हवामान ढगाळ राहील, थंडी कमी होईल

आठवड्याचे हवामान
आठवड्याचे हवामान

महाराष्ट्रावरील हवेचे दाब कमी होत आहेत. राज्यावर १०१२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. पूर्व किनारपट्टीवर दक्षिणेकडे १०१२ तर उत्तरेकडे १०१४ हेप्टापास्कल हवेचा दाब राहण्यामुळे वाऱ्याची दिशा अग्नेयेकडून राहून मोठ्या प्रमाणात वारे बाष्प वाहून आणतील. त्यामुळे ढगाळ हवामान राहील. मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत पावसाची शक्‍यता आहे. संपूर्ण भारतातील थंडीचे प्रमाण थोडे कमी होणे शक्‍य असून महाराष्ट्रातही मध्यम स्वरूपात थंडीचे प्रमाण राहील. ९ डिसेंबर रोजी महाराष्ट्रावरील हवेचे दाब आणखी कमी होतील. महाराष्ट्रावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. पश्‍चिम किनारपट्टीवरील हवेचे दाब १०१२ हेप्टापास्कल इतका अधिक राहण्यामुळे वारे पूर्वेकडून अग्नेयेकडून महाराष्ट्राच्या दिशेने वाहतील. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बाष्प वाहून आणतील. ढगनिर्मिती होऊन मराठवाडा व विदर्भात पाऊस होईल. मात्र पावसाचे प्रमाण अल्पसेच राहील.

१० डिसेंबर रोजी हवामान स्थिती कायम राहील. संपूर्ण भारतात थंडीचे प्रमाण कमी राहील. गुजरात, मध्यप्रदेश भागातही हवामान ढगाळ राहून पावसाची शक्‍यता निर्माण होईल. ११ डिसेंबर रोजी महाराष्ट्रावर २०१२ हेप्टापास्कल हवेचा दाब राहील. तसेच विदर्भात पावसाची शक्‍यता निर्माण होईल. गुजरात, मध्यप्रदेशसह पश्‍चिम भारतावरील हवेचे दाब कमी होतील. त्यामुळे थंडीचे प्रमाण कमी होईल. त्याचवेळी हिंदीमहासागर, बंगालच्या उपसागरावरील भागातील हवेचे दाब कमी होतील. श्रीलंकेजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन चक्राकार वारे वाहतील. १२ डिसेंबर रोजी पुन्हा महाराष्ट्रावरील हवेचे दाब कमी होतील. संपूर्ण पश्‍चिम किनारपट्टीपासून पूर्वेस १०१० हेप्टापास्कल हवेचा दाब कमी होण्यामुळे पावसाची शक्‍यता निर्माण होईल. १३ डिसेंबर रोजी बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडील भागात चक्रीवादळाची निर्मिती होणे शक्‍य आहे.

महाराष्ट्रावर हवेचे दाब कमीत राहतील. अरबी समुद्र व हिंदीमहासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअस पर्यंत वाढेल. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्राचा काही भाग, मराठवाडा व विदर्भात पावसाची शक्‍यता आहे.

कोकण रायगड जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस तर रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस राहील. तर सिंधुदूर्ग जिल्ह्यात कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदूर्ग व रायगड जिल्ह्यांत किमान तापमान २१ अंश सेल्सिअस राहील, तर रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यांत किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. ठाणे जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ५४ टक्के राहील तर रायगड जिल्ह्यात ६१ टक्के राहील. सिंधुदूर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ७३ ते ७५ टक्के राहील. ठाणे जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ३४ टक्के राहील. तर सिंधुदूर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ४० ते ४८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ५ किलोमटीर राहील. वाऱ्याची दिशा र्इशान्येकडून राहील. या आठवड्यात दक्षिण कोकणातील काही भागात अत्यल्प पावसाची शक्‍यता आहे.

उत्तर महाराष्ट्र नाशिक जिल्ह्यात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत कमाल तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअस राहील. नाशिक जिल्ह्यात कमाल तापमान १६ अंश सेल्सिअस राहील. तर धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत १३ ते १४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. जळगाव जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ५७ टक्के राहील. नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतील सकाळची सापेक्ष आर्द्रता ४१ ते ४८ टक्के राहील. नंदुरबार जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता २९ टक्के राहील. नाशिक, धुळे व जळगाव जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ३० ते ३५ टक्के राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ८ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा अग्येयेकडून राहील.

