Agriculture story in marathi, useful instruments for farm women | Page 2 ||| Agrowon

अवजारांच्या वापरांमुळे महिलांचे कष्ट होतील कमी

एस. एन. सोलंकी, ए. ए. वाघमारे
शुक्रवार, 8 मार्च 2019

महिलांचा शेती कामातील वाटा लक्षात घेता, त्यांच्यासाठी सुधारित, कार्यक्षमता वाढविणारी तसेच कमी ऊर्जेचा वापर करावा लागणारी शेती अवजारे विकसित करण्यात आली आहे. या सुधारित अवजारांचा उपयोग केल्यामुळे कष्ट, वेळ व पैसा कमी लागून पीक उत्पादन वाढीला फायदा होतो.
 
शेतीतील कामे जास्तीत जास्त वेळ व ऊर्जा लागणारे आणि कष्टप्रद आहेत. तसेच शेतीतील काम करण्याच्या स्थितीमुळे पाठीच्या मणक्याचे आजार, मानदुखी, कंबर आणि गुडघ्याचे आजार होतात. त्यामुळे कामाची गती मंद होते. हे लक्षात घेऊन महिलांना शेती कामे सुलभ जाण्यासाठी भारतात विविध संशोधन संस्थांनी सुधारित अवजारे तयार केली आहेत.

महिलांचा शेती कामातील वाटा लक्षात घेता, त्यांच्यासाठी सुधारित, कार्यक्षमता वाढविणारी तसेच कमी ऊर्जेचा वापर करावा लागणारी शेती अवजारे विकसित करण्यात आली आहे. या सुधारित अवजारांचा उपयोग केल्यामुळे कष्ट, वेळ व पैसा कमी लागून पीक उत्पादन वाढीला फायदा होतो.
 
शेतीतील कामे जास्तीत जास्त वेळ व ऊर्जा लागणारे आणि कष्टप्रद आहेत. तसेच शेतीतील काम करण्याच्या स्थितीमुळे पाठीच्या मणक्याचे आजार, मानदुखी, कंबर आणि गुडघ्याचे आजार होतात. त्यामुळे कामाची गती मंद होते. हे लक्षात घेऊन महिलांना शेती कामे सुलभ जाण्यासाठी भारतात विविध संशोधन संस्थांनी सुधारित अवजारे तयार केली आहेत.

सरी व वरंबा पाडण्याचे अवजार :

 • वेगवेगळ्या रुंदीच्या सरी व वरंबा पाडण्याकरिता उपयोगी.
 • दोन महिला या अवजाराने ९ ते १६ इंच पर्यंत रुंदीच्या सरी सहज पाडू शकतात. याचा वापर प्रामुख्याने भाजीपाला लागवडीसाठी होतो.
 • अवजाराच्या सहाय्याने दोन महिला प्रति तास ०.०४-०.०६ हेक्टर क्षेत्रावर सऱ्या पाडू शकतात.
 • ओढून तसेच ढकला पद्धतीने सऱ्या पाडता येतात.

नवीन टोकण यंत्र 

 • एका ओळीत उभ्याने टोकण पद्धतीने पेरणी करण्याकरिता वापरता येते.
 • पारंपरिक पेरणी पद्धतीत वाकल्यामुळे पाठ व कंबरदुखीचा होणारा त्रास या यंत्राच्या वापराने कमी होतो.
 • यंत्राद्वारे वाटाणा, सोयाबीन, तूर, मका इत्यादी पिकांची पेरणी करता येते.
 • यंत्राचे वजन ४ किलो असून त्याची क्षमता ०.०३ हेक्टर प्रति तास एवढी आहे.

