सुरक्षित मळणी करण्यासाठी आयएसआय मार्क असलेले मळणीयंत्र वापरावे. निर्मात्याच्या शिफारशीनुसार यंत्राची गती निश्चित करावी. ही गती कमी-जास्त करण्यासाठी फॅन पुली किंवा ड्राइव्ह पुली कमी-जास्त व्यासाची वापरावी. मळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा प्रकार, जाळीला दिलेला उतार, चाळणी हलवणाऱ्या यंत्राची गती आणि जाळी हलवण्याचे अंतर या गोष्टींवर अवलंबून असते. मळणी यंत्रामध्ये ड्रम, सिलेंडर, चाळणी आणि पंखा यांचा समावेश असतो.
मळणी यंत्राची कार्यपद्धती मळणी यंत्रातील सिलेंडर आणि पंखा एकाच वेळी ट्रॅक्टर, इंजिन, पॉवर टिलर किंवा इलेक्ट्रिक मोटारच्या शक्तीचा वापर करून फिरवले जातात. कणसे किंवा ओंब्या जेव्हा वेगाने फिरणाऱ्या सिलेंडर आणि स्थिर ड्रममध्ये येतात तेव्हा घर्षणामुळे दाणे वेगळे होऊन चाळणी पडतात आणि पंख्याच्या साह्याने भुसा वेगळा केला जातो. महत्त्वाचे म्हणजे स्थिर ड्रम व सिलेंडर यांच्यातील अंतर पिकानुसार नियंत्रित करावे, त्यामुळे कार्यक्षमता वाढते. वैभव सूर्यवंशी, ९७३०६९६५५४ (कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद, जि. जळगाव) मळणी यंत्राची रचना
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.