agriculture story in marathi, Umesh Pawar a studious farmer from Sangli Dist. is doing sapota, mango farming successfully. | Agrowon

अभ्यासपूर्ण शेतीतून ‘ए ग्रेड’ फळांचे उत्पादन

अभिजित डाके
शनिवार, 27 मार्च 2021

मांजर्डे (जि. सांगली) येथील उमेश पवार यांनी दुष्काळी पट्ट्यात अभ्यास, प्रयोगशील वृत्ती व उत्कृष्ट व्यवस्थापन यातून फळबाग केंद्रित शेती यशस्वी केली आहे. चिकू, आंब्याचे ए ग्रेड उत्पादन घेत आठ वर्षांपासून स्वतः विक्रीचे तंत्र वापरून पंचक्रोशीत त्यास वेगळी ओळख तयार केली आहे.

मांजर्डे (जि. सांगली) येथील उमेश पवार यांनी दुष्काळी पट्ट्यात अभ्यास, प्रयोगशील वृत्ती व उत्कृष्ट व्यवस्थापन यातून फळबाग केंद्रित शेती यशस्वी केली आहे. चिकू, आंब्याचे ए ग्रेड उत्पादन घेत आठ वर्षांपासून स्वतः विक्रीचे तंत्र वापरून पंचक्रोशीत त्यास वेगळी ओळख तयार केली आहे.

सांगली जिल्ह्यातील तासगाव पट्टा म्हणजे द्राक्ष व बेदाण्याचे माहेरघरच. तालुक्याच्या पूर्व भागातील मांजर्डे तसं दुष्काळी गाव. आजही निम्मे गाव पाण्यासाठी वणवण भटकंती करते आहे. काही प्रमाणात द्राक्ष बागा डौलात उभ्या आहेत. ऊसही काही जण घेऊ लागले आहेत.

पवार यांची शेती
गावातील बाबासो पवार, पत्नी सौ. बबूताई, मुलगा उमेश, सून जया, हर्षवर्धन आणि स्वरांजली ही नातवंडे असे हे कुटुंब. बाबासो निवृत्त शिक्षक आहेत. उमेश यांनीही इतिहास, राज्यशास्त्र आणि शिक्षणशास्त्र या तिन्ही विषयांत ‘पोस्ट ग्रॅज्युएशन’ केले आहे. ते ‘एमएड’ ही आहेत. घरची परिस्थिती मध्यमच होती. जिद्द आणि सचोटीतून शेती उभारली. उमेश यांना नोकरीची इच्छा नव्हती. शेती फळबाग केंद्रित करायची हे ठरवून तसा आकार देण्यास सुरुवात केली. द्राक्षाची २००१ मध्ये लागवड केली. प्रतिकूलतेतही चांगले उत्पादन घेऊ लागले. दरम्यान, केसरच्या ५० आंबा झाडांची लागवड केली. हे पीक कुटुंबाला तसे नवेच. अभ्यास म्हणूनच हा प्रयत्न केलेला. पुढे खर्चात वाढ, दर, मजुरांची कमतरता, दुष्काळ या बाबींमुळे द्राक्ष बाग काढली. कोरडवाहू पद्धतीत बहुवार्षिक व विविधता असलेली फळबाग फायदेशीर ठरू शकते या कयासावर २००७ मध्ये चिकू व आंब्याची लागवड केली. पूर्वी आंबा व्यवस्थापनाचा अभ्यास झाला होता. सातत्य, परिश्रम व प्रयोगांतून फळबाग यशस्वी होत गेली.

व्यवस्थापनातील बाबी

चिकू

 • बोर्डो मिश्रणाची फवारणी
 • प्रति झाडास ८० किलो शेणखत वापर
 • एनएए संजीवकाचा वापर
 • दोन लिटर ताक वा लिंबूरस, अंडी व गूळ यांच्यापासून संजीवक निर्मिती.ते फूलवृद्धिकारक व सेटिंगसाठी चांगले असा अनुभव.
 • टाकाऊ मत्स्यघटक व गूळ यांचे मिश्रण ४५ दिवस ठेवून त्यापासून प्रथिनयुक्त घटकाचा वापर
 • त्याचा फळ आकार व गुणवत्तेला फायदा
 • पंधरा दिवसांतून एकरी ५०० लिटर वेस्ट डीकंपोजर
 • घरातील सदस्यांची फळाकाढणी व पॅकिंगमध्ये मदत. त्यामुळे मजुरीत बचत.

