Agriculture story in marathi use of indirect solar dryer | Agrowon

पदार्थाची प्रत, रंग टिकविण्यासाठी उपयुक्त सोलर ड्रायर

हेमंत श्रीरामे, मयूरेश पाटील, किशोर धांदे
रविवार, 8 मार्च 2020

सौर वाळवणी संयंत्राच्या इनडायरेक्ट सोलर ड्रायर आणि टनेल टाइप सोलर ड्रायर प्रकारामध्ये पदार्थांची प्रत, रंग इत्यादी टिकवून वाळविण्यासाठीचे पदार्थ कमीत कमी वेळात सुकवता येतात. त्यामुळे हे सोलर ड्रायरचे प्रकार प्रक्रिया उद्योजकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरतात.

सौर वाळवणी संयंत्राच्या इनडायरेक्ट सोलर ड्रायर आणि टनेल टाइप सोलर ड्रायर प्रकारामध्ये पदार्थांची प्रत, रंग इत्यादी टिकवून वाळविण्यासाठीचे पदार्थ कमीत कमी वेळात सुकवता येतात. त्यामुळे हे सोलर ड्रायरचे प्रकार प्रक्रिया उद्योजकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरतात.

 सौर ऊर्जेचा वापर करून औषधी वनस्पतीपासून निर्मित पदार्थ, मसाल्याचे पदार्थ, फळांपासून बनविण्यात येणारे पदार्थ. उदा. आंबापोळी, भुकटी इत्यादींची निर्मिती त्या पदार्थांचे गुणधर्म व त्यास आवश्यक योग्य ते तापमान ठरवून करणे शक्य आहे. सौर वाळवणी संयंत्राच्या इनडायरेक्ट सोलर ड्रायर या प्रकामध्ये साधारणतः औषधी वनस्पती, मसाल्याची पिके (कांदा, लसूण, लवंग, काळी मिरी, आले, कढीपत्ता) मेथी व कोथिंबीर पावडर, मिरची पावडर इत्यादी पदार्थ सुकवले जातात. या प्रकारच्या सौर ड्रायरची मुख्य भाग खालीलप्रमाणे आहे.
१. सौर संकलक
२. सुकवणी ट्रे
३. हवाबंद काचेचे आवरण

  • या संयंत्रामध्ये सौर संकलक हा अत्यंत महत्त्वाचा व मुख्य भाग आहे. या ड्रायरमध्ये पदार्थ सुकविण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करून पदार्थापासून दूर इतरत्र हवा गरम करण्यात येते.
  • या ड्रायरमध्ये डायरेक्ट सौर किरणे पदार्थांवर न शोषली जाता गरम हवेद्वारे पदार्थांची वाळवणी केली जाते. त्यामुळे वाळवण पदार्थाचा रंग व सुगंध टिकून राहण्यास मदत होते.
  • सौर संकलकामध्ये तांब्याच्या किंवा अॅल्युमिनियमच्या पातळ पत्र्यावर खास प्रकारच्याम काळ्या रंगाचे आच्छादन असते. त्याला सिलेक्टिव्ह कोटिंग असे म्हणतात.
  • हे सिलेक्टिव्ह कोटींग उष्णताशोषक असून ते सूर्यप्रकाश शोषून त्याचे रूपांतर उष्णतेमध्ये करते व सिलेक्टिव्ह कोटींग हे एका हवाबंद पेटीमध्ये बंदिस्त असते.
  • पेटीला खालच्या व बाजूच्या कडांवर ग्लासवूलचा उष्णतारोधक थर दिलेला असतो. संकलकाच्या वरील बाजूस ४ मि. मी. जाडीच्या टफन्ड काचेचे आवरण दिलेले असते. या पारदर्शक काचेतून सूर्यकिरणे आतमध्ये, सिलेक्टिव्ह कोटींगवर शोषली जातात व आतील तापमान वाढून हवा गरम होते. ही गरम हवा वजनाने हलकी झाल्यामुळे नैसर्गिक गुणधर्माने वरच्या बाजूस सरकते. या संकलाकाला जोडूनच एका पेटीमध्ये पदार्थ सुकविण्यासाठी चार किंवा त्यापेक्षा जास्त सच्छिद्र ट्रे असतात. या ट्रेमध्ये वाळवणीसाठी पदार्थ ठेवून त्याची गुणवत्ता (सुगंध व रंग) टिकवणे शक्य होते.
  • सौर संकलकातील गरम हवा संकलकाला जोडूनच असलेल्या पेटीतील सच्छिद्र ट्रे मधून पास होते व ड्रायरच्यावरील बाजूस असलेल्या चिमणीद्वारे बाहेर पडते. त्यामुळे पदार्थाची आर्द्रता कमी होऊन पदार्थ लवकर सुकतात.
  • या सौर ड्रायरमध्ये सौर संकलक सर्वसाधारणपणे दक्षिणेकडे तोंड करून भुतलाशी १५ अंश इतका कोन करून उभा करावा. संकलकाच्या पेटीची तसेच, स्टँडची दर २-३ वर्षांमध्ये गंजरोधक रंग लावून काळजी घेणे आवश्यक आहे.
  • या प्रकारच्या ड्रायरमध्ये औषधी वनस्पती, सुगंधी वनस्पती तसेच, फळभाजी पावडर इत्यादींचा रंग व सुगंध टिकवण्यास मदत होते.

