच बॅचेस कोष उत्पादन घेतात. तयार होणारे सर्व कोष धागा निर्मितीसाठी वापरले जातात.
सध्या एकेरी किंवा कच्चा धागा निर्मिती असली तरी येत्या काळात डबल किंवा पक्का धागा निर्मितीत
उतरण्याचा मानस आहे. कुटुंबातील आई, वडील तसेच बंधू सागर यांची मदत होते. धागा निर्मितीसाठी रेशीम कार्यालयातील आर. डी पाटील यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरले आहे.

संपर्क- सूरज शिंदे- ९६९७००२१५१, ८००७४७६४६९
 


फोटो गॅलरी

इतर टेक्नोवन
इलेक्ट्रिक वाहने डिझेल वाहनांशी नक्कीच...डिझेल इंजिनवर चालणारी वाहने आणि शेतीपयोगी...
जमीन सपाटीकरणासाठी लेझर लॅंड लेव्हलरट्रॅक्टरचलित लेझर मार्गदर्शित लेव्हलरमध्ये...
सायकलचलित गिरणीमुळे घरगुती पीठ मिळवणे...नागपूर : उत्तर प्रदेश राज्यातील गोरखपूर येथील...
कोकरांच्या वेगवान वाढीसाठी मिल्क...मेंढ्यांच्या मांसाला वाढणारी मागणी पुरवण्यासह...
निचऱ्यासाठी मोल नांगर, सबसॉयलरभारी काळ्या जमिनीमधून प्रभावी निचरा होण्यासाठी...
पीकविषयक माहितीसाठी मोबाईल ॲपकोणत्याही ॲपची उपयुक्तता ही त्यामध्ये असलेली...
मालमत्ता मोजणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा...पंचायतराज मंत्रालयाच्या प्रस्तावानुसार तयार...
शेती व्यवस्थापनात सेन्सर तंत्रज्ञानड्रोनमधील सेन्सर हे पिकांची स्थिती किंवा...
ऊस पिकासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापरउसासाठी योग्य ठिबक सिंचन शक्यतो १६ मी.मी....
रेशीम उत्पादकाने सुरू केली कच्चा धागा...सातारा जिल्ह्यातील अंतवडी येथील सूरज महेंद्र...
सौरऊर्जेवरील वैशिष्ट्यपूर्ण स्वयंचलित...पीक संरक्षणाच्या  खर्चात वाढ होत असून,...
सूक्ष्म सिंचनामध्ये स्वयंचलित यंत्रणासूक्ष्म सिंचनामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत...
सीआयसीआर’ने विकसित केली कापूस वेचणी बॅग नागपूर ः कापूस वेचणीतील महिलांचे श्रम कमी व्हावे...
बटाटा साठवणीत हवा खेळती ठेवणारी प्रणालीदक्षिण कर्नाटकमध्ये सामान्यतः सरासरी तापमान कमाल...
पेंढा कापणी, गोळा करणारे ‘स्ट्रॉ कंबाइन...अलीकडे विविध पिकांच्या काढणीसाठी कंबाइन...
कच्च्या हळदीपासून भुकटी करण्याचे वेगवान...* १२ ते २४ तासांत ओल्या हळदीपासून भुकटी शक्य *...
सेंद्रिय शेतीचे तंत्र केले आत्मसातआगर (ता. डहाणू, जि. पालघर) येथील चंद्रकांत पाटील...
कृषी क्षेत्रामध्ये महिला अनुकूल यंत्रे...प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांचे योगदान कौतुकास्पद...
हरितगृहावरील पांढरा थर शेवंती पिकाला...शेवंतीसारख्या प्रकाशासाठी संवेदनशील पिकामध्ये...
ग्रामीण उत्पादनांच्या विक्रीसाठी ऑनलाइन...मोबाईल हाती आला तरी अद्याप शेतकरी व ग्रामीण...