agriculture story in marathi, Vijay Magdum is doing sugarcane ratoon farming successfully. | Page 2 ||| Agrowon

खोडवा उसाची अधिक उत्पादनक्षम शेती.

राजकुमार चौगुले
शनिवार, 28 ऑगस्ट 2021

महाराष्ट्र- कर्नाटक राज्याच्या सीमेवरील सिदनाळ (ता. निपाणी, जि. बेळगाव) येथील विजय मगदूम यांनी प्रयोगशील ऊस शेतीचा आदर्श उभारला आहे. त्याद्वारे लागवडीच्या उसाचे एकरी १०० टन, तर खोडव्याचे ५० ते ७४ टन असे सातत्यपूर्ण उत्पादन ते घेत आहेत.

महाराष्ट्र- कर्नाटक राज्याच्या सीमेवरील सिदनाळ (ता. निपाणी, जि. बेळगाव) येथील विजय मगदूम यांनी प्रयोगशील ऊस शेतीचा आदर्श उभारला आहे. त्याद्वारे लागवडीच्या उसाचे एकरी १०० टन, तर खोडव्याचे ५० ते ७४ टन असे सातत्यपूर्ण उत्पादन ते घेत आहेत.

महाराष्ट्र- कर्नाटक राज्याच्या सीमेवर सिदनाळ (ता. निपाणी, जि. बेळगाव) हे वेदगंगा नदीकाठावर वसलेले बागायती गाव आहे. गावात पूर्वीपासून तंबाखूचे पीक घेतले जायचे. परंतु गेल्या काही वर्षांपासून भागात ऊस शेती वाढत आहे. अनेक शेतकऱ्यांनी प्रयोगशीलताही जपली आहे. यापैकीच विजय अण्णासाहेब मगदूम हे एक नाव आहे. वडिलोपार्जित पारंपरिक ऊस शेतीत अभ्यासपूर्ण बदल करीत त्यांनी लावणीच्या उसाबरोबर खोडव्यातही मास्टरी मिळवली आहे.

प्रयोगशील ऊसशेती
मगदूम यांची नऊ एकर शेती आहे. पैकी तीन एकर केळी व सहा एकरांत ऊस आहे. एम.ए. पर्यंत शिक्षण झाल्यानंतर नोकरी न करता त्यांनी सन २००० पासून ऊसशेतीला प्रारंभ केला. त्यापूर्वी तीन फुटी सरीचा वापर व्हायचा. लागवडीच्या उसाचे एकरी ५० टन, तर खोडव्याचे उत्पादन ३० टनांपर्यंत यायचे. विजय यांनी अनुभवी शेतकऱ्यांसोबत चर्चा व अभ्यासातून व्यवस्थापनातून अनेक बदल केले ते पुढीलप्रमाणे.

व्यवस्थापनातील सुधारणा
वाण को ८६०३२ आहे. पूर्वी तीन फुटी सरी होती. ते वाढवत नेले. आता प्रत्येक उंच वरंब्यावर ठिबकच्या दोन लॅटरल्स आहेत. दोन्हींतील अंतर साडेचार फूट आहे. वरंब्याच्या दोन्ही बाजूंना उसाच्या ओळी आहेत. उसाची उजवी बाजू ते पुढील डावीकडची बाजू यातील अंतर साडेसात फुटांपर्यंत आहे. दोन रोपांतील अंतर दीड फूट आहे. या पद्धतीमुळे रोपांची वाढ व विस्तार चांगला होण्यास मदत झाल्याचे विजय सांगतात.

लावणीचा ऊस तुटून गेल्यानंतर खोडव्याकडेही विजय काटेकोर लक्ष देतात. त्यांच्या मते
लावण उसाच्या तुलनेत खोडवा उसाचा उत्पादन खर्च ५० ते ६० टक्क्यांनी कमी येतो.

