रेनबो ट्राउट माशापासून मूल्यवर्धित उत्पादने

रेनबो ट्राउट मासा
रेनबो ट्राउट मासा

रेनबो ट्राउट हा थंड पाण्यात सापडणारा मासा मुळात परदेशी असला तरी भारताच्या विविध भागांत तो आढळतो. शहरी भागात या माशाला बरीच मागणी असते. इतर अनेक मूल्यवर्धित उत्पादने बनविण्यासाठी रेनबो ट्राउटचा उपयोग होतो. सध्‍या भारतामध्‍ये हा मासा ताज्‍या थंड स्‍वरूपात विकला जातो. या माशापासून विविध प्रकारचे‍ मूल्‍यवर्धित पदार्थ तयार करता येतात. १. गोठवलेला (फ्रोजन) रेनबो ट्राउट गोठवून शीतगृहात ठेवलेला रेनबो ट्राउट बरेच दिवस टिकतो. प्रत्येक मासा पॉलिथिनच्या पिशवीत वेगवेगळा पॅक केल्यास त्याचा दमटपणा कमी होत नाही, तसेच ऑक्सिडेशनही घटते. गोठवलेला आख्खा रेनबो ट्राउट (-१८) अंश तपमानावर एक वर्ष टिकतो. २. धुरावलेला (स्मोक्ड) रेनबो ट्राउट रेनबो ट्राउटपासून मूल्यवर्धित उत्पादन मिळविण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे पूर्ण मासा स्वच्छ करून (होल गटेड्) तो हॉट स्मोक्ड म्हणून विकणे. ह्या प्रक्रियेच्‍या दरम्यान तो पुरेसा शिजविला जातो व लगेच खाता येतो. असे स्मोक्ड उत्पादन बनविण्याची कार्यपद्धती आयएफटीने प्रमाणित केली आहे. यासाठी माशाचे डोके व पोटातील घाण काढून (बिहेडेड्, गटेड्) तो उघडून (स्प्लिट ओपन) १० टक्के खाऱ्या‍ पाण्यात १५ मिनिटे कोल्ड-ब्लांच करण्‍यात येतो. यानंतर ६० अंश सेल्सिअस तपमानावर तो तीन तास हॉट-स्मोक केला की इच्छित रंग व चव मिळू शकते. निर्वात पॅकबंद स्थितीतील रेनबो ट्राउट ११ आठवडे टिकतो. हवेसहित पॅक केलेल्या माशाच्या तुलनेत हा काळ जास्त आहे. ३. डबाबंद (कॅनड) रेनबो ट्राउट पूर्ण मासा स्वच्छ करून, धुवून त्याचे एकसारखे लांब तुकडे म्हणजे स्टेक्स बनवतात. हे स्टेक्स १० टक्के खारे पाणी व ०.५ टक्के सायट्रिक ॲसिडमध्ये १० मिनिटे कोल्ड-ब्लांच करतात. ४५ अंश सेल्सिअस तपमानावर दोन तास स्मोक करून एक तास अर्धवट वाळवतात. ३०७ X १०९ आकाराच्या प्रकारच्या कॅन्स म्हणजे डब्यांमध्ये सुमारे १२० ग्रॅम स्टेक्स हाताने भरतात. यानंतर १२० अंश सेल्सिअस तापमानावर रिफाइंड शेंगदाणा तेलात तळतात. स्मोक्ड् ॲंड कॅन्ड् ट्राउट स्टेक इन ऑइल हे एक उत्कृष्ट उत्पादन असून, वातावरणीय तपमानावर ते एक वर्ष टिकते. संपर्क ः आर. एम. सिद्दिकी, ९६३७६७६६८८ (अन्न सूक्ष्मजीवशास्त्र आणि सुरक्षितता विभाग, एम.आय.पी. अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, औंढा (नागनाथ), जि. हिंगोली)  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com