Agriculture story in marathi use of silicon based fertilizers in onion crop | Agrowon

कांदा पिकासाठी सिलिकॉनचा वापर फायदेशीर

शिवाजी थोरात
बुधवार, 22 जानेवारी 2020

सिलिकॉनच्या वापराने नत्रयुक्त खतांची उपलब्धता २० ते ४० टक्के, स्फुरदयुक्त ४० ते ६० टक्के आणि पालाशयुक्त २० ते ३० टक्क्यांनी वाढते. योग्य प्रमाणात अन्नद्रव्यांचा पुरवठा झाल्यामुळे उत्पादनात निश्‍चितच वाढ होते.

सिलिकॉनच्या वापराने नत्रयुक्त खतांची उपलब्धता २० ते ४० टक्के, स्फुरदयुक्त ४० ते ६० टक्के आणि पालाशयुक्त २० ते ३० टक्क्यांनी वाढते. योग्य प्रमाणात अन्नद्रव्यांचा पुरवठा झाल्यामुळे उत्पादनात निश्‍चितच वाढ होते.

जगभरातील संशोधनानुसार सर्व पिकांमध्ये सिलिकॉनचा वापर फायदेशीर असल्याचे दिसून आले. संशोधकांच्या मते, प्रतिवर्षी हेक्‍टरी सुमारे २०० ते ८०० किलो सिलिकॉन जमिनीतून निघून जाते. पिकांना जमिनीतून सिलिकॉन उपलब्ध न झाल्यामुळे उत्पादनात घट, रोग व किडींचा प्रादुर्भाव, जमीन भेगाळणे, अन्नद्रव्यांचा ऱ्हास इत्यादी समस्या उद्‍भवतात. सिलिकॉनयुक्त खतांमधील सिलिकॉन डाय-ऑक्‍साईड पाण्यामध्ये विरघळते. त्या वेळी पाण्यासोबत त्याची अभिक्रिया होऊन तयार झालेल्या सिलिसिक आम्लाचे पिके शोषण करतात.

कांदा पीक रासायनिक खतास विशेषतः नत्रास उत्तम प्रतिसाद देते. कांदा जमिनीतून सुमारे ६५ ते ९० किलो नत्र, ४५ ते ५० किलो स्फुरद व १३० किलो पालाशचे शोषण करते. जास्त उत्पादनासाठी हेक्‍टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश याप्रमाणे शिफारस करण्यात येते. जमिनीध्ये वापरलेले नत्र निचरा, बाष्पीभवन आणि पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जाते. पिकाला ५० ते ६० टक्केच नत्र उपलब्ध होते. स्फुरदाचा जमिनीतील कॅल्शियमसोबत संयोग होऊन ८० टक्के स्थिरीकरण झाल्याने उपलब्धता कमी होते. पालाशची उपलब्धतादेखील ५० ते ६० टक्के एवढीच आहे. परंतु सिलिकॉनयुक्त खतांच्या वापरामुळे अन्नद्रव्याचे शोषण चांगल्या प्रकारे होते. परिणामी नत्रयुक्त खतांची उपलब्धता २० ते ४० टक्के, स्फुरदयुक्त ४० ते ६० टक्के आणि पालाशयुक्त २० ते ३० टक्क्याने वाढते. योग्य प्रमाणात अन्नद्रव्यांचा पुरवठा झाल्यामुळे उत्पादनात निश्‍चितच वाढ होते.
 
रोग नियंत्रणासाठी सिलिकॉन उपयुक्तता 
१) फुलकिडे 

 • किडे पातीमधील अन्नरसाचे शोषण करतात. पांढरे डाग पडून पात वेडीवाकडी होते.
 • सिलिकॉनची फवारणी केल्यास, पानातील पेशीभोवती पातळ पण कठीण आवरण तयार होते. किडींना रसशोषणामध्ये अडथळे येतात.

२) कडा करपा व शेंडा करपा 

 • सिलिकॉनमुळे पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते.
 • पात जाड व टणक बनल्यामुळे रोगांच्या बीजाणूंना रुजण्यास मज्जाव होतो.

कृषी विज्ञान केंद्र, बारामती, जि. पुणे येथे घेतलेल्या प्रयोगाअंती मिळालेले निष्कर्ष ः

 • पिकाची मुळे मजबूत होण्यास व मुळांची घनता वाढण्यास मदत.
 • कमी वेळात, कमी सूर्यप्रकाशात प्रकाशसंश्‍लेषणाची क्रिया मोठ्या प्रमाणात जाणवते.
 • पिकावर कमी पाणी किंवा अतिउष्णतेचा ताण कमी जाणवतो.
 • नत्र, स्फुरद व पालाशची उपलब्धता चांगली होते.
 • करपा व फुलकिडींचा उपद्रव कमी होतो.

