किमान तापमान घसरेल, कडाक्‍याच्या थंडीचा आठवडा

डॉ. रामचंद्र साबळे
डॉ. रामचंद्र साबळे

महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर १०१६ हेप्टापास्कल इतका तसेच नाशिक, धुळे, जळगाव, बुलडाणा, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांवरही तितकाच हवेचा दाब अधिक राहण्यामुळे थंडीच्या प्रमाणात वाढ होऊन कडाक्‍याची थंडी या आठवड्यात राहील, तर मध्य व दक्षिण महाराष्ट्रात थंडीचे प्रमाण हवेचा दाब १०१४ हेप्टापास्कल राहण्यामुळे मध्यम स्वरूपाचे राहील. काश्‍मीर ते मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली या भागांवर १०२० हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे थंडीची तीव्रता अधिक राहील. संपूर्ण उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, सिक्कीम भागांत थंडीची तीव्रता अधिक राहील. वाऱ्याची दिशा उत्तरेकडून, ईशान्येकडून व वायव्येकडून दक्षिणेकडे राहील, त्यामुळे महाराष्ट्रात थंडीची तीव्रता या आठवड्यात कायम राहील. वर्षाच्या ५२ आठवड्यांपैकी हा ५२ वा आठवडा असल्याने हा आठवडा अत्यंत तीव्र थंडीचा आठवडा आहे. या वर्षी तो अधिक तीव्र असल्याने हवामान स्थिती सरासरीनुसार आहे, असेच म्हणावे लागेल. हिंदी महासागराच्या विषववृत्तीय भागाच्या तसेच अरबी समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान २९ ते ३० अंश सेल्सिअसपर्यंत वाढले असल्याने समुद्राच्या पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होईल, त्यातून ढगनिर्मिती होईल आणि सध्या व जानेवारी महिन्यात आकाश ढगाळ राहील. ३० डिसेंबर रोजी महाराष्ट्रावरील हवेचा दाबात वाढ होणे शक्‍य असून, थंडीची तीव्रता उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली, काश्‍मीर, उत्तराखंड या भागांत अधिक राहील. दक्षिण महाराष्ट्रातही थंडीची तीव्रता वाढेल. कर्नाटक, आंध्र प्रदेश या भागातही थंडी वाढेल. त्याचप्रमाणे केरळ व तमिळनाडू भागातही थंडी वाढेल. ३१ डिसेंबर तसेच १ व २ जानेवारीपर्यंत थंडीचे प्रमाण सर्व भारतभर अधिक अधिक होत जाईल. २ जानेवारी रोजी व ३ जानेवारी रोजी महाराष्ट्रावर १०२० हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब वाढण्यामुळे कडाक्‍याच्या थंडीचा आठवडा असणार आहे. महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र व विदर्भ भागात तसेच नगर व इतर भागात किमान तापमान ८ अंश सेल्सिअसपेक्षा खाली घसरणे शक्‍य आहे. कोकण सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ ते ३४ अंश सेल्सिअस राहील, तर ठाणे व रायगड जिल्ह्यांत ३१ ते ३२ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत किमान तापमान २० ते २१ अंश सेल्सिअस राहील, तर ठाणे व रायगड जिल्ह्यांत १८ ते १९ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील, तर ठाणे जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ९३ टक्के राहील. मात्र, रत्नागिरी, रायगड व ठाणे जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ७१ ते ७९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यांत ७० ते ७५ टक्के राहील, तर सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांत ती ५७ ते ६५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा इशान्येकडून राहील. पावसाची शक्‍यता नाही. उत्तर महाराष्ट्र धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस राहील. जळगाव व नाशिक जिल्ह्यांत कमाल तापमान २९ ते ३० अंश सेल्सिअस राहील. नाशिक व धुळे जिल्ह्यांत किमान तापमान १२ अंश सेल्सिअस राहील. मात्र जळगाव जिल्ह्यात ते १० अंश सेल्सिअस आणि नंदूरबार जिल्ह्यात ते १४ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. धुळे जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ८३ टक्के राहील. मात्र नाशिक, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ५२ ते ५७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता नाशिक व नंदूरबार जिल्ह्यांत ३० ते ३४ टक्के राहील, तर धुळे व जळगाव जिल्ह्यांत ५० ते ५६ टक्के राहील. नंदूरबार जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १० किलोमीटर राहील, तर नाशिक व धुळे आणि जळगाव जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ९ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा इशान्येकडून राहील. मराठवाडा उस्मानाबाद, लातूर व जालना जिल्ह्यांत कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. हिंगोली जिल्ह्यात ते २६ अंश सेल्सिअस इतके कमी राहील. तसेच नांदेड व औरंगाबाद जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील, तर बीड जिल्ह्यात ते ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नांदेड व उस्मानाबाद जिल्ह्यांत १५ ते १६ अंश सेल्सिअस राहील. तसेच लातूर जिल्ह्यात १४ अंश सेल्सिअस राहील. बीड, परभणी व जालना जिल्ह्यांत किमान तापमान १३ अंश सेल्सिअस राहील. हिंगोली व औरंगाबाद जिल्ह्यांत किमान तापमान १२ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड व परभणी जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता लातूर व औरंगाबाद जिल्ह्यांत ४१ ते ४८ टक्के राहील. नांदेड जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ७७ टक्के राहील. उस्मानाबाद, बीड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत ६० ते ६५ टक्के सकाळची सापेक्ष आर्द्रता राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता उस्मानाबाद व नांदेड जिल्ह्यांत ५० ते ५३ टक्के राहील, तर लातूर, बीड, हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ३० ते ३४ टक्के राहील. वाऱ्याची ताशी वेग जालना, लातूर, उस्मानाबाद व हिंगोली जिल्ह्यांत १० ते १२ किलोमीटर राहील तर औरंगाबाद, परभणी व नांदेड जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ८ ते ९ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा इशान्येकडून राहील. पश्‍चिम विदर्भ अकोला जिल्ह्यात कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस राहील. बुलढाणा, वाशिम व अमरावती जिल्ह्यांत कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस राहील. वाशिम जिल्ह्यात किमान तापमान ९ अंश सेल्सिअस राहील तर बुलढाणा, अकोला व अमरावती जिल्ह्यांत ते ८ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. वाशिम व अमरावती जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ५० ते ५५ टक्के राहील तर बुलढाणा व अकोला जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ३५ ते ४५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २० ते २३ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ६ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. मध्य विदर्भ यवतमाळ जिल्ह्यात कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस राहील तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ते २७ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान ८ ते ९ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. नागपूर जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ६५ टक्के राहील; तर यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत ४० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २५ ते २९ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ५ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. पावसाची शक्‍यता नाही. हवामान थंड व कोरडे राहील. पूर्व विदर्भ चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत कमाल तापमान २८ ते २९ अंश सेल्सिअस राहील, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ते २७ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत किमान तापमान १० ते ११ अंश सेल्सिअस राहील. भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ते ८ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ४० ते ४१ टक्के राहील; तर गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ६० ते ७० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २४ ते २७ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ६ किलोमीटर व वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. पावसाची शक्‍यता नाही. दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र नगर व सोलापूर जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ ते ३२ अंश सेल्सिअश राहील. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत ते ३० अंश सेल्सिअस राहील व सातारा व पुणे जिल्ह्यांत ते २८ अंश सेल्सिअस राहील. पुणे व नगर जिल्ह्यांत किमान तापमान १२ अंश सेल्सिअस राहील. सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यांत ते १८ ते २० अंश सेल्सिअस राहील तर सांगली व सातारा जिल्ह्यांत किमान तापमान १६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. पुणे व नगर जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ९४ टक्के राहील. सांगली व सातारा जिल्ह्यांत ८५ ते ८८ टक्के राहील, तर सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यांत ७१ ते ७४ टक्के राहील. कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ४० ते ४९ टक्के राहील. पुणे व नगर जिल्ह्यांत ५० ते ५५ टक्के व सातारा जिल्ह्यात ४३ टक्के राहील. कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १० ते १४ किलोमीटर राहील. सातारा, नगर व पुणे जिल्ह्यांत ८ ते ९ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.   कृषी सल्ला

  • बागायती ऊस, मका, सूर्यफूल व गहू आणि बागायती रब्बी ज्वारी पिकाला सायंकाळी पाणी दिल्यास जमिनीचे तापमान योग्य राखण्यास मदत होते.
  • फळबागांमध्ये पहाटेच्या वेळी शेकोट्या पेटवाव्यात. त्यामुळे तापमान योग्य राखण्यास मदत होते.
  • जनावरे उघड्यावर न बांधता गोठ्यामध्ये बांधावीत. कुक्कुटपालन शेडमध्ये रात्री बल्ब लावून तापमान वाढवणे आवश्‍यक आहे.
  • (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ सदस्य संशोधन परिषद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com