रोटरी टोकण यंत्र 

 • हे उभ्याने ढकला पद्धतीने चालणारे टोकण यंत्र आहे.
 • यंत्राच्या सहाय्याने मका, सोयाबीन आणि तूर यांसारखे मध्यम आकाराचे बी पेरता येते. यंत्राच्या सहाय्याने एका ओळीतील दोन बियांतील अंतरही ठरविता राखता येते.
 • एक महिला एका तासात ०.०५ हेक्टर जागेत टोकण करु शकते. यंत्राचे वजन २२ किलो आहे.

पेरणी यंत्र 

 • हे हस्तचलित फ्लुटेड रोलर प्रकारचे पेरणी यंत्र असून मध्यम ते मोठ्या आकाराच्या बियाणांच्या पेरणीसाठी वापरता येते.
 • हे यंत्र एक व्यक्ती ढकल पद्धतीने चालवू शकते.
 • एका तासात ०.०३ हेक्टर क्षेत्र पेरता येते.

कोळपणी यंत्र 

 • जमिनीवर बसून खुरपणी केल्यामुळे गुडघे दुखतात. सुधारित हात कोळपी वापरून हे काम उभ्याने करता येते.
 • यंत्राचा उपयोग केल्यास मजुरांची संख्या कमी करुन अधिक चांगले काम होऊ शकते.

बांबू अवजारांचा संच 

 • वेगवेगळ्या संरचनांची अवजारे बांबूला बसवून आपण विविध अवजारे वापरू शकतो.
 • शेतीमधील कामासाठी तसेच परसबाग, गांडूळ शेती यासाठी उपयुक्त अवजार आहे.
 • सर्व संरचना सहित किंमत १,५५० रुपये आहे.

त्रिफाळी 

 • हाताने आंतरमशागत करण्यासाठी त्रिफाळी वापरण्यात येते.
 • यंत्र वजनाने हलके असून त्याला तीन फाळ बसविलेले आहेत. त्याच फाळांना तीन रुंद पास आहेत.
 • हॅंन्डलने त्रिफाळी ओढली असता जमिनीत पास घुसून ती भुसभुशीत होते. जमिनीतील खोलवरचे तण उपटले जाते.

चाकाचे कोळपे :

 • खुरप्याने दोन ओळीत खुरपणी करताना अवघडलेल्या स्थितीत बसल्याने गुडघे, पाठ दुखीचा त्रास होतो. अशावेळी दोन्ही ओळीमधील गवत काढण्यासाठी चाकाचे कोळपे उपयोगी आहे.
 • लांब हॅंन्डलमुळे ढकल पद्धतीने पासीच्या सहाय्याने गवत काढले जाते. या यंत्राने एका दिवसात ०.१६ हेक्टर क्षेत्रातील गवत काढले जाते.
 • म.कृ.वि. व सी.आय.ए.ई. चाकाच्या कोळप्यांना एक चाक दिले आहे. चाकाच्या पाठीमागे सरळ/व्ही आकाराचे पास दिले आहे.

दातेरी हातकोळपे 

 • हे कोळपे आंतरमशागतीसाठी वापरता येते. यामध्ये एक व्ही आकाराची पास असून पासेच्या पाठीमागील बाजूस एक दातेरी रोलर दिलेला आहे.
 • पासेमुळे निघणाऱ्या तणाचे दातेरी रोलरमुळे तुकडे होऊन ते मातीत मिसळले जातात. हे ढकला व चालवा पद्धतीचे कोळपे असून यांच्या वापराने मजुराचा त्रास कमी करता येतो.
 • एक महिला मजूर एका दिवसात ०.०५ ते ०.०६ हेक्टर क्षेत्रावरील गवत काढते.

चाकाचे त्रिफाळी कोळपे / सायकल कोळपे :

 • यंत्रामध्ये लोखंडी सांगाड्याला एक चाक व त्याच्या पाठीमागे पास बसविलेले असतात. ते वर-खाली करता येतात.
 • तण काढण्यासाठी तीन व्ही आकाराचे पास आणि ढकलण्यासाठी चाक आहे.
 • यंत्राच्या सहाय्याने एक महिला ०.०४ हेक्टर प्रतितास कोळपणी करू शकते.

