परिश्रमपूर्वक दुग्ध व्यवसायातून उभारले वैभव

बदलत्या परिस्थितीत शेतीवर पूर्णपणे अवलंबून न राहता दादूलगाव (जि. बुलडाणा) येथीलदळवी कुटुंबाने एक-दोन जनावरांपासून सुरुवात करीत दुग्ध व्यवसायात पाऊल टाकले. कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून मेहनत करीत विस्तार केला. वैभव उभारले. दररोज ३०० लिटरपर्यंत दूध संकलनापर्यंत मजल मारणारा तालुक्यातील हा एकमेव व्यवसाय असावा.
भरपूर दूध देणाऱ्या गायी
भरपूर दूध देणाऱ्या गायी

बदलत्या परिस्थितीत शेतीवर पूर्णपणे अवलंबून न राहता दादूलगाव (जि. बुलडाणा) येथील दळवी कुटुंबाने एक-दोन जनावरांपासून सुरुवात करीत दुग्ध व्यवसायात पाऊल टाकले. कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून मेहनत करीत विस्तार केला. वैभव उभारले. दररोज ३०० लिटरपर्यंत दूध संकलनापर्यंत मजल मारणारा तालुक्यातील हा एकमेव व्यवसाय असावा. दादूलगाव (ता. मेहकर, जि. बुलडाणा) येथील वामनराव कुंडलिक दळवी यांची १५ एकर शेती असून, संपूर्ण क्षेत्रात ओलिताची सुविधा आहे. दहा एकर सोयाबीन, पाच एकरांत चारा पिके, मका, गवतवर्गीय व ज्वारी असते. मागील वर्षी दोन एकरांत शेवगा, त्यात कांदा बीजोत्पादन, पाच एकरांत सीताफळ व त्यात भाजीपाला असतो. करार पद्धतीने स्वीटकॉर्न घेतात. दुग्ध व्यवसाय झाला मुख्य दळवी कुटुंबाने २०१३ मध्ये दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली. दोन म्हशी घेतल्या. दूध हॉटेलला पुरवले जाई. नंतर थेट विक्री सुरू केली. दळवी यांचा मुलगा विशाल मेहकर येथे मोटरसायकल दुरुस्ती व्यवसाय चालवायचे. या गॅरेज ठिकाणी घरचे ३० लिटर व इतरांचे २० असे ५० लिटर दूध थेट ग्राहकांना पुरवले जायचे. दुधाची गुणवत्ता चांगली असल्याने ग्राहक वाढत गेले. वामनराव दरवर्षी आळंदी ते पंढरपूर दिंडी सोहळ्यात पायी जायचे. त्या वेळी नगर जिल्ह्यातील दूध उत्पादकांसोबत २०१४ मध्ये भेट झाली. त्यातून व्यवसायातील बाबींविषयी सांगोपांग चर्चा झाली. त्यानंतर व्यवसायाला आकार देण्याचे ठरवले. व्यवसायाला दिला आकार होलस्ट्नि फ्रिजियन (एचएफ) गायी विदर्भातील वातावरणात टिकाव धरतील का याबाबत साशंकता होती. त्यामुळे सुरुवातीला ६० हजार रुपयांत एक गाय खरेदी केली. ती दिवसाला २५ लिटर दूध द्यायची. योग्य व्यवस्थापन केल्यास गायीला इथले वातावरण मानवते हा अनुभव आला. मग २०१५ मध्ये लोणी (जि. नगर) येथील बाजारातून सहा एचएफ गायी चार लाख ६० हजारांना आणल्या. दूध संकलनात वाढ झाली. या भागात म्हशीच्या दुधाला मागणी व दर जास्त असल्याने नफ्यातून २०१६-१७ मध्ये गुजरात- सुरत बाजारातून आठ जाफराबादी म्हशी व २०१९-२० मध्ये नऊ गायी लोणी, घोडेगाव बाजारातून आणल्या. दळवी यांच्या दुग्ध व्यवसायाची वैशिष्ट्ये

