Agriculture story in marathi, tick fever in livestock | Agrowon

जनावरांतील गोचीड ताप

डॉ. प्रशांत पवार, डॉ. अमोल जायभाये, डॉ. पी. पी. मते
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

गोचीड कान, पंजा, उदर, बारीक व नाजूक त्वचा तसेच शेपटीच्या मागील भागांवर आढळतात. गोचीड आपली सोंड जनावराच्या त्वचा व मांसल भागामध्ये खोलवर खुपसून सायफन पद्धतीद्वारे रक्त शोषतात. एकदा चावा घेतल्यावर पोटभर रक्त शोषल्याशिवाय त्या जनावरांचे शरीर सोडत नाहीत.
 
जनावरांच्या अंगावर मुख्यतः कान व शेपटीच्या मागे, तोंडावर, छातीच्या भागावर तसेच कासेवर गोचीड चिकटलेले असतात.

गोचीड कान, पंजा, उदर, बारीक व नाजूक त्वचा तसेच शेपटीच्या मागील भागांवर आढळतात. गोचीड आपली सोंड जनावराच्या त्वचा व मांसल भागामध्ये खोलवर खुपसून सायफन पद्धतीद्वारे रक्त शोषतात. एकदा चावा घेतल्यावर पोटभर रक्त शोषल्याशिवाय त्या जनावरांचे शरीर सोडत नाहीत.
 
जनावरांच्या अंगावर मुख्यतः कान व शेपटीच्या मागे, तोंडावर, छातीच्या भागावर तसेच कासेवर गोचीड चिकटलेले असतात.
गोचीड रोज हळूहळू जनावराच्या शरीरातील रक्ताचे शोषण करत असते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन जनावर कोणत्याही आजाराला सहज बळी पडते. गोचीड विविध रोगप्रसार करणाऱ्या रक्तातील जिवाणू, विषाणू व एक पेशीय परजीवींचा देखील प्रसार करतात. त्यामुळे जनावरे एक पेशी परजीवीला बळी पडतात. त्यामुळे माणसांमध्ये व जनावरांमध्ये ताप येतो. गोचीडाच्या चाव्यामुळे येणाऱ्या तापाला ‘गोचीड ताप' असे म्हणतात. गोचिडीद्वारे थायलेरीयाओसीस, बेबेओसीस, ॲनापालज, ॲलीकओसीस या एकपेशी परोपजीवींचा प्रसार होतो. माणसामध्ये केएफडी व सीसीएचएफ या रोगांचा प्रसार गोचिडीमार्फत होतो.
 
गोचीडचे प्रकार
हार्ड गोचीड ः

 • या गोचिडीचे बाह्य आवरण टणक असते. शरीर गोल किंवा अंडाकृती आकाराचे असते. डोके आयताकृती, त्रिकोणी किंवा षट्कोनी आकाराचे असते.
 • नर गोचीड आकाराने लहान असून ते जनावरांच्या शरीरावर फार काळ राहत नाहीत. तर मादी गोचीड आकाराने मोठा (वाटाणा/शेंगदाण्याच्या बी सारखा) असून प्रामुख्याने रक्त शोषणाचे कार्य करते. याद्वारे थॉलेरीयाओसीस, बेबेओसीस, ॲनापालज, ॲलीकओसीस सारख्या प्राणघातक रोगांचा प्रसार होतो.

गोचीडच्या सवयी ः

 • गोचिडीचा प्रादुर्भाव हा वातावरणातील पोषक तापमान व आर्द्रतेवर अवलंबून असतो.
 • त्यांना विशिष्ट प्रकारच्या यजमानाची आवश्‍यकता नसते. त्या कोणालाही चावा घेतात. काही गोचीड त्यांच्या जीवनकाळातील सर्व अवस्था एकाच जनावरावर तर काही वेगवेगळ्या जनावरांवर पूर्ण करतात.
 • गोचीड कान, पंजा, उदर, बारीक व मलमलीत त्वचा तसेच शेपटीच्या मागील भागावर आढळतात.
 • गोचीड आपली सोंड जनावराच्या त्वचा व मांसल भागामध्ये खोलवर खुपसून सायफन पद्धतीद्वारे रक्त शोषतात.
 • एकदा चावा घेतल्यावर पोटभर रक्त शोषल्याशिवाय त्या जनावराचे शरीर सोडत नाहीत.

हानिकारक प्रभाव ः
काटेरी जखम ः

चावा घेतलेल्या भागामध्ये जिवाणूंच्या प्रभावामुळे दुखापत होते.

रक्त शोषण्याची सवय ः
एक मादी गोचीड एका दिवसामध्ये ०.५ ते २ मिलि रक्त शोषते. त्यामुळे जनावरांमध्ये अशक्तपणा येऊन ॲनिमिया होतो. तसेच रोग प्रतिकारशक्ती जास्त प्रमाणात कमी होते.

गोचीड लखवा ः

 • इक्‍टोडीअस नावाच्या गोचडामुळे कुत्रा व मांजरामध्ये श्‍वसननलिकेचा लकवा आढळून येतो.
 • या लकव्यामुळे मृत्यूदेखील होऊ शकतो. मृत्यू मुख्यतः गोचीड संख्या, गोचिडीचा कालावधी व गोचिडीचे जनावरांच्या शरीरावरील स्थान या गोष्टींवर अवलंबून असतो.
 • गोचिडाच्या चाव्यामुळे जनावराचे खाणे कमी होते. त्यामुळे दूध उत्पादनात घट येते.

नियंत्रण

 • सर्वात प्रभावी आणि महत्त्वाची पद्धती म्हणून डिपिंग पद्धत ओळखली जाते. यामध्ये जनावराचे पूर्ण शरीर हे खड्ड्यामध्ये मिसळलेल्या द्रावणात बुडवले जाते. त्यामुळे जनावराच्या पूर्ण शरीरावर औषधाचा समप्रमाणात व योग्य प्रकारे उपयोग होतो.
 • औषधांचा डस्टिंग, फवारणी (यंत्राच्या साहाय्याने किंवा हाताद्वारे) पद्धतींने वापर केला जातो.
 • निरुपयोगी चारा जाळून टाकल्यामुळे गोचीडच्या सर्व अवस्था नाहीशा होण्यास मदत होते.
 • जमिनीची मशागत करावी. सूर्यप्रकाशामुळे गोचीडचा नायनाट होण्यास मदत होते.
 • चारा क्षेत्रामध्ये जनावरांना चरायला सोडू नये. त्यामुळे गोचीड भुकेमुळे मरून जातात.

जैविक नियंत्रण ः

 • मेलिनिस/सिनोडॉन/पेनिसॅटम सारख्या गवतामुळे गोचीड नियंत्रण करता येते.
 • जनावरांच्या गोठ्यातील कुक्कुट पक्ष्यांच्या वावरामुळे गोचिडीचा प्रभाव कमी होण्यास मदत होते.

आनुवंशिक नियंत्रण ः
काही जनावरांमध्ये गोचिडीचा प्रादुर्भाव होत नाही. या आनुवंशिक गुणधर्मामुळे त्यांच्यामध्ये गोचिडीचा प्रादुर्भाव कमी दिसून येतो. अशा प्रकारची जनावरे गोठ्यामध्ये असणे आवश्‍यक आहे. तसेच गाई व म्हशींचा गोठा वेगळा असावा.

लसीकरण ः
बीएम-८६ ही लस बुफिलस मायक्रील्पस या जातीच्या गोचिडीसाठी प्रभावीपणे वापरली जाते.

जनावरांचे ग्रुमिंग ः
यामध्ये जनावरांच्या शरीरावरील गोचीड ब्रशद्वारे काढल्या जातात. ग्रुमिंग केल्यामुळे जनावरांच्या त्वचेतील रक्ताभिसरण क्रिया सुधारते. तसेच, विविध त्वचारोग कमी होण्यास मदत होते.

गोठ्याचे व्यवस्थापन ः
जनावरांचा गोठा स्वच्छ व कोरडा ठेवावा. गोठा सिमेंट काँक्रीटचा असल्यास, त्यामध्ये पडलेल्या भेगा सिमेंटने भरून घ्याव्यात. कारण अशा भागांत गोचीड सहज लपून बसतात व अंडी घालतात. त्यामुळे गोठ्यातील भेगा किंवा छिद्र लिपून घ्यावीत व कीटकनाशकांची फवारणी करावी.
 
गोचीड ताप आलेल्या जनावरांची काळजी ः

 • गोचीड ताप आलेल्या जनावरांची विशेष काळजी घ्यावी. आजारी जनावरे गोठ्यापासून बाजूला बांधावीत.
 • पशुवैद्यकियांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करावा. किमान ५ दिवस औषधोपचार करणे आवश्‍यक आहे.
 • निरोगी जनावरांमध्ये हा रोग पसरणार नाही याची काळजी घ्यावी.

संपर्क ः डॉ. प्रशांत पवार, ९७३०३८३१०७
क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ (जि. सातारा) 


इतर कृषिपूरक
हिरव्या चाऱ्याच्या पूर्ततेसाठी मुरघास...हिरव्या चाऱ्याच्या व्यवस्थापनावर उपाययोजना म्हणून...
वाहतूक शेळ्या, मेंढ्यांची...तापमानात जास्त वाढ झाल्यास, शेळ्यांना शरीराचे...
व्यावसायिक गांडूळखत प्रकल्प उभारणीभाऊसाहेब गावात आल्याची बातमी समजली. सर्व बचत...
कृषी पर्यटन ः आव्हानात्मक पूरक व्यवसायवसंताच्या मनातील कृषी पर्यटनाच्या विचाराला...
ऋतुमानानुसार म्हशीतील प्रजनन व्यवस्थापनअधिक दूध उत्पादनाकरिता म्हशीमधील प्रजनन सक्षम...
जैवपुंज निर्मितीसाठी विविध कार्बन स्रोतपाण्याचे तापमान, सामू, विरघळलेला प्राणवायू...
जनावरांच्या आहारामध्ये पोषकद्रव्ये...दुधाळ जनावरांच्या शरीराची प्रसूतिदरम्यान झालेली...
मेंढ्यांची संवाद साधण्याची पद्धतमेंढ्यांचे आवाज हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात...
मत्स्यशेतीसाठी पाण्याची गुणवत्ता...मत्स्यशेती यशस्वी होण्यासाठी मत्स्य टाक्यांची...
वयानुसार पुरवा कोंबड्यांना संतुलित खाद्यकुक्कुटपालनामध्ये एकूण खर्चाच्या जवळ जवळ ६० ते ७०...
फळबागेला दिली शेळीपालनाची जोडअजगणी (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील जगदीश...
जनावरांतील गोचीड तापगोचीड कान, पंजा, उदर, बारीक व नाजूक त्वचा तसेच...
जाणून घ्या ग्राहक संरक्षण अधिनियम, १९८६ग्राहकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी...
शेळ्यांना द्या समतोल आहार शेळीच्या प्रजननक्षमता वाढीस आहाराचे...
मेंढीपालनाचे वार्षिक वेळापत्रकगाभण मेंढ्यांकडे विशेष लक्ष द्यावे. नवजात...
असे करा जनावरांतील पोटफुगीला प्रतिबंधसर्वच मोसमामध्ये चांगल्या प्रतीचा चारा मिळेल अशी...
व्यवस्थापनाला मार्केटिंगची जोड देत...पॅालिहाउसमधील फूलशेतीसाठी एकेकाळी प्रसिद्ध असलेले...
आरोग्यदायी शेळीचे दूधशेळीच्या दुधाचे नियमित सेवन केल्याने आतड्यांवरील...
बहुगुणी कडुनिंबविविध प्रकारचे त्वचारोग जसे की, त्वचेवर खाज, पुरळ...
..अशी ओळखा दुधातील भेसळवाढत्या महागाईमुळे अनेकदा अन्नपदार्थांमध्ये भेसळ...