agriculture story in marathi, Vasantrao Naik Marathvada Agriculture University is making available various fodder crop varieties to the farmers in the scarcity of fodder. | Agrowon

बहुवार्षिक चारापिकांचा कृषी विद्यापीठामार्फत प्रसार, चाराटंचाईच्या काळात शेतकऱ्यांना आधार 

माणिक रासवे
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

ठोंब नेऊन त्याद्वारे चारापिकांचे उत्पादन व पुन्हा ठोंबनिर्मिती करून उत्पन्नाचा स्रोत शेतकऱ्यांना निर्माण करता येऊ शकतो. एकदल बहुवार्षिक चारापिके कमी पाण्यावरही तग धरून राहतात. देवणी जनावरे दुग्धोत्पादन, तसेच शेतीकाम अशी दुहेरी उपयोगाची आहेत. आमच्या प्रक्षेत्रावरच ठोंब उपलब्ध होत असल्याने दूरवरून बेणे आणण्याचा शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च कमी झाला. विविध जिल्ह्यांत सुधारित जातींचा प्रसारही झाला. 
-डॅा. दिनेश सिंह चौहान 
प्रभारी अधिकारी, 
संपर्क - ९४२३१७१७१५ 

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात देवणी देशी व संकरित गोवंशाचे संवर्धन केले जात आहे. सोबतच देशभरातील कृषी विद्यापीठे आणि संशोधन संस्थांतर्फे विकसित चारा पिकांच्या जातींची लागवड करून चारा प्रक्षेत्र विकसित केले आहे. मराठवाड्यातील एक हजार शेतकऱ्यांनी या पिकांचे ठोंब नेले आहेत. त्यातून दुष्काळी व चाराटंचाई काळात जनावरांना चांगले पशुधन मिळण्याबरोबरच हिरवा चारा उत्पादित करणे त्यांना शक्य झाले आहे. 
 
सध्या दुष्काळ, मका पिकात संकट तयार केलेली अमेरिकन लष्करी अळी या मुख्य समस्यांमुळे अनेक ठिकाणी चाराटंचाई निर्माण झाली आहे. शेतकरी उपलब्ध होईल तेथून व असेल त्या महागड्या दराने चारा खरेदी करताना दिसत आहेत. शुद्ध, जातिवंत पशुधनाचीही वानवा आहे. या पार्श्‍वभूमीवर परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने पशुपालकांना संकटात साथ दिली आहे. 

गोवंश संवर्धन केंद्र 
विद्यापीठात १९७५ मध्ये संकरित गोपैदास केंद्र स्थापन झाले. पन्नास टक्के परदेशी गुण असणाऱ्या संकरित जनावरांची उत्पत्ती, मराठवाड्यातील तापमानात त्यांची अनुकूलता, आहार, आरोग्य याबाबत संशोधन करणे हा केंद्र स्थापनेमागील उद्देश होता. त्यातूनच देवणी आणि होलस्टीन फ्रिजिअन (एचएफ) यांच्या संकरातून होलदेव ही जात २०११ मध्ये विकसित करण्यात आली. 

गोवंशाचे संवर्धन 
देशी गोवंशात देवणी गायीची जात लोकप्रिय आहे. कृषी विद्यापीठाच्या गोपैदास केंद्र प्रकल्प ठिकाणी वळू, गायी, वासरे मिळून सुमारे १६७ देवणी जनावरे आहेत. पैकी ९२ गायी दुधाळ होलदेव जातीच्या ९४ गायी आहेत. देवणीचे पाच व होलदेव जातीचे तीन वळू आहेत. एकूण मिळून २७५ च्या दरम्यान जनावरे आहेत. डॉ. संदेश देशमुख आणि सहकारी नियमित लसीकरण, आरोग्य व्यवस्थापन पाहतात. वार्षिक सरासरी पाहिली तर दररोज सुमारे १४० ते १६० लिटर दूध संकलन होते. त्याची कूपनधारक कर्मचाऱ्यांना विक्री होते. वर्षातून एकदा अतिरिक्त जनावरांची विक्री जाहीर लिलाव पद्धतीने होते. 

