पणज गावाने आणली केळी पिकातून सुबत्ता

शेतकरी एकत्र येऊन केळी पीक व्यवस्थापनाबाबत सातत्याने चर्चा करतात.
शेतकरी एकत्र येऊन केळी पीक व्यवस्थापनाबाबत सातत्याने चर्चा करतात.

अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात पणज हे छोटे गाव आहे. अकोट-अंजनगाव मार्गावर सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या या गावात १५० ते २०० हेक्टरपर्यंत केळीचे क्षेत्र विस्तारले आहे. प्रशिक्षण, अभ्यासातून ज्ञानवृद्धी, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याद्वारे एकरी उत्पादन व त्याचा दर्जा वाढवणे शेतकऱ्यांना शक्य झाले आहे. आपल्या केळीला बाजारपेठही त्यांनी मिळवली आहे. या पिकातून अर्थकारण उंचावून समृद्धी व आर्थिक सुबत्ता मिळवणे येथील शेतकऱ्यांना शक्य होत आहे.  . अकोला जिल्ह्यात पणज (ता. अकोला) गावातील शेतकरी मेहनती, प्रयोगशीलता जोपासणारे म्हणून ओळखले जातात. गावची लोकसंख्या सुमारे पाचहजार आहे. गहू, कापूस, ज्वारी, कांदा, भाजीपाला आदी पारंपरिक पिके गावच्या शिवारात प्राधान्याने दिसायची. त्यातून अर्थकारण फारसे समाधानकारक नसायचे. त्यामुळे वेगळे व्यावसायिक पीक शोधून अर्थव्यवस्थेला आकार देण्याचा विचार शेतकरी करू लागले. साधारणतः १० ते १५ वर्षांपूर्वी गावशिवारात केळीचा प्रवेश झाला. तेथून पणजची या पिकात ओळख बनण्यास सुरुवात झाली. जमिनीची सुपीकता वाढवली आधुनिक तंत्रज्ञानाची फारशी ओळख नसल्याने पणजचे शेतकरी सुरुवातीच्या काळात पारंपरिक पद्धतीने केळी लागवड करायचे. मात्र तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला. उतिसंवर्धित रोपांची लागवड, ठिबक सिंचन, फर्टिगेशन यांचा वापर सुरू झाला. पाण्याचा वापर कमी होण्याच्या उद्देशाने मल्चिंगचा वापर वाढला. अशा विविध उपाययोजनांतून केळीचे उत्पादन व दर्जा वाढण्यास मदत झाली. शेतकऱ्यांनी परिसरातील प्रकल्पांमधून गाळाची माती आणून शेतात वापरण्यास सुरुवात केली. शेणखताचा वापर वाढविला. टप्प्याटप्प्याने जमिनीची सुपीकता वाढू लागली. आधुनिक साधनांचा वापर केळी पिकातून अर्थकारणाला गती मिळाली. विविध बदल होऊ लागले. फर्टिगेशन विषयातील आधुनिक तंत्रही शेतकरी वापरू लागले. दर्जेदार केळी पिकविण्यात शेतकरी कुशल झाले. केळीला मागणी वाढू लागली. गुणवत्तेच्या जोरावर पणजची केळी मागील दोन वर्षांत परदेशात निर्यातही होऊ लागली. गावाचा चेहरामोहरा बदलला शेतातील उत्पन्नाचा परिमाण येथील प्रत्येक कुटुंबाच्या राहणीमानापासून ते आर्थिक संपन्नेवर दिसून येतो. पाच हजार लोकसंख्येच्या गावातील प्रत्येक प्रमुख रस्ता ब्लॉक पेव्हर, सिमेंट काँक्रीटचा झाला आहे. सिमेंटची टुमदार घरे गावात दिसतात. शेतीच्या कामासाठी गावात ४० हून अधिक ट्रॅक्टर दिसतात. चारचाकी वाहनांची संख्याही मोठी आहे. दुचाकी तर प्रत्येक घरासमोर उभी दिसते. शेतीच्या ज्ञानासाठी जागरूक गाव  