agriculture story in marathi, Vyavahare Family from Bori, Dist. Nanded has achieved suceess in integtated farming with much efforts & well planning. | Page 2 ||| Agrowon

भूमिहीन ते यशस्वी बागायतदार अतिव संघर्षातून साकारलेला प्रवास

रमेश देशमुख
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

नांदेड जिल्ह्यातील बोरी (बु.) येथील मारोती व पारूबाई या व्यवहारे दांपत्याने अत्यंत खडतर कष्ट, संघर्षातून मोलमजुरी व भाजीपाला-फळे विक्री करून एकात्मीक शेती केली. त्यात प्रशंसनीय प्रगती केली. एकेकाळी भूमिहीन असलेल्या व्यवहारे यांची आज १२ एकर शेती आहे. आंबा, हळद, भाजीपाला यांच्यासह डेअरी, दूध संकलन, पोल्ट्री, गिरणी यांच्या माध्यमातून उत्पन्नाचे स्त्रोत प्रशस्त केले. त्यांच्या मुलांना आई-वडिलांचा अभिमान असून त्यांचा हाच वारसा ते पुढे चालवत आहेत.

नांदेड जिल्ह्यातील बोरी (बु.) येथील मारोती व पारूबाई या व्यवहारे दांपत्याने अत्यंत खडतर कष्ट, संघर्षातून मोलमजुरी व भाजीपाला-फळे विक्री करून एकात्मीक शेती केली. त्यात प्रशंसनीय प्रगती केली. एकेकाळी भूमिहीन असलेल्या व्यवहारे यांची आज १२ एकर शेती आहे. आंबा, हळद, भाजीपाला यांच्यासह डेअरी, दूध संकलन, पोल्ट्री, गिरणी यांच्या माध्यमातून उत्पन्नाचे स्त्रोत प्रशस्त केले. त्यांच्या मुलांना आई-वडिलांचा अभिमान असून त्यांचा हाच वारसा ते पुढे चालवत आहेत.

नांदेड जिल्ह्यात कंधार तालुक्यातील बोरी (बु.) येथील मारोती व पारूबाई या व्यवहारे दांपत्याचा भूमिहीन ते बागायतदार हा प्रवास कष्टाचा, जिद्दीचा, व्यावहारिक चातुर्य दाखवणारा आणि प्रेरणादायी असाच आहे. त्यांची वडिलोपार्जीत जमीन नव्हती. कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी सुरवातीच्या काळात दोघे नवरा-बायको कधी मोलमजुरी करायचे. शेतकऱ्यांकडून भाजीपाला, फळे, बाजरी असा शेतमाल घ्यायचे. आपल्या डोक्यावरील टोपल्यात माल वाहून नेत घरोघरी जाऊन विकायचे. दिवसभर अशी कष्टमय पायपीट केल्यानंतर पैसा हाती पडायचा. पण घरचा खर्च, मुलांची शिक्षणं या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून शिलकी पैसा ठेवायचे. त्यातून मग मारोती यांनी जमीन घेण्यास सुरवात केली.

शेतीमालक झाले, प्रगती साधली
कष्टांत सातत्य व प्रगती करायची ओढ यातूनच मग शून्यातून चक्क बारा एकर जमिनीपर्यंत मजल गाठणे व्यवहारे कुटूंबाने साध्य केले. आता मुलेही हाताशी येऊ लागली होती. उत्पन्नातील पैसे शिल्लक टाकून मग मन्याड धरणावरून पाइपलाइन करीत सिंचनाची व्यवस्थाही बळकट केली. चिरंजीव प्रभाकर यांनी एमएएमएड पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. आज ते धाकटे चिरंजीव यांच्यासोबत पूर्णवेळ शेतीत गुंतले आहेत. दोघा मुलांची व तीन मुलींची लग्नेही शेतीतील उत्पन्नावरच साध्य केली.

आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत वाढवले
आज आई-वडिलांसह दोघे बंधू, त्यांच्या पत्नी असे सहाही जण शेतीत विविध जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. आई-वडील वयोमानाने थकले असले तरी ते विक्रीची जबाबदारी आजही ताकदीने सांभाळतात. केवळ पिकांची लागवड न करता या कुटूंबाने पूरक व्यवसायांची जोड देत आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत विस्तारले आहे. एका व्यवसायातील नफा दुसऱ्या व्यवसायासाठी खर्च म्हणून उपयोगात येतो.

