agriculture story in marathi, through water conservation works Pimpalgaon Wagha village dist. Nagar has made progress in Agriculture & village development. | Page 3 ||| Agrowon

पिंपळगाव वाघाच्या शिवारात लोकसहभागातून समृद्धी

सूर्यकांत नेटके
शुक्रवार, 11 डिसेंबर 2020

कित्येक वर्षापासून दुष्काळाशी सामना करत असलेल्या पिंपळगाव वाघा (ता. जि. नगर) गावाने लोकसहभागातून पावणे दोन कोटीची कामे करून शिवारात समृद्धी आली आहे. टॅंकरने पाणी पुरवठा करावा लागत असलेल्या गावांत यंदा विहीरी पाण्याने डबडबल्या. बंधारे ओसंडून वाहू लागले. पीक पद्धतीत बदल झाला असून दुग्ध व्यवसायालाही चालना मिळाली आहे.

कित्येक वर्षापासून दुष्काळाशी सामना करत असलेल्या पिंपळगाव वाघा (ता. जि. नगर) गावाने लोकसहभागातून पावणे दोन कोटीची कामे करून शिवारात समृद्धी आली आहे. टॅंकरने पाणी पुरवठा करावा लागत असलेल्या गावांत यंदा विहीरी पाण्याने डबडबल्या. बंधारे ओसंडून वाहू लागले. पीक पद्धतीत बदल झाला असून दुग्ध व्यवसायालाही चालना मिळाली आहे.

पिंपळगाव वाघा (ता. जि. नगर) हे बाराशे लोकसंख्येचे गाव. शाश्वत पाण्याची उपलब्धता नसल्याने
या गावासह परिसराला कायम दुष्काळाशी सामना करावा लागत होता. आदर्श गाव हिवरेबाजारला जोडून हे गाव आहे. साहजिकच येथे झालेल्या विकासकामांची प्रेरणा गावातील युवकांनी घेतली. सन २०१८ मध्ये ग्रामस्थ एकत्र आले. तत्कालीन सरपंच अजय वाबळे, उपसरपंच ललिता नाट, नूतन उरमुडे, नामदेव शिंदे, पारुबाई नाट या सदस्यांसह सामाजिक कार्यकर्ते दत्ता उरमडे यांनी पुढाकार घेतला. पाणी फाऊंडेशनमध्ये गावाने सहभाग घेतला. त्यासाठी जनजागृती, बैठका घेतल्या.

कामांना झाली सुरवात
आदर्श गाव योजनेचे पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनातून कामांना सुरवात झाली.
श्रमदान, लोकसहभाग, विविध संस्थाची मदत आणि सरकारी योजनांतून नदीवरील वीस वर्षांपूर्वीच्या तीन बंधाऱ्यातील गाळ काढला. पावणे पाच किलोमीटर नदीचे रूंदी- खोलीकरण केले. सीसीटी, गॅबियन बंधारे, दगडी बंधारे, मातीनाला बांध, कंपांडबंडिंग, शेततळी आदी कामे केली. सेवानिवृत्त सैनिक भीमराज वाबळे, बाबासाहेब शिंदे, नामदेव नाट यांची समिती स्थापन करून त्यांना जबाबदारी देण्यात आली. परिसरातील लोकांनी श्रमदानात सहभागी व्हावे यासाठी वर्षातून दोनदा महाश्रमदानही घेतले. गावची २०१८ मध्ये जलयुक्त शिवार अभियानासाठी निवड झाली. त्यातूनही कामे करण्याला मदत झाली. पाणी फाउंडेशन, भारतीय जैन संघटना, स्नेहालय, एज्युकेशन फाउंडेशन, मावळा संघटना यांची मदत झाली.

पीक पद्धतीत बदल
गावाचे ७१४ हेक्टर लागवड क्षेत्र आहे. पूर्वी केवळ १५ हेक्टरपर्यंत कांदा पीक होते. यंदा खरिपात २२५ तर रब्बीत ८० हेक्टरवर कांदा लागवड झाली. पूर्वी पंधरा हेक्टरपर्यंत असलेले चारा पिकांचे क्षेत्र १०० हेक्टरपुढे गेले आहे. रब्बीत ३६० हेक्टर ज्वारी, ४० हेक्टर गहू, ७० हेक्टर हरभरा, २५ हेक्टरवर भाजीपाला लागवड झाली आहे. पूर्वी सुमारे एक हजार लिटर होणारे दूधसंकलन
पाच हजार लिटरच्या जवळपास गेले आहे. फळपिके, मका, गहू यांचेही क्षेत्र वाढू लागले आहे.

