आठवडाभर पहाटेच्या वेळी थंडी राहील

आठवड्याचे हवामान
आठवड्याचे हवामान

महाराष्ट्राच्या मध्यावर उत्तर-दक्षिण दिशेने १०१८ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहण्यामुळे पूर्व विदर्भ, मराठवाडा, पूर्वेकडील पश्‍चिम महाराष्ट्रावर १०२० हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील, याचाच अर्थ असा की, या भागात किमान तापमानात मोठी घसरण होईल. मध्यापासून पूर्वेकडील भागात नीचांकी तापमानाची नोंद होईल, तशीच परिस्थिती उत्तर महाराष्ट्रातील पूर्व भागातही राहील. ६ जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात किंचित वाढ होऊन तो १०१६ हेप्टापास्कल इतका कमी होईल आणि कडाक्‍याच्या थंडीचे प्रमाण कमी होईल. गुजरातवर १०१८, राजस्थानवर तसेच पंजाब, हरियानावर तितकाच हवेचा दाब राहण्यामुळे थंडीचे प्रमाण उत्तरेकडील पश्‍चिम भारतात अधिक राहील.

कर्नाटक, केरळ, तमिळनाडू भागांतही थंडीचे प्रमाण अधिक राहील. संपूर्ण उत्तर भारतात थंडीचे प्रमाण अधिक राहण्यामुळे व तेथे हवेचे दाब अधिक राहण्यामुळे व वाऱ्याची दिशा उत्तरेकडून दक्षिणेकडे राहण्यामुळे याही आठवड्यात थंडीचे प्रमाण अधिक राहील. ७ जानेवारी रोजी राजस्थानवर १०२० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब वाढेल, याचाच अर्थ असा की, तेथे कडाक्‍याची थंडी राहण्यामुळे थंड वारे दक्षिण दिशेने वाहतील आणि महाराष्ट्रात थंडीत वाढ होईल, त्याचप्रमाणे कर्नाटक, आंध्र, तमिळनाडू, केरळ भागातही थंडीचे प्रमाण कायम राहील. एकूणच संपूर्ण भारतात या आठवड्यात थंडीचे प्राबल्य अधिक राहील, अशी हवामान स्थिती राहील. ८ जानेवारी रोजी काश्‍मीर, पंजाब, हरियाना भागावर १०२० हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील. याचा अर्थ असा, की थंडीच्या प्रमाणात वाढ होईल.

महाराष्ट्रात मात्र उत्तर महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात थंडीचे प्रमाण अधिक राहील. मात्र, दक्षिण महाराष्ट्रात तुलनेने ते किंचित कमी राहील. मात्र थंडीचा जोर कायम राहील. ९ व १० जानेवारी रोजी कडाक्‍याच्या थंडीचे प्रमाण कायम असेल. हिंदी महासागर, अरबी समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान २९ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होईल. मात्र, वाऱ्याची दिशा उत्तरेकडून असल्याने परिणाम होणार नाही. थंडीचे प्रमाण कायम राहील. कोकण रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ ते ३३ अंश सेल्सिअस राहील, तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत ते २९ ते ३० अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत किमान तापमान १७ अंश सेल्सिअस राहील तर किमान तापमान १४ ते १५ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५४ ते ५७ टक्के सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत राहील तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ७१ ते ७६ टक्के राहील. रायगड जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ६९ टक्के राहील; तसेच ठाणे जिल्ह्यात ३८ टक्के राहील व सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ती ४१ ते ४५ टक्के राहील. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ११ ते १२ किलोमीटर राहील. मात्र तो ठाणे व रायगड जिल्ह्यांत ५ ते ६ किलोमीटर प्रतिताशी राहील. ठाणे जिल्ह्यात वाऱ्याची दिशा अग्नेयेकडून राहील, तर इतर जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा र्इशान्येकडून राहील. उत्तर महाराष्ट्र जळगाव जिल्ह्यात कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस राहील, तर नाशिक, धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस राहील. नाशिक व जळगाव जिल्ह्यांत किमान तापमानात घट होऊन ते ७ ते ८ अंश सेल्सिअस इतके कमी राहील, तर धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत किमान तापमान ११ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता धुळे जिल्ह्यात ६९ टक्के राहील, तर नंदूरबार जिल्ह्यात ४९ टक्के राहील आणि जळगाव व नाशिक जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ५५ ते ५७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता नाशिक व धुळे जिल्ह्यांत २९ टक्के राहील तर नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत ती २० ते २६ टक्के इतकी कमी राहील. वाऱ्याची ताशी वेग ५ ते ८ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. मराठवाडा हिंगोली जिल्ह्यात कमाल तापमान २५ अंश सेल्सिअस राहील, तर लातूर जिल्ह्यात ते २७ अंश सेल्सिअस राहील. मराठवाड्यातील उर्वरित उस्मानाबाद, नांदेड, बीड, परभणी, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