agriculture story in marathi, village development, panaj, banana crop enhances village economy | Agrowon

पणज गावाने आणली केळी पिकातून सुबत्ता

गोपाल हागे
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात पणज हे छोटे गाव आहे. अकोट-अंजनगाव मार्गावर सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या या गावात १५० ते २०० हेक्टरपर्यंत केळीचे क्षेत्र विस्तारले आहे. प्रशिक्षण, अभ्यासातून ज्ञानवृद्धी, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याद्वारे एकरी उत्पादन व त्याचा दर्जा वाढवणे शेतकऱ्यांना शक्य झाले आहे. आपल्या केळीला बाजारपेठही त्यांनी मिळवली आहे. या पिकातून अर्थकारण उंचावून समृद्धी व आर्थिक सुबत्ता मिळवणे येथील शेतकऱ्यांना शक्य होत आहे.
 .

अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात पणज हे छोटे गाव आहे. अकोट-अंजनगाव मार्गावर सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या या गावात १५० ते २०० हेक्टरपर्यंत केळीचे क्षेत्र विस्तारले आहे. प्रशिक्षण, अभ्यासातून ज्ञानवृद्धी, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याद्वारे एकरी उत्पादन व त्याचा दर्जा वाढवणे शेतकऱ्यांना शक्य झाले आहे. आपल्या केळीला बाजारपेठही त्यांनी मिळवली आहे. या पिकातून अर्थकारण उंचावून समृद्धी व आर्थिक सुबत्ता मिळवणे येथील शेतकऱ्यांना शक्य होत आहे.
 .
अकोला जिल्ह्यात पणज (ता. अकोला) गावातील शेतकरी मेहनती, प्रयोगशीलता जोपासणारे म्हणून ओळखले जातात. गावची लोकसंख्या सुमारे पाचहजार आहे. गहू, कापूस, ज्वारी, कांदा, भाजीपाला आदी पारंपरिक पिके गावच्या शिवारात प्राधान्याने दिसायची. त्यातून अर्थकारण फारसे समाधानकारक नसायचे. त्यामुळे वेगळे व्यावसायिक पीक शोधून अर्थव्यवस्थेला आकार देण्याचा विचार शेतकरी करू लागले. साधारणतः १० ते १५ वर्षांपूर्वी गावशिवारात केळीचा प्रवेश झाला. तेथून पणजची या पिकात ओळख बनण्यास सुरुवात झाली.

जमिनीची सुपीकता वाढवली
आधुनिक तंत्रज्ञानाची फारशी ओळख नसल्याने पणजचे शेतकरी सुरुवातीच्या काळात पारंपरिक पद्धतीने केळी लागवड करायचे. मात्र तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला. उतिसंवर्धित रोपांची लागवड, ठिबक सिंचन, फर्टिगेशन यांचा वापर सुरू झाला. पाण्याचा वापर कमी होण्याच्या उद्देशाने मल्चिंगचा वापर वाढला. अशा विविध उपाययोजनांतून केळीचे उत्पादन व दर्जा वाढण्यास मदत झाली. शेतकऱ्यांनी परिसरातील प्रकल्पांमधून गाळाची माती आणून शेतात वापरण्यास सुरुवात केली. शेणखताचा वापर वाढविला. टप्प्याटप्प्याने जमिनीची सुपीकता वाढू लागली.

आधुनिक साधनांचा वापर
केळी पिकातून अर्थकारणाला गती मिळाली. विविध बदल होऊ लागले. फर्टिगेशन विषयातील आधुनिक तंत्रही शेतकरी वापरू लागले. दर्जेदार केळी पिकविण्यात शेतकरी कुशल झाले. केळीला मागणी वाढू लागली. गुणवत्तेच्या जोरावर पणजची केळी मागील दोन वर्षांत परदेशात निर्यातही होऊ लागली.

