agriculture story in marathi, weekly weather advisary | Agrowon

उत्तर, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाज
डॉ. रामचंद्र साबळे
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

महाराष्ट्रावरील हवेचे दाब कमी होत आहेत. महाराष्ट्राच्या उत्तर भागावर अाणि विदर्भावर ९९८ ते १००० हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहणार असून, मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्रावर १००२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र व विदर्भात पावसाचे प्रमाण अधिक तर दक्षिण महाराष्ट्र व मराठवाड्यावर पावसाचे प्रमाण मध्यम ते हलक्‍या स्वरूपाचे राहील.

महाराष्ट्रावरील हवेचे दाब कमी होत आहेत. महाराष्ट्राच्या उत्तर भागावर अाणि विदर्भावर ९९८ ते १००० हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहणार असून, मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्रावर १००२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र व विदर्भात पावसाचे प्रमाण अधिक तर दक्षिण महाराष्ट्र व मराठवाड्यावर पावसाचे प्रमाण मध्यम ते हलक्‍या स्वरूपाचे राहील. १९ ऑगस्ट रोजी उत्तर महाराष्ट्र व विदर्भावर १००२ तर पश्‍चिम व दक्षिण महाराष्ट्रावर १००४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहण्यामुळे उत्तर महाराष्ट्र व विदर्भात हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा तर दक्षिण महाराष्ट्रात हलक्‍या स्वरूपाचा पाऊस सुरूच राहील.

२० ऑगस्ट रोजी उत्तर महाराष्ट्रावर १००४ हेप्टापास्कल तर दक्षिण महाराष्ट्रात १००६ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहण्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होईल. २१ ऑगस्टला पावसाचे प्रमाण कमी होईल. कारण, हवेच्या दाबात वाढ होत आहे. २२ ऑगस्ट रोजी मध्य व दक्षिण महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ होऊन तो १००८ हेप्टापास्कल होईल, तेव्हा पावसात उघडीप जाणवेल. त्याचवेळी उत्तर महाराष्ट्र व विदर्भावर हवेचे दाब वाढून ते १००६ हेप्टापास्कल होतील आणि तेथेही पावसाचे प्रमाण कमी होईल. गुजरात, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाना, उत्तराखंड, सिक्कीम या भागांत जोराच्या पावसाची शक्‍यता असून, केरळवरील अतिवृष्टीचे प्रमाणही कमी होईल.

या आठवड्यात कोकणात २२ ऑगस्टपर्यंत जोराचे पाऊस होतील. त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी होईल. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा व मध्यमहाराष्ट्रात आठवडाभर मध्यम ते हलक्‍या स्वरूपाचा पाऊस होईल. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. वाऱ्याचा वेग मध्यम स्वरूपाचा राहील. पिकांच्या वाढीसाठी हवामान अनकूल राहील.

कोकण
कोकणात पावसाचे प्रमाण चांगले राहील. रत्नागिरी जिल्ह्यात काही दिवशी ५० मिलिमीटर पाऊस होईल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही दिवशी ४९ मिलिमीटरपर्यंत पावसाची शक्‍यता आहे. रायगड जिल्ह्यात काही दिवशी ४३ मिलिमीटर तर ठाणे जिल्ह्यात काही दिवशी २८ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग सिंधुदुर्ग जिल्ह्यात ताशी १५ किलोमीटर तर उर्वरित जिल्ह्यांत ताशी १० ते १२ किलोमीटर वेग राहील. कमाल तापमान २८ ते ३० अंश सेल्सिअस तर किमान तापमान २३ ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९६ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८९ ते ९३ टक्के राहील. त्यामुळे सकाळची व दुपारची सापेक्ष आर्द्रता अधिक राहील. त्याचा परिणाम रोग व किडी वाढण्यात होईल.

उत्तर महाराष्ट्र
नाशिक जिल्ह्यात काही दिवशी २१ मिलिमीटरपर्यंत पावसाची शक्‍यता असून, धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत प्रतिदिनी ६ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० ते ११ किलोमीटर राहील. धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत कमाल तापमानात ३२ ते ३३ अंश सेल्सिअस राहील, तर नाशिक व जळगाव जिल्ह्यांत कमाल तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ७० ते ८५ टक्के तर सकाळची सापेक्ष आर्द्रता ९२ ते ९५ टक्के राहील. किमान तापमान २२ ते २५ अंश सेल्सिअस राहील.

मराठवाडा
मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यांत काही दिवशी १३ मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून, उर्वरित जिल्ह्यांत ३ ते ६ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १३ ते १६ किलोमीटर राहील. कमाल तापमान ३१ ते ३२ अंश सेल्सिअस राहील तर किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९१ ते ९३ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६७ ते ७६ टक्के राहील.

पश्‍चिम विदर्भ
अकोला व अमरावती जिल्ह्यांत १३ ते १५ मिलिमीटर पावसाची काही दिवशी शक्‍यता असून, बुलढाणा व वाशिम जिल्ह्यांत ३ ते ६ मिलिमीटरह पावसाची शक्‍यता आहे. कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस तर किमान तापमान २३ ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९३ ते ९६ टक्के राहील तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८७ ते ९१ टक्के राहील.

मध्य विदर्भ
नागपूर जिल्ह्यात काही दिवशी ३० मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून, उर्वरित यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत ११ ते १५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ११ ते १४ किलोमीटर राहील. कमाल तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९१ ते ९६ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८४ ते ९१ टक्के राहील या प्रकारचे आर्द्रतेचे काळात कपाशी, सोयाबीन या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढेल.

