agriculture story in marathi, Vijay Deshmukh from Nagar Dist. has made expertise himself in Pomegranate farming. | Agrowon

निर्यातक्षम डाळिंब उत्पादनात देशमुख यांचा हातखंडा; १११ रुपये प्रतिकिलो दराने विक्री

सूर्यकांत नेटके
मंगळवार, 12 ऑक्टोबर 2021

सुलतानपूर (जि. नगर) येथील विजय देशमुख यांनी नऊ वर्षांच्या अनुभवातून निर्यातक्षम गुणवत्तेच्या डाळिंब उत्पादनात हातखंडा तयार केला आहे. उत्कृष्ट व्यवस्थापनातून एकरी सात ते १० टनांपर्यंत उत्पादकता तर प्रति किलो शंभर रुपयांपर्यंत दर मिळवण्याचा त्यांचा दरवर्षी यशस्वी प्रयत्न राहिला आहे.

सुलतानपूर (जि. नगर) येथील विजय देशमुख यांनी नऊ वर्षांच्या अनुभवातून निर्यातक्षम गुणवत्तेच्या डाळिंब उत्पादनात हातखंडा तयार केला आहे. उत्कृष्ट व्यवस्थापनातून एकरी सात ते १० टनांपर्यंत उत्पादकता तर प्रति किलो शंभर रुपयांपर्यंत दर मिळवण्याचा त्यांचा दरवर्षी यशस्वी प्रयत्न राहिला आहे.
 
नगर जिल्ह्यात नेवासे तालुक्यातील कुकाणे परिसर बागायती असून, मुळा प्रकल्पाच्या कालव्यातून भागाला पाणी मिळते. उसासह फळपिके घेण्यावर शेतकऱ्यांचा कल असतो. तालुक्यातील सुलतानपूर येथील विजय भानुदास देशमुख यांनी निर्यातक्षम डाळिंब उत्पादनात हातखंडा व पंचक्रोशीत ओळख तयार केली आहे. त्यांची वडिलोपार्जित पंधरा एकर शेती होती. नोकरीपेक्षा त्यांनी शेती प्रगतीवर भर दिला. सन २०१० मध्ये सहा एकरांत भगव्या जातीच्या डाळिंबाची लागवड केली. अथक परिक्षमातून चांगले उत्पादन घेत टप्प्याटप्प्याने क्षेत्रात वाढ केली. आज एकूण क्षेत्र ४८ एकर असून पैकी ३० एकरांत जुनी व नवी अशी डाळिंब बाग आहे. सन २०१३ मध्ये पाच एकरांत मंत्र्याच्या ८५० झाडांची लागवड केली. सन २०१६ पासून उत्पादन हाती येत असून व्यापाऱ्यांना जागेवरच विक्री होते.

पाण्याची उपलब्धता
अडचणीच्या काळासाठी प्रत्येकी एक कोटी लिटर क्षमतेची दोन शेततळी सुलतानपूर व नजीक चिंचोली येथे घेतली. दोन एकर क्षेत्र राखीव ठेवून तेथेही शेततळे उभारण्याचे नियोजन आहे. विजेची समस्या भासू नये यासाठी स्वखर्चाने शेतात स्वतंत्र रोहित्र बसवले आहे. नव्याने घेतलेले क्षेत्र भेंडे साखर कारखान्यापासून सहा किलोमीटरवर आहे. कॅनॉलवरून पाइपलाइन करून पाण्याची सोय केली आहे.

व्यवस्थापनातील ठळक मुद्दे
विजय सांगतात, की झाडांच्या ‘रेस्टिंग पिरियडमधील तीन ते चार महिन्यांचे व्यवस्थापन खूप महत्त्वाचे असते. तोडणी झाल्यानंतर अनेक जण पुढील बहर धरेपर्यंत झाडांची फारशी काळजी घेत नाहीत. तसे करू नये. तोडणीनंतर झाडांत अन्नद्रव्यांचा साठा उपलब्ध व्हावा यासाठी लगेच आठ दिवसांत झाडांची झीज भरून काढावी. त्यासाठी प्रति झाड पन्नास किलो कुजलेले शेणखत, जिवाणू खते, बोनमिल तसेच ५०० ग्रॅम रासायनिक खते देण्यात येतात.