पडीक जमिनीवर चारा प्रक्षेत्र 

 • विद्यापीठात ३२० एकरांपैकी १२० एकरांत चारापिकांचे उत्पादन 
 • दीडशे एकरांवर बीजोत्पादन. उर्वरित क्षेत्र गोठे आणि चराई क्षेत्र. 
 • येथे ज्वारी, बाजरी चारा पिके घेतली जात. परंतु दरवर्षी लागवड असल्याने वेळ, श्रम, पैसे खर्च होत. बहुवार्षिक चारापिकांचे पोषणमूल्य लक्षात घेऊन त्यांच्या विविध जातींची लागवड सुरू झाली. 
 • तत्कालीन कुलगुरू डॉ. बी. व्यंकटेश्वरलू, विद्यमान कुलगुरू डॉ. अशोक ढवण, संशोधक संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांचे त्यामागे मार्गदर्शन 
 • केंद्र प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी डॉ. दिनेशसिंह चौहान यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने नियोजन केले. संकरित गोपैदास केंद्र प्रक्षेत्राजवळून वाहणाऱ्या पिंगळगड नाल्याचे पाणी साठून राहत होते. त्यामुळे अनेक वर्षांपासून पडीक जमिनीत मशागत, पाण्याचा निचरा होण्यासाठी वेगवेगळे उपचार करून जमीन चारा लागवडीयोग्य केली. 

बहुवार्षिक चारा उपलब्धता- ठळक बाबी 

 • प्रक्षेत्रावर देशभरातील कृषी विद्यापीठे, संशोधन संस्थांकडून विकसित बहुवार्षिक एकदल, द्विदल चारापिकांची लागवड 
 • असे आहेत वाण 
 • राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे फुले जयवंत, फुले गुणवंत, 
 • भारतीय गवत आणि चारा संशोधन संस्था, धारवाड येथील डीएचएन-६ 
 • झांशी येथील सीओबीएन-५ 
 • बायएफ संस्थेचे बीएनएच-१०, 
 • मारवेल, पॅराग्रास, दशरथ, ओट, बरसीम, ल्युसर्न, बहुवार्षिक ज्वारी, गिनी, अंजन, धामण गवत, 
 • रे ग्रास (मखन जात), चवळी, सुबाभूळ, दीनानाथ, फुले रुचिरा (ज्वारी) 
 • संकरित नेपियरच्या ठोंबांना मागणी. त्याची पहिली कापणी ९० दिवसांत, त्यानंतर प्रत्येक ६० दिवसांनी कापणी असे तीन वर्षांपर्यंत उत्पादन सुरू राहते. 

ठोंबांची विक्री  

 • शेतकरी, कृषी विज्ञान केंद्रे, खाजगी कृषी महाविद्यालये, अशासकीय व शासकीय संस्था, वैरण विकास कार्यक्रमांतर्गत इच्छुक संस्थांना ठोंबांचा पुरवठा. त्यातून विद्यापीठाला उत्पन्न. 
 • एक रुपया प्रति ठोंब असा दर. एकरी सुमारे साडेचार ठोंब लागतात. 

विक्री- प्रातिनिधिक 
वर्षे       शेतकरी संख्या     शेतकरी  रक्कम   
 २०१७-   २१८०               ३,१५, ८०० 
२०१८-१९   १७००              २,१५, ०००    
चालू वर्ष      ७००              ६७,००० 
दररोजची विक्री- दोन हजार ते चार हजार ठोंब 

प्रतिक्रिया 
परभणीत आमचा दुग्ध व्यवसाय आहे. दहा एकर शेतीपैकी सात एकरांत विविध चारापिकांची लागवड आहे. कृषी विद्यापीठातून आणलेले जयवंत गवत पाच एकरांत तर उर्वरित क्षेत्रावर मका, कडवळ आहे. हिरवा आणि वाळला चारा कुट्टी करून दिल्याने दुग्धोत्पादनात वाढ झाली आहे. लहान मोठी मिळून ७२ जनावरे आहेत. येत्या काळात चारा क्षेत्र वाढविणार आहोत. 
- विशाल काकडे, ९८६०८७४५७६ 
परभणी 

दोन वर्षांपूर्वी गोपैदास केंद्रातून जयवंत जातीचे ठोंब घेऊन अर्धा एकरांत लागवड केली. सुमारे अकरा जनावरे आहेत. सुधारित जातीच्या बहुवार्षिक चाऱ्यामुळे दुग्धोत्पादनात वाढ झाली. यंदाच्या दुष्काळात कमी पाण्यावर पीक तग धरून राहिले. 
-संग्राम कापसे - ८२०८१९२७८३ 
सिंगणापूर, जि. परभणी. 