गावाचा चेहरामोहरा बदलला
शेतातील उत्पन्नाचा परिमाण येथील प्रत्येक कुटुंबाच्या राहणीमानापासून ते आर्थिक संपन्नेवर दिसून येतो. पाच हजार लोकसंख्येच्या गावातील प्रत्येक प्रमुख रस्ता ब्लॉक पेव्हर, सिमेंट काँक्रीटचा झाला आहे. सिमेंटची टुमदार घरे गावात दिसतात. शेतीच्या कामासाठी गावात ४० हून अधिक ट्रॅक्टर दिसतात.
चारचाकी वाहनांची संख्याही मोठी आहे. दुचाकी तर प्रत्येक घरासमोर उभी दिसते.

शेतीच्या ज्ञानासाठी जागरूक गाव 
गावात शेतकरी गटांची संख्या चांगली आहे. पिकातील नवे तंत्रज्ञान मिळवण्यासाठी हे गट सक्रिय असतात. कृषी विभाग, विविध कंपन्यांचे कार्यक्रम या ठिकाणी सातत्याने होतात. येथील शेतकऱ्यांनी त्रिची येथील संशोधन केंद्राला भेट देऊनही तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतले आहे. गावशिवारात दरवर्षी १५० ते २०० हेक्टरपर्यंत केळीची लागवड केली जाते. येथील शेतकरी साधारण २५ किलो वजनाची रास पिकवतात. एकरी सरासरी ३० ते कमाल ४० ते काही वेळा त्याहून अधिक टनांपर्यंत उत्पादन घेण्यात येथील शेतकरी यशस्वी झाले आहेत. गावातील केळीचे क्षेत्र, उत्पादन व मिळणारा दर या बाबी पाहाता या पिकाच्या माध्यमातून वर्षाला काही कोटी रुपयांची उलाढाल होऊ लागली आहे.

वेगाने बदलतेय पणज
मागील काही वर्षांत पणज गावाचा तसेच गावातील शेतकऱ्यांचा विकास होत आहे. ग्रामपंचायतीनेही त्यात मागे न राहता व्यायामशाळा उभारली. पशुचिकित्सालयासाठी नवी इमारत बांधली. अंगणवाड्यांची दुरुस्ती केली. मराठी तसेच उर्दू माध्यमाच्या दोन्ही शाळांमध्ये शुद्ध पाणी पिण्याची व्यवस्था करण्यात आली. गावकऱ्यांनी लोकवर्गणी गोळा करून ‘आरओ’ प्लांट उभा केला. या ठिकाणावरून अवघ्या २५ पैसे प्रति लिटर दराने पाणी मिळते. गावात रोजगाराची निर्मितीही वाढली आहे. नवी पिढी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेत आहे.

शेतकऱ्यांचा प्रश्‍न मार्गी लागण्याची गरज
केळी पिकाच्या वाहतुकीसाठी शेतरस्त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. शासनाच्या मदतीने पणज-अकोली जहाँगीर, पणज-निमखेड, पणज- धामणगाव रस्त्याचे काम सुरू झाले होते. परंतु ते अर्धवट राहिले आहे. पणज ते रुईखेड, अकोली जहाँगीर, बोचरा, दिवठाणा जोडणारे रस्ते झाले तर केळी उत्पादकांना मोठा फायदा होऊ शकतो.

प्रतिक्रिया
एखाद्या पिकाद्वारे गावाच्या विकासाला दिशा मिळू शकते यासाठी पणजचे उदाहरण महत्त्वाचे
आहे. या पिकामुळे गावात आर्थिक समृद्धी येण्यास मदत झाली आहे. संलग्न पूरक व्यवसायांची संख्या वाढली. नवनवीन तंत्रज्ञान गावापर्यंत पोचविण्यासाठी विविध कंपन्या प्रयत्न असतात. स्थानिकांना रोजगार मिळाला. शेतकऱ्यांना स्थानिक स्तरावर कृषी निविष्ठांची सोय झाली. गावातील काही तरुण व्यापारात उतरले आहेत.
दिनेश आकोटकार, विकास देशमुख
संपर्क ःआकोटकर-  ९९२११३७१४९

