agriculture story in marathi, Vijayrao Ambhore has achieved a 45 quintal per hectior production iof Soyabean. | Agrowon

उत्कृष्ट व्यवस्थापनातून एकरी १८ क्विंटल सोयाबीन आदर्श

गोपाल हागे
शनिवार, 5 जून 2021

सोयाबीन बीजोत्पादन शेतीचा राज्यासाठी आदर्श विजयराव अंभोरे (मंगरूळ, जि. बुलडाणा) उभारला आहे. मागील वर्षी हेक्टरी ४५ क्विंटल विक्रमी उत्पादन घेणाऱ्या विजयरावांना भारतीय सोयाबीन संशोधन संस्थेतर्फे सन्मानीतही करण्यात आले आहे.

उत्कृष्ट व्यवस्थापनातून सोयाबीन बीजोत्पादन शेतीचा राज्यासाठी आदर्श विजयराव अंभोरे (मंगरूळ, जि. बुलडाणा) उभारला आहे. दरवर्षी दर्जेदार उत्पादनात सातत्य व मागील वर्षी हेक्टरी ४५ क्विंटल विक्रमी उत्पादन घेणाऱ्या विजयरावांना भारतीय सोयाबीन संशोधन संस्थेतर्फे सन्मानीतही करण्यात आले आहे.

राज्यात ४० लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीन असते. विभागनिहाय उत्पादकता वेगवेगळी आहे. बुलडाणा जिल्ह्यात सुमारे साडेसात लाख हेक्टर खरीप क्षेत्रापैकी चार लाख हेक्टरवर सोयाबीनअसते. मंगरूळ येथील विजयराव पुंजाजीराव अंभोरे हे जिल्ह्यासाठीच नव्हेत, तर या पिकातील राज्यातील आदर्श शेतकरी म्हणायला हवेत. त्यांचे वय ६५ वर्षे असले, तरी युवकांना लाजवेल या उत्साहाने ते सोयाबीनमध्ये विविध प्रयोग करण्यात मग्न असतात.

सोयाबीनची सुरुवात
विजयराव सांगतात, की सन १९९१ च्या दरम्यान त्यांनी सोयाबीन शेतीला प्रारंभ केला. त्या वेळी भागात सोयाबीन पीक फारसे नव्हतेच. इंदूर येथील संशोधन केंद्राच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रयोग सुरू केले. तज्ज्ञांचे मार्गदर्शन, शिफारशीत व्यवस्थापनाच्या जोरावर एकरी उत्पादनात वाढ व सातत्य टिकवले. दरवर्षी ते विविध वाणांचे बीजोत्पादन घेतात. त्यामुळे बाजारपेठेपेक्षा अधिक दर मिळतात. आपल्या एकूण २५ एकरांपैकी २२ एकरांत ते सोयाबीन घेतात.

सोयाबीन व्यवस्थापनातील बाबी

 • जूनमध्ये चांगला पाऊस होताच सुरुवात.
 • विविध वाणांची निवड. उदा. केडीएस ७२६, फुले संगम, फुले किमया,
 • एमएयूएस ६१२, ७१, १६२, आघारकर संशोधन केंद्राचे ११८८ आदी.
 • मर, चक्रीभुंगा, खोडकिडी यांना प्रतिकारकता यांना प्राधान्य.
 • एकरी झाडांची संख्या-१ लाख १० हजार (टोकण) लाख ते १ लाख २० हजार (पेरणी)
 • सर्वांत आधी रासायनिक बीजप्रक्रिया. बुरशीजन्य रोगांसाठी थायरम, खोडकीड व चक्रीभुंग्यासाठी थायामेथोक्झाम प्रति किलो ३ ग्रॅम.
 • पेरणीआधी दोन तास जिवाणू संवर्धक प्रक्रिया- रायझोबियम व पीएसबी.
 • पेरणीपूर्वी चार- पाच दिवस- एकरी चार पोते सिंगल सुपर फॉस्फेट आणि ३० किलो पोटॅश.
 • त्यानंतर शक्यतो खत नाही.
 • दर तिसऱ्या वर्षी शेतात शेणखत एकरी ५ ते ६ ट्रॉली किंवा २० ते २५ बैलगाड्या.
 • बियाण्याची उगवण तपासतात. ती चांगली असल्याने एकरी २० ते २२ किलो बियाणे वापर.
 • पेरणी ट्रॅक्टरद्वारे.
 • सोयाबीन, तूर, मूग, उडीद यांचे काड दरवर्षी शेतात पसरवितात. त्यातून सेंद्रिय कर्ब वाढवण्याचा प्रयत्न.
 • दोन ओळींतील अंतर पारंपरिक पद्धतीचे १५ इंच न ठेवता २१ इंच ठेवतात. दोन झाडांतील अंतर ३ ते ४ इंच. त्यामुळे कमी बियाणे लागते. भरपूर अंतर असल्याने झाडांना प्राथमिक अवस्थेत भरपूर सूर्यप्रकाश व मोकळे वातावरण मिळते.