मकृवि विळा-खुरपे :

 • याचे वैशिष्ट्ये म्हणजे हे पारंपरिक विळा व खुरपी यांच्या सारखे असल्यामुळे मजुरांना काम करताना त्रास होत नाही.
 • कापणी करण्यासाठी आतून धार लावलेले पाते असून त्याची रुंदी १५० मि.मी. आहे तर बाहेरील बाजूस असलेली धार ही ६३ मि.मी. आहे. ती खुरपणीसाठी वापरही जाते.
 • विळा खुरपीचे वजन हे इतर विळ्यापेक्षा कमी असून ते स्प्रींग स्टीलपासून बनविले असल्यामुळे नेहमी धार लावावी लागत नाही.
 • एक महिला मजूर साधारणत: एका दिवसात ०.१७० हेक्टर एवढे कापणीचे काम करू शकते.

ऊस साळण्याचा चिमटा 

 • चिमट्याचा उपयोग ऊस कापणीनंतर वाडे कापण्यासाठी व वाळलेली पाने साळण्यासाठी होतो.
 • चिमट्याच्या खालील बाजूस सुरी असून, ऊस चिमट्यात पकडून खाली ओढले असता, सुरीच्या सहाय्याने ऊस साळला जातो.
 • सुरीच्या सहाय्याने उसाची मुळे स्वच्छ करता येतात.

मका सोलणी यंत्र 

 • कणसापासून दाणे वेगळे करण्यासाठी पारंपरिक पद्धतीत ती काठीने बडविली जातात. त्यामुळे हाताला इजा होते, बियांची अंकुरण क्षमता कमी होते. हे टाळण्यासाठी मका सोलणी यंत्र वापरले जाते.
 • हे यंत्र म्हणजे ६.४ सेंमी लांब व ७.२ सें.मी. व्यासाचा एक पाईप तुकडा असून त्याला आतल्या बाजूने दातेरी पट्ट्या बसविलेल्या असतात.
 • एका हातात यंत्र पकडून दुसऱ्या हाताने कणीस घालून पुढे-मागे फिरविल्यास प्रति तास २२-२५ किलो दाणे मिळतात. हेच यंत्र अष्टकोनी आकारात मिळते.
 • हॅंन्डलच्या सहाय्याने चालणारे रोटरी मका सोलणी यंत्र उपलब्ध आहे. रोटरी डीक्सवरील दात्यामुळे फिरतेवेळेस कणसापासून दाणे वेगळे करते. यात मक्याची कणसे हॉपरमध्ये टाकावी लागतात. यामध्ये बसून व उभे राहून काम करता येते. यंत्राच्या सहाय्याने एका तासात ३० ते ८० किलो दाणे प्रती तास वेगळे होतात.

पदचलित मका सोलणी यंत्र 

 • मका सोलणीसाठी हाताने सोलणी यंत्र किंवा पारंपरिक पद्धतीने करतात. या पद्धतीमध्ये होणारा श्रम व वेळ वाचवण्याच्या उद्देशाने पदचलित मका सोलणी यंत्र विकसित करण्यात आले आहे.
 • यंत्राचा सोलणीचा दर ८०-८५ किलो प्रतितास इतका असून त्याची सरासरी सोलणी क्षमता ९७.७४ टक्के इतकी आहे.

बीबा फोडणी यंत्र 

 • पारंपरिक पद्धतीत बीबा फोडण्यासाठी महिला दगड, विटांचा वापर करतात. त्यामुळे गोडंबीचे नुकसान होते, बीब्याचे तेल अंगावर उडून महिलांच्या हातावर जखमा होतात. यापासून वाचण्यासाठी बीबा फोडणी यंत्र तयार करण्यात आले आहे.
 • यंत्रात बीबा ठेवण्यासाठी पाटावर खाच केलेली असते, त्यात बीबा ठेवून हॅंडलच्या सहाय्याने गोडंबी सहजपणे अलग करता येते.
 • यंत्राची क्षमता पाच किलो प्रति महिला प्रतिदिन एवढी असून यापासून ७० ते ७५ टक्के अखंड गोडंबी मिळते.