पिके
कृषी विभागामार्फत केशर आंब्याची लागवड रोजगार हमी योजनेतून केली आहे. दहा बाय दहा मीटरवर लागवड केली असून दहा ते पंधरा वर्षे वयाची सुमारे १०० आहेत. सेंद्रिय व्यवस्थापनातून त्यांचे संगोपन केले जाते. आपल्या बागेतील सेंद्रिय आंबा असा फलक त्यांनी लावला असून ग्राहक बागेतून देखील खरेदी करून जातात. प्रत्येक जुन्या झाडाला एकहजार ते १५०० पर्यंत फळे मिळतात. आंबे घरीच गवतामध्ये पिकवण्यात येतात. थेट विक्री केल्यामुळे नफ्यात वाढ होते. हवामान चांगले असेल तर वर्षाला दोन ते तीन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते.

अन्य पिके- हळदीची सुमारे दोन एकरांवर लागवड आहे. टोमॅटो, मिरची, मेथी, असा विविध भाजीपाला काही गुंठ्यांत घेण्यात येतो. सर्व शेतमालाची विक्री थेट ग्राहकांनाच होते. मध्यस्थ्यांचा अडसर नसतो.

पूरक व्यवसाय
शेतीबरोबरच व्यवहारे कुटुंब अनेक जोडव्यवसाय करत असल्याने पैसा सारखा खेळता राहतो. दुग्धव्यवसाय- सुमारे दोन म्हशी आहेत. स्वतःकडील दुधाबरोबरच हे कुटूंब गावातील अन्य शेतकऱ्यांकडील दुधाचेही संकलन करते. शेत गावालगतच रस्त्यावर असल्याने हा व्यवसाय सुलभ झाला आहे. पहाटे पाचपासून आठ वाजेपर्यंत दूध संकलन, त्यातील फॅट तपासणे, पावत्या देणे अशी कामे होतात. संकलनासाठी प्रति लिटर तीन रुपये याप्रमाणे खाजगी दूध कंपनीकडून कमिशन मिळते. महिन्याला या व्यवसायातून सुमारे १० हजार रुपये उत्पन्न मिळते.

गोऱ्हे विक्री
नांदेड भागात गायीचा लाल कंधारी हा गोवंश फार लोकप्रिय आहे. बाजारातून लाल कंधारीची लहान वासरे ते खरेदी करतात. सुमाके १० महिने त्यांचे पालनपोषण होते. त्यानंतर त्यांची शेतकऱ्यांना विक्री होते. एका जोडीला सुमारे एक लाखपर्यंत किंमत मिळते. या व्यवसायातून सुमारे ३० हजार रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळते.

पोल्ट्री
या व्यवसायाची जबाबदारी उत्तम यांच्याकडे आहे. शेताच्या बाजूला ५० बाय २० फूट आकारमानाचे एक लाख रुपये खर्चून शेड उभारले आहे. त्यात गावरान कोंबड्याचे संगोपन होते. कोंबड्यांची पिल्ले नगरहून घेतली आहेत. सध्या एक हजार कोंबड्या आहेत. त्यांचे लसीकरण घरीच केले जाते. सध्या ते सव्वा ते दीड किलो पक्षाची विक्री २५० ते ३०० रुपये प्रति किलो या दराने करतात. या व्यवसायातील विक्रीसाठी देखील बाहेर जाण्याची गरज भासत नाही.

पीठगिरणी, मिरची कांडप
एवढे सर्व करूनही व्यवहारे थांबले नाहीत. तर शेती व घर गावालगतच असल्याची आणखी एक संधी त्यांनी उचलली. पिठाची गिरणी व मिरची कांडप व्यवसायही सुरू केला. या व्यवसायातून महिन्याला पाच ते सात हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. त्याचबरोबर पोल्ट्रीसाठी भरडधान्याचे पीठही उपलब्ध होते.