एकूण १५ एकरांत चारा लागवड आहे. परभणी कृषी विद्यापीठातून आणलेल्या डीएचएन- ६ जातीची दोन एकरांत लागवड आहे. याच्या ठोंबांपासून नव्याने लागवड करता येते. हिरव्या चाऱ्यामुळे जनावरांना सकस आहार मिळतो आहे. 
-एकनाथराव साळवे- ९८६०७९१८५८ 
सिंगणापूर 
 


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
शेती, दुग्धव्यवसायाने बनविले...कोल्हापूर जिल्ह्यातील शेळेवाडी (ता. राधानगरी)...
पंजाबचे पशुपालक वापरतात सुधारित तंत्रलुधियाना (पंजाब) येथे प्रोग्रेसिव्ह डेअरी...
देशी गोसंगोपन, गांडूळखतासह दूध...सातारा जिल्ह्यातील कोपर्डे हवेली (ता. कऱ्हाड)...
आव्हाने खूप सारी, तरीही मधमाशीपालनात...नाशिक येथे पूर्वा केमटेक या कंपनीतर्फे नुकताच...
उत्कृष्ट व्यवस्थापनातून पपईत मिळवली ओळखनंदुरबार जिल्ह्यात धमडाई येथील सुभाष व प्रनील या...
परिश्रमपूर्वक व्यवस्थापनातून...पुणे जिल्ह्यातील रिहे येथील सुनील शिंदे...
कमी कालावधीचा दोडका देतोय चांगला नफागेल्या दोन, तीन महिन्यांत झालेल्या पावसामुळे पुणे...
उसाचे ३८ गुंठ्यांत तब्बल १४७ टन उत्पादनकोल्हापूर जिल्ह्यातील कवठेगुलंद (ता. शिरोळ) येथील...
साईप्रवरा शेतकरी कंपनीची उलाढाल पोचली...नगर जिल्ह्यातील चिंचोली (ता. राहुरी) परिसरातील...
प्रक्रिया उद्योगातून सोयाबीनचे...शहरी बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड...
नोकरीला शेतीची जोड देत उंचावले अर्थकारणआसोदे (ता. जि. जळगाव) येथील नीलेश नारायण माळी एका...
कमी पाण्यामध्ये सीताफळाचे किफायतशीर...सिंचनासाठी पाण्याच्या कमतरतेसह प्रतिकूल...
दर्जेदार वांगी उत्पादनात मानेंचा हातखंडाकसबे डिग्रज (ता. मिरज, जि. सांगली) येथील युवा...
देशी बियाण्यांची तयार केली सीड बॅंकभाजीपाला, फुलझाडे आणि विविध औषधी, सुगंधी...
कष्ट, अनुभवातून साकारली भाजीपाला पिकाची...मूळचे सावत्रा (ता. मेहकर, जि. बुलडाणा) गावचे...
पणज गावाने आणली केळी पिकातून सुबत्ताअकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात पणज हे छोटे गाव...
रोपवाटिका व्यवसायाने दिला सक्षम आधारदहावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर नोकरी न मिळाल्याने...
औरंगाबादच्या मोसंबी कलमांची मध्य...महाराष्ट्रातील अत्यंत गोड, रसाळ मोसंबीने आता मध्य...
रोडे यांचे संत्र्याचे अत्याधुनिक...दर्जेदार संत्रा उत्पादनासोबतच संत्र्याचे ग्रेडिंग...
रासायनिक अवशेषमुक्त शेतीचा कृषी...नाशिक येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या...