लावण ऊस तुटून गेल्यानंतर पाचट बारीक केले जाते व ते सरीत भरून घेतले जाते. खोडकी यंत्राद्वारे किंवा कुदळीने काढून सपाट केली जातात. त्यावर कार्बेन्डाझिम व क्लोरपायरिफॉस यांच्या द्रावणाची फवारणी केली जाते. यातून किडी व बुरशीजन्य रोगांचा धोका कमी होऊन उसाची निरोगी वाढ होण्यास मदत होते. त्यानंतर बगला चिरून घेतात. त्यामुळे पाचटावर माती पडते. त्यानंतर जिवाणू कल्चरचा वापर होतो. त्यातून पाचट अडीच ते तीन कुजण्यास मदत होते.

बगला चिरलेल्या एका बाजूला एकरी डीएपी १०० किलो, युरिया १०० किलो, एमओपी ५० किलो, चाळलेले शेणखत १०० किलो व कीटकनाशक असे घटक मातीआड केले जातात. दुसऱ्या बाजूला माती परीक्षणानुसार पुढीलपैकी गरजेनुसार झिंक, फेरस प्रत्येकी १० किलो, मॅंगेनीज ३ किलो, बोरॉन २ किलो, कॉपर १ किलो, मॅग्नेशिअम सल्फेट २० किलो, गंधक १० किलो, सिलिकॉन ४० किलो व
निंबोळी पेंड बारीक केलेली असा वापर होतो.

कोंब येण्यास सुरुवात झाल्यानंतर पहिले पाणी दिल्यानंतर काही
अन्य घटकांची आळवणी केली जाते. ऊस तुटून जाईपर्यंत सुमारे सहा फवारण्या होतात.

 फुटव्यांच्या संख्येचे नियोजन खोडवा उत्पादनवाढीसाठी महत्त्वाचे असल्याचे विजय सांगतात.
पाचट पूर्ण कुजल्यानंतर बेटातील बारीक-सारीक कोंब काढले जातात. एका बेटात नऊ ऊस ठेवले जातात.

भरणी करत असताना खते विस्कटून न देता मातीआड केली जातात. त्यामुळे वाया जात नाहीत. रासायनिक खतांच्या मात्रा देताना चाळलेले शेणखत मिसळून दिले जाते.

लावण ऊस तुटून गेल्यानंतर सुमारे दहा महिन्यांपर्यंत प्रत्येक आठवड्याला ठिबकने खते दिली जातात. यात आठवड्याला एकरी तीन किलो युरिया, एक किलो फॉस्फोरिक ॲसिड, तीन किलो पांढरे पोटॅश, गरज भासल्यास अर्धा किलो मॅग्नेशिअम सल्फेट असा वापर होतो. पाच महिन्यांनंतर युरियाऐवजी अमोनिअम सल्फेटचा वापर होतो. ठिबकद्वारे खते देण्यात सातत्य ठेवल्याने उसाची वाढ चांगली होत असल्याचा अनुभव आहे.

लावण व खोडवा उत्पादन चांगले घेण्यासाठी उसाचा बेणेमळा व रोपवाटिका स्वतः तयार करतात. सुमारे २१ दिवसांच्या रोपांची पुनर्लागवड होते.

जमिनीची सुपीकता जपली
सन २००९ पासून पाचटाचा वापर होतो. खोडवा काढल्यानंतर डिसेंबर वा जानेवारीत
हरभरा पीक बेवड म्हणून घेतले जाते. त्याच्या उत्पादनाची फारशी अपेक्षा नसते. कारण
हिरवळीच्या खतासारखा त्याचा वापर होतो. तो जमिनीत गाडला जातो. यामुळे जमिनीत हवा खेळती राहून ती सुपीक होते. दोन वर्षांतून एकदा एकरी सहा ते सात ट्रॉली शेणखत दिले जाते.

उत्पादन
लावणीच्या उसाचे एकरी १०० टनांपर्यंत, तर खोडव्याचे उत्पादन ५५ ते ७४ टन असे सातत्य ठेवले आहे. लावण उसाचा एकरी खर्च ९० हजार रुपयांपर्यंत, तर खोडव्याचा३५ हजार ते ३८ हजार रुपयांपर्यंत येतो. खोडवा उसाचे एकरी ६० टन उत्पादन व दर २८५० रुपये प्रति टन गृहित धरल्यास सुमारे एक लाख ३३ हजार रुपयांपर्यंत नफा मिळतो. मागील वर्षी लावण उसाचे ५५ गुंठ्यांत १५५ टन उत्पादन मिळाले आहे.

