agriculture story in marathi, weekly weather advisary | Agrowon

हवेच्या कमी दाबामुळे पावसाचा जोर कमी
डॉ. रामचंद्र साबळे
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

महाराष्ट्र व गुजरात सीमेवर १००६ हेप्टापास्कल, मध्यावर १००८ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे महाराष्ट्रात या आठवड्यात पावसास जोर राहणार नाही. १२ ऑगस्ट रोजी हीच हवेच्या दाबाची स्थिती कायम राहील. १३ ऑगस्ट रोजी उत्तर महाराष्ट्रावर १००४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. त्यामुळे त्या भागात हवेचा दाब कमी होईल. त्याचवेळी ओरिसाजवळ हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. १४ ऑगस्ट रोजी उत्तर महाराष्ट्र व विदर्भावर हवेचे दाब वाढतील. १५ ऑगस्ट व १६ ऑगस्ट रोजी उत्तर व मध्य महाराष्ट्रावर १००६ हेप्टापास्कल हवेचा दाब राहील.

महाराष्ट्र व गुजरात सीमेवर १००६ हेप्टापास्कल, मध्यावर १००८ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे महाराष्ट्रात या आठवड्यात पावसास जोर राहणार नाही. १२ ऑगस्ट रोजी हीच हवेच्या दाबाची स्थिती कायम राहील. १३ ऑगस्ट रोजी उत्तर महाराष्ट्रावर १००४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. त्यामुळे त्या भागात हवेचा दाब कमी होईल. त्याचवेळी ओरिसाजवळ हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. १४ ऑगस्ट रोजी उत्तर महाराष्ट्र व विदर्भावर हवेचे दाब वाढतील. १५ ऑगस्ट व १६ ऑगस्ट रोजी उत्तर व मध्य महाराष्ट्रावर १००६ हेप्टापास्कल हवेचा दाब राहील. राजस्थानवर केवळ ९९८ हेप्टापास्कल तर पूर्व भारतावर १००० हेप्टापास्कल असा कमी हवेचा दाब राहण्यामुळे संपूर्ण उत्तर भारतात अतिवृष्टी आणि पावसाचे प्रमाण अधिक राहील. मध्यप्रदेश, गुजरातवरही १००२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहण्यामुळे त्याही भागात पावसाचे प्रमाण अधिक राहील. एकूणच उत्तर भारतात पावसाचे प्रमाण अधिक तर दक्षिण भारतात ते कमी राहील. ही हवामान स्थिती आठवडाभर कायम राहील. १४ ऑगस्ट रोजी उत्तर भारतात हवेचे दाब वाढतील आणि पावसाचे प्रमाण कमी होईल.

कोकणात या आठवड्यात चांगल्या पावसाची शक्‍यता असून उर्वरित महाराष्ट्रात या आठवड्याच्या उत्तरार्धात हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता असून उत्तर महाराष्ट्रात १० ते १३ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. मराठवाड्यातील लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, औरंगाबाद जिल्ह्यांत ४ ते ५ मिलिमीटर काही दिवशी पावसाची शक्‍यता आहे. पश्‍चिम विदर्भात काही दिवशी २ ते ४ मिलिमीटर, मध्य विदर्भात काही दिवशी ५ मिलिमीटर, पूर्व विदर्भात काही दिवशी ५ ते ८ मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून दक्षिण, पश्‍चिम महाराष्ट्रात कोल्हापुरात अधिक तर उर्वरित जिल्ह्यात अल्पसा पाऊस होईल.

कोकण
रत्नागिरी जिल्ह्यात काही दिवशी १५ मिलिमीटर सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यात काही दिवशी १८ मिलिमीटर तर ठाणे जिल्ह्यात काही दिवशी १२ मिलिमीटरपर्यंत पावसाची शक्‍यता असून वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ११ ते १३ किलोमीटर राहील. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांत किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील तर रत्नागिरी जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस आणि ठाणे जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८८ ते ९४ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६५ ते ८५ टक्के राहील.

उत्तर महाराष्ट्र
नाशिक जिल्ह्यातील पश्‍चिम भागात प्रतिदिनी ६ मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत प्रतिदिनी १३ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. तसेच जळगाव जिल्ह्यात १० मिलिमीटरपर्यंत पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग नंदुरबार जिल्ह्यात २१ किलोमीटर, नाशिक व धुळे जिल्ह्यांत १५ ते १६ किलोमीटर आणि जळगाव जिल्ह्यात ताशी ६ किलोमीटर राहील. नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील तर धुळे जिल्ह्यात ३० अंश आणि नाशिक जिल्ह्यात किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. तर नाशिक व धुळे जिल्ह्यांत २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत ८१ ते ८४ टक्के राहील. नाशिक जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ६१ टक्के तसेच धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत ६२ टक्के राहील.

मराठवाडा
लातूर व नांदेड जिल्ह्यांत प्रतिदिनी पावसाचे प्रमाण २ ते ३ मिलिमीटर तर परभणी, हिंगोली, जालना जिल्ह्यांत ४ मिलिमीटर आणि औरंगाबाद जिल्ह्यात ५ मिलिमीटरपर्यंत राहील. उस्मानाबाद व बीड जिल्ह्यांत पावसाची शक्‍यता या आठवड्यात अत्यल्प राहील. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. बीड जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १६ किलोमीटर राहील. लातूर जिल्ह्यात ताशी १५ किलोमीटर, परभणी व जालना जिल्ह्यांत ताशी १४ किलोमीटर आणि उस्मानाबाद व हिंगोली जिल्ह्यांत ताशी १३ किलोमीटर राहील. नांदेड जिल्ह्यात ताशी १२ आणि औरंगाबाद जिल्ह्यात ताशी ९ किलोमीटर वेगाने वारे वाहतील. उस्मानाबाद व हिंगोली जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील तर औरंगाबाद जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. लातूर, बीड व जालना जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस आणि नांदेड व परभणी जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद जिल्ह्यात तसेच नांदेड, हिंगोली व औरंगाबाद जिल्ह्यांत किमान तापमान २१ अंश सेल्सिअस राहील. जालना व परभणी जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस आणि लातूर व बीड जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७७ टक्के व ९१ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६१ ते ६७ टक्के राहील.

