agriculture story in marathi, Suryavanshi brothers are doing mashroom production business & gained market for it. | Agrowon

‘ऑयस्टर’ मशरूमला मिळवली बाजारपेठ

अभिजीत डाके
शनिवार, 23 ऑक्टोबर 2021

सांगली जिल्ह्यातील बावची येथील प्रदीप व राजेंद्र या सूर्यवंशी बंधूंनी सात ते आठ वर्षांचे सातत्य ठेवत ऑयस्टर मशरूम (अळिंबी) व्यवसाय यशस्वी केला आहे. दर्जेदार उत्पादन घेत 'सूर्यवंशी मशरूम' या ब्रॅंडने मुंबई येथील तारांकित होटेल्सचे मार्केट त्यांनी मिळवले आहे.

सांगली जिल्ह्यातील बावची येथील प्रदीप व राजेंद्र या सूर्यवंशी बंधूंनी सात ते आठ वर्षांचे सातत्य ठेवत ऑयस्टर मशरूम (अळिंबी) व्यवसाय यशस्वी केला आहे. दर्जेदार उत्पादन घेत 'सूर्यवंशी मशरूम' या ब्रॅंडने मुंबई येथील तारांकित होटेल्सचे मार्केट त्यांनी मिळवले आहे.
 
सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात बावची हे गाव आहे. ऊस या मुख्य पिकासह हळदीची लागवडही गावात चांगल्या प्रकारे होते. दोन्ही पिकांच्या उत्पादनात इथला शेतकरी माहिर आहे. याच गावात प्रदीप शिवाजी सूर्यवंशी राहतात. आई सौ. विमल, वडील शिवाजी, बंधू राजेंद्र असे मिळून दहा सदस्यांचे एकत्रित कुटुंब आहे. आर्थिक परिस्थिती पूर्वी कमजोर असल्याने दोघा भावांना शिक्षण पूर्ण करता आले नाही. वडिलांसोबतच ते शेतीत कष्ट करायचे. पण श्रम व चिकाटी हे गुण कायम जपले.

रेशीम शेतीचा अनुभव
ऊसशेतीला आधार म्हणून पूरक व्‍यवसायाकडे ते वळले. कृषी विभागाच्या माध्यमातून सन २००२ मध्ये रेशीम शेती सुरु केली. त्यातील बारकावे, बाजारपेठ यांचा अभ्यास केला. दर्जेदार कोष निर्मिती होऊ लागली. महाराष्ट्र शासनाचा रेशीम पंडित पुरस्कारही मिळाला. पुढे अनेक संकटे आली. वाढता खर्च, कोषांना मिळणारा दर यांचा ताळमेळ बसणे मुश्कील झाले. मग २०१० मध्ये हा व्यवसाय करणे थांबवले.

नव्या उमेदीने नवा शोध
नव्या व्यवसायाच्या शोधात सूर्यवंशी होते. पण भांडवल गुंतवून अतिरिक्त खर्च करण्यापेक्षा तयार रेशीम शेडमध्येच व्यवसाय सुरु करण्याचा प्रयत्न होता. नगर जिल्ह्यातील श्रीगोंदे येथील श्री.. लाटे यांच्याकडील अळिंबी (मशरूम) व्यवसायाची माहिती मिळाली. तेथे जाऊन दहा दिवस मुक्काम ठोकला. बेडनिर्मितीपासून ते उत्पादन, पॅकिंगपर्यंतचे शिक्षण घेतले. बाजारपेठ शोधण्याचेही आव्हानही होते. त्याचाही अभ्यास केला.

रीतसर प्रशिक्षण
मशरूम निर्मितीचे शास्त्रीय प्रशिक्षण आवश्यक होते. दर्जेदार उत्पादन झाले तरच मार्केटमध्ये टिकणे शक्य होते. त्यादृष्टीने पुणे येथील कृषी महाविद्यालयातील अखिल भारतीय समन्वित अळिंबी संशोधन प्रकल्पामध्ये प्रशिक्षण घेतले. येथील कृषी सहाय्यक नामदेव देसाई आणि कवकशास्त्रज्ञ डॉ. अशोक जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.

