आठवडाभर मध्यम ते हलक्‍या पावसाची शक्‍यता

अाठवड्याचे हवामान
अाठवड्याचे हवामान

महाराष्ट्राच्या उत्तर भागावर १००४ हेप्टापास्कल तर मध्य व दक्षिण भागावर १००६ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहण्यामुळे या आठवड्याच्या सुरवातीपासून पावसाचे प्रमाण चांगले राहील. २८ ऑगस्ट रोजी महाराष्ट्राच्या उत्तर भागावर १००६ हेप्टापास्कल तर दक्षिण भागावर १००८ हेप्टापास्कल अशाप्रकारे हवेच्या दाबात वाढ होईल आणि त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होईल. मात्र, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरूच राहील. आठवड्याच्या उत्तरार्धात काही दक्षिणेकडील भागात पावसात काहीकाळ उघडीप राहणे शक्‍य आहे. उत्तर भारतावर हवेचे दाब अत्यंत कमी राहतील. राजस्थानवर ९९८ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. त्यामुळे त्या भागात पावसाचा जोर कायम राहील, तर दिल्लीसह पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशच्या भागावर केवळ १००० हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहण्यामुळे हिमाचल प्रदेशसह सिक्कीम, बिहारपर्यंत पावसाचा जोर कायम राहील. बंगालच्या उपसागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. तसेच हिंदी महासागराच्या विषववृत्तीय भागात ५० ते ७० रेखांशामध्ये समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. त्यामुळे यापुढेही पावसाचे प्रमाण चांगले राहील. या आठवड्यात सर्व कोकणात विस्तृत स्वरूपात तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी विस्तृत स्वरूपात पावसाची शक्‍यता आहे. तसेच पूर्व विदर्भातील गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ३५ ते ६० मिलीमीटर पावसाची शक्‍यता या आठवड्याच्या सुरवातीच्या काही दिवसांत होईल. तसेच कोकणात २४ ते ३५ मिलिमीटर प्रतिदिनी पावसाची शक्‍यता आहे. उर्वरित महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत प्रतिदिनी ३ ते ११ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील, त्यामुळे या आठवड्यात नैर्ऋत्य मॉन्सून पावसाचा जोर कायम राहील. कोकण ः रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत काही दिवशी ३० ते ३५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून, रायगड व ठाणे जिल्ह्यांत प्रतिदिनी २४ ते २६ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ९ किलोमीटर राहील. रायगड जिल्ह्यात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील तर रत्नागिरी जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील. ठाणे व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ८६ टक्के राहील तर ठाणे व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ९१ ते ९२ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ७४ ते ७६ टक्के राहील तर सिंधुदुर्ग व ठाणे जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ८१ ते ८७ टक्के राहील. उत्तर महाराष्ट्र ः नाशिक व नंदूरबार जिल्ह्यांत प्रतिदिनी १० ते ११ मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून, धुळे व जळगाव जिल्ह्यांत प्रतिदिनी ७ ते ८ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते १० किलोमीटर राहील. नाशिक व धुळे जिल्ह्यांत कमाल तापमान २७ ते २८ अंश सेल्सिअस राहील, तर नंदूरबार जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस आणि जळगाव जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान धुळे व जळगाव जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस राहील, तर नाशिक व नंदूरबार जिल्ह्यांत २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९२ ते ९४ टक्के राहील. तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६७ ते ७२ टक्के राहील. मराठवाडा ः नांदेड जिल्ह्यात प्रतिदिनी १८ मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून, उस्मानाबाद जिल्ह्यात केवळ ३ मिलिमीटर प्रतिदिनी पावसाची शक्‍यता आहे. उर्वरित सर्वच जिल्ह्यांत प्रतिदिनी ६ ते ९ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते १२ किलोमीटर राहील. या संपूर्ण आठवड्यात नांदेड जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत हलक्‍या स्वरूपाचा पाऊस होईल. उस्मानाबाद जिल्ह्यात कमाल तापमान २५ अंश सेल्सिअस राहील, तर नांदेड जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. बीड व जालना जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस कमाल तापमान राहील. हिंगोली व औरंगाबाद जिल्ह्यांत कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस राहील तर लातूर व परभणी जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस कमाल तापमान राहील. जालना, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यांतच किमान तापमान २० अंश सेल्सिअस राहील. लातूर जिल्ह्यात किमान तापमान २१ अंश सेल्सिअस राहील. परभणी व हिंगोली जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस तर नांदेड व औरंगाबाद जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस किमान तापमान राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९२ ते ९३ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६४ ते ७० टक्के राहील. पश्‍चिम विदर्भ ः बुलडाणा व अमरावती जिल्ह्यांत प्रतिदिनी २० मिलीमीटर पावसाची शक्‍यता असून, वाशिम व अकोला जिल्ह्यांत प्रतिदिनी ८ ते १० मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते १० किलोमीटर राहील. अमरावती जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील, तर उर्वरित बुलढाणा, अकोला व वाशिम जिल्ह्यांत कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २० ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९१ ते ९३ टक्के राहील तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७० ते ८१ टक्के राहील. मध्य विदर्भ ः वर्धा जिल्ह्यात प्रतिदिनी १० मिलिमीटर, नागपूर जिल्ह्यात प्रतिदिनी २० मिलिमीटर तर यवतमाळ जिल्ह्यात प्रतिदिनी २५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते १२ किलोमीटर राहील. कमाल तापमान २९ ते ३० अंश सेल्सिअस तर किमान तापमान २१ ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९१ ते ९३ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७० ते ७९ टक्के राहील. पूर्व विदर्भ ः गडचिरोली जिल्ह्यात काही दिवशी ६० मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून, गोंदिया व भंडारा जिल्ह्यांत ३५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे, तर चंद्रपूर जिल्ह्यात २० मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ९ मिलिमीटर राहील. गडचिरोली जिल्ह्यांत कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस राहील तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९४ ते ९६ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८० ते ८२ टक्के राहील. दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र ः कोल्हापूर जिल्ह्यात प्रतिदिनी ११ मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून, उर्वरित सर्वच जिल्ह्यांत प्रतिदिनी ४ ते ९ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ११ किलोमीटर राहील. सोलापूर जिल्ह्यात कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस राहील. सांगली व नगर जिल्ह्यांत ते २९ अंश सेल्सिअस राहील. उर्वरीत सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नगर जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस राहील, तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत किमान तापमान २१ ते २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९१ ते ९४ टक्के राहील तर दुपारची सापेक्ष आर्द्रता सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांत ७२ टक्के राहील. उर्वरीत सर्वच जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ६३ ते ६९ टक्के राहील. या आठवड्यातील हवमान सर्वच पिकांचे वाढीसाठी उपयुक्त राहील. कृषी सल्ला ः

  • शेतातील पाण्याचा निचरा करणे अत्यंत महत्त्वाचे असून, निचरा न झाल्यास पिके पिवळी पडतात. शेताच्या उताराकडील बांधाच्या एका बाजूची उंची कमी करून शेतात साचलेले पाणी शेताबाहेर चराद्वारे काढून टाकावे.
  • पिकातील उंच वाढलेली तणे हाताने उपटून शेताबाहेर काढून टाकावीत.
  • मूग, मटकी, चवळी, उडीद या पिकांच्या परिपक्व झालेल्या शेंगांची तोडणी करून शेंगा सावलीत सुकवाव्यात किंवा उन्हात वाळवून बडवून दाणे वेगळे करून पोत्यात भरून ठेवावे.
  • अडसाडी उसाची लागवड पूर्ण करावी.
  • (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य संशोधन परिषद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com