आंबा व्यवस्थापन

 • जूनच्या पहिल्या आठवड्यात छाटणी
 • एक टक्के बोर्डो मिश्रण फवारणी, खोडाला बोर्डो पेस्टिंग
 • प्रति झाडास २० किलो शेणखत.
 • कृषी विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे कीडनाशकांच्या सहा फवारण्या
 • चिकूप्रमाणेच संजीवकांचा वापर
 • कोंबडीखत, मळी, लेंडीखत, राख यांचे मिश्रण, गंध व चिकट
 • सापळे, दशपर्णी अर्क यांचा वापर
 • शाश्‍वत पाण्यासाठी शेततळे
 • पॉवर टिलरचा वापर
 • विक्रीस जाताना गावातील शेतकऱ्यांचा मालही घेऊन जातात.

ठळक बाबी 

 • शेती- १० एकर, जिरायती. अनुभव १० वर्षे
 • चिकू- २.५ एकर- २०० झाडे (कालीपत्ती वाण)
 • लागवड- २२ बाय २४ फूट
 • आंबा- एक एकर- ३०० झाडे (केसर)
 • (१५ बाय १५ फूट)
 • सीताफळ- दोन एकर- नवी ६०० झाडे
 • फुले पुरंदर आणि बाळानगर प्रत्येकी एक एकर
 • (१५ बाय ८ फूट)
 • बाकी कोरडवाहू पिके.

फळ हंगाम
चिकू- जुलै ते मे
आंबा- एप्रिल ते जून
सीताफळ- ऑगस्ट ते सप्टेंबर

 • उत्पादन प्रति झाड- चिकू ८० किलो
  (९ वर्षांच्या झाडाला)
  सरासरी दर प्रति किलो-  हातविक्रीचा- ३० ते ६०
 • आंबा उत्पादन प्रति झाड- ३० किलो हातविक्री दर ६० ते ८०, मार्केटमध्ये ४० ते ५५ रु.
 • चिकू व आंबा- एकरी सरासरी उत्पादन- ६ टन

हात विक्री ठरली फायदेशीर
उमेश यांचा परिसर तसा दुष्काळी. बाजूला ऊसपट्टा. या भागात फळपिकांची उपलब्धता तशी कमीच. हीच संधी घेऊन भिलवडी, नांद्रे या भागात थेट विक्री सुरू केली. आपले छोटे वाहन घेऊन ठिकठिकाणी स्टॉल लावून विक्री करतात. उत्कृष्ट दर्जा व आकारामुळे खप हातोहात होतो. आठ वर्षांपासून सातत्य ठेवल्याने ग्राहक तयार झाले आहेत. हंगामात ग्राहक फोनवरून ‘ऑर्डर’ देतात. गुणवत्तेमुळे दरात तडजोड करीत नाही. भले दोन पैसे कमी मिळाले तरी चालतील.

अन्य मार्केट
हातविक्रीतून शिल्लक मालाची विक्री सांगली येथील विष्णू अण्णा पाटील फळे व भाजीपाला मार्केटमध्ये होते.

बाजारपेठ विश्‍लेषण
जानेवारी ते मार्च या काळात चिकूला सर्वांत कमी दर (किलोला २० ते ३० रू) तर ऑगस्ट ते नोव्हेंबर काळात ते सर्वाधिक (६० ते ८० रु.) असतात. बाजारात आवकेचे स्थिती व दरांचा अभ्यास करून
त्यानुसार फळहंगाम व बाजारात फळ आणण्याचे नियोजन.

शेतीतील उल्लेखनीय बाबी

 • प्रगतिशील शेतकरी, राहुरी, दापोली, सासवड जवळील फळ संशोधन केंद्र आदी ठिकाणांहून ज्ञान घेऊन शेतीत वापर
 • झाडाची उत्पादनक्षमता व गुणवत्ता उत्तम ठेवण्यासाठी मर्यादित फळे ठेऊन उत्पादन स्थिर.
 • चिकू व आंब्याची दरवर्षी विरळणी व छाटणी. चिकूत शेंड्याला अधिक फळे येतात. साहजिकच छाटणीमुळे अतिरिक्त फळे कमी होतात. वजन चांगले मिळते.
 • झाडांचा घेर आणि उंची सारखी ठेवल्याने फळकाढणी सोपी.
 • प्रत्येक पीक थोड्या प्रमाणात लावून त्याचे निष्कर्ष पाहतात. त्यानंतर त्याचा विस्तार.
 • चिकूच्या दोन झाडांत तीन झाडे पेरूची अशी लागवड. चिकूचे उत्पादन सहा वर्षांनी सुरू होते. तोपर्यंत पेरूचे व्यावसायिक उत्पन्न घेत राहायचे.

