agriculture story in marathi, weekly weather advisary | Agrowon

कोकणात मध्यम स्वरूपात तर उर्वरित ठिकाणी अत्यल्प पाऊस

डॉ. रामचंद्र साबळे
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

उत्तर महाराष्ट्र व गुजराच्या सीमेवर १००६ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील. तर मध्य महाराष्ट्रावर १००८ व दक्षिण बाजूस १०१० हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात पावसात उघडीप राहणे शक्‍य असून केवळ कोकणातच मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता राहील तसेच पुणे जिल्ह्यातील पश्‍चिम घाटाच्या भागातही काही दिवशी १० ते १५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील पश्‍चिम भागात ६ ते ८ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात काही दिवशी ३ ते ५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे.

उत्तर महाराष्ट्र व गुजराच्या सीमेवर १००६ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील. तर मध्य महाराष्ट्रावर १००८ व दक्षिण बाजूस १०१० हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात पावसात उघडीप राहणे शक्‍य असून केवळ कोकणातच मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता राहील तसेच पुणे जिल्ह्यातील पश्‍चिम घाटाच्या भागातही काही दिवशी १० ते १५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील पश्‍चिम भागात ६ ते ८ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात काही दिवशी ३ ते ५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. नाशिक नंदूरबार व सोलापूर जिल्ह्यांत अत्यल्प पावसाची शक्‍यता आहे. या आठवड्यात आकाश अंशतः ढगाळ राहील.

नाशिक, नंदूरबार व धुळे जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १५ ते २० किलोमीटर राहील. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग जिल्ह्यातही वाढेल. कोल्हापूर, सांगली, सोलापूर व पुणे आणि नगर जिल्ह्यांतही वाऱ्याचा ताशी वेग १४ ते १६ किलोमीटर राहील. त्यानुसार बाष्पीभवनाचा वेग वाढेल आणि पिकांची पाण्याची गरजही वाढेल. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने नैऋत्येकडून राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता अधिक राहील. मात्र, दुपारची सापेक्ष आर्द्रता कमी राहील.

महाराष्ट्रातील आतापर्यंतचे म्हणजे ३१ जुलैपर्यंतचे पाऊसमान कोकण, मध्यमहाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत मध्य महाराष्ट्र वगळता अधिक पाऊस झाल्याचे चित्र आहे. विदर्भ (६५० मि.मी.), कोकण (२२१८ मि.मी.), मध्य महाराष्ट्र (४२७ मि.मी.), मराठवाडा (३०२ मि.मी.) या भागांत गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगला पाऊस झालेला असला तरी दुष्काळी पट्ट्यात विशेषतः बीड, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, नाशिकचा पूर्व भाग, सातारा, सांगली व पुणे आणि कोल्हापूरचा पूर्व भाग यात चांगल्या पावसाची प्रतीक्षा असून, ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात, सप्टेंबर महिन्यात व ऑक्‍टोबरच्या १० तारखेपर्यंत चांगला पाऊस होईल.

कोकण
कोकणात या आठवड्यात चांगल्या पावसाचा अंदाज असून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात काही दिवशी ६० ते ७० मिलिमीटरपर्यंत पाऊस होण्याची शक्‍यता असून, रायगड जिल्ह्यात ४५ मिलिमीटर तर ठाणे जिल्ह्यात ३६ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ताशी ११ किलोमीटर राहील तर ठाणे व सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ९ किलोमीटर राहील. रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील तर ठाणे व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील तसेच ठाणे व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत किमान तापमान २६ ते २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९३ ते ९८ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८४ ते ८८ टक्के राहील.

मध्य महाराष्ट्र
नाशिक व नंदूरबार जिल्ह्यांत १ ते २ मिलिमीटर इतका अल्पशा पावसाची शक्‍यता प्रतिदिनी राहील तसेच हा पाऊस पश्‍चिमेकडील भागात होणे अपेक्षित आहे. धुळे व जळगाव जिल्ह्यांत पावसाची शक्‍यता नाही. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. नाशिक व धुळे जिल्ह्यांत ताशी १५ किलोमीटर वेगाने वारे वाहतील तर नंदूरबार जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग २१ किलोमीटरपर्यंत वाढेल. जळगाव जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ९ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. नंदूरबार जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील तर नाशिक व धुळे तसेच जळगाव जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत किमान तापमान २४ अंश सेल्सिअस तर नाशिक जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस आणि जळगाव जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८७ ते ९३ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६८ ते ७९ टक्के राहील.

मराठवाडा
मराठवाड्यात या आठवड्यात पावसाची शक्‍यता नाही. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० ते १४ किलोमीटर राहील. परभणी व औरंगाबाद जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. तसेच उर्वरित जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांत किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहील. बीड जिल्ह्यात ते २० अंश सेल्सिअस आणि परभणी जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस राहील. उर्वरित सर्वच जिल्ह्यात किमान तापमान २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९२ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६८ ते ७४ टक्के राहील.

पश्‍चिम विदर्भ
अमरावती जिल्ह्यात काही दिवशी ३ मि.मी. पावसाची शक्‍यता असून बुलडाणा, अकोला व वाशिम जिल्ह्यांत पावसाची शक्‍यता नाही. अमरावती जिल्ह्यात वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाशिम जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ११ किलोमीटर राहील तर उर्वरित जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ९ किलोमीटर राहील. अकोला व अमरावती जिल्ह्यांत तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील तर बुलडाणा व वाशिम जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान बुलडाणा जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस राहील. तर उर्वरित अकोला, वाशिम व अमरावती जिल्ह्यात किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८५ ते ९३ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७४ ते ७८ टक्के राहील.