संपर्क ः हेमंत श्रीरामे, ९४२२५४५९१५
मयूरेश पाटील, ९०२१६८२३९५
(विद्युत आणि अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी) 


इतर टेक्नोवन
दर्जेदार पशू खाद्य निर्मितीचे तंत्रजनावरांना शारीरिक व दूध उत्पादनासाठी लागणारे घटक...
सोपी, सहज सौर वाळवण यंत्रेसध्या कोरोनाच्या स्थितीमध्ये विक्रीअभावी शेतीमाल...
सौर ऊर्जेद्वारे काजू टरफल तेल निर्मितीसौर ऊर्जेच्या सहायाने काजू बी टरफलापासून तेल...
सिंचनाकरिता चुंबकीय पाणी तंत्राचा वापरक्षारयुक्त पाण्याचा पीक उत्पादन, गुणवत्ता यावर...
पीक व्यवस्थापनात कृत्रिम बुद्धिमत्ता,...शेती व्यवस्थापनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर...
ठिबक सिंचनाचा योग्य वापर महत्त्वाचा...ठिबक सिंचन तंत्रामुळे जमिनीत कायम वाफसा ठेवता...
तयार करा कांडी पशुखाद्य खाद्य घटकांची भुकटी करून गोळ्या किंवा कांड्या...
रोवा काठ्या कमी खर्चात अन श्रमात...भाजीपाला विशेषतः वेलवर्गीय पिकांमध्ये मांडवासाठी...
तिहेरी उपयोगाचे रिंग गार्डन!जागतिक पातळीवर शेती ही अन्नाची उपलब्धता...
पदार्थाची प्रत, रंग टिकविण्यासाठी...सौर वाळवणी संयंत्राच्या इनडायरेक्ट सोलर ड्रायर...
सौर ऊर्जेवर चालणारी ई-सायकल !सध्या दुचाकीचे प्रमाण वाढले असले तरी त्यासाठी...
अन्न शिजवण्यासाठी नावीन्यपूर्ण ‘...सरळ ज्वालेवर अन्नपदार्थ भाजण्यापासून माणसांच्या...
जमीन सुपीकता अन् तंत्रज्ञान; दर्जेदार...वडिलोपार्जित बागायती शेती असल्याने नोकरीच्या मागे...
कृषिक्षेत्रासाठी उपयुक्त ‘ब्लॉक चेन’...कृषिक्षेत्र हे अन्नसुरक्षेच्या दृष्टीने सर्वात...
प्रक्रिया उद्योगासाठी सोलर ड्रायरसौरऊर्जेचा वापर करून पदार्थ वाळवणे हा...
अचूक सिंचनासाठी स्वयंचलित यंत्रणास्वयंचलित सूक्ष्म सिंचन यंत्रणेद्वारे (ऑटोमेशन)...
इंधनबचतीसाठी पर्यावरणपूरक सौर चूलसौरऊर्जेच्या साह्याने रोजच्या जेवणातील सर्व...
तयार खाद्यपदार्थ, पूर्वमिश्रणे...सध्याच्या घाईगडबडीच्या युगामध्ये लोक तयार...
ऊस शेतीसाठी आवश्यक यंत्रेऊस उत्पादनात केवळ मजुरीवर ३५ ते ४० टक्के खर्च...
जलशुद्धीकरणासाठी सौर शुद्धजल संयंत्रदुर्गम भागांत तसेच समुद्रकिनाऱ्यावर पिण्यायोग्य...