agriculture story in marathi, Vikas Patil from Jalgaon Dist. has achieved sustainability through sericulture. | Agrowon

दर्जेदार रेशीम कोष उत्पादनात पाटील यांनी मिळवली ओळख

चंद्रकांत जाधव
मंगळवार, 7 सप्टेंबर 2021

जळगाव जिल्ह्यात देवपिंप्री येथील विकास पाटील यांनी कुटुंबाच्या एकीतून रेशीम शेती यशस्वी केली आहे. वर्षाला दोन शेड्‍समध्ये बारा बॅचेस व प्रति बॅच २५० अंडीपुंजांचे उत्पादन ते घेतात. दर्जेदार रेशीम कोषांना २५० ते कमाल ५३५ रुपये दर मिळवत या व्यवसायातून आर्थिक स्थैर्य मिळविले आहे.

जळगाव जिल्ह्यात देवपिंप्री येथील विकास पाटील यांनी जिद्द, कष्ट व कुटुंबाच्या एकीतून रेशीम शेती यशस्वी केली आहे. वर्षाला दोन शेड्‍समध्ये बारा बॅचेस व प्रति बॅच २५० अंडीपुंजांचे उत्पादन ते घेतात. दर्जेदार रेशीम कोषांना २५० ते कमाल ५३५ रुपये दर मिळवत या व्यवसायातून त्यांनी मजबूत आर्थिक स्थैर्य मिळविले आहे.

जळगाव जिल्ह्यात देवपिंप्रीचे (ता. जामनेर) शिवार कापूस पिकासाठी प्रसिद्ध आहे. सिंचनाचे स्रोत तयार झाल्याने केळीचे क्षेत्रही वाढले आहे. शिवारात विकास रामकृष्ण पाटील यांची पाच एकर शेती आहे. पूर्वी ते केळी, कापूस घ्यायचे. दुग्ध व्यवसायासाठी म्हशींचे संगोपनही केले. कापसाचे भरघोस उत्पादन ते अजूनही घेतात. परंतु व्यावसायिक पिकांमधील जोखीम, बाजारांतील समस्या लक्षात घेता पर्यायी पूरक उद्योगाच्या ते शोधात होते. तालुक्यातील सुनसगाव येथील मधुकर नारायण पाटील यांची रेशीम शेती पाहण्यात आली. त्याचे अर्थकारण फायदेशीर वाटले. निधी, जोखीम, बाजारपेठ, नफा, आवश्यक श्रम याबाबत सांगोपांग चर्चा झाली. अखेर या पूरक व्यवसायात उतरण्याचा निर्णय झाला.
 
रेशीम शेतीतील बाबी

  • शेत गावानजीक घरापासून हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे शेतातच लोखंडी रॉड, पत्रे व सिमेंटचा वापर करून मजबूत संगोपनगृह (शेड) उभारले. ५० बाय ३० फूट आकार, मध्यभागी १४ फूट उंची व डाव्या-उजव्या बाजूला ११ फूट जागा असे त्याचे स्वरूप आहे. ‘मनरेगा’कडून त्यास २ लाख ९२ हजार रुपयांचे अनुदान मिळाले. एकूण गुंतवणूक सुमारे साडेतीन लाख रुपयांची आहे.
  • तीनशे अंडीपुंजांची बॅच अशी शेडची क्षमता आहे. मात्र पाटील २५० अंडीपुंजांची बॅच घेतात.
  • उन्हाळ्यात तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. ते नियंत्रित करण्यासाठी शेडच्या छताखाली मजबूत सुती कापड लावले आहे. छतावर मिनी तुषार सिंचन संच आहेत. पाच मजली रॅक्स आहेत. रॅकचे तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी प्लॅस्टिकऐवजी कागदी पेपरचा उपयोग केला जातो.
  • रेशीम शेतीत मिळणारा नफा लक्षात घेता दुसऱ्या वर्षी अजून पहिल्यासारखेच म्हणजे त्या आकारमानाचे अजून एक संगोपनगृह उभारले. त्यासही अनुदानासाठी प्रयत्न सुरू आहेत.
  • कीटकाच्या बाल्यावस्थाही (चॉकी) घरीच तयार केल्या जातात. त्यासाठीची कुशलताही अनुभवातून प्राप्त केली आहे. त्यामुळे बाहेरून आणण्याचा खर्च वाचतो. सध्या रेशीम शेतीत चार वर्षांचा अनुभव तयार झाला आहे.
  • पाटील यांनी केळीची शेती चार वर्षांपूर्वीच थांबवली. आता संपूर्ण पाच एकरांत ते व्ही वन जातीच्या तुतीची लागवड करतात. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन एक रुपया प्रति स्टंप अशी विक्रीही
  • करतात. घरानजीक पाच एकर शेती भाडेतत्त्वावरही घेतली आहे. तेथे कापूस लागवड होते.
  • एकरी आठ क्विंटल उत्पादन ते घेतात.

उत्पादन व उत्पन्नात सरस 
जिल्ह्यातील रेशीम शेतीत जामनेर तालुका आघाडीवर आहे. त्यामध्ये पाटील यांनी आघाडीचे व मोठे रेशीम कोष उत्पादक म्हणून नाव मिळवले आहे. कोष उत्पादकताही त्यांनी चांगली मिळवली आहे. प्रति २५० अंडीपुंजांमागे २०० किलो किंवा प्रति १०० अंडीपुंजांमागे ९० ते ९५ किलो उत्पादनही त्यांनी घेतले आहे. अंडीपुंज रेशीम विभागातर्फे अनुदानावर मिळतात.