सूर्यफूल मळणी यंत्र 
सूर्यफूलांची मळणी करताना फुले काठ्यांनी बडवून बी वेगळे करावे लागतात. परंतु त्यामध्ये बीया फुटण्याचे प्रमाण जास्त असते. त्यासाठी मळणी यंत्र वापरणे फायदेशीर ठरते. यात सायकलच्या चाकाप्रमाणे परंतु आडवे फिरणारे चाक असते. त्यावर फुले धरुन चाक फिरवल्याने बी चाकाखालील नरसाळ्यात पडतात. नंतर ते पंख्याच्या सहाय्याने स्वच्छ होऊन आपणास चांगल्या प्रतीचे बी मिळते. २) हे यंत्र इलेक्ट्रीक मोटारच्या सहाय्याने चालविले असता एका दिवसात ४ ते ५ क्विंटल सूर्यफूलाची मळणी करता येते. हे यंत्र पॅडलच्या सहाय्याने देखील चालविता येते. या यंत्राच्या सहाय्याने एका तासाला ६० ते ६५ किलो दाणे वेगळे होतात.

भेंडी-वांगी तोडण्याचा चिमटा 

 • भेंडी, वांगी तोडतांना त्यांच्या देठावरील असणाऱ्या बारीक काट्यांमुळे बोटांना इजा होण्याचा संभव असतो. त्यासाठी कात्रीप्रमाणे पाती असलेला चिमटा उपलब्ध आहे.
 • चिमट्याला दोन रिंग असतात. त्यातील एका रिंगमध्ये अंगठा व दुसरीमध्ये शेजारचे बोट घालून थोडे दाबून वांगी, भेंडी तोडली जाते.
 • चिमट्याने एक व्यक्ती एका दिवसात ५० ते ६० किलो भेंडी किंवा वांगे तोडू शकते.

भाजीपाला कापणी रिंग कटर :

 • हे यंत्र वापरण्यास सुलभ असून यामध्ये बोटात घालण्याकरिता एक रिंग आहे. त्याच्या समोर कापणीकरिता छोटा पास दिलेला आहे.
 • हे वापरताना एका हाताने भाजीपाला धरुन दुसऱ्या हातात असलेले रिंग समोरील पासेमुळे भाजीपाला सहजतेने कापता येतो.

कापूस सड उपटणी चिमटा 

 • कापसाचे सड उपटण्यासाठी व्यक्तीला खाली वाकून जोर लावून ते उपटावे लागतात. त्यामुळे हात, पाठ व कंबरदुखीचा त्रास होतो. त्यासाठी चिमट्याचा वापर करणे फायद्याचे आहे.
 • यात एक चिमटा असतो, त्यामध्ये सड पकडून लिव्हरच्या सहाय्याने ते पकडावे लागते. यांचे हॅंडल उंच असल्याने खाली न वाकताच सहजपणे सड उपटले जाते.
 • चिमट्याचे वजन ५.२५ किलो आहे. एक महिला एका तासामध्ये ५० वर्ग मिटर एवढ्या क्षेत्रावरील सड काढू शकते.