मशरूम निर्मिती
३६ बाय १२ फूट रेशीम शेडचा वापर मशरूम तयार करण्यासाठी केला. स्पॉन
निर्जंतुकीकरणासाठी वेगळी खोली (कक्ष) तयार केली. सुरवातीला बाजारपेठेतील मागणीचा पूर्ण अंदाज नव्हता. त्यामुळे अत्यल्प प्रमाणात उत्पादन सुरु केले. मशरूम तयार करताना येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या.

मुंबईची बाजारपेठ
अळिंबीचे मार्केटिंग करणे सोपी गोष्ट नव्हती. त्याचे कारण म्हणजे मशरूम खाणारा वर्ग वेगळा आहे. मुंबईतील ‘थ्री स्टार’, फाइव्ह स्टार होटेल्स’ तसेच चायनीज रेस्टॉरंट येथे अळिंबीला मागणी असते हे सूर्यवंशी यांनी ओळखले. त्यांचे भाचे शशिकांत गायकवाड मुंबईत राहतात. मग थेट मुंबई गाठली. त्यांना घेऊन मुंबईतील ठराविक हॉटेल्समध्ये उत्पादित मशरूम घेऊन गेले. तेथे चवीसाठी नमुने दिले. त्याचे अभिप्राय घेतले. पसंतीस उतरल्यानंतर पुढील उत्पादन व विक्री सुरु केली.

बाजारपेठेसाठी प्रयत्न हवेत
प्रदीप सांगतात की मशरूम ही संकल्पना अजूनही ग्रामीण भागात तेवढी रुजलेली नाही. त्यामुळे उत्पादन घेणे तितकेच जोखमीचे आहे. ग्राहक मिळाला नाही तर तोटाही होऊ शकतो. आम्ही ग्रामीण भागात विक्रीसाठी पुढाकार घेतला. मशरूमची रेसिपी देखील सोबत द्यायचो. परंतु त्यात यश आले नाही. त्यामुळे हा व्यवसाय करायचा असेल तर बाजारपेठ शोध, जोखीम, स्वजबाबदारी या बाबी स्वीकारणे गरजेचे आहे. स्वतः ‘मार्केटिंग’साठी चांगले प्रयत्न केले पाहिजेत. मागणी व जमा-खर्चाचा अभ्यास करूनच उत्पादनाचा विचार केला पाहिजे.

कोरोनाचे संकट
गेली दीड वर्षे कोरोनाचे संकट होते. त्यावेळी हॉटेल्स बंद होती. त्याकाळात उत्पादन कमी झाले. आता हळू हळू हॉटेल्स सुरू झाली आहेत. त्यामुळे पुन्हा उत्पादनाला चालना मिळाली आहे.अडचणीच्यावेळी आपल्याकडे मशरूम तयार असायला हवे. अन्यथा ग्राहक तुटू शकतो. अशावेळी पर्यायी व्यवस्था म्हणून वाळवलेले मशरूम तयार करण्यास सुरवात केली. त्यामुळे वेळेत देणे शक्य होते असे सूर्यवंशी सांगतात.

अळिंबी व्यवसाय- ठळक बाबी

 • पुणे येथील कृषी महाविद्यालयातून स्पॉनची ८० रुपये प्रति किलो दराने खरेदी. खासगी कंपनीकडून घेण्यात येते.
 • मशरूम माध्यमाचे वाफेच्या साह्याने (स्टीम) निर्जंतुकीकरण होते. त्यानंतर उत्पादनास सुरवात होते. व सोयाबीन) ठेवले जाते
 • 'ग्रोईंग रॅक’ ५९ बाय ५ फूट आकाराचे. त्यास पाच कप्पे. येथे १५ दिवस तर ‘हार्वेस्टिंग रॅक’वर २० दिवस ठेवण्यात येते. हार्वेस्टिंग’चे चार रॅक्स. चार हजार बॅग्स ठेवण्याची क्षमता.
 • प्रत्येक सहा दिवसाच्या अंतराने तीन वेळा कटिंग.
 • प्रति बेड माध्यमासह वजन दोन किलो होते. त्यातून प्रति बेड ५०० ग्रॅम मशरूम उत्पादन होते.
 • २०० ग्रॅम वजनाप्रमाणे पॅकिंग.
 • 'एफएसएसएआय’ नोंदणीकृत.
 • शेडमधील तापमान स्थिर राखण्यासाठी फॉगर्स.
 • दर पंधरा दिवसांनी नवी बॅच.

