ढगाळ, थंड, कोरड्या हवामानाची शक्यता

अाठवड्याचे हवामान
अाठवड्याचे हवामान

महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. राजस्थान, मध्य प्रदेशवर १०१६ तर हिमालयाच्या पायथ्याशी १०१८ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. त्याचप्रमाणे ईशान्य भारतावर १०१८ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील व वाऱ्याची दिशा इशान्येकडून राहणार असल्याने महाराष्ट्रातही उत्तरेकडून व इशान्येकडून थंड वारे येतील. थंडीचे प्रमाणात वाढ होईल. मात्र लगेच २ डिसेंबर रोजी हवेच्या दाबात बदल होतील. मध्य व उत्तर भारतात तसेच राजस्थानवर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहण्यामुळे व महाराष्ट्रातील हवेचा दाब १०१२ हेप्टापास्कल होऊन तो कमी होत असल्याने मध्य व उत्तर भारतातील थंडीचे प्रमाण कमी होईल आणि महाराष्ट्रातील थंडीचे प्रमाणही कमी होईल.

३ डिसेंबर रोजी कोकण किनारपट्टी व महाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील; आणि हिमालयाच्या पायथ्याशी १०१६ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील. त्यामुळे उत्तर भारतात थंडीचे प्रमाण वाढेल. महाराष्ट्रातही थंडीचे प्रमाण किंचीत वाढेल. दिनांक ४ डिसेंबर रोजी हिमालयाच्या पायथ्याशी व राजस्थानवर १०१८ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. दिल्ली, उत्तर प्रदेश भागावरील थंडीचे प्रमाण वाढेल. ५ डिसेंबर रोजी पुन्हा हवेच्या दाबात बदल होऊन महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब वाढेल आणि थंडीचे प्रमाण कायम राहील. ६ डिसेंबर रोजी उत्तर भारतातील हवेचे दाब कमी होतील व महाराष्ट्रातील हवेचे दाब कायम राहील. थंडीचे प्रमाणही कायम राहील.

बंगालचा उपसागर, हिंदी महासागर व अरबी समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढेल. ढग निर्मिती होईल. पावसासाठी ६ व ७ डिसेंबर रोजी वातावरण तयार होईल आणि दक्षिण महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता निर्माण होईल. या आठवड्यात महाराष्ट्रात आकाश अंशतः ढगाळ राहील. वाऱ्याची दिशा इशान्येकडून राहण्यामुळे थंडीचे सातत्य टिकून राहील.

कोकण रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. तर सिंधुदूर्ग व ठाणे जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदूर्ग जिल्ह्यात किमान तापमान १५ अंश सेल्सिअस राहील तर ठाणे जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस राहील. रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात किमान तापमान २० ते २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ठाणे जिल्ह्यात ४८ टक्के राहील तर सिंधुदूर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात ५१ ते ५५ टक्के राहील. दुपारीच सापेक्ष आर्द्रता रायगड व ठाणे जिल्ह्यात २६ टक्के राहील. सिंधुदूर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात ३२ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ठाणे व रायगड जिल्ह्यात ताशी ५ ते ६ किलोमीटर राहील तर रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यात ७ ते ८ किलोमीटर ताशी राहील. वाऱ्याची दिशा इशान्येकडून राहील. दिनांक ६ ते ८ डिसेंबर दरम्यान अल्पशा पावसाची शक्‍यता राहील.

उत्तर महाराष्ट्र जळगाव जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील, तर नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान १२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. नंदुरबार व धुळे जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ३८ ते ३९ टक्के राहील. जळगाव व नाशिक जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ४१ ते ४३ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २२ ते २३ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ७ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा नाशिक व जळगाव जिल्ह्यात इशान्येकडून तर धुळे व नंदुरबार जिल्ह्यात अग्नेयेकडून राहील.

