Agriculture story in marathi use and benefits of solar equipments | Agrowon

सौर ऊर्जा उपकरणाचे उपयोग, फायदे

हेमंत श्रीरामे, पूनम चव्हाण, मयूरेश पाटील
बुधवार, 22 जानेवारी 2020

भविष्यात ऊर्जेचे पर्याय शोधणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यासाठी सौर ऊर्जा हा अतिशय चांगला पर्याय आहे. शेतीसोबतच दैनंदिन जीवनात जर सौर उपकरणांचा जास्तीत जास्त वापर केला, तर कमी खर्चामध्ये बरीचशी कामे पार पाडली जाऊ शकतात.

भविष्यात ऊर्जेचे पर्याय शोधणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यासाठी सौर ऊर्जा हा अतिशय चांगला पर्याय आहे. शेतीसोबतच दैनंदिन जीवनात जर सौर उपकरणांचा जास्तीत जास्त वापर केला, तर कमी खर्चामध्ये बरीचशी कामे पार पाडली जाऊ शकतात.

सौर उपकरणांमुळे उत्तम प्रकारे अन्न शिजविता येते. अशुद्ध पाण्याचे शुद्ध पाण्यात रुपांतर करता येते. सौर यंत्रणेच्या साह्याने पाणी उपसले जाते. फोटोव्होल्टाईक साधने सौर ऊर्जेला विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतरित करतात. याचा वापर विद्युतपंप चालविण्यासाठी होतो. पंपिंग यंत्रणा, उघडी विहीर, कूपनलिका, ओढा, तळे, कालवा यांमधून पाणी खेचते. सौर ऊर्जेवरील सौर उष्णजल संयंत्राद्वारे गरम पाणी रोजच्या वापरासाठी वापरले जाऊ शकते. सौर उपकरणे पर्यावरणासाठी कोणत्याही प्रकारे हानीकारक नाहीत. यामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदुषण होत नाही.

फायदे
१. सौर उष्णजल संयंत्र
उपयोग

 • आंघोळीसाठी पाणी गरम करण्याकरिता.
 • गरम पाणी भांडी धुण्यासाठी.
 • हॉटेल्स, वसतिगृह, मंदिरे, गुरुद्वारे इ. ठिकाणी.
 • विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकांसाठी विविध शाळांमध्ये.
 • निरनिराळ्या हॉस्पिटल्समध्ये.
 • घरगुती कृषी प्रक्रिया उद्योगासाठी.
 • औद्योगिक वापरासाठी.

फायदे

 • कोणत्याही प्रकारची पारंपरिक ऊर्जेची आवश्यकता नसते.
 • सौर उष्णजल संयंत्राच्या वापरामुळे एक कुटुंब प्रत्येक महिन्याला २००-२५० रुपयांची वीजबिलामध्ये बचत करतो.
 • पारंपरिक ऊर्जेवर अवलंबून नसते.
 • वीजपुरवठा उपलब्ध नसतानादेखील आवश्यक त्या वेळी गरम पाण्याची उपलब्धता असते.
 • प्रदूषणविरहित साधन.
 • महागड्या विजेचा वापर इतर महत्त्वाच्या कार्यासाठी करण्याची मोकळीक.

२. सौर चूल
उपयोग

 • घरगुती स्वयंपाकासाठी.
 • हॉटेल्स, मेस, कॅन्टीन इत्यादी ठिकाणी.
 • विविध प्रकारची खाद्य सामुग्री भाजण्यासाठी.

फायदे

 • कोणत्याही प्रकारचे इंधन उदा. एल. पी. जी. गॅस, विद्युत, लाकूड इत्यादींची स्वयंपाक तयार करण्यासाठी आवश्यकता नसते.
 • या चुलीद्वारे तयार केलेले अन्न चविष्ट असते.
 • या चुलीद्वारे तयार केलेल्या पदार्थांत पौष्टीक तत्त्वांचा -हास होत नाही.
 • शिजविण्यासाठी ठेवलेले अन्न जळत नाही किंवा खराब होत नाही.

३. सौर शुद्धजल संयंत्र
उपयोग

 • अशुद्ध पाण्याचे शुद्ध पाण्यात रुपांतर करण्यासाठी.
 • डिस्टील वॉटर तयार करण्यासाठी.
 • खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करण्यासाठी.