वाचनालयाची उभारणी :
आपल्या आई-वडिलांनी शून्यातून केलेल्या प्रगतीचा त्यांच्या मुलांना अभिमान आहे. तसेच खालेल्या खस्तांची जाणीवही आहे. शेतीचा हाच वारसा पुढे टिकवायचा व क्षेत्र वाढवण्याचा विस्तार आहे असे प्रभाकर यांनी सांगितले. आपण उच्चशिक्षित असल्याची जाणीव ठेऊन आपल्या शेतातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय त्यांनी सुरू केले आहे. दररोज सुमारे पाच दैनिके, साप्ताहिके, मासिके, त्रैमासिके येथे असतातच. शिवाय विविध तीन हजार पुस्तकांचा संग्रह त्यांनी केला आहे. या वाचनालयाचा फायदा गावातील नागरिक व विद्यार्थी घेतात. स्पर्धा परीक्षांची पुस्तकेही येथे उपलब्ध होतात.

संपर्क - प्रभाकर व्यवहारे - ८९९९०२८९५२
रमेश देशमुख - ९४२३१५६५९३
(लेखक कंधार, जि. नांदेड येथे तालुका कृषी अधिकारी आहेत.)

 

 


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
काजूगर निर्मितीचा स्वयंचलित अत्याधुनिक...रत्नागिरी जिल्ह्यात गव्हाणे येथे रत्नागिरी कृषी...
संयमवृत्तीनेच होते नफावृध्दी व...जनावरे मग ती दुभती असोत की नको असलेली, योग्य...
दूग्ध, रेशीम व्यवसायातून अर्थकारण केले...परभणी शहरानजीक शेती असलेल्या ढगे कुटुंबाने शेतीला...
शेतकरी नियोजन- कापूसमाझ्या शेतातील कपाशीचे पीक सध्या जवळपास ३५ ते ४२...
पीक नियोजनातून बसवले कुटुंबाचे आर्थिक...बाभूळसर (ता. शिरूर) येथील रामचंद्र नागवडे व...
महिला बचतगटाचा ‘जय भोलेनाथ’ ब्रॅण्डभेंडा बुद्रूक (ता. नेवासा,जि.नगर) येथील वीस...
हिरवे हिरवेगार गालिचे, हरित तृणांच्या...हिरवे हिरवेगार गालिचे हरित तृणांच्या मखमालीचे......
यांत्रिकी पद्धतीने मूरघास निर्मिती...सध्या दुग्धव्यवसायात मूरघास ही अत्यंत महत्त्वाची...
कृषीसंपन्नता, आरोग्य, पर्यावरण हेच...कोटमगावाने (ता. जि. नाशिक) कृषीसंपन्न, आरोग्य व...
द्राक्ष, पेरूतून प्रगतीकडे कृषी...कृषी पदविका घेतल्यानंतर त्याचा योग्य वापर करीत...
कोकणात प्रयत्नावादातून दिली...कोकणात दुग्धव्यवसाय म्हणावा तसा विकसित झालेला...
खरीप पिकांतील तण नियंत्रण व्यवस्थापनजगात सर्वांत जास्त वापर तणनाशकांचा (४३.६ टक्के)...
अतीव संघर्ष, धैर्यातून साधली उल्लेखनीय...उस्मानाबाद जिल्ह्यातील अणदूर येथील वैशाली घुगे...
चिकाटी, आर्थिक नियोजनातून पोल्ट्री...वांजोळी (जि. नगर) येथील ३८ वर्षे वयाच्या अमोल...
जलसंधारण,शिक्षण अन् कृषी विकासाचा रचला...सुदृढ, आत्मनिर्भर समाज घडविणे या उद्देशातून जळका...
दुग्ध व्यवसाय ठरतोय शेतीला आधारपनवेल येथील बांधकाम व्यावसायिक अनिल लक्ष्मण...
‘रायरेश्‍वर ’ गटाचा; सेंद्रिय हळदीचा...नाटंबी (ता. भोर, जि. पुणे ) येथील श्री. रायरेश्वर...
दुग्धप्रक्रिया उद्योगातून कमावला...सांगली येथील माळी कुटुंबीय गेल्या काही...
कांदा बीजोत्पादनातून मिळवली शिवापूर...अकोला जिल्ह्यातील शिवापूर गावाने कांदा...
वर्षभर विविध भाज्यांची चक्राकार...अवर्षणग्रस्त असलेल्या सालवडगाव (ता. नेवासा, जि....