मध्य विदर्भ
यवतमाळ जिल्ह्यात काही दिवशी ४ मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून, उर्वरित जिल्ह्यात पावसाची शक्‍यता नाही. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते १२ किलोमीटर राहील. कमाल तापमान यवतमाळ जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस, वर्धा जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस व नागपूर जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान यवतमाळ जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान यवतमाळ जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९१ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७० टक्के राहील.

पूर्व विदर्भ
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत काही दिवशी ३ ते ५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. तर उर्वरित जिल्ह्यात पावसाची शक्‍यता नाही. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. गडचिरोली जिल्ह्यात वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. तर चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत ते ३२ अंश सेल्सिअस राहील. गडचिरोली जिल्ह्यात किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील तर चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ९२ टक्के राहील. गोंदिया जिल्ह्यात ९० टक्के व भंडारा जिल्ह्यात ९१ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ६७ ते ७४ टक्के राहील.

दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्र
कोल्हापूर जिल्ह्यात काही दिवशी ६ मिलिमीटर, सांगली जिल्ह्यात १ मिलिमीटर, सातारा जिल्ह्यात ८ मिलिमीटर, सोलापूर जिल्ह्यात ३ मिलिमीटर आणि पुणे जिल्ह्यात पश्‍चिम भागात १५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. सांगली जिल्ह्यात ताशी १९ किलोमीटर वेगाने वारे वाहतील. सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांत ताशी १३ ते १४ किलोमीटर वेगाने वारे वाहतील. तर सोलापूर पुणे व अहमदनगर जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १५ ते १६ किलोमीटर राहील. सांगली व सोलापूर जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील तर उर्वरित जिल्ह्यात ते ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २१ ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८८ ते ९६ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६५ ते ८७ टक्के राहील.
 
कृषी सल्ला

  • दुभत्या जनावरांना स्वच्छ पाणी द्यावे. गोठे स्वच्छ अाणि बंदिस्त असावेत.
  • खारवट जमिनीत उसाच्या को.एम. २६५ जातीची लागवड करावी तर मध्यम ते खोल सुपीक जमिनीत को. ८६०३२ या जातीची निवड करावी.
  • पूर्ण वाढ झालेल्या आंबा झाडांना प्रत्येकी ५० किलो शेणखत + दीड किलो युरिया+ १ किलो डीएपी+ १ किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे.

    (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ अाणि सदस्य संशोधन परिषद, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

 


इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात आतबट्ट्याचा दुग्ध व्यवसायऔरंगाबाद : दर दिवसाच्या दूध संकलनात फरक पडला नाही...
जळगाव जिल्ह्यातील दूध उत्पादक संकटातजळगाव  ः जिल्ह्यात रोज सुमारे साडेसहा लाख...
जळगावात पीक कर्जवाटपाची गती अतिशय संथजळगाव : केंद्र व राज्य सरकार, प्रशासनातील वरिष्ठ...
`औरंगाबाद जिल्ह्यात मका खरेदीची मुदत...औरंगाबाद : झालेली मका खरेदी व बाकी असलेली...
धुळे जिल्ह्यात मक्यावर लष्करी अळीचा...देऊर, जि. धुळे  : जिल्ह्यात मका पिकावर...
सांगलीत दुग्ध व्यवसाय बंद पडण्याच्या...सांगली  ः शेतीपूरक दूग्ध व्यवसाय पशुखाद्य...
सिंधुदुर्गात दुध संकलनाची शासकीय...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात दुध संकलन करणाऱ्या...
कोल्हापुरात बिलांअभावी...कोल्हापूर : दुध संघांकडून वेळेत बिले मिळत...
‘पीकविमा प्रस्तावासाठी जनसुविधा केंद्र...नांदेड : ‘‘जिल्ह्यातील जनसुविधा केंद्र (सीएससी)...
परभणीत दर कपातीमुळे दूध उत्पादकांसमोर...परभणी : शासकीय दुग्धशाळेतील दूधाचे दर स्थिर आहेत...
सोलापुरात पावसाने जूनची सरासरी केली...सोलापूर  ः जिल्ह्यात यंदा पावसाने चांगली...
भाटघर, वीर, नीरा देवघर धरणांतील...सोलापूर  : सोलापूर, पुणे आणि सातारा...
पुणे जिल्ह्यात दूध दराअभावी शेतकऱ्यांचे...पुणे ः ‘कोरोना’मुळे दूध व्यवसाय अडचणीत आला आहे....
हिंगोलीत ‘कर्जमुक्ती’तून ७० हजार...हिंगोली : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
साताऱ्यात कमी दूध दरामुळे उत्पन्न,...सातारा ः दुष्काळग्रस्त तसेच बागायती भागातील...
कृषी केंद्रात दरफलक नसल्यास...नाशिक : कृषी निविष्ठा विक्री केंद्र चालविणाऱ्या...
सोलापुरात ‘स्वाभिमानी’ने केली वीज...सोलापूर : ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे राज्यात...
नगर जिल्ह्यातील दुग्धोत्पादक मेटाकुटीलानगर ः जिल्ह्यात ‘कोरोना’चा संसर्ग सुरू...
पदरमोड करून दूध व्यवसाय करण्याची...सोलापूर  ः चारा व पशुखाद्याच्या वाढत्या...
कोल्हापुरात वाढीव वीज बिलांची होळीकोल्हापूर : वाढीव वीज बिलांविरोधात येथील...