उत्पादन व विक्री

 • एक किलो मशरूम तयार करण्यासाठी १०० रुपये खर्च
 • दररोजचे उत्पादन २० ते ३० किलो (मागणी पाहून)
 • दररोज संध्याकाळी जवळच्या आष्टा गावातून खासगी ट्रॅव्हल्समधून मुंबईला भाचे शशिकांत यांच्याकडे पाठवले जाते.
 • मागणीनुसार हॉटेल्सना पुरवठा होतो. दर १५० रुपये प्रति किलो

संपर्क- प्रदीप सूर्यवंशी-९९७५३८२६३५


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
जळगाव जिल्ह्यात बोंडअळीचा उद्रेकजळगाव ः जिल्ह्यात यंदा शेतकऱ्यांना अतिवृष्टीने...
राज्यात पावसाला पोषक हवामान पुणे : राज्याच्या किमान तापमानात आणखी घट झाल्याने...
पावसाला पोषक हवामानामुळे किमान तापमानात...पुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्याच्या किमान...
वीजप्रश्नी संतप्त शेतकरी  महावितरण...नाशिक : महावितरण कंपनीकडून सटाणा तालुक्यात थकीत...
कापूस खेडा खरेदी करणाऱ्या ...बुलडाणा ः खेडा खरेदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना...
कडुलिंबाची झाडे वाळू लागली पुणे नगर ः नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील...
राज्यातील १२१ आदिवासी  आश्रमशाळा होणार...पुणे ः शिक्षण व्यवस्थेमधील बदलांना सामोरे जात...
लाल कांद्याला उन्हाळच्या  तुलनेत मिळतोय...नाशिक : दिवाळीनंतर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार...
नगर पंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी...पुणे नगर ः राज्यातील मुदत संपलेल्या परंतु,...
सत्तावीस हजार सहकारी संस्थांच्या ...पुणे ः राज्यातील कृषी पतसंस्था, बहुउद्देशीय...
‘बेरीज् एक्सलन्स सेंटर’ उभारणीसाठी ...सातारा ः स्ट्रॅाबेरी मातृ रोपांवरील आयात शुल्क...
शेतकरी उत्पन्न दुपटीच्या बैठकीला २३... नवी दिल्ली ः संसदेच्या कृषी विषयक स्थायी...
दिवाळी सुटीनंतरच्या बेदाणा  सौद्यात...सांगली ः दिवाळीच्या सुटीनंतर सांगली कृषी उत्पन्न...
स्टॉक लिमिटला नकार;  सोयाबीन बाजाराला...पुणे ः राज्य सरकारने सोयाबीनवर स्टॉक लिमिट लावणार...
भाजीपाला,पूरक उद्योगातून महिलांची आघाडीमिरजोळी(ता.चिपळूण,जि.रत्नागिरी) गावातील उपक्रमशील...
तुर्कांबाद खराडीत करारावर बटाटा...औरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर तालुक्‍यातील...
शेतकऱ्यांनो एकरकमी भरा अर्धेच वीजबिल ः...नगर : राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे धोरण...
राज्याच्या किमान तापमानात घट पुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर आकाश...
शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळावे -...लातूर ः आज देशात गहू, तांदूळ, मका आणि साखर अधिकची...
शिंदीच्या झाडांचे आता जिओ टॅगिंग  नीरा...नागपूर ः राज्य शासनाने नीरा देणाऱ्या शिंदीच्या...