विक्री व्यवस्था
रेशीम कोषांची विक्री जालना बाजारपेठेत केली जाते. पाटील यांचा सुमारे पाच ते सहा शेतकऱ्यांचा गट आहे. त्यामुळे सुमारे १० क्विंटलपर्यंत एकत्र कोष विक्रीसाठी पाठवणे सोपे होते. त्यासाठी दर महिन्याला चार हजार रुपये भाडे वाहतुकीसाठी लागते. ग्रेडनुसार दर मिळतात. पाटील सांगतात, की प्रति किलो किमान २५० रुपये दर मिळतात. उच्च गुणवत्तेमुळे कमाल दर ५३५ रुपयांपर्यंतही मिळाले आहेत. अलीकडेच दोन क्विंटल ३० किलो माल जालना येथे पाठवला. त्यास ४५५ रुपये दर मिळाला. या बाजारपेठेत पाटील यांनी आपली ओळखही तयार केली आहे. उत्पादन खर्च प्रति बॅच किमान १० हजार ते १५ हजार रुपये असतो.
 
संपूर्ण कुटुंबाचा राबता
वर्षभरात दोन्ही शेड्‍समधून एकूण १२ पर्यंत बॅचेस घेण्याचा पाटील यांचा प्रयत्न असतो. साहजिकच मनुष्यबळ खूप लागते. मात्र विकास यांच्यासह पत्नी, मुलगा, स्नुषा हे सर्व जण राबतात. प्रसंगी आईदेखील हातभार लावते. त्यामुळे मजुरांवरील अवलंबित्व कमी केले आहे.त्यावरील खर्च वाचविला आहे. तुतीची शेती, खाद्य देणे, आरोग्य व्यवस्थापन, शेड स्वच्छता, निर्जंतुकीकरण आदी सर्व बाबतींत मेहनत, सांघिकी वृत्ती, नियोजन यांची आवश्यकता असते. त्यात सुसूत्रता ठेवल्यानेच पाटील कुटुंबीय रेशीम शेतीत यशस्वी ठरले आहेत.
 
शिकण्याची वृत्ती
विकास यांचे वय पंचावन्नपेक्षा अधिक आहे. पन्नाशीनंतर त्यांनी पारंपरिक पिके त्यागून रेशीम शेतीची कास धरली. शिकण्याची, ज्ञान घेण्याची वृत्ती जोपासली. आजही उत्साहाने ते शेतीत कार्यरत असतात. नातेवाईक व परिचितांमध्ये रेशीम शेतीचा प्रचार करतात. त्यांच्या प्रेरणेतून जामनेर भागात दोन-तीन जणांनी रेशीम शेती सुरू केली आहे. मोबाईलवर बोलत असतानाच
कीटकांना तुतीची पाने घालणे, संगोपनगृहातील कामे आवरणे सुरू असते.

संपर्क- विकास पाटील, ९४२३५२८२०७


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
सोनपेठ तालुक्यातील शेतकरी महिलांचा...परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथे महिला आर्थिक विकास...
दुग्ध व्यवसायातून उंचावले शेती-...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवजे (ता. कुडाळ) येथील...
भाजीपाला निर्जलीकरण, मसालानिर्मितीलातूर जिल्ह्यातील वासनगाव येथील ‘सावित्रीबाई फुले...
शेतीसह पर्यावरणाचे संवर्धनमान्हेरे (ता. अकोले, जि. नगर) येथील तुकाराम भोरू...
एकोप्यातून पानोलीकरांचा ग्रामविकासात...गावकऱ्यांचा एकोपा, लोकसहभाग, श्रमदान आणि गावांतील...
गणेशोत्सवात आंबा, काजू मोदकांनी खाल्ला...गणेशोत्सवामध्ये मोदकांना चांगली मागणी असते. हे...
उत्कृष्ट, दर्जेदार उत्पादनातून कांदा...नाशिक जिल्ह्यातील धोडांबे (ता. चांदवड) येथील...
पेरणी ते काढणी- जपला यांत्रिकीकरणाचा वसागरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
भरीताच्या वांग्यासह केळी अन कांद्याची...नशिराबाद (ता.. जि.. जळगाव) येथील लालचंद व यशवंत...
उच्चशिक्षित दांपत्याची पोल्‍ट्रीत...वाशीम जिल्हयात मुठ्ठा या छोट्या गावात नीलेश व...
आंबा, काजू, फणसापासून चॉकलेट मोदकांची...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोरे (वाडोस) येथील...
सेंद्रिय उत्पादनांचा ‘सात्त्विक कृषिधन...नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीप्रणीत शेतकरी उत्पादक...
श्रमदानातून ‘चुंब’ गाव झाले जल...स्वच्छता, रस्ते, भूमिगत गटार आदी विविध पायाभूत...
‘कोरोना’नंतर आकार घेतेय फुलांची...गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे पुणे...
मोसंबी, शेडनेटसह सेंद्रिय पद्धतीने...पारंपरिक मोसंबी बागेतील लागवड अंतर व वाणातील बदल...
‘इंडो- इस्राईल तंत्रज्ञानातून संत्रा...नागपुरी संत्र्याची हेक्टरी उत्पादकता वाढण्यासाठी...
शास्त्रीय, उत्कृष्ट व्यवस्थापनातून बीटल...सातारा जिल्ह्यातील शेळकेवाडी येथील जितेंद्र शेळके...
कांदा- लसूण शेतीत जरे यांचे देशभर नावबहिरवाडी (ता. जि. नगर) येथील कृषिभूषण...
नगदी पिकांना हंगामी पिकांची जोड देते...आपली शेती प्रयोगशील ठेवत मुदखेड (जि. नांदेड)...
कुक्कुटपालन, पोषण बागेतून प्रगती न्यू राजापूर (ता.हातकणंगले,जि.कोल्हापूर) येथील २४...