फायदे

 • दररोज ३-४ लीटर प्रति वर्ग संयंत्रामधून शुद्ध (डिस्टील वॉटर) जल मिळते.
 • प्रतिमाह एक संयंत्रापासून १०००-२००० रुपये कमवू शकतो.
 • पाण्याचे वाफेत रूपांतर करण्यासाठी पारंपरिक विद्युतची आवश्यकता नाही.
 • पर्यावरणावर कोणत्याही प्रकारची हानी होत नाही.

४. सौर फोटो व्होल्टाईक साधने
उपयोग

 • विद्युत निर्मिती करणे.
 • सौर कंदील, सौर पंप, सौर फवारणी यंत्र, सौर पवन विद्युत यंत्र तसेच विविध घरगुती उपकरणे सौर विद्युतवर चालविण्यासाठी.

फायदे

 • वारंवार ऊर्जा तयार करता येते.
 • या ऊर्जेचा पर्यावरणावर कोणताही विपरित परिणाम होत नाही.
 • पर्यावरणात कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही.

संपर्क ः हेमंत श्रीरामे, ९४२२५४५९१५
(विद्युत आणि अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी)  


इतर टेक्नोवन
इंधनबचतीसाठी पर्यावरणपूरक सौर चूलसौरऊर्जेच्या साह्याने रोजच्या जेवणातील सर्व...
तयार खाद्यपदार्थ, पूर्वमिश्रणे...सध्याच्या घाईगडबडीच्या युगामध्ये लोक तयार...
ऊस शेतीसाठी आवश्यक यंत्रेऊस उत्पादनात केवळ मजुरीवर ३५ ते ४० टक्के खर्च...
जलशुद्धीकरणासाठी सौर शुद्धजल संयंत्रदुर्गम भागांत तसेच समुद्रकिनाऱ्यावर पिण्यायोग्य...
शून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्षशून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्षाची उभारणी कमी खर्चात...
ऊर्जेशिवाय शीतकरणाचे तंत्रकोणत्याही ऊर्जेच्या वापराशिवाय शीतकरणाची एक...
जास्त अन्न शिजविण्यासाठी शेफलर सौरचूल...शेफलर सौर चूल पेटी सौरचूल आणि पॅराबोलिक...
...ही आहेत आंतरमशागतीसाठी अवजारेशेती मशागतीमध्ये आता ट्रॅक्टर, पॉवर टिलर अशी...
बटाटा प्रक्रिया उद्योगासाठी यंत्रेतळलेल्या पदार्थामध्ये बटाट्याचे चिप्स किंवा...
मेथी वाळवण्याचे तंत्रभारतामध्ये मेथी (शा. नाव - ट्रिगोनेला फीनम -...
फ्राइम्स प्रक्रिया उद्योगातील यंत्रेतळलेल्या पदार्थांच्या बाजारपेठेमध्ये फ्राइम्स...
..अशी आहे डाळनिर्मितीची प्रक्रियामागील भागात मिनी डाळ मिल व त्या माध्यमातून डाळ...
सौर ऊर्जा उपकरणाचे उपयोग, फायदेभविष्यात ऊर्जेचे पर्याय शोधणे महत्त्वाचे ठरणार...
फळप्रक्रिया उद्योगासाठी उपयुक्त यंत्रेकोणत्याही अन्नप्रक्रिया उद्योगामध्ये येणाऱ्या...
नत्रयुक्त खतांच्या वापराशिवाय उत्पादन...कडधान्याच्या मुळावरील गाठीमध्ये वसाहती करणाऱ्या...
सौर ऊर्जेवर आधारीत उपकरणांचा वापरपारंपरिक ऊर्जास्त्रोतांच्या तुटवड्यामुळे व जास्त...
किफायतशीर बैलचलित अवजारेबैलचलित बहूपीक टोकण यंत्रामध्ये पिकानुसार...
सोयादूध, पनीर बनवण्याची यंत्रेसोयाबीनपासून दूध आणि त्याचे पनीर ही उत्पादने...
जवसापासून जेल, कुरकुरीत पदार्थविविध आजारांवरील उपचारामध्ये जवस उपयुक्त असूनही...
यांत्रिक पद्धतीने युवकाने केली खारे...मासा (ता. जि. अकोला) येथील प्रफुल्ल फाले या...