पीक संरक्षण

 • पेरणीनंतर १२ ते १५ दिवसांदरम्यान खोडकिडी व रसशोषक किडींसाठी डायमिथोएट किंवा निंबोळी अर्काची फवारणी
 • तिसऱ्या, चौथ्या कोवळ्या पानाच्या शिरेवर खोडकिडीची मादी अंडी घालते. बीजप्रक्रिया केली तरी किडींपासून कोवळ्या झाडाचे संरक्षण महत्त्वाचे असते.
 • तीस दिवसांनंतर क्लोरपायरिफॉस व निंबोळी अर्काची फवारणी.
 • ४५ दिवसांनंतर प्रोफेनोफॉस. प्रत्येक फवारणीत स्टिकर. सोबत १२ः६१ः० वापर.
 • किडी-रोगांच्या प्रादुर्भावानुसार पुढील फवारण्या. चौथी फवारणी ८० ते ८५ दिवसांनी
 • बुरशीला रोखण्यासाठी. या काळात शेंगा पिवळ्या पडलेल्या असतात.
 • दाण्यात तेलाचे प्रमाण वाढावे यासाठी गंधकाचा वापर.

कोळपणीचे महत्त्व
पेरणीनंतर १५ व्या दिवशी कोळपणी, २२ दिवसांनंतर शिफारशीनुसार तणनाशकाची फवारणी होते. तिसाव्या दिवशी व ३५ दिवसांनी अशा सुमारे तीन कोळपण्या बैलजोडीच्या साह्याने घेतात. त्यामुळे मुळांना शुद्ध हवा मिळते. विजयराव म्हणतात, की जे वाण ३५ व्या दिवसापर्यंत फुलोऱ्यावर येतात त्यात ३२ व्या दिवसाच्या आत कोळपणी झाली पाहिजे. फुले संगम, किमया आदी वाण ४५ दिवसांनी फुलोऱ्यावर येतात. त्यात हा कालावधी थोडा वाढवता येतो. पावसाचा खंड पडला तर संरक्षित पाणी देण्याचेही नियोजन होते.

भारतीय संस्थेकडून गौरव
सोयाबीन शेतीतील उत्कृष्ट व्यवस्थापन, उत्पादनवाढ यांची दखल इंदोर येथील भारतीय सोयाबीन संशोधन संस्थेने घेतली. ३४ व्या स्थापनादिनाचे औचित्य साधून भारतातील ६२ शेतकऱ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यात विजयरावांचाही समावेश होता.

उत्पादन हेक्टरी ४५ क्विंटल
विजयराव कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन केंद्रांकडील नवीन वाणांचे प्रयोग करण्यात आघाडीवर असतात. सन २०१९-२० या हंगामात १५ एकरांत केडीएस ७२६ फुले संगम वाणाची लागवड केली. या वर्षी जास्त पाऊस झाला. काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. यलो व्हेन मोझॅक, खोडकीड, चक्रीभुंगा, रसशोषक कीड आदी समस्या उद्‌भवल्या. विजयरावांनी मात्र चोख व्यवस्थापनाद्वारे हेक्टरी ४५ क्विंटल (एकरी १८ क्विंटल) प्रमाणे १५ एकरांत किमान २७० क्विंटल बिजोत्पादन घेतले. कसबे डिग्रज येथील संशोधन केंद्रातील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. मिलिंद देशमुख, इंदोर येथील संस्थेतील शास्त्रज्ञ डॉ. बी. यू. दुपारे यांचे मार्गदर्शन त्यांना होते.