  • गायी, म्हशी मिळून ४० पर्यंत संख्या, प्रत्येक गायीचे नामकरण.
  • दररोजचे संकलन- स्वतःकडील २२५ ते २५० लिटर. शेतकऱ्यांकडील- १०० लि.
  • दररोज २५ लिटर ताक, १५ किलो दह्याचे व मागणीनुसार अन्य पदार्थांचे उत्पादन.
  • कडबा कुट्टी यंत्र, ‘मिल्किंग मशिन, खुराक-भरडा बनविण्यासाठी विजेवरील चक्की.
  • खुराक, दूध वाहतुकीसाठी चारचाकी वाहन. चारा वाहतूक-मशागतीसाठी ट्रॅक्टर
  • दुधाची गुणवत्ता तपासण्यासाठी फॅट मीटर, दोन डीप फ्रिजर्स.
  • चार घनमीटर क्षमतेचा गोबर गॅस. त्यातून दर्जेदार शेणखतनिर्मिती. वर्षाला दोन घरांच्या स्वयंपाकासाठी गॅसची उपलब्धता. वर्षाला १०० ट्रॉली शेणखत. शेतासाठी वापरून उर्वरित विक्री.
  • गोठा बांधणी सहा लाख रु, पाणी उपलब्धता सव्वा लाख, मुक्त गोठा दोन लाख,
  • यंत्र ७० हजार, ट्रॅक्टर, कडबा कुट्टी व खुराक-भरडा यंत्र अशी गुंतवणूक
  • ‘कोरोना’ संकटातही मार्ग शोधला कोरोना संकटाचा फटका दुग्ध व्यवसायाला बसला. थेट विक्रीवर मर्यादा आल्या. तोडगा शोधताना पनीर, तूप, दही, ताक व मागणीनुसार श्रीखंड बनविण्यास सुरुवात केली. ग्राहकांकडून त्यास चांगला प्रतिसाद मिळू लागला. उत्साह वाढला. मेहकरमध्ये स्वतःची डेअरी होती. आता दुधासह अन्य पदार्थांसाठी गावात दुसरी शाखा सुरू केली. समस्यांचा अभ्यास व उपाय

  • एचएफ गायींना विदर्भातील वातावरण पोषक नाही असे अनेकांनी दळवी यांना सांगितले. त्यामुळे त्यांच्या मनात शंका निर्माण झाल्या. मग नगर भागातील शेतकऱ्यांसोबत चर्चा करून बदल केले.
  • गायींच्या शरीराचे तापमान २८ अंश से. पेक्षा कमी राहण्यासाठी ‘फॉगर्स’ व तापमापकाचा वापर
  • गायींना दोन वेळा धुणे, गोठा थंड ठेवण्याकडे लक्ष
  • हिवाळ्यात गोठ्याच्या बाजूला हिरवी नेट
  • दिवे लावून उष्णता वाढवली जाते.
  • पायाखाली व बसण्यासाठी रबरी मॅट
  • मुक्त गोठा पद्धती. त्यामुळे आरोग्य सुधारून दुधात वाढ.
  • जनावरांच्या अंगावर गोचिडचा प्रादुर्भाव ही समस्या होती. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ डॉ. जाधव यांनी सल्ला दिला. त्यानुसार परसबागेतील देशी कोंबडी पालन सुरु केले. त्यातून प्रश्‍न सुटला. सोबत दिवसाला ५० अंडी मिळू लागली. १० ते १२ रुपये प्रति नग दराने विक्री होते.
  • कुटुंबाचा एकोपा उत्पन्न वाढत गेले तशी जनावरांची संख्या वाढवीत नेली. त्यांची खरेदी, गोठा उभारणी, यंत्र खरेदी आदी बाबींसाठी कुठले कर्ज घेतले नाही. घरचे सुमारे सहा सदस्य व्यवसायात गुंतले आहेत. सकाळी सहा वाजता कामांना सुरुवात होते. रात्री दहावाजेपर्यंत सर्व कामांत व्यस्त असतात. एका जनावरांपासून व्यवसाय सुरू करून आर्थिक सक्षमता व वैभव उभे केले. नातवंडे चांगल्या शाळेत शिकताहेत. घरी वाहने आहेत असे वामनरावांनी सांगितले. पत्नी बेबीताई, मोठा मुलगा जगदीश, लहान मुलगा विशाल, सुना, नातवंडे असा त्यांचा परिवार आहे. संपर्क- वामनराव दळवी, ९५११५८२७७७

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com