तळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची हक्काची बाजारपेठ

तळेगाव ढमढेरेत मुगाची झालेली आवक
तळेगाव ढमढेरेत मुगाची झालेली आवक

पुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत तळेगाव ढमढेरे येथील महात्मा फुले उपबाजार समिती मुगासाठी प्रसिद्ध आहे. येथे दरवर्षी मुगाची चांगली आवक होते. वार्षिक उलाढाल कोट्यवधीच्या घरात जाते. तालुक्यात मुगाचे क्षेत्र चांगले आहे. साहजिकच पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना यानिमित्तने हक्काची बाजारपेठ तयार झाली आहे.   मूग हे खरिपातील कमी कालावधीचे पीक असल्याने शेतकऱ्यांची त्याकडे अधिक पसंती असते. पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे हे हक्काचे नगदी पीक आहे. मुगाचे क्षेत्र

  • जिल्ह्यात सरासरी आठ ते नऊ हजार हेक्टर
  • चालू वर्षी १३ हजार ४०२ हे.
  • शिरूर तालुक्यात सर्वाधिक ११ हजार ६६२ हेक्टरवर पेरणी
  • यंदाचा हंगाम आश्‍वासक यंदा पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागातील काही भागांत बऱ्यापैकी पाऊस झाल्यामुळे अनेकांनी मुगाची पेरणी केली. त्यानंतर पावसाने हुलकावणी दिली, त्यामुळे उत्पादनात काही प्रमाणात घट झाली. परिणामी महात्मा फुले उपबाजार समिती, तळेगाव ढमढेरे येथे आवक बऱ्यापैकी झाली असली, तरी दरात चांगलीच वाढ झाली. या उपबाजारात दरवर्षी मोठ्या प्रमाणात मुगाची आवक होते. यंदा दोन हजार ५१७ क्विंटल आवक होऊन क्विंटलला किमान ५१००, कमाल ६५००, तर सरासरी साडेपाच हजार रुपये दर मिळाला. सध्या आवक कमी आहे. उपबाजार समिती जवळ असल्याने परिसरातील १५ ते २० हून अधिक गावांतील शेतकरी मुगाची पेरणी करतात. मूग- शेती व मार्केट

  • मूग कोणत्याही जमिनीत घेता येते, त्यासाठी शेतकरी मेमध्ये तयारी करतात. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात वेळेवर पाऊस झाल्यास पेरणी सुलभ. कृषी विद्यापीठ किंवा कंपन्यांकडील बियाण्यांचाही वापर होतो. काही शेतकरी मूग आंतरपीक म्हणून घेतात.
  • कमी पाण्यातील, कमी कालावधीतील पीक. त्यानंतर कांदा, ज्वारी अशी पिके घेणे शक्य
  • द्विदल पीक असल्याने जमिनीसाठीही पोषक
  • तळेगाव ढमढेरे उपबाजार समितीत शिरूर, दौंड, पारनेर, श्रीगोंदा या भागातून पुरवठा
  • किफायतशीर पीक पेरणीसाठी सुमारे एकरी पाच ते सात किलो बियाणे लागते. योग्य नियोजन व पोषक हवामानात एकरी दहा ते बारा क्विंटल उत्पादन मिळते. किलोला ५० ते ६५ रुपये दर मिळल्यास तीन महिन्यांच्या काळात ५० ते ६० हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. उत्पादन खर्च सुमारे १५ ते २० हजार रुपयांपर्यंत येतो. तो वजा जाता सुमारे ४० हजार रुपयांपर्यंत निव्वळ नफा मिळू शकतो, असे तळेगाव ढमढेरे येथील मूग उत्पादक दशरथ भुजबळ यांनी सांगितले. शिरूर बाजार समिती- मूग मार्केट वर्ष --- आवक (क्विंटल)    सरासरी दर उलाढाल (रु.) २०१६ -- ४७९२ --- ४८५०--- २ कोटी १५ लाख ६४,००० २०१७ --- १२५८९ --- ४३०१ -- ५ कोटी ६६ लाख ५०,५०० २०१८ --- २१४२ --- ५१५० -- १ कोटी ७ लाख १०,००० २०१९ -- २५१७ --- ५५०० -- - १ कोटी ३८ लाख ४३,५०० (दर- प्रति क्विंटल) उपबाजार समितीविषयी शिरूर बाजार समितीअंतर्गत तळेगाव ढमढेरे येथे उपबाजार समिती १९७७-७८ मध्ये अस्तित्वात आली. हळूहळू बाजार समितीचे क्षेत्र चार एकरांवर विस्तारले. परिसरातील ३०-३५ गावांची ही हक्काची बाजारपेठ असून, बाहेरील तालुक्यांतूनही मुगासह ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, तूर, मठ, हुलगा, भुईमूग, उडीद आदींची आवक होते. उपलब्ध सुविधा पिण्याचे पाणी, शेतकरी निवास, कुंपण भिंत, कर्जपुरवठ्यासाठी बँक, जनावरांचा बाजार, स्वच्छता गृहे, इलेक्ट्रॉनिक वजन काटे, सीसीटीव्ही कॅमेरे, वॉचमन, टेलिव्हिजन, टेलिफोन, बाजारभाव फलक, अद्ययावत सभागृह, सावलीसाठी झाडे, अंतर्गत रस्ते, डांबरीकरण