फळाचा दर हा त्याची गुणवत्ता व आकारावर अवलंबून असतो. तोडणीनंतर काही दिवसांत झाडांच्या पोटातून फूट (वॉटर शूट) निघते. ती अनावश्यक फूट काढून टाकतात. त्यामुळे सूर्यप्रकाश शेवटपर्यंत पोहोचतो. काडी जाड होते. पुढील बहरात कळी निघणारी काडी सक्षम राहते. कळी चांगली निघून फळ आकाराने मोठे तयार होत असल्याचा अनुभव आहे

झाडाच्या जुन्या पानांत अन्न तयार करण्याची क्षमता अधिक असते. त्यामुळे फळाची तोडणी झाल्यानंतरही जुनी पाने टिकून राहणे गरजेचे आहे. अनेक शेतकरी जुनी पाने टिकून राहावीत यासाठी प्रयत्न करत नाहीत. मग काही दिवसांत पावसाळी वातावरणात बुरशीजन्य रोगांमुळे जुनी पाने गळून जातात. त्याचा पुढील काळात फटका बसतो. त्यामुळे जुनी पाने टिकून राहण्यासाठी बुरशीनाशकांसह कीटकनाशकांच्या गरजेनुसार फवारण्या घेतात.

व्यवस्थापनातील बारकाव्यामुळे २०११ पासून आतापर्यंत एकही बहर वाया गेलेला नाही. लागवडीचे अंतर १४ बाय १० फूट आहेत. प्रामुख्याने येणाऱ्या तेलकट डाग रोगापासून बचाव करण्यासाठी बहर धरण्याच्या वेळी रासायनिक खतांबरोबरच प्रति झाड ५०० ग्रॅम शेंगदाणा पेंड, ५०० ग्रॅम निंबोळी पेंड, बोनमील (हाडाचा चुरा) ५०० ग्रॅमचा वापर व ठिबकद्वारे जिवाणू खते दिली जातात.

फळे ‘सेट’ झाल्यानंतर दर १५ दिवसांनी रासायनिक खतांची तसेच कडधान्य स्लरी, जिवाणू स्लरी आलटून पालटून प्रति झाड प्रति लिटर पाण्यातून दिली जाते.
दरवर्षी आंबे बहर धरतात. सप्टेंबरच्या काळात फळे बाजारपेठेत येतात.

उत्पादन व उत्पन्न
जुन्या वयाच्या झाडांपासून एकरी सात ते १० टनांपर्यंत, तर नव्या बागेतून एकरी तीन ते चार टनांपर्यंत उत्पादन मिळते असे विजय सांगतात. सुमारे सात ते आठ वर्षांपासून व्यापाऱ्यांमार्फत बांगलादेश, आखाती देशांना निर्यात होते. यंदा ५० टन डाळिंबाची निर्यात प्रति किलो १११ रुपये दराने झाली. दरवर्षी १०० रुपयांच्या आसपास दर मिळतो. एकदा तो १३१ रुपयेही मिळाला आहे.

मार्गदर्शन व मदत
फळपीक विमा, लागवड, ठिबक सिंचन, शेततळे आदी योजनांसाठी कृषी विभागाची मदत झाली आहे. सन २००७-०८ च्या सुमारास ‘ॲग्रोवन’मध्ये कृषिभूषण डॉ. दत्तात्रेय वने यांच्या ‘वने मॉडेल’ ची लेखमाला प्रसिद्ध झाली. ती वाचून कांदा व अन्य पिके यशस्वीपणे घेण्यासह पाणी व्यवस्थापनात सुधारणा केली. राजुरी येथील सहकारी बी. टी. गोरे यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांचा मार्गदर्शनातून डाळिंबाची लागवड केली. या भागात डाळिंब उत्पादक मित्रांचा गट आहे. सर्वजण एकमेकांना मार्गदर्शन व मदत करतात. शेतीत आई वडील, पत्नी व भाऊ यांची समर्थ साथ आहे.