धसकटे गोळा करण्याचे यंत्र 

 • पीक काढणीनंतर व वखरणीनंतर धसकटे व काड्या गोळा करणे हे वेळखाऊ व श्रमिक काम असते.
 • साधारणत: एका हेक्टरवरील धसकटे गोळा करण्यासाठी १२ ते १५ महिला मजूर लागतात. त्याएवजी धसकटे गोळा करण्याचे यंत्र वापरणे सोयीचे होते. हे यंत्र वजनाने हलके असल्याने एका महिलेस वापरण्यास सोपे आहे.
 • हे यंत्र म्हणजे दीड ते सव्वादोन फूट लोखंडी अॅंगलला दर अर्धा इंच अंतरावर ३ इंच असलेली लोखंडी सळी लावलेली आहे. सळईचे जमिनीतले टोक अणकूचीदार असते. याला ५ फूट लांबीचे बांबू किंवा हलक्या पाईपचे हॅंडल बसविलेले असते. त्यामुळे न वाकता काम सोपे होते.
 • दोन महिला मजूर एका दिवसात एका हेक्टरवरील धसकटे गोळा करू शकतात.

संपर्क ः एस.एन. सोलंकी, ८००७७५२५२६
(वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी )

 


फोटो गॅलरी

इतर टेक्नोवन
काढणीपश्‍चात कामासाठी सुधारित यंत्रेमानवचलित सुपारी सोलणी यंत्र पारंपरिक पद्धतीने...
सुधारित तंत्राद्वारे वाढवली उसाची...सतत शिकण्याची आस, अभ्यास, मेहनत व सुधारित...
कपाशी अवशेषातील बोंड अळीचा नाश करणारी...कपाशी पिकामध्ये अमेरिकन बोंड अळी आणि गुलाबी बोंड...
सुगंधी तेलनिर्मितीतून शेतकऱ्यांना...जिरॅनॉलचे प्रमाण अधिक असल्यामुले पाल्मरोसा (शा....
गोचिड निर्मूलनासाठी पर्यावरणपुरक पद्धतीजनावरांच्या शरीरावरील गोचिड निर्मुलन करण्यासाठी...
सुधारित भोपळा जातीच्या लागवडीतून...ओडिशा येथील चंदन कुमार खुंटिया यांनी केवळ...
फवारणी यंत्राची देखभालआपण शेतामध्ये फवारणी यंत्रांचा अनेक वेळा वापर करत...
कडक जमिनींसाठी ठरतोय ‘व्हायब्रेटिंग...खोल जमिनीत तयार झालेला कडक थर फोडण्यासाठी तसेच...
शेळी दूध प्रक्रियेला संधीभारतीय कृषी संशोधन परिषदने शेळीच्या दुधापासून...
मशागतीसाठी सुधारित रोटरी नांगररोटरी नांगर हे प्राथमिक मशागतीसाठी वापरले जाणारे...
विद्यार्थी बंधूंनी उभारला जैविक स्लरी...पुणे जिल्ह्यातील नानगाव येथील प्रतीक व प्रवीण या...
कार्यक्षम जल व्यवस्थापनासाठी नव्या दिशाकाटेकोर सिंचन व कार्यक्षम जलवापर पद्धतीच्या...
शेती नियोजनासाठी ड्रोन तंत्रज्ञानपिकांमधील पाण्याचा ताण, सूक्ष्म अन्नद्रव्यांची...
पर्वतीय, पठारी प्रदेशातील शेतीसाठी...भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या रांची येथील पर्वतीय...
हवामान बदल समरस शेतीसाठी हवी यंत्रणाआज अन्नधान्याचे उत्पादन पुरेसे असले, तरी भविष्यात...
आधुनिक काळाची गरज ः कृषी यंत्रमानवजागतिक पातळीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर...
कृषी अभियांत्रिकी ज्ञानाचा उपयोग व्हावामहाराष्ट्र राज्य अवर्षण, दुष्काळ याबरोबरच अनियमित...
‘हायड्रोपोनिक’ तंत्रज्ञानावर आधारित...नांदेड शहरापासून जवळच असलेल्या पुयणी (ता. नांदेड...
ट्रॅक्टरचलित फवारणी यंत्रेरोग, किडीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी फवारणी...
अर्का किरण’ पेरू वाणाची अति सघन लागवड...आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील इसुका दार्सी...