    राबविण्यात येणारे उपक्रम

  • शेतकरी बाजार
  • शेतमाल तारण कर्ज योजना
  • कांदा व डाळिंब प्रशिक्षण पॉलिहाउस, ग्रीन हाउसमधील पीक व्यवस्थापन व विक्री व्यवस्थापनावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन
  • शासनामार्फत कांदा उत्पादकांना अनुदान मिळवून देणे.
  • प्रतिक्रिया दरवर्षी मूग घेतो. यंदा सुरवातीला कमी पावसामुळे अर्ध्या एकरावर पेरणी केली. उत्पादन कमी मिळाले. मात्र दर चांगला मिळाल्याने दिलासा मिळाला. - दशरथ दगडू भुजबळ, तळेगाव ढमढेरे चाळीस वर्षांपासून भुसार माल खरेदी- विक्रीचा व्यवसाय करतो. माझ्याकडे गहू, बाजरी, ज्वारी, मूग अशा अन्नधान्याची आवक होते. यंदा मुगाची आवक चांगली असली तरी दर मात्र वाढले होते. माझ्याकडे मोठ्या प्रमाणात मुगाची आवक झाली, त्यास प्रतिक्विंटल पाच ते साडेसहा हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. - दिवाणजी पांडुरंग ढोरे, व्यापारी जूनमध्ये वेळेवर पाऊस झाल्यास बाजार समितीत सर्वाधिक आवक होते. यंदा सुरवातीला पाऊस कमी असला तरी नंतर झालेल्या पावसामुळे उत्पादन बऱ्यापैकी झाले. खरेदी मूग पुणे, शिरूर येथे विक्रीसाठी पाठवितो. - संतोष मोहन विरोळे पाटील, अडतदार व व्यापारी बाजार समिती शेतकऱ्यांना अधिकाधिक बाजारभाव कसा मिळेल यासाठी कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांसाठी दरवर्षी कृषी प्रदर्शन भरवितो. - शशिकांत दसगुडे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, शिरूर, जि. पुणे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दरात चांगलीच वाढ झाली. क्विंटलला जवळपास साडेसहा हजार रुपयांपर्यंत दर मिळाले. - विश्वास ढमढेरे, उपसभापती, बाजार समिती संपर्क- अनिल ढोकले - ९९२१२२४४९० सचिव, बाजार समिती, शिरूर, जि. पुणे ९९२१२२४४९० प्रभू नरके - ९८५०५५७२६२ विभागप्रमुख, उपबाजार समिती

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com