मराठवाडा नांदेड जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. तर परभणी व हिंगोली जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस राहील. उर्वरीत सर्वच जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद जिल्ह्यात किमान तापमान १५ अंश सेल्सिअस राहील. लातूर, नांदेड व जालना जिल्ह्यात किमान तापमान १४ अंश सेल्सिअस राहील. बीड, परभणी, हिंगोली व औरंगाबाद जिल्ह्यात किमान तापमान १३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४५ ते ५२ टक्के तर दुपारची आर्द्रता केवळ २४ ते २७ टक्के राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ९ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा अग्नेयेकडून राहील. पावसाची शक्‍यता ६ ते ७ डिसेंबर दरम्यान राहील.

पश्‍चिम विदर्भ पश्‍चिम विदर्भातील सर्वच जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील, तर किमान तापमान अमरावती जिल्ह्यात १५ अंश सेल्सिअस आणि उर्वरीत जिल्ह्यात १४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४४ ते ५० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २४ ते २६ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ६ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा इशान्येकडून राहील. पावसाची शक्‍यता नाही.

मध्य विदर्भ यवतमाळ जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. वर्धा, नागपूर जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. नागपूर जिल्ह्यात किमान तापमान १२ अंश सेल्सिअस राहील. तर वर्धा व यवतमाळ जिल्ह्यात किमान तापमान १४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहाली. सकाळची सापेक्ष आर्द्रता यवतमाळ व नागपूर जिल्ह्यात ५२ टक्के राहील. तर वर्धा जिल्ह्यात ५५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २८ ते २९ टक्के इतकी कमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ५ किलोमीटर राहील. वर्धा जिल्ह्यात वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील तर नागपूर व यवतमाळ जिल्ह्यात वाऱ्याची दिशा इशान्येकडून राहील.

पूर्व विदर्भ भंडारा जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. भंडारा, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. भंडारा जिल्ह्यात किमान तापमान १५ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात किमान तापमान १३ अंश सेल्सिअस राहील तर गोंदिया जिल्ह्यात ते १२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. गडचिरोली जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ६३ टक्के राहील. चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ५५ ते ५६ टक्के राहील. चंद्रपूर जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ३१ टक्के राहील. तर गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता २४ ते २९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ५ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा इशान्येकडून राहील.

दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्र सांगली व पुणे जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. सातारा व नगर जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस राहील तर कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यात कमात तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर जिल्ह्यात किमान तापमान १८ अंश सेल्सिअस राहील. सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यात १५ अंश सेल्सिअस राहील. नगर व पुणे जिल्ह्यात किमान तापमान ११ ते १२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सोलापूर जिल्ह्यात ४५ टक्के राहील, तर पुणे व अहमदनगर जिल्ह्यात ४८ टक्के राहील. सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ५४ ते ५५ टक्के राहील. सोलापूर, पुणे व अहमदनगर जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता २६ ते २८ टक्के राहील. तर कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ३० ते ३२ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग सोलापूर जिल्ह्यात १० किलोमीटर राहील तर उर्वरीत जिल्ह्यात तो ५ ते ८ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा इशान्येकडून राहील. या आठवड्यात ६ व ७ रोजी पावसाची शक्‍यता आहे. कृषिसल्ला

  • दिनांक ६ ते ८ डिसेंबरचे काळात दक्षिण महाराष्ट्राच्या काही भागात अल्पशा पावसाची शक्‍यता असल्याने तयार झालेली अंजीर फळे तसेच फुले यांची काढणी करून बाजारात माल विक्रीसाठी पाठवावा.
  • थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून जनावरे शेडमध्ये बांधावीत.
  • कुक्कुटपालन शेडमध्ये बल्ब लावून तापमान वाढवण्याचा प्रयत्न करावा.
  • चारा पिकांच्या पेरण्या पूर्ण करून जनावरांसाठी हिरव्या चाऱ्याची तरतूद करावी.
  • पिकांना ठिबक व तुषार सिंचन प्रणालीने पाणी द्यावे.
  • (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ आणि सद्स्य संशोधन परिषद, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com