Agriculture story in marathi value added products from rainbow trout fish | Agrowon

रेनबो ट्राउट माशापासून मूल्यवर्धित उत्पादने

आर. एम. सिद्दिकी, एस. व्ही. मस्के, जी. एम. माचेवाड
बुधवार, 4 डिसेंबर 2019

रेनबो ट्राउट हा थंड पाण्यात सापडणारा मासा मुळात परदेशी असला तरी भारताच्या विविध भागांत तो आढळतो. शहरी भागात या माशाला बरीच मागणी असते. इतर अनेक मूल्यवर्धित उत्पादने बनविण्यासाठी रेनबो ट्राउटचा उपयोग होतो. सध्‍या भारतामध्‍ये हा मासा ताज्‍या थंड स्‍वरूपात विकला जातो. या माशापासून विविध प्रकारचे‍ मूल्‍यवर्धित पदार्थ तयार करता येतात.

रेनबो ट्राउट हा थंड पाण्यात सापडणारा मासा मुळात परदेशी असला तरी भारताच्या विविध भागांत तो आढळतो. शहरी भागात या माशाला बरीच मागणी असते. इतर अनेक मूल्यवर्धित उत्पादने बनविण्यासाठी रेनबो ट्राउटचा उपयोग होतो. सध्‍या भारतामध्‍ये हा मासा ताज्‍या थंड स्‍वरूपात विकला जातो. या माशापासून विविध प्रकारचे‍ मूल्‍यवर्धित पदार्थ तयार करता येतात.

१. गोठवलेला (फ्रोजन) रेनबो ट्राउट
गोठवून शीतगृहात ठेवलेला रेनबो ट्राउट बरेच दिवस टिकतो. प्रत्येक मासा पॉलिथिनच्या पिशवीत वेगवेगळा पॅक केल्यास त्याचा दमटपणा कमी होत नाही, तसेच ऑक्सिडेशनही घटते. गोठवलेला आख्खा रेनबो ट्राउट (-१८) अंश तपमानावर एक वर्ष टिकतो.

२. धुरावलेला (स्मोक्ड) रेनबो ट्राउट
रेनबो ट्राउटपासून मूल्यवर्धित उत्पादन मिळविण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे पूर्ण मासा स्वच्छ करून (होल गटेड्) तो हॉट स्मोक्ड म्हणून विकणे. ह्या प्रक्रियेच्‍या दरम्यान तो पुरेसा शिजविला जातो व लगेच खाता येतो. असे स्मोक्ड उत्पादन बनविण्याची कार्यपद्धती आयएफटीने प्रमाणित केली आहे. यासाठी माशाचे डोके व पोटातील घाण काढून (बिहेडेड्, गटेड्) तो उघडून (स्प्लिट ओपन) १० टक्के खाऱ्या‍ पाण्यात १५ मिनिटे कोल्ड-ब्लांच करण्‍यात येतो. यानंतर ६० अंश सेल्सिअस तपमानावर तो तीन तास हॉट-स्मोक केला की इच्छित रंग व चव मिळू शकते. निर्वात पॅकबंद स्थितीतील रेनबो ट्राउट ११ आठवडे टिकतो. हवेसहित पॅक केलेल्या माशाच्या तुलनेत हा काळ जास्त आहे.

३. डबाबंद (कॅनड) रेनबो ट्राउट
पूर्ण मासा स्वच्छ करून, धुवून त्याचे एकसारखे लांब तुकडे म्हणजे स्टेक्स बनवतात. हे स्टेक्स १० टक्के खारे पाणी व ०.५ टक्के सायट्रिक ॲसिडमध्ये १० मिनिटे कोल्ड-ब्लांच करतात. ४५ अंश सेल्सिअस तपमानावर दोन तास स्मोक करून एक तास अर्धवट वाळवतात. ३०७ X १०९ आकाराच्या प्रकारच्या कॅन्स म्हणजे डब्यांमध्ये सुमारे १२० ग्रॅम स्टेक्स हाताने भरतात. यानंतर १२० अंश सेल्सिअस तापमानावर रिफाइंड शेंगदाणा तेलात तळतात. स्मोक्ड् ॲंड कॅन्ड् ट्राउट स्टेक इन ऑइल हे एक उत्कृष्ट उत्पादन असून, वातावरणीय तपमानावर ते एक वर्ष टिकते.

संपर्क ः आर. एम. सिद्दिकी, ९६३७६७६६८८
(अन्न सूक्ष्मजीवशास्त्र आणि सुरक्षितता विभाग, एम.आय.पी. अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, औंढा (नागनाथ), जि. हिंगोली)
 

टॅग्स

इतर कृषी प्रक्रिया
रेनबो ट्राउट माशापासून मूल्यवर्धित...रेनबो ट्राउट हा थंड पाण्यात सापडणारा मासा मुळात...
सुधारित पद्धतीने टिकवा मासेमासे खारवून टिकविणे ही पद्धत तुलनात्‍मक स्‍वरूपात...
मैद्याच्या प्रतीवर ठरतो बेकरी...बेकरी उद्योगातील प्रमुख उत्पादनांमध्ये बिस्किटे,...
मस्त ना..! काबुली हरभऱ्यापासून...ब्रेड किंवा पोळीवर पसरवून बटरचे सेवन केले जाते....
भारतीय मक्याचे पुढे काय होते ? जाणून...मका हे एक महत्त्वाचे तृणधान्य आहे. जगातील चार...
तळण पदार्थासाठी नवे तंत्र ः एअर फ्रायिंगभारतीयांमध्ये तळलेल्या पदार्थांची आवड...
केळीच्या जैवविविधतेत तमिळनाडूची श्रीमंतीऑगस्ट महिन्यात तमिळनाडू राज्याची राजधानी चेन्नई...
उसापासून साखर निर्मितीची प्रक्रिया जागतिक पातळीवर साखर उद्योग उत्तम विकसित झाला असून...
करटोलीपासून प्रक्रिया पदार्थ करटोली ही रानभाजी असून, त्याच्या विशिष्ट चवीसाठी...
कापूस पऱ्हाट्यांपासून ब्रिकेट, पेलेट...पांढरे सोने या नावाने ओळखले जाणारे कापूस पीक...
मिल्क केक बनविण्याची प्रक्रियामिल्क केक हा दिसायला कलाकंदप्रमाणे असला तरी...
जांभळापासून बनवा जॅम, जेली, टॉफी,पावडरजॅम     परिपक्व जांभळाची फळे निवडून...
नाचणी प्राक्रियेत संधीनाचणी हे पीक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत...
व्हॅनिलामुळे दूध लागते अधिक गोडगोड दुधामध्ये व्हॅनिला स्वादाचा अंतर्भाव केला...
आरोग्यवर्धक पौष्टिक राजगिराधान्यांच्या तुलनेत राजगिऱ्यामध्ये कॅल्शिअम हे...
औषधी अन् आरोग्यदायी करवंदकरवंदामध्ये नैसर्गिकरीत्या कॅल्शिअम भरपूर...
बेल फळापासून बनवा जॅम, कॅन्डी, स्क्वॅशबेलाचे फळ अतिशय गुणकारी आहे. बेलफळांचा वापर...
आरोग्यास उपयुक्त कुळीथआयुर्वेदशास्त्राने कुळथास आजारी व्यक्‍तींसाठी...
आरोग्यदायी शेवगा भुकटीचे उपयोगशेवगा वनस्पतीचे इंग्रजी नाव ड्रमस्टिक असे असून,...
केळीपासून बनवा जेली, प्युरी, ज्यूस केळीमध्ये अनेक पोषणमूल्ये आहेत. केळी शरीरातील...