कृषी विज्ञान केंद्राने बारामती तालुक्यातील पारवडी गावामध्ये काही शेतकऱ्यांच्या शेतावर घेतलेल्या चाचण्यांचे निष्कर्ष ः

 • फवारणी न केलेल्या शेतातील पिकाच्या पाती पिवळ्या पडून संपूर्ण क्षेत्र पांढरे झाले होते. मात्र, फवारणी केलेल्या क्षेत्रातील पाती हिरव्यागार व ताठ होत्या.
 • फवारणीमुळे कीड व रोगाचे प्रमाण कमी झालेले दिसून आले.
 • फवारणी खर्चात एकरी १५०० रुपये बचत होऊन एकरी उत्पादनात ५०० ते १००० किलो वाढ झाली, त्यामुळे एकरी ५ ते १० हजार रुपयांपर्यंत नफा झाला.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे २०१८ मध्ये सिलिकॉनचा हेक्‍टरी ३५० किलो वापर केल्यानंतर मिळालेले निष्कर्ष ः

 • जमिनीचा सामू, ई.सी., सेंद्रिय कर्ब यावर अनुकूल परिणाम दिसून आला.
 • उपलब्ध नत्राचे प्रमाण २० टक्के, स्फुरदाचे ३६ टक्के आणि पालाशचे प्रमाण ४० टक्क्यांनी वाढले.
 • फेरस, झिंक, मॅंगेनीज व कॉपर इत्यादी सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढली.
 • पातीमधील हरितद्रव्यांचे प्रमाण, कांद्याचे आकारमान, वजन इत्यादींवर अनुकूल परिणाम दिसून आले.
 • हेक्‍टरी उत्पादनात ४.२२ मे. टनांनी वाढ झाली.

चीनमध्ये २०१४ मध्ये ‘चायनीज स्प्रिंग ओनियन’ या कांद्याच्या दोन जातींवर सिलिकॉनच्या घेतलेल्या चाचणीचे निष्कर्ष ः

 • उत्पादनात अनुक्रमे १९.४ व ३०.९ टक्के वाढ दिसून आली.
 • मुक्त अमिनो आम्ल, पायरुविक आम्ल, रंग व तिखटपणावर अनुकूल परिणाम दिसून आला.

विविध संशोधनांअंती मिळालेले निष्कर्ष ः

 • कांदा साठवणुकीसाठी चाळीमध्ये टाकण्यापूर्वी चाळीत सिलिकॉनची फवारणी केल्यास, काजळी व विटकरी सड रोगास प्रतिबंध होतो, असे निष्कर्ष हावेरी (कर्नाटक) येथील संशोधन केंद्रात दिसून आले आहेत.
 • सिलिकॉनच्या वापरामुळे कांदा साठवणुकीत टिकतो, वजनातील घट कमी होते, तसेच रंग टिकवण्यासाठी फायदेशीर आहे, असे वॉर्सा (पोलंड) येथील कृषी विद्यापीठातील संशोधनाअंती दिसून आले.

संपर्क ः शिवाजी थोरात, ९८५००८५८११
(सदस्य - इंटरनॅशनल सोसायटी फॉर सिलिकॉन रिसर्च इन ॲग्रिकल्चर)


इतर ताज्या घडामोडी
गोरेगाव आणि देगावांतील शेतकऱ्यांच्या...अकोला  ः जिल्ह्यातील गोरेगाव व देगाव या दोन...
जळगाव जिल्ह्यात अर्ली केळी लागवड सुरूजळगाव  ः जिल्ह्यात यावल, रावेर, मुक्ताईनगर,...
...अखेर रुईखेड येथे हवामान केंद्र स्थापनअकोला  ः महावेध व हवामान आधारित फळपीक विमा...
चांदवड येथे शेतकरी संघटनेची कांदा परिषद...नाशिक  : केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री...
गोंदिया : नुकसानग्रस्तांचे डोळे लागले...सडक अर्जुनी, गोंदिया  ः खरीप हंगामात अवकाळी...
जळगाव : किसान सन्मानच्या लाभाची...जळगाव ः शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या...
परभणी जिल्ह्यात नादुरुस्त बंधाऱ्यांमुळे...परभणी : जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे...
कर्जमुक्ती योजनेंतर्गत ७४६ शेतकऱ्यांचे...नाशिक : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
किसान सभेचे बिऱ्हाड आंदोलन मागेनाशिक  : दिंडोरी तालुक्यामध्ये गेल्या अनेक...
लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात हेक्‍टरी १०...उस्मानाबाद : दोन्ही जिल्ह्यातील कापूस व तुरीची...
पाणी सोडण्याविरुद्ध रेणा प्रकल्पस्थळी...रेणापूर, जि. लातूर : भंडारवाडी (ता. रेणापूर)...
वणवा नुकसानग्रस्तांना सिंधुदुर्ग ‘झेडपी...सिंधुदुर्ग : ‘‘वणव्यामुळे नुकसान झालेल्या...
सांगलीत ‘रोहयो’तून डाळिंब लागवडीला ‘...आटपाडी, जि. सांगली : पावणे दोन वर्षांत येथील...
पुणे जिल्ह्यात हरभऱ्याला रोग-किडीचा फटकापुणे ः रब्बी हंगामात वाफसा न झाल्याने अनेक...
नगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मदत...नगर ः अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची...
पीकविम्याची रक्कम लवकरच ः कृषिमंत्री...मुंबई ः राज्यातील शेतकऱ्यांना १५ ते २० दिवसांच्या...
सातारा जिल्ह्यात अडीच महिन्यांत केवळ ४४...सातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू...
मराठवाड्यातील दूध संकलनात घटऔरंगाबाद : मराठवाड्यातील दूध संकलनात गतवर्षी...
पहाटेच्या शपथविधीची विधानसभेत आठवणमुंबई ः देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी...
मराठवाडी धरणग्रस्तांनी बंद पाडले धरणाचे...ढेबेवाडी, जि. सातारा : ‘आधी पुनर्वसन मगच धरण’ या...