agriculture story in marathi, Takarkhed village of Buldhana dist. has became popular in bitter gourd farming. | Agrowon

कारले म्हणावे तर टाकरखेडचेच’

गोपाल हागे
शुक्रवार, 30 एप्रिल 2021

बुलडाणा जिल्ह्यातील टाकरखेड गाव कारले पिकासाठी प्रसिद्ध झाले आहे. परिसरातील जिल्ह्यांसह हैदराबादच्या बाजारपेठेपर्यंत इथल्या कारल्याने ओळख तयार केली आहे. शेतकऱ्यांनी प्रयत्न व अभ्यासपूर्वक हे पीक यशस्वी करीत त्यातून गावचे अर्थकारण उंचावण्यात यश मिळवले आहे.
 

बुलडाणा जिल्ह्यातील टाकरखेड गाव कारले पिकासाठी प्रसिद्ध झाले आहे. परिसरातील जिल्ह्यांसह हैदराबादच्या बाजारपेठेपर्यंत इथल्या कारल्याने ओळख तयार केली आहे. शेतकऱ्यांनी प्रयत्न व अभ्यासपूर्वक हे पीक यशस्वी करीत त्यातून गावचे अर्थकारण उंचावण्यात यश मिळवले आहे.
 
खामगाव- औरंगाबाद महामार्गावर उंद्री गावापासून पाच किलोमीटरवर अडीच हजार लोकसंख्येचे टाकरखेड हेलगा (जि.. बुलडाणा) गाव आहे. पंचवीस वर्षांपूर्वी गावात कपाशी, ज्वारी, तूर, मूग, उडीद अशी पारंपरिक पिके घेतली जायची. पुढे सोयाबीन, तूर या पिकांकडे शेतकरी वळले. सन १९९० नंतर नैसर्गिक बदलांचे फटके बसू लागले. पण शेतकऱ्यांनी सुसंगत शेती पद्धतीचे पर्याय शोधण्यास सुरुवात केली.

गावातील तरुणांचा यात पुढाकार होता. डाळिंब व त्यानंतर प्रामुख्याने अल्पभूधारकांनी कारले, दोडके, भाजीपाला, पपई आदींना पसंती दिली. त्यात जम बसू लागला. तंत्र आत्मसात झाले. मग गावचे अर्थकारणच बदलू लागले. आजमितीला दरवर्षी १५० एकरांपर्यंत कारले लागवडीचा पल्ला गावाने गाठला आहे.
 
बाजारपेठेत प्रसिद्ध

टाकरखेडची कारली अकोला, अमरावती, जळगाव खानदेश, हैदराबाद, नाशिक येथील बाजारपेठांमध्ये प्रसिद्ध झाली आहेत. दोन वर्षांत तैवान पपई, केळी वाढत आहे. दिल्ली मार्केटपर्यंत पपई जात आहे. बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्रावर कारले घेणारे गाव म्हणून टाकरखेडची ओळख झाली आहे.

तरुणांनी पेलली शेती
नवी पिढी शेतीबाबत फार गंभीर नाही, त्यांचा कल व्यवसाय, नोकरीकडे आहे हा समज गावाने चुकीचा ठरवला आहे. गावात दीडशेपर्यंत युवा शेतकरी कारले, दोडके आदी वेलवर्गीय पिकांच्या शेतीत गुंतले आहेत. एकरी दीड ते दोन लाखांपर्यंत उत्पन्न ते त्यातून मिळवतात. स्वबळावर वेगळे काही करण्याची त्यांची धडपड आहे.

असे असते व्यवस्थापन

  • लागवड दरवर्षी एप्रिलच्या दरम्यान सुरू होते. एक एकरात सरासरी एक हजार वेल उभे राहतात. एकरी पाच ते सहा ट्रॉली शेणखत, त्यानंतर नांगरणी, वखरणी व गादीवाफे (बेड) तयार केले जातात.
  • एकरी सुमारे हजार बांबू व त्यापासून मांडव व त्यावर वेल वाढवले जातात.
  • लागवडीपासून एक महिन्यानंतर छाटणी करून वेलाची बांधणी होते.
  • जूनमध्ये पहिला पाऊस आला की इकडे तोडणी येते. पहिल्या तोडणीत एकरी चार क्विंटलपर्यंत माल निघतो. दर चार-पाच दिवसांनी तोडणी होते. प्रत्येक तोडा एक क्विंटलने वाढत जाते. एकूण २० ते २५ तोडे होतात. एकरी १२, १५ ते २० टनांपर्यंतही उत्पादन मिळते. त्यासाठी उत्पादन खर्च
  • ८५ ते ९० हजार रुपये असतो. शिवाय काही वर्षांसाठी दीर्घ भांडवली खर्च बांबू ४० हजार,
  • तार १० हजार असा किमान ५० हजारांपर्यंत असतो.

आवक व दर
तोडणी सुरू असतानाच्या म्हणजे जून, जुलै काळात किलोला २५ ते ३५ रुपयांपर्यंत दर मिळतो. श्रावण महिन्यानंतर दर कमी होत जातात. त्याच वेळी बाजारपेठांमध्ये आवक वाढते. वर्षभराचा विचार केल्यास १० ते १५ रुपयांदरम्यान दर शेतकऱ्यांना मिळतात.

बाजारपेठ
शेतकरी प्रतवारी, पॅकिंगवरही भर देतात. २५ ते ३० किलो वजनाच्या प्लॅस्टिक बॅग्जमधून कारली पाठवली जातात. आज टाकरखेडची कारली अमरावती, पुणे, हैदराबाद आणि मागील वर्षीपासून नाशिक बाजारपेठेत हुकूमत गाजवीत आहेत. काही व्यापारी थेट गावातून खरेदी करू लागले आहेत. गेल्या वर्षी लॉकडाउनच्या काळात हा अनुभव पाहण्यात आला. शिवाय तीन-चार तरुणांनी एकत्र येऊन एका वाहनाद्वारे माल बाजारात नेण्याचा प्रयत्नही यशस्वी झाला. स्वतः ‘मार्केटिंग’ केल्यास किलोमागे दोन- चार रुपये अधिक मिळतात हे त्यांना उमगले आहे.