गावाकडून घ्यावयाचे आदर्श

 • पाणी उपलब्ध झाले तरच समृद्धी येईल हे समजून गावकऱ्यांनी एकोप्याने काम केले.
 • गावांतील नवदांपत्य श्रमदान करून संसाराची सुरवात करते. त्यातून तरुणांचा उत्साह वाढला.
 • श्रमदान, लोकसहभाग आणि सरकारी निधीतून दीड कोटी रुपयांची सिंचनाची कामे झाली.
 • ओढ्या-नाल्याचे खोलीकरणानंतर माती, गाळापासून नदीच्या बाजूला तीन किलोमीटरचा रस्ता तयार केला. अनेक वर्षांपासूनचा रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला.
 • दोन वर्षांत दोनहजार झाडे लावली. त्यासाठी गावांतच रोपवाटिका तयार केली.
 • पिंपळ, वड, उंबर, आपटा, कवठ आदी एकहजार वृक्षलागवडीचे नियोजन.
 • एक घर एक झाड उपक्रम. यातून ३५० झाडांची लागवड
 • सर्व २०७ कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालये.
 • डोंगरात झाडांची संख्या अधिक. दहा वर्षांपासून कुऱ्हाडबंदी, चराईबंदी.
 • नूतन उरमडे यांच्या अध्यक्षतेखाली वन समिती कार्यरत. कोणताही
 • निर्णय ग्रामसभेतच घेतला जातो. महिलांची त्यास उपस्थिती.
 • आर्थिक दृष्ट्या १०० कुटुंबांना धान्य वाटप. मजुरांना टिकाव, खोऱ्यांचे वाटप. वन समितीच्या मदतीने ३० कुटुंबांना इंधन गॅसचे वाटप

कोरोना संकटातील कामे
कोरोना लॉकडाऊन काळात सर्वानुमते जाण्या-येण्याची वेळ निश्चित केली. सुमारे ५०० लोकांच्या ॲटीजेन चाचण्या घेतल्या. अर्थ आयोगाच्या निधीतून मास्क, सॅनिटायझर्सचे वाटप केले. योग्य काळजी घेतल्याने आत्तापर्यंत गावांत एकही कोरोना बाधित रुग्ण आढळला नाही.

उल्लेखनीय कामे

 • ग्रामपंचायतीजवळील सभागृहात पाण्याची उपलब्धता आणि वापर यांचा ताळेबंद असलेला फलक लावला आहे. वर्षभरात त्यानुसारच पाण्याचा वापर गावकरी करतात.
 • पन्नास वर्षांपूर्वी प्राथमिक शाळेचे लोकसहभागातून काम झाले. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या बहिण विजयालक्ष्मी पंडित यांनी पाहणी करत शाळेचे उद्घाटन केले. शाळेची इमारत आताही सुस्थितीत आहे. आठवण म्हणून गावकऱ्यांनी सुशोभीकरण केले असून तेथे तरुणांसाठी अद्ययावत प्रशिक्षण केंद्र व अभ्यासिका उभारण्याचे नियोजन आहे. -पुण्यात नोकरी, व्यवसायाला असलेल्या गावातील तरुणांच्या पुणे येथील मित्रमंडळाने जिल्हा परिषदेच्या शाळेचे सुशोभीकरण केले. पेव्हींग ब्लॉक्स बसवले. दोन संगणक दिले.
 • काही ग्रामस्थांनी पाणी फाऊंडेशनकडून प्रशिक्षण घेत श्रमदानवाढीस मदत केली.
 • आता शेतकरी, युवकांना आपत्ती व्यवस्थापन, मुरघास, अझोला निर्मितीचे प्रशिक्षण, माती तपासणी करून आरोग्य पत्रिका तयार करणे आदी संकल्प आहेत.
 • निर्मलग्राम, हागणदारीमुक्ती व तंटामुक्ती पुरस्काराने गावाचा गौरव
 • सरकारी निधीतून पशुवैद्यकीय रुग्णालय, जिल्हा परिषद शाळा, दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत
 • भूमीगत गटार योजना, सिमेंट रस्ते, स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण आदी कामे.
 • ड्रोन कॅमेऱ्याद्वारे गावांतील जागांची मोजणी केली जात आहे.

