भाजीपाला पिकाला द्या गरजेनूसार पाणी

भाजीपाला पिकाच्या चांगल्या वाढीसाठी आवश्‍यकतेनुसार ओलित करावे
भाजीपाला पिकाच्या चांगल्या वाढीसाठी आवश्‍यकतेनुसार ओलित करावे

 उन्हाळी हंगामात भेंडी, चवळी, गवार, वेलवर्गीय भाजीपाला, तसेच टरबूज व खरबूज या पिकांची लागवड केली जाते. स्थानिक हवामान, जमीन तसेच बाजारपेठेतील मागणी या बाबी विचारात घेऊन पिकांची लागवड करावी. सर्व भाजीपाला पिकांच्या सरळ व संकरित जाती उपलब्ध आहेत. लागवडीसाठी योग्य जातीची निवड महत्त्वाची ठरते.   जाती ः भेंडी ः अर्का अनामिका, पुसा मखमली, फुले उत्कर्षा, परभणी क्रांती, फुले विमुक्ता आणि अकोला बहार.   वांगी ः पुसा परपल राउंड, पुसा परपल क्लस्टर, पुसा परपल लाँग, कृष्णा, फुले हरिता.   टोमॅटो ः भाग्यश्री, धनश्री, फुले राजा   मिरची ः फुले ज्योती, जयंती, एन पी-४६ ए, कोकण कीर्ती.   टरबूज ः शुगर बेबी, अर्का ज्योती, दुर्गापूर मीठा.   खरबूज ः हरा मधू, अर्का जीत, पुसा मधुरस.   चवळी ः पुसा कोमल, पुसा फाल्गुनी.   गवार ः पुसा नवबहार, पुसा सदाबहार.   वेलवर्गीय भाजीपाला ः काकडी, कारली, दुधी भोपळा, दोडका या पिकांच्या कमी कालावधीत प्रति वेल अधिक फळे देणाऱ्या जातींची निवड करावी.   खत व्यवस्थापन ः

जानेवारी महिन्यात लागवड केलेल्या पालक, मेथी, कोथिंबिरीला खताचा दुसरा हप्ता द्यावा. माती परीक्षणानुसार हेक्टरी ३७.५ किलो नत्र, १२.५ किलो स्फुरद आणि १२.५ किलो पालाशची मात्रा द्यावी. वांगी पिकाला हेक्टरी ३० किलो नत्र, टोमॅटो ५० किलो नत्र आणि भेंडीला २५ किलो नत्र द्यावे. मिरची, भेंडी, वांगी, कलिंगड, खरबूज, टरबूज, चवळी, गवार आणि टोमॅटो पिकांना बांगडी पद्धतीने तर कांदा पिकाला दोन ओळींमध्ये खत द्यावे. खत दिल्यानंतर मातीने झाकावे. जमिनीमध्ये पुरेसा ओलावा उपलब्ध नसल्यास पाटपाणी द्यावे. पिकाच्या चांगल्या वाढीसाठी आवश्‍यकतेनुसार ओलित करावे. पीक तणविरहित ठेवावे. कांदा ः

  • हेक्टरी ५० किलो नत्राचा दुसरा हप्ता द्यावा.
  • त्यासोबत प्रति हेक्टर ३० किलो गंधकाची मात्रा द्यावी.
  • फुलकिडे ः नियंत्रण ः (प्रति लिटर पाणी)

  • प्रोपेनोफॉस १.५ मिलि किंवा
  • गरजेनुसार १५ दिवसांनी दुसरी फवारणी करावी.
  • ओलित व्यवस्थापन ः

  • पिकाला पाण्याचा ताण पडू देऊ नये. ताण बसल्यास त्याचा विपरीत परिणाम उत्पादनावर होतो.
  • मुळांजवळ पाणी साचून राहिल्यास मूळसड किंवा खोडसड व मर रोगाचा प्रादुर्भाव होतो. प्रमाणापेक्षा जास्त ओलित करू नये.
  • संपर्क ः डॉ. एस. एम. घावडे, ७०२०५७५८६७ (मिरची व भाजीपाला संशोधन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com