पूर्व विदर्भ
भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत काही दिवशी २२ ते २३ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. गडचिरोली जिल्ह्यात काही दिवशी १९ मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून, चंद्रपूर जिल्ह्यात काही दिवशी ११ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ९ किलोमीटर राहील. कमाल तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअस राहील, तर किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९७ टक्के राहील तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८५ ते ९० टक्के राहील.

दक्षिण - पश्‍चिम महाराष्ट्र
कोल्हापूर जिल्ह्यात ४३ मिलिमीटर, सांगली जिल्ह्यात ३६ मिलिमीटर तर सातारा जिल्ह्यात ३० मिलिमीटर काही दिवशी पावसाची शक्‍यता आहे. तसेच पुणे जिल्ह्यात काही दिवशी ३१ मिलिमीटरपर्यंत पावसाची शक्‍यता आहे. सोलापूर व नगर जिल्ह्यांत ५ ते ७ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आठवड्याचे सुरवातीचे ४ ते ५ दिवस राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्यकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ११ ते १५ किलोमीटर राहील. कोल्हापूर जिल्ह्यात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील तर उर्वरीत जिल्ह्यांत ३० ते ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सातारा, सोलापूर व पुणे आणि अहमदनगर जिल्‍ह्यांत २१ ते २२ अंश सेल्सिअस राहील तर कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९१ ते ९७ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात ९२ टक्के आणि सोलापूर जिल्ह्यात ६९ टक्के राहील. उर्वरित जिल्ह्यांत किमान तापमान ७८ ते ८३ टक्के राहील.
 
कृषी सल्ला

  • आठवड्यातील पाऊसमान खरीप हंगामातील भात, सोयाबीन, तूर, उडिद, मटकी, चवळी, सूर्यफूल, बाजरी, नाचणी, मका, ज्वारी, कपाशी, ऊस या पिकांना तसेच भाजीपाला व फळ पिकांना अत्यंत उपयुक्त ठरेल. पिके वाढीच्या अवस्थेत असल्याने हा पाऊस वाढीसाठी उपयुक्त अाहे.
  • भात खाचरातील अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. खाचरातील पाण्याची पातळी ५ सें.मी. ठेवावी.
  • ढगाळ व दमट हवामानामुळे भाजीपाला पिकांवर कीड व रोगाचा प्रादुर्भाव वाढणे शक्‍य अाहे. पावसात उघडीप होताच कीड रोग नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात.

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य संशोधन परिषद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)  

इतर ताज्या घडामोडी
लोक-जैविपा - भर दुष्काळात उभारलेली...शेतकऱ्यांचा पुढाकार अनुभवल्यावर वन विभागाच्या...
नगर : नुकसान भरपाईसाठी एकशे पस्तीस...नगर : जिल्ह्यात ऑक्टोबर ते नोव्हेंबर या...
'या' बाजार समितीत शेतकऱ्यांना अल्प दरात...अकोला : सध्या कोणत्याही शासकीय योजनेचा फायदा...
जळगाव जिल्ह्यात सर्वच नुकसानग्रस्तांना...जळगाव : अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना...
केंद्रीय पथक आज मराठवाड्यात पीक...औरंगाबाद : मराठवाड्यात ऑक्‍टोबर-...
फळबागांची लागवड खोळंबण्यास ‘तो’ ठरला...पुणे : मागील दोन ते तीन महिन्यांत जोरदार पाऊस...
सांगलीत बेदाणा लिलावास प्रारंभसांगली : दिवाळीच्या महिन्याच्या सुटीनंतर बाजार...
अमरावती जिल्ह्याला २४ टक्‍के...अमरावती : मॉन्सूनोत्तर पावसाचा जिल्ह्यात ८० टक्‍...
परभणी विभागात २८ हजार क्विंटल...परभणी : महाबीजच्या परभणी विभागातील सहा...
हमीभावासाठी 'सीसीआय'ला द्या कापूस : ॲड...वर्धा : ‘‘शेतकऱ्यांनी आधारभूत किमतीपेक्षा कमी...
राज्यात रताळी ५०० ते ६००० हजार रुपये...जळगावात २२०० ते ३२०० रुपये  जळगाव...
पेरणीपूर्व मशागतीय पद्धतीने करा...रब्बी हंगामात ज्वारी, गहू, हरभरा, करडई व सूर्यफूल...
कांदा पिकासाठी संतुलित अन्नद्रव्य...कांदा उत्पादकता कमी होण्यासाठी असंतुलित खत...
जळगाव जिल्हा परिषदेत निधीवाटपावरून आरोप...जळगाव : जिल्हा परिषद सेस फंड, शिक्षण, महिला-...
वऱ्हाडला पीक नुकसानभरपाईचा २६५ कोटींचा...अकोला : ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिपावसाचा फटका...
पुणे विभागात रब्बीसाठी अडीच लाख टन खते...पुणे : रब्बी हंगामात शेतकऱ्यांना खतांची अडचण येऊ...
सांगली जिल्ह्यात भूजल पातळी ५८...सांगली : जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांपेक्षा यंदा...
नाशिक : भिजलेल्या पिकांमुळे चाऱ्याचा...नाशिक : जिल्ह्यात झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसाने...
धक्कादायक, एकाच गावातल्या ६०० मेंढ्या...नगर  ः मागील महिन्यात अतिवृष्टीने पारनेर...
अधिक उपसा केला तर पाणी टंचाईची शक्यता...लातूर : जिल्ह्यात पावसाळ्याच्या चारही महिन्यांत...