गावात शेतकरी गटांची संख्या चांगली आहे. पिकातील नवे तंत्रज्ञान मिळवण्यासाठी हे गट सक्रिय असतात. कृषी विभाग, विविध कंपन्यांचे कार्यक्रम या ठिकाणी सातत्याने होतात. येथील शेतकऱ्यांनी त्रिची येथील संशोधन केंद्राला भेट देऊनही तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतले आहे. गावशिवारात दरवर्षी १५० ते २०० हेक्टरपर्यंत केळीची लागवड केली जाते. येथील शेतकरी साधारण २५ किलो वजनाची रास पिकवतात. एकरी सरासरी ३० ते कमाल ४० ते काही वेळा त्याहून अधिक टनांपर्यंत उत्पादन घेण्यात येथील शेतकरी यशस्वी झाले आहेत. गावातील केळीचे क्षेत्र, उत्पादन व मिळणारा दर या बाबी पाहाता या पिकाच्या माध्यमातून वर्षाला काही कोटी रुपयांची उलाढाल होऊ लागली आहे. वेगाने बदलतेय पणज मागील काही वर्षांत पणज गावाचा तसेच गावातील शेतकऱ्यांचा विकास होत आहे. ग्रामपंचायतीनेही त्यात मागे न राहता व्यायामशाळा उभारली. पशुचिकित्सालयासाठी नवी इमारत बांधली. अंगणवाड्यांची दुरुस्ती केली. मराठी तसेच उर्दू माध्यमाच्या दोन्ही शाळांमध्ये शुद्ध पाणी पिण्याची व्यवस्था करण्यात आली. गावकऱ्यांनी लोकवर्गणी गोळा करून ‘आरओ’ प्लांट उभा केला. या ठिकाणावरून अवघ्या २५ पैसे प्रति लिटर दराने पाणी मिळते. गावात रोजगाराची निर्मितीही वाढली आहे. नवी पिढी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेत आहे. शेतकऱ्यांचा प्रश्‍न मार्गी लागण्याची गरज केळी पिकाच्या वाहतुकीसाठी शेतरस्त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. शासनाच्या मदतीने पणज-अकोली जहाँगीर, पणज-निमखेड, पणज- धामणगाव रस्त्याचे काम सुरू झाले होते. परंतु ते अर्धवट राहिले आहे. पणज ते रुईखेड, अकोली जहाँगीर, बोचरा, दिवठाणा जोडणारे रस्ते झाले तर केळी उत्पादकांना मोठा फायदा होऊ शकतो. प्रतिक्रिया एखाद्या पिकाद्वारे गावाच्या विकासाला दिशा मिळू शकते यासाठी पणजचे उदाहरण महत्त्वाचे आहे. या पिकामुळे गावात आर्थिक समृद्धी येण्यास मदत झाली आहे. संलग्न पूरक व्यवसायांची संख्या वाढली. नवनवीन तंत्रज्ञान गावापर्यंत पोचविण्यासाठी विविध कंपन्या प्रयत्न असतात. स्थानिकांना रोजगार मिळाला. शेतकऱ्यांना स्थानिक स्तरावर कृषी निविष्ठांची सोय झाली. गावातील काही तरुण व्यापारात उतरले आहेत. दिनेश आकोटकार, विकास देशमुख संपर्क ःआकोटकर-  ९९२११३७१४९ गावात काही वर्षांत सुमारे दोन कोटींपेक्षा अधिक रुपयांची विकासकामे झाली आहेत. गावकरी एकत्र येत विविध धार्मिक कार्यक्रम, सण, उत्सव साजरे करतात. येत्या काळात आणखी विकासकामे करण्यात येणार आहेत. गावासाठीही आरओ प्लांट आम्ही उभा केला. त्याच धर्तीवर बस स्थानक परिसरातही प्रवाशांना शुद्ध पाणी प्यायला मिळावे यासाठी तसे युनिट उभारणार आहोत. प्रदीप ठाकूर, सरपंच, पणज संपर्क ः ९९२२६५११०४v

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com