मराठवाडा नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. तर परभणी जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. तर उर्वरित सर्वच जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. त्यात उस्मानाबाद, लातूर, बीड, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांचा समावेश राहील. जालना जिल्ह्यात किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहील. तर बीड जिल्ह्यात किमान तापमान १७ अंश सेल्सिअस राहील. परभणी, हिंगोली, औरंगाबाद या जिल्ह्यांत किमान तापमान १५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता औरंगाबाद जिल्ह्यात ५७ टक्‍के राहील तर नांदेड, बीड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत ६१ ते ६८ टक्के राहील. तर लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ७६ ते ७८ टक्के राहील. जालना जिल्ह्याची दुपारची सापेक्ष आर्द्रता ४० टक्के राहील. तर उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली व औरंगाबाद जिल्ह्यांत ३४ ते ३९ टक्के राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांत ताशी १३ किलोमीटर राहील. परभणी जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ११ किलोमीटर राहील. नांदेड, बीड, हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ८ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा अग्नेयेकडून राहील. उस्मानाबाद, लातूर, बीड व परभणी जिल्ह्यांत १ ते ३ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे.

पश्‍चिम विदर्भ वाशीम जिल्ह्यात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील तर अमरावती, अकोला व बुलढाणा जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान बुलढाणा जिल्ह्यात १३ अंश सेल्सिअस राहील. तर अमरावती जिल्ह्यात किमान तापमान ११ अंश सेल्सिअस राहील. तसेच अकोला व वाशीम जिल्ह्यांत किमान तापमान १२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता अकोला जिल्ह्यात ८५ टक्के राहील. वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ६५ टक्के राहील व बुलढाणा जिल्ह्यात ७४ टक्के राहील. अमरावती जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ४४ टक्के राहील. अकोला जिल्ह्यात ४३ टक्के आणि वाशीम व बुलढाणा जिल्ह्यांत ३५ ते ३८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ६ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा बुलढाणा व वाशीम जिल्ह्यात नैर्ऋत्येकडून अकोला जिल्ह्यात अग्नेयेकडून व अमरावती जिल्ह्यात दक्षिणेकडून राहील.

मध्य विदर्भ मध्य विदर्भात कमाल तापमान २८ ते २९ अंश सेल्सिअस तर किमान तापमान ११ ते १२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता नागपूर जिल्ह्यात ६६ टक्के तर वर्धा व यवतमाळ जिल्ह्यांत ८० ते ८२ टक्के राहील. यवतमाळ जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ३४ टक्के राहील. तर वर्धा व नागपूर जिल्ह्यात ४३ ते ४६ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ७ किलोमीटर राहील व पावसाची दिशा नैर्ऋत्य, वायव्य व अग्नेयेकडून राहील. काही दिवशी विशेषतः ८ व ९ डिसेंबर रोजी २ ते ३ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे.

पूर्व विदर्भ ८ ते ९ डिसेंबर रोजी १ ते ३ मिलिमिटर पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा उत्तरेकडून राहील, तर गडचिरोली जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. तसेच गोंदिया जिल्ह्यात र्इशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ६ किलोमीटर राहील. गोंदिया जिल्ह्यात कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस राहील आणि गडचिरोली जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान १ ते १२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८५ ते ९० टक्के राहील तर दुपारची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर जिल्ह्यात ४२ टक्के, गोंदिया जिल्ह्यात २८ टक्के आणि गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत ३३ ते ३५ टक्के राहील.

दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्र कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत कमाल तापमान २७ ते २९ अंश सेल्सिअस राहील. पुणे जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस राहील. सोलापूर व नगर जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. तर सातारा जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील. सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यांत किमान तापमान १७ ते १८ अंश सेल्सिअस राहील. तर सांगली जिल्ह्यात १५ अंश सेल्सिअस राहील. पुणे जिल्ह्यात १४ अंश सेल्सिअस आणि नगर व सातारा जिल्ह्यांत १३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. पुणे व नगर जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ६१ ते ६५ टक्के राहील. उर्वरित जिल्ह्यात ७१ ते ७८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता नगर व सोलापूर जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ३५ ते ३७ टक्के राहील. तसेच पुणे, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत ४१ ते ४८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग सांगली व सोलापूर जिल्ह्यांत १० ते ११ किलोमीटर राहील. उर्वरित सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ६ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा पुणे जिल्ह्यात र्इशान्येकडून तर उर्वरित जिल्ह्यात वाऱ्याची दिशा अग्नेयेकडून राहील. पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता कमी राहील.

कृषिसल्ला

  • गरवा कांदा लागवडीसाठी एन.२-४-१ या जातीची लागवड करावी. कांद्याची साठवणूक चाळीमध्ये करावी.
  • बागायत क्षेत्रात यापुढे कमी कालावधीची जसे कोथिंबीर, मुळा, मेथी, चाकवत, पालक इत्यादी भाजीपाला पिकांची लागवड करावी.
  • पाण्याची कमतरता भासत असल्यास ऊस पिकास सरीआड सरी पद्धतीने पाणी द्यावे. शक्‍यतो ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करावा.
  • पाण्याच्या पाळीतील अंतर १२ ते १५ दिवसांचे ठेवावे.
  • (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ आणि सदस्य संशोधन परिषद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com