प्रतिजैविकांचा वापर अन् वाढता प्रतिरोध

जनावरामध्ये पशुवैद्यकाच्या सल्ल्यानेच प्रतिजैविकाचा वापर करावा.
जनावरामध्ये पशुवैद्यकाच्या सल्ल्यानेच प्रतिजैविकाचा वापर करावा.

जनावरांमध्ये आणि मानवीय आजारांमध्ये वापरण्यात येणारे अनेक अँटिबायोटिक्स आणि अँटिमायक्रोबियल्ससारखे आहेत. फक्त वापरण्याचे प्रमाण वेगळे आहे. जनावरापासून मानवामध्ये अँटिमायक्रोबिल रेसिस्टन्सचा प्रसार होऊ शकतो हे जगभरातील संशोधनातून सिद्ध झालेले आहे. त्यामुळे जनावरांवर उपचारपद्धती अत्यंत बारकाईने आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून करणे गरजेचे आहे.

जी औषधे आजाराचा प्रादुर्भाव झाल्यावर आजार बरा करण्यासाठी वैद्यकीय सल्ल्यातून घेतली जातात, त्याला प्रतिजैविके (अँटिबायोटिक्स) म्हणतात. प्रतिजैविके प्रामुख्याने जिवाणूजन्य आजारांवर प्रभावी असतात. "अँटिमायक्रोबियल्स" ही संज्ञा सर्वसाधारणपणे जिवाणूरोधक, विषाणूरोधक, बुरशीरोधक, परजीविरोधक अशा सर्व प्रकारातील औषधांसाठी आहे. २०१५ साली जागतिक आरोग्य संघटना (डब्लू. एच. ओ.), जागतिक प्राणी आरोग्य संघटना (ओ. आई. इ.) आणि जागतिक खाद्य आणि कृषी संघटना (एफ. ए. ओ.) या तिन्ही आंतरराष्ट्रीय संघटनांनी प्रतिजैविकांचा उपयोग आणि त्यांच्या वाढत्या प्रतिरोधाबद्दल एकत्रितपणे काम करण्याची गरज दर्शविली आहे. आज जगभरात अँटिमायक्रोबियल रेसिस्टन्स ही एक महत्त्वाची समस्या मानली जात आहे. 

प्रतिजैविके प्रतिरोधक (अँटिमायक्रोबियल रेसिस्टन्स)

प्रतिजैविके प्रतिरोधक म्हणजे एखादे औषध सूक्ष्म जिवाणूंपासून झालेल्या आजारावर अपरिणामकारक होणे. याचे प्रमुख कारण म्हणजे हे जिवाणू पूर्वी वापरात आलेल्या प्रतिजैविकांविरोधात प्रतिरोधी बनतात.  

अँटिमायक्रोबियल रेसिस्टन्स वाढण्याची करणे

  • डॉक्टरांच्या सल्ल्याविना उपचार करणे. 
  • औषधे दिलेल्या मात्रेप्रमाणे न घेता कमी अथवा जास्त प्रमाणात घेणे. 
  • कारण नसताना जास्त काळासाठी अँटिबायोटिकचा उपयोग करणे. 
  • आवश्यक नसताना चुकीचे औषधी देणे किंवा त्याचे सेवन करणे. 
  • एक्सपायर किंवा उरलेले अँटिबायोटिक्सची योग्य विल्हेवाट न लावता पाण्याच्या स्रोतात फेकून देने. 
  • पशुपक्ष्यांमध्ये अँटिबायोटिक्सचा सर्रास वापर करणे. 
  • पशुपक्ष्यांमध्ये अँटिबायोटिक्सचा वाढ होण्यासाठी प्रेरक म्हणून वापर (ग्रोथ प्रोमोटर म्हणून वापर). 
  • जनुकातील बदलातून नैसर्गिकरीत्या जिवाणूंमध्ये होत असलेला बदल आणि वाढता प्रादुर्भाव. 
  • आंतरराष्ट्रीय पर्यटन आणि खाद्यघटकांची आयात निर्यात. 
  • पशुपक्ष्यांची आंतरराष्ट्रीय खरेदी विक्री. 
  • आजाराचे योग्य निदान न करता एकाच उपचारपद्धतीचा अवलंब. 
  • पशुजन्य खाद्यघटकांतून पसरत असलेला प्रतिजैविकांचा अंश. 
  • खाद्यघटकांच्या साठवणीकरिता अँटिबायोटिक्स चा होत असलेला वापर. 
  • प्रतिरोध आणि होणाऱ्या दुष्परिणामाबद्दल अत्यल्प जनजागृती इ. कारणे आहेत.
  • प्रतिरोध कमी करण्यासाठी...

  • अँटिमायक्रोबिल रेसिस्टन्स बद्दल समज आणि जागरूकता वाढविणे. 
  • संशोधनाच्या माध्यमातून ज्ञानाचे बळकटीकरण करणे. 
  • रोगाचा संसर्ग कमी करणे. 
  • अँटिमायक्रोबिल एजंट्सचा नियंत्रित वापर करणे.  
  • नवीन औषधांवर संशोधन, आजारांचे निदान आणि लसीकरण यावर राष्ट्रीय स्तरावर जास्तीत जास्त लक्ष देणे.  
  • जनावरांच्या खाद्यात अँटिबायोटिक्सचा वापर 

  • अँटिबायोटिक्स वापरताना पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्लयानेच जनावरांवर उपचार करावा. 
  • स्वत्ः उपचार न करता डॉक्टरांनी दिलेली औषधे ठरवून दिलेल्या मात्राप्रमाणेच द्यावी आणि उरलेल्या/खराब झालेल्या औषधांची योग्य विल्हेवाट लावावी. 
  • प्रक्षेत्रावर काम केल्यानंतर हात साबणाने धुवावे जेणेकरून आजाराचा संसर्ग होणार नाही. 
  • जनावरांच्या मलमूत्राची योग्यरीत्या विल्हेवाट लावावी जेणेकरून पिण्याच्या पाण्याचे स्रोत प्रतिरोधी जिवाणूंपासून दूषित होणार नाहीत.  
  • जनावरांच्या खाद्यात अँटिबायोटिक्सचा वापर वाढीस प्रेरक म्हणून करू नये. दुधामध्ये अँटिबायोटिक्सचे आढळणारे अंश ही एक समस्या असून, भारतीय दुग्धजन्य पदार्थ प्रक्रियेतील एक प्रमुख अडथळा आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे ग्रामीण भागात आजारी आणि उपचार सुरू असलेल्या जनावरांचे दूध डेअरीला घातले जाते. सर्वसाधारणपणे असे मानक आहे की, दुभत्या जनावरावर अँटिबायोटिक्सचा उपचार सुरू असेल, तर औषध दिल्यानंतर कमीत कमी ७२ तास दुधाची विक्री करू नये. 
  • डॉ. आर. पी. कोल्हे, ९८६०१९६२०१  (क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com