पश्‍चिम विदर्भ
पश्‍चिम विदर्भात २ ते ४ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याचे दिशेत बदल होत असून वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते १४ किलोमीटर राहील. अकोला जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान अकोला व वाशिम जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस राहील तर बुलडाणा जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस आणि अमरावती जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८५ टक्के व दुपारची सापेक्ष आर्द्रता ६० ते ६५ टक्के राहील.

मध्य विदर्भ
वर्धा ते नागपूर जिल्ह्यांत प्रतिदिनी ५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून, यवतमाळ जिल्ह्यात अल्प पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० ते १५ किलोमीटर राहील. कमाल तापमान ३२ ते ३३ अंश सेल्सिअस राहील, तर किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८२ ते ९० टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६० ते ७० टक्के राहील.

पूर्व विदर्भ
पूर्व विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत ५ ते ८ मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० ते १२ किलोमीटर राहील. भंडारा व गोंदिया या जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ ते ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान गोंदिया जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस तर उर्वरित चंद्रपूर, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८८ ते ९० टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६० ते ६७ टक्के राहील.

दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्र
कोल्हापूर जिल्ह्याचे पश्‍चिम भागात काही दिवशी ३४ किलोमीटर पावसाची शक्‍यता आहे. तर उर्वरित जिल्ह्यात प्रतिदिनी ३ ते ४ मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून त्यात सांगली, सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यांचा समावेश आहे. नगर जिल्ह्यात अत्यल्प पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. सांगली, पुणे व नगर जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १४ ते १५ किलोमीटर राहील. उर्वरित जिल्ह्यात तो १० ते १२ किलोमीटर ताशी राहील. सातारा जिल्ह्यात कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस राहील. तर कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस राहील. पुणे व नगर जिल्ह्यांत ३० ते ३१ अंश सेल्सिअस आणि सोलापूर जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. सांगली जिल्ह्यात किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहील. तर उर्वरित जिल्ह्यात किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७८ ते ९५ टक्के राहील. दर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६९ ते ८८ टक्के राहील. या आठवड्यात सुरवातीचे काही दिवस पावसात उघडीप राहील. मात्र या आठवड्याचे उत्तरार्धात हलका ते मध्यम पाऊस होईल.

कृषिसल्ला

  • सोयाबीन पिकामध्ये कीड नियंत्रणासाठी शेतात एकरी ८ ते १० पक्षी थांबे उभारावेत.
  • ढगाळ व दमट हवामानामुळे केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसताच रोगयुक्त पाने काढून नष्ट करावीत.
  • पाण्याची उपलब्धता असल्यास पिकास संरक्षित पाणी द्यावे.

 

इतर अॅग्रो विशेष
राजद्रोह कायद्याची गरज काय?का ही वर्षांपूर्वीची ही घटना आहे. एका...
को-मार्केटिंगचा घोळबियाणे, खते, कीडनाशके या कृषी उत्पादनासाठीच्या...
नाशिक जिल्ह्यात पावसाचा टोमॅटो पिकाला...नाशिक: जिल्ह्यात मागील दोन आठवड्यांत झालेल्या...
झोपडीचा आधार बांबू पोचला सातासमुद्रापारवेलतूर, जि. नागपूरः गरिबांच्या झोपडीचा आधार...
देशाच्या उत्तर-मध्य बहुतांश भागातून...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) मजल-दरमजल...
रब्बीसाठी अनुदानित हरभरा बियाणे उपलब्धपुणे: राज्यात गेल्या रब्बी हंगामात अनुदानित हरभरा...
बुधवारपासून पावसाची शक्यतापुणे: देशातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास वेगाने सुरू...
पावासामुळे खरीप पिके, भाजीपाल्यासह...पुणे : राज्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या वादळी...
कलम ३७० पुन्हा आणून दाखवा : नरेंद्र मोदीजळगाव  : हिंमत असेल तर, जम्मू-काश्मीरबाबत...
पीक बदलातून दिली नवी दिशाशिरपूर जैन (ता. मालेगाव, जि. वाशीम) येथील...
अमेरिकेतील भातशेतीची शिवारफेरीअमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यामध्ये सॅक्रामेंटो...
परतीचा प्रवास वेगाने; मध्य, पूर्व...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून)...
सातारा : उसावर अमेरिकन लष्करी अळीचा...सातारा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणीत...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे : ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून पडणाऱ्या...
राष्ट्रीय संस्थांमध्ये कृषी...दापोली, जि. रत्नागिरी : राष्ट्रीय कृषी...
...हे खूपच संतापजनक आहे : राजू शेट्टीसध्या शेतकऱ्याला भाकरीची गरज आहे, त्याच्या पुढे...
कृषी शिक्षणव्यवस्थेला हवी दिशादेशातील सर्वांत जास्त कृषी विद्यापीठे आणि कृषी...
कर्जबाजारी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा...मुंबई : मधुमेहासारख्या २०० चाचण्या १ रुपयात...
जैवविविधतेचा ऱ्हास करणारा प्रकल्प नकोचनियोजित नवमहाबळेश्वर गिरिस्थान प्रकल्पाचं क्षेत्र...
पाण्याचा ताळेबंद गरजेचाच नगर जिल्ह्यातील हिवरे बाजार या गावाने यंदाच्या...