‘सोशल मीडिया’चा वापर
विजय ‘होय, आम्ही शेतकरी समूह तसेच ‘सोशल मीडिया’ व शेतकरी मेळावे या माध्यमातून शेतकरी व तज्ज्ञांसोबत संपर्कात असतात. त्यातून ज्ञान व तंत्रज्ञान यांची देवाणघेवाण सातत्याने सुरू
असते.

संपर्क- विजय मगदूम, ९४४८२७०५०५


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
डाळ निर्मिती उद्योगातील ‘अनुजय' ब्रॅण्डढवळी (ता.वाळवा,जि.सांगली) येथील सौ.चारुलता उत्तम...
महिला गटाने दिली कृषी,ग्राम पर्यटनाला...पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी संस्थेने मार्गासनी (ता....
वांगे भरीत पार्टीद्वारे व्यवसाय...डांभुर्णी (ता. यावल, जि. जळगाव) येथील राणे...
लाकडी घाण्याद्वारे दर्जेदार तेल, खाद्य...अकोला जिल्ह्यातील अकोट येथील कांचन अशोकराव चौधरी...
भिडी गावाने उभारल्या अवजारे बॅंका,...काळाची पावले ओळखत विदर्भातील अनेक गावांनी...
साठ एकरांवरील बांबूलागवडीतून समृद्धीसिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाडोस (ता..कुडाळ) येथील...
वैविध्यपूर्ण फळे- भाजीपाला उत्पादन ते...परभणी जिल्ह्यातील रवळगाव (ता.सेलू) येथील सोमेश्वर...
रोपवाटिका व्यवसायासाठी ‘मॅट पॉट’...प्रगत देशामध्ये पर्यावरणपूरक पेपरपॉट निर्मितीसाठी...
जातिवंत दुधाळ गाई,म्हशींच्या पैदाशीसाठी...तामखडा (ता.फलटण,जि.सातारा) येथील प्रयोगशील...
गुलाबामध्ये तुळशीचे आंतरपीक ठरतेय...कोरोना संकट ही संधी समजून कवडी माळवाडी (ता. हवेली...
तीस वर्षांपासून फळपिकांमध्ये सातत्य...भोसे (ता. पाथर्डी, जि. नगर) येथील कृषी पदवीधर डॉ...
वन्यप्राणी, संवर्धन, जनजागृतीसाठी ‘...मानव आणि वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी वर्धा...
बटण मशरूमचा ‘कॅम्बीअम गोल्ड’ ब्रँडमूळचे जमालपूर (बिहार) येथील नीलकमल झा यांनी...
सेंद्रिय गुळाचा ‘यादवबाग’ ब्रॅण्ड !घरची वर्षानुवर्षांची ऊसशेती. मात्र मिळणाऱ्या कमी...
केळी, कापूस, जलसंधारणात झाली जळके...जळके (ता.जि. जळगाव) गावाने जलसंधारणात भरीव काम...
नागपूरला फुलला सीताफळाचा बाजारनागपूर येथील महात्मा फुले मार्केट सीताफळाने फुलले...
‘मार्केट डिमांड’नुसार देशी वांग्यांची...देशी वांग्याला अस्सल चव असल्याने...
पाचट कुट्टी यंत्राचा वापर ऊसशेतीत ठरला...ऊसशेतीतील वेळ, खर्च व मजूरबळ कमी करून उत्पादन...
शेळी, कोंबडीपालनात युवा शेतकऱ्याची...बुलडाणा जिल्ह्यातील आडविहिर येथील युवा शेतकरी...
राधानगरीच्या दुर्गम भागात रेशीम शेतीचे...पारंपरिक ऊस, भात य पारंपरिक शेतीपेक्षा थोड्या...