एकरी उत्पादन

 • सन २०१२ नंतर १३ क्विंटलपुढे.
 • २०१७-१८- १३ ते १४ क्विं.
 • २०१८-१९- १३ क्विं.
 • २०१९-२०- १८ क्विं.
 • उत्पादन खर्च- (लावणी ते काढणी) १८ हजार रु.
 • दर-सरकारी कंपनीसोबत बीजोत्पादन कार्यक्रम.
 • दर- ५५ ते ६० रुपये प्रति किलो. मागील वर्षी ७० रु.

संपर्क- विजयराव अंभोरे, ९८२२३०३५२८


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
खर्च, जोखीम करणारे नागरे यांचे तीनमजली...शिवणी आरमाळ (जि.. बुलडाणा) येथील कैलास नागरे...
संकटांमधून जांभूळ शेती उद्योगाची वाटचालसिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरुखे येथील अनिरुद्ध...
प्रक्रिया उद्योगातून ‘सूर्या’ची झळाळी तेलगाव (ता. वसमत. जि. हिंगोली) येथील सूर्या...
मानवलोक... ग्रामीण पुनर्रचनेसाठी...शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण स्त्रियांसाठी कल्याणकारी...
पदवीधर महिलेची मशरूम निर्मिती ठरतेय...पुणे येथील तृप्ती धकाते यांनी मशरूम (अळिंबी)...
बहुमजली, शाश्‍वत, नैसर्गिक शेती पद्धती...मध्य प्रदेशातील तिली (जि. सागर) येथील आकाश...
खानदेशातील आवार प्रगतीवर स्वारआवार (ता.जि. जळगाव) हे कापूस, दादर ज्वारीसाठी...
भाजीपाला बीजोत्पादनातील ‘मास्टर’जिद्द, हिंमत, अभ्यास, ज्ञान घेण्याची वृत्ती व...
अनेक वर्षांपासून जपली आले उत्पादकता अन्...आले पिकातील दरांत दरवर्षी चढउतार होते. मात्र...
गव्हाच्या काडापासून भुस्सानिर्मिती‘हार्वेस्टर’द्वारे गहू काढणी झाल्यानंतर मोठ्या...
प्रयोगशील, अभ्यासपूर्ण शेतीचा आदर्शतिडका (जि. औरंगाबाद) येथील युवा शेतकरी ईश्‍वर...
गांडुळखताचा लोकप्रिय केला शुभम ‘ब्रॅण्ड’सोलापूर जिल्हयातील उपळाई बुद्रूक येथील महादेव...
दूध उत्पादकांचे उत्पन्न पोचेल २५...गायी म्हशींमधील लिंग विनिश्‍चित वीर्यमात्रांच्‍या...
महिला गटाने रुजविले शेती, पूरक...कुशिवडे (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) आणि म्हाप्रळ...
२५ एकरांत शेडनेट्‍स, आदिवासींची सामूहिक...नगर जिल्ह्यात म्हाळुंगी (ता. अकोले) परिसरातील...
घृष्णेश्‍वर कंपनीची सातत्यपूर्ण उंचावती...एका गटापासून सुरुवात करून विविध उपक्रम, त्यात...
मत्स्यपालन, काथ्या उद्योग, कृषी पर्यटन...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हडी (ता. मालवण) गावाने...
फळपिके, फळभाज्यांची अर्थपूर्ण शेतीभावेर (जि.धुळे) येथील गोरख पाटील यांनी केळी, पपई...
सोयाबीनमध्ये तूर शाश्‍वत पद्धतीचा प्रयोग‘कॉटन सिटी’ अशी यवतमाळ जिल्ह्याची ओळख आहे. याच...
ऊसरसापासून इम्युनिटी शॉट, गन्ना पन्नामाहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या...