अन्य पिकांकडे कल
कारल्याचा सात ते आठ महिन्यांचा हंगाम जोमात असतो. त्यानंतर सुमारे ७० टक्के कारले उत्पादक त्याच मांडवावर भोपळा, दोडका, काकडी अशी वेलवर्गीय पीक घेतात. दोन वर्षांपासून १५ ते २० शेतकरी पपईकडे वळले आहेत. मागील वर्षी पाच ते सहा शेतकऱ्यांनी केळी लागवडही केली.

उलाढाल
कडू कारले टाकरखेड ग्रामस्थांसाठी मात्र गोड बनले आहे. दहा वर्षांत या पिकातून गावचे अर्थकारण बदलले आहे. दरवर्षी सुमारे पाच कोटी रुपयांपेक्षा कारल्यातून
तर भोपळा, दोडका यांच्यापासून दीड- दोन कोटींची उलाढाल गावात होत असावी. विशेष म्हणजे युवा, काही उच्चशिक्षित व अल्पभूधारक वर्गातील शेतकऱ्यांचे हे यश आहे. एमबीए पदवीधारक अभिजित पाटील यांनी दोन एकरांत पपई लागवड केली आहे. गावशिवारात यांत्रिकीकरणाचा वापर वाढला. दहा वर्षांत विहिरी, बोअरवेल्सची संख्या बरीच वाढली. तुषार, ठिबक पद्धतीचा वापर होतो.

प्रतिक्रिया
बारा एकर शेती आहे. दहा वर्षांपासून कारले घेतो. यंदा तीन एकरांत लागवड करणार आहे. एकरी
अडीचशे क्विंटलपर्यंत उत्पादन घेतो. घरचे सदस्य राबत असल्याने मजुरीखर्च कमी केला आहे.
-मदन वरकड, ७०६६१९६६४०

दोन एकर शेती आहे. यापैकी एकरात सात- आठ वर्षांपासून नियमित कारले लागवड करतो.
खर्च वजा जाता एक ते दीड लाखापर्यंत उत्पन्न मिळते. किलोला सरासरी १० ते १५ रुपयांचे दर पडतात. पाऊसमान व बाजारपेठ स्थिती चांगली राहिली तर याहीपेक्षा अधिक उत्पादन मिळते.
-अमोल ठाकूर, ७४९८३७८५६०


फोटो गॅलरी

इतर ग्रामविकास
लॉन’ शेतीत मिळवली चांदे गावाने ओळखपुणे शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या प्रसिद्ध...
ग्राम, आरोग्य अन् शेती विकासामधील ‘...सातारा जिल्ह्यातील अन्नपूर्णा सेवाभावी संस्था...
खानदेशातील आवार प्रगतीवर स्वारआवार (ता.जि. जळगाव) हे कापूस, दादर ज्वारीसाठी...
कोकणातील शेतीला नव्या संधींची दिशादापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
शेती, शिक्षण अन पूरक उद्योगातून शाश्वत...जमीन आरोग्य उपक्रमांबाबत जागृती, आत्महत्याग्रस्त...
शेततळ्यांद्वारे मिर्झापूरचे शिवार झाले...मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत मिर्झापूर (ता.जि...
कारले म्हणावे तर टाकरखेडचेच’बुलडाणा जिल्ह्यातील टाकरखेड गाव कारले पिकासाठी...
उन्हाळी काकडीने उंचावले धामणखेलचे...बाजारपेठेची मागणी ओळखून धामणखेल (ता. जुन्नर. जि....
शेती, पूरक उद्योगावर दिला भरकुडाळ तालुक्यातील पूर्व भागात आमचे निरुखे हे...
महिला सक्षमीकरणातून होतो ग्राम विकाससामर्थ्य संपन्न ग्रामीण भारताच्या उभारणीसाठी...
पाणीपुरवठा, जलपुनर्भरणाच्या कामांना आता...मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदा, पंचायत समित्या...
उच्चशिक्षित महिला सरपंचांनी गावात पेरला...नागपूर : नागपूर जिल्ह्यातील मोहगावच्या...
लोक सहभाग हाच विकासाचा पायाकुटुंबाचा विकास म्हणजे कुटुंबातील सर्व सदस्यांचा...
ग्राम स्वच्छता, प्रयोगशील शेतीला चालनालोणी बुद्रुक (ता.पाथरी, जि.परभणी येथे ...
पाणलोटाच्या मदतीनं केली दुष्काळावर मातजालना जिल्ह्यातील कायम दुष्काळी नंदापूर गावच्या...
गावामध्ये असावी संयुक्त कुरण व्यवस्थापन...शेती परिवार कल्याण संस्था गावशिवारातील माळरानावर...
गावाचा चेहरामोहरा बदलण्याचे प्रयत्नतीन वर्षांपासून मनारखेड गावाचे सरपंचपद सांभाळत...
शिक्षण, कृषी, ग्रामविकासामध्ये ‘समता...नाशिक जिल्ह्यातील येवल्यासारख्या दुष्काळी...
दुष्काळी मजले एकीतून झाले बागायतीकायम दुष्काळी असलेले मजले (ता. हातकणंगले. जि....
प्रशिक्षण, निविष्ठा विक्रीसाठी योजनामहाराष्ट्र सहकारविकास महामंडळामार्फत शेतकरी...