प्रतिक्रिया 
विविध उपक्रमांद्वारे पिंपळगाव वाघा आदर्श गावांकडे वाटचाल करत आहे. सार्वजनिक बळातूनच गाव पाणीदार झाले आहे.
-अजय वाबळे, माजी सरपंच, पिंपळगाव वाघा

दुष्काळमुक्तीकडे गावाने वाटचाल सुरु केली आहे. ई ग्रामपंचायत करण्याला प्राधान्य दिले आहे.
दत्ता उरमुडे, सामाजिक कार्यकर्ते,
पिंपळगाव वाघा
संपर्क- ९८९०११८५३२

 


फोटो गॅलरी

इतर ग्रामविकास
लोकसहभागातून तयार होईल ग्रामविकासाचा...शाश्‍वत ग्रामविकास करताना विकासाच्या विविध...
सुधारित तंत्राद्वारे बदलला गावचा...गावकऱ्यांचे प्रयत्न, करडा कृषी विज्ञान केंद्राचे...
गावशिवाराचा शाश्‍वत विकास करणारी ‘एफईएस’आनंद (गुजरात) येथे नोंदणीकृत असलेल्या फाउंडेशन...
दुर्गम सावंगी गावात घडले एकीतून कृषी...गावातील युवकांना दिशा देण्यासोबतच त्यांच्यातील...
नैसर्गिक वारसा जपत देवडे गाव समृद्धीकडेऐतिहासिक पार्श्‍वभूमी लाभलेले रत्नागिरी...
ग्राम पर्यटन, पर्यावरण संवर्धनातील...गेली पंधरा वर्षे रत्नागिरी येथील निसर्गयात्री ही...
पायाभूत सुविधांसह शेतीतून प्रगतिपथावर...रस्ते, बंधारे उभारणी, सांडपाणी व्यवस्थापन,...
पिंपळगाव वाघाच्या शिवारात लोकसहभागातून...कित्येक वर्षापासून दुष्काळाशी सामना करत असलेल्या...
टंचाईग्रस्त दहीगाव झाले लोकसहभागातून...सातारा जिल्ह्यातील दहीगाव गावातील ग्रामस्थांनी...
लोकसहभागातून हिंगणगाव झाले ‘पाणी’दारपाणीटंचाई आणि कित्येक वर्षांपासून दुष्काळाशी...
चुडावा बनले रेशीम शेतीचे क्लस्टरचुडावा (ता.पूर्णा,जि.परभणी) गावातील येथील...
स्वच्छ, सुंदर स्मशानभूमीसाठी ग्रामस्थ...परभणी : जिल्ह्यातील आव्हई (ता.पूर्णा) येथील...
शेती, जलसंधारण, सामाजिक कार्यात...पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या केंदूर (ता....
गावी परतलेल्यांसाठी आधार ठरेल मनरेगाग्रामीण भागातील लोकांना काम मिळण्याचा हक्क अबाधित...
बारीपाडा शिवारात रुजली शाश्वत शेती,...बारीपाडा (जि.धुळे) गावाने शाश्वत शेती, वनीकरण आणि...
जलसंधारणातून प्रगतीकडे पाऊल कोळपांढरी (ता.शहादा,जि.नंदुरबार) येथील...
डोंगरदऱ्यातील कुमशेत आर्थिक उन्नतीच्या...एकेकाळी ओसाड माळरानावर वसलेले व टँकरचे गाव म्हणून...
सुधारित शेती, पूरक व्यवसायाचा ‘निवजे...निवजे (ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग) गावकऱ्यांनी शेती...
कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली...बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण...
महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद...सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर...