Agriculture story in marathi turmeric harvesting | Agrowon

सुधारित पद्धतीने करा हळद काढणी

डॉ. मनोज माळी, डॉ. दिलीप कठमाळे
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

हळद लागवडीच्या पद्धतीनुसार हळद काढणीची पद्धत अवलंबवावी. जमीनीच्या पोताप्रमाणे हळदीच्या वाळलेल्या पानांचे प्रमाण तपासून हळद काढणीचे नियोजन करावे. हळदीची काढणी करतेवेळी जमीन पूर्णपणे वाळली असल्यास हलके पाणी द्यावे. परिणामी हळद काढणी करणे सोपे होते.
 

हळद लागवडीच्या पद्धतीनुसार हळद काढणीची पद्धत अवलंबवावी. जमीनीच्या पोताप्रमाणे हळदीच्या वाळलेल्या पानांचे प्रमाण तपासून हळद काढणीचे नियोजन करावे. हळदीची काढणी करतेवेळी जमीन पूर्णपणे वाळली असल्यास हलके पाणी द्यावे. परिणामी हळद काढणी करणे सोपे होते.
 

सर्वसाधारणपणे जातीपरत्वे हळद काढण्यासाठी ७ ते ९ महिने लागतात. यामध्ये प्रामुख्याने हळव्या जातींना तयार होण्यास लागवडीपासून ६ ते ७ महिने लागतात. (उदा. आंबे हळद) तर निमगरव्या जाती या ७ ते ८ महिन्यात काढणीस येतात. (उदा. फुले स्वरुपा) गरव्या जाती ८ ते ९ महिन्यामध्ये काढणीस तयार होतात. (उदा. सेलम, कृष्णा) त्यामुळे जातीपरत्वे कालावधी पूर्ण झाल्याशिवाय पाला कापू नये.

हळद काढणी

 • जमिनीच्या पोताप्रमाणे हलक्या जमीनीमध्ये ८० ते ९० टक्के पाने पिकाचा कालावधी पूर्ण होते वेळी वाळलेली असतात, तर मध्यम व भारी जमीनीमध्ये ६० ते ७० टक्के पाने वाळलेली असतात. हळद पीक काढण्यापूर्वीचे पीक परिपक्वतेचे हे मुख्य लक्षण मानले जाते.
 • हळदीच्या काढणीअगोदर १५ ते ३० दिवस पाणी देणे बंद करावे. पाणी बंद करताना प्रथम पाणी थोडे थोडे कमी करून नंतर पाणी बंद करावे. त्यामुळे पानातील अन्नरस कंदामध्ये लवकर उतरण्यास मदत होते. त्यामुळे हळकुंडाला वजन, गोलाई आणि चकाकी येते. जर पाणी शेवटपर्यंत चालू ठेवले तर हळकुंडाना नवीन फुटवे फुटू लागतात. त्यामुळे उत्पादनात घट होते.
 • पाला वाळल्यानंतर १ इंच जमीनीच्यावर खोड ठेवून धारदार विळ्याच्या साह्याने हळदीचा पाला कापावा. पाला बांधावर गोळा करावा, शेत ४ ते ५ दिवस चांगले तापू दयावे त्यामुळे हळदीच्या कंदामध्ये असलेल्या पाण्याच्या अंशामुळे जमीन साधारणपणे भेगाळली जाते. त्यामुळे हळदीची काढणी करणे सुलभ होते.
 • हळद लागवडीच्या पद्धतीनुसार हळद काढणीची पद्धत अवलंबवावी. सरी वरंबा पद्धतीत टिकाव अथवा कुदळीच्या साह्याने हळदीची खांदणी करावी तर गादी वाफा पद्धतीत ट्रॅक्टरचलित हळद काढणी यंत्राचा वापर करावा. हळदीची काढणी करते वेळी जमीन पूर्णपणे वाळली असल्यास हलके पाणी द्यावे. परीणामी हळद काढणी करणे सोपे होते.
 • खांदणी करून काढलेले कंद २-३ दिवस सूर्यप्रकाशात चांगले तापू द्यावेत. त्यामुळे कंदास चिकटलेली माती पूर्णपणे निघण्यास मदत होते. २-३ दिवसानंतर हळदीच्या कंदाची मोडणी करावी.
 • हळदीच्या कंदाचा गड्डा आपटल्यास हळकुंडे व गड्डे एकमेकापासून वेगळे होतात. त्यावेळी मात्र जेठे गड्डे, बगल गड्डे, हळकुंडे, सोरा गड्डे, कुजकी सडलेली हळकुंडे अशा कच्च्या मालाची प्रतवारी करून वेगवेगळ्या ठिकाणी साठवणूक करावी.

अ) जेठे गड्डे
मुख्य रोपाच्या खाली वाढणाऱ्या कंदास जेठे गड्डे (मातृकंद) म्हणतात. हे गड्डे प्रामुख्याने पुढील वर्षी लागवडीसाठी वापरतात. त्यामुळे काढणीनंतर हे गड्डे ताबडतोब सावलीमध्ये ठेवावेत.
ब) सोरा गड्डा
लागवडीसाठी वापरलेले कंद ५० ते ६० टक्के कुजून जातात. राहिलेले ४० ते ५० टक्के कंदाना सोरा गड्डे म्हणतात. हे काळपट रंगाचे मुळ्याविरहीत असतात. यांना हळकुंडापेक्षा दुप्पट भाव मिळतो.
क) बगल गड्डे
जेठे गड्ड्याला आलेला फुटव्यांच्या खाली बगल गड्डे तयार होतात, यांस अंगठा गड्डे असेही म्हणतात. ४० ग्रॅम पेक्षा जास्त वजन असणाऱ्या गड्ड्यांचा वापर बियाणे म्हणून करतात. 
ड) हळकुंडे
बगल गड्ड्यांना आलेल्या कंदास हळकुंडे असे म्हणतात. प्रामुख्याने प्रक्रिया करून बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी याचा वापर करतात. यातील काही हळकुंडांना उपहळकुंडे येतात. त्यास लेकुरवाळे हळकुंडे असे म्हणतात. याचा वापर धार्मिक कार्यात मोठ्या प्रमाणावर केला जातो.

 • हळदीची काढणी केल्यानंतर लवकरात लवकर हळदीची प्रक्रिया करावी. काढणी केल्यानंतर साधारणत: १५ दिवसाच्या आत त्यावर प्रक्रिया करावी. म्हणजे हळदीची प्रत व दर्जा चांगला राहतो.
 • जातिपरत्वे सर्व साधारणपणे एकरी १५० ते २०० क्विंटल ओल्या हळदीचे उत्पादन मिळते तर प्रक्रिया करुन ३० ते ४० क्विंटल होते.

पारंपरिक पद्धतीने हळद खांदणी

 • या पद्धतीत पूर्णपणे कंद जमिनीतून निघत नाहीत. १० ते १५ टक्के कंद जमिनीत राहतात.
 • सरी वरंबा अथवा गादी वाफा पद्धतीने लागवड केलेल्या ठिकाणी या पद्धतीद्वारे हळदीची काढणी करता येते.
 • एकरी १८ ते २० मजूर लागतात.
 • कंदास इजा होण्याची शक्यता असते.

हळद काढणी यंत्राद्वारे हळद खांदणी

 • हे यंत्र कंदाच्या खालून कंद वरती उचलत असल्याने केवळ १ ते २ टक्के कंदच जमिनीमध्ये राहतात.
 • केवळ गादी वाफा पद्धतीने लागवड केलेल्या हळदीची काढणी करता येते.
 • साधारणपणे ८ ते १० लिटर डिझेलमध्ये १ एकर हळदीची काढणी होते. परिणामी मजूर बचत होते.
 • कंद जमिनीतून अलगत उचलत असल्याने कंदास कोणत्याही प्रकारची इजा होत नाही.

संपर्क ः डॉ. दिलीप कठमाळे ः ९४०३७७३६१४
प्रभारी अधिकारी, हळद संशोधन योजना, कसबे डिग्रज, जि. सांगली


इतर मसाला पिके
व्यवस्थापन हळद पिकाचेसध्या हळद लागवड होऊन सात महिन्यांचा कालावधी (२१०...
आरोग्यदायी आले आल्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे आणि खनिजे...
आले पिकावरील कंदमाशीचे व्यवस्थापनआले पिकामध्ये कंदमाशी, खवले कीड, खोडकिडा, फुलकिडे...
ओळखा हळदीवरील किडींचा प्रादुर्भाव...सध्या हळद पीक फुटवे आणि गड्डे तयार होण्याच्या...
व्यवस्थापन मसाला पिकांचेनारळ, सुपारी बागेत अतिशय चांगल्या प्रकारे मसाला...
हळदीची पाने पिवळी पडण्याची समस्या अन्...सध्या काही भागात हळदीची पाने पिवळे पडण्याची...
आरोग्यदायी दालचिनीमसाल्यांच्या पदार्थांत, घरात मसाला करताना...
आरोग्यदायी हिंगआपल्या रोजच्या स्वयंपाकात पदार्थ करताना फोडणीसाठी...
हळदीला द्या शिफारशीत खतमात्रापावसाच्या कालावधीत जमिनीतील ओलावा अभ्यासून पाणी...
तंत्र कारळा लागवडीचे...कारळ्याची पेरणी जूनच्या पहिल्या पंधरवड्यापासून ते...
काळीमिरीची लागवड मिरी लागवडीसाठी आधाराच्या झाडांपासून किमान ४५ सें...
साठवणूक हळद बेण्याची...निवडलेले बेणे जातिवंत आणि चांगले असेल तर उत्पादन...
कढीपत्त्याची व्यावसायिक लागवड फायदेशीरकढीपत्याचे शास्त्रीय नाव ‘मुर्रया कोइनिगी’ आहे....
काळी मिरी काढणी तंत्रज्ञानविविध पदार्थांच्या निर्मितीमध्ये मिरीचा वापर केला...
योग्य परिपक्वतेला करा पिकांची काढणीपिकांची योग्य परिपक्वतेला काढणी करण्यासाठी...
हळदीची पॉलिशिंग, प्रतवारी करणे...हळदीची विक्री उघड लिलाव पद्धतीने होत असल्याने...
व्यवस्थापन दालचिनीचे...वाढीच्या टप्यात असलेल्या दालचिनी कलमांना आधार...
व्यवस्थापन मसाला पिकांचे...मिरी वेल आणि जायफळास पुरेसे पाणी आणि खत...
सुधारित पद्धतीने करा हळद काढणीहळद लागवडीच्या पद्धतीनुसार हळद काढणीची पद्धत...
दालचिनीची वेळेवर काढणी महत्त्वाचीदालचिनी झाडाची साल ही मसाल्यात दालचिनी म्हणून...