प्रतिक्रिया
कायम सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. अवांतर गोष्टीत वेळ व्यर्थ न घालवता आपली ऊर्जा शेतीवर केंद्रित करून पीकशास्त्र, रोग-किडी व अन्य बाबींचा अभ्यास करावा. त्यातून शेती फायदेशीर राहते.
-विजय देशमुख- ९३७०८२९२४३, ९९२१८०९८४५


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
‘ऑयस्टर’ मशरूमला मिळवली बाजारपेठसांगली जिल्ह्यातील बावची येथील प्रदीप व राजेंद्र...
गोड्या पाण्यात निर्यातक्षम व्हेमानी...गोड्या पाण्यात कोळंबी व त्यातही ‘व्हेनामी’ जातीचे...
शेती, पर्यावरण संवर्धनातून वाघापूरची...पुणे जिल्ह्यात वाघापूर गावाने लोकसहभागातून आपले...
सुयोग्य व्यवस्थापनातून हरभरा पिकात तयार...बुलडाणा जिल्ह्यातील सवडद येथील विनोद देशमुख यांनी...
अॅपलबेरचे निर्यातक्षम उत्पादन. पुणे जिल्ह्यातील खानापूर (ता. जुन्नर) येथील...
ट्रॅक्टरचलित विविध यंत्रांद्वारे वेळ,...ट्रॅक्टरचलित यंत्राच्या साह्याने पेरणी वा कोळपणी...
योग्य व्यवस्थापनातून वाढविला १९०...गोठा, म्हशींचे संगोपन व दूध विक्री या स्तरांवर...
दुग्धव्यवसायातून संयुक्त फोलाने...नगर जिल्ह्यात कुकाणे येथील संयुक्त फोलाने...
संघर्षातून फुलले शेतीमध्ये 'नवजीवन'अवघी दोन एकर जिरायती शेती. खाण्यापुरती बाजरी...
झेंडूसह अन्य फुलांमध्ये शिरसोलीची ओळखजळगाव जिल्ह्यातील शिरसोली गाव फुलशेतीसाठी...
प्रयत्नशील व प्रयोगशीलतेचा पडूळ...लाडसावंगी (जि.. औरंगाबाद) येथील प्रयोगशील, जिद्दी...
देशी केळी अन रताळ्यांना नवरात्रीसाठी...कोल्हापूर जिल्ह्यात नवरात्रीच्या निमित्ताने...
फळे- भाजीपाला साठवणुकीसाठी ‘पुसा फार्म...नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेने (...
दुग्ध व्यवसायातून बसविली आर्थिक घडीसातारा जिल्ह्यात कोपर्डे (हवेली) येथील कैलास...
निर्यातक्षम डाळिंब उत्पादनात देशमुख...सुलतानपूर (जि. नगर) येथील विजय देशमुख यांनी नऊ...
डाळ निर्मिती उद्योगातील ‘अनुजय' ब्रॅण्डढवळी (ता.वाळवा,जि.सांगली) येथील सौ.चारुलता उत्तम...
महिला गटाने दिली कृषी,ग्राम पर्यटनाला...पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी संस्थेने मार्गासनी (ता....
वांगे भरीत पार्टीद्वारे व्यवसाय...डांभुर्णी (ता. यावल, जि. जळगाव) येथील राणे...
लाकडी घाण्याद्वारे दर्जेदार तेल, खाद्य...अकोला जिल्ह्यातील अकोट येथील कांचन अशोकराव चौधरी...
भिडी गावाने उभारल्या अवजारे बॅंका,...काळाची पावले ओळखत विदर्भातील अनेक गावांनी...