गावात काही वर्षांत सुमारे दोन कोटींपेक्षा अधिक रुपयांची विकासकामे झाली आहेत. गावकरी एकत्र येत विविध धार्मिक कार्यक्रम, सण, उत्सव साजरे करतात. येत्या काळात आणखी विकासकामे करण्यात येणार आहेत. गावासाठीही आरओ प्लांट आम्ही उभा केला. त्याच धर्तीवर बस स्थानक परिसरातही प्रवाशांना शुद्ध पाणी प्यायला मिळावे यासाठी तसे युनिट उभारणार आहोत.
प्रदीप ठाकूर, सरपंच, पणज
संपर्क ः ९९२२६५११०४v


फोटो गॅलरी

इतर ग्रामविकास
‘कोरडवाहू‘ला दिशा देण्यासाठी संस्था...कोरडवाहू क्षेत्राचे पुनरुज्जीवन करण्यासाठी...
आदर्श कामांच्या उभारणीतून ठसा उमटवलेले...द्राक्ष, डाळिंब,कांद्यासाठी जगभर प्रसिद्ध नाशिक...
कुडावळेमध्ये `शत प्रतिशत भात लागवड'...गाव आणि शेतीचा शाश्वत विकास करायचा असेल तर...
कृषीसंपन्नता, आरोग्य, पर्यावरण हेच...कोटमगावाने (ता. जि. नाशिक) कृषीसंपन्न, आरोग्य व...
कांदा बीजोत्पादनातून मिळवली शिवापूर...अकोला जिल्ह्यातील शिवापूर गावाने कांदा...
जलसंधारणातून शिवार फुलले, समाधानाचे...मामलदे (जि.जळगाव) गावाने शिवारातील पाण्याची टंचाई...
चला, झाडांच्या गावाला जाऊया...गावातील सर्व घरावरील छताच्या पाण्याचे रेन वॅाटर...
प्राथमिक निवड झाल्यानंतर गाव, संस्थेने...आदर्शगाव योजनेमध्ये गावाची प्राथमिक निवड...
ग्रामविकासातील अडथळे आणि उपाययोजनाग्रामविकास करताना स्थानिक पातळीवर नियोजन तसेच...
कृषी, पर्यावरण, आरोग्य प्रकल्पांतून...वेगाने होणाऱ्या शहरीकरणातही कृषी, पर्यावरण,...
ग्राम परिवर्तनासाठी तरुणाईने घडविली...लोकसहभागातून काम केल्यास ग्रामीण भागाचा जलद गतीने...
मांडा ग्रामपंचायतीचे वार्षिक अंदाजपत्रकआपल्या गावाचा ग्रामविकास आराखडा आपण सर्वांनी...
रेशीम शेतीतून टाकळीने बांधले प्रगतीचे...यवतमाळ जिल्हयात रेशीम शेतीच्या माध्यमातून आर्थिक...
समजाऊन घ्या ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प ‘आमचं गाव-आमचा विकास' या लेखमालेमध्ये आपण शाश्वत...
शेती. शिक्षण, विकासकामांतून पुढारलेले...भाटपुरा (जि.धुळे) गावाने सिंचनाचे शाश्‍वत स्त्रोत...
ज्ञानग्राम-शाश्‍वतग्राम निवडीचे निकषज्ञानग्रामासाठी निवड करण्याची मागणी गावाकडूनच आली...
नॉलेज-कॉलेज-व्हिलेज' योजनेचा आराखडा‘नॉलेज- कॉलेज- व्हिलेज' सहयोगी योजना ही मागणी...
आदिवासी शेतकऱ्यांच्या जीवनात झाला बदलटाटा ट्रस्ट `सेंट्रल इंडिया`च्या माध्यमातून...
स्नेहग्राम बनलंय उपेक्षित मुलांचा आधारसमाजातील वंचित, उपेक्षित घटकासह, एकल पालकांच्या...
सर्वसमावेशक ग्रामविकास आराखडा महत्वाचाविविध प्रकारच्या स्वयंसेवी संस्था ग्रामीण भागात...