देशी जातीवर कलम

 • दरवर्षी देशी आंब्याच्या कोयी उन्हाळ्यात साठवतात.
 • पाण्यात टेस्ट घेतात. तरंगणाऱ्या बाजूला काढून बुडणाऱ्या निवडतात. जूनमध्ये तीन ते चार कोयी खड्ड्यात लावतात.
 • जानेवारीत त्यास केसरचे कलम. त्यानंतर अन्य कोयींचे रोपही त्यास बांधून घेतात.
 • अशामुळे झाडाची ताकद वाढते असे उमेश सांगतात.

संपर्क- उमेश पवार, ९४२१३६१७७८


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
तीन पूरक व्यवसायांचा शेतीला भक्कम आधारखरपुडी (ता.. जि.जालना ) येथील अल्पभूधारक शेतकरी...
संत्रा प्रक्रियेतून शेतकरी कंपनीची...वरुड (जि. अमरावती) येथील श्रमजीवी नागपुरी संत्रा...
पीक बदलातून शेती झाली किफायतशीरनांदोस (ता.मालवण,जि.सिंधुदुर्ग) गावातील...
धान्य प्रक्रियेतून ‘संत तेजस्वी’ ची...शेतकरी गटापासून वाटचाल करीत देऊळगावमाळी (जि....
आठवडी बाजारांचे नेटवर्क उभारत यशस्वी...पुणे येथील नरेंद्र पवार व चार मित्रांनी एकत्र...
उन्हाळी काकडीने उंचावले धामणखेलचे...बाजारपेठेची मागणी ओळखून धामणखेल (ता. जुन्नर. जि....
गाजराने दिले उत्पन्नासह चाराहीनगर जिल्ह्यात अकोल तालुक्यातील गणोरे येथील...
व्यावसायिक दृष्टिकोनातून घडवली...नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील भात उत्पादक...
अल्पभूधारकांसाठी कमी खर्चातील रायपनिंग...तळसंदे (जि. कोल्हापूर) येथील डॉ. डी.वाय. पाटील...
शेतकरी गट ते कंपनी उभारली प्रगतीची गुढीशेतकऱ्यांसाठी अल्प दरात विविध अवजारे उपलब्ध...
जिरॅनियम तेलनिर्मिती, करार शेतीतून...देहरे (ता. जि. नगर) येथील वैभव विक्रम काळे या...
कांदा, कलिंगड पिकातून बसवले आर्थिक गणितकरडे (ता. शिरूर, जि. पुणे) येथील भाऊसाहेब बाळकू...
शिक्षकाची प्रयोगशील शेती ठरतेय फायद्याचीआश्रम शाळेत गेल्या २३ वर्षांपासून शिकविणारे सहायक...
बचत गटांना पूरक उद्योगांची साथपारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता उमेद अभियानाच्या...
तळलेले गरे, फणसाची फ्रोझन भाजी, फणसाचे...फणस हे कोकणातील महत्त्वाचे मात्र दुर्लक्षित पीक...
फुलशेतीतून सुखाचा बहर जिद्द, चिकाटी, मेहनत, ज्ञान व व्यावसायिक...
म्यानमारी शेतकऱ्याची जीवनदायिनी : इरावडीइरावडी ही म्यानमारमधील सर्वांत मोठी आणि देशातील...
ओल्या काजूगरासाठी प्रसिद्ध कुणकवणसिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकवण (ता. देवगड) हे गाव...
माळरानावर फळबागांतून समृद्धीरांजणगाव देवी (ता. नेवासा, जि. नगर) येथील संयुक्त...
प्रयत्नवाद, उद्योगी वृत्तीने उंचावले...पणज (जि. अकोला) येथील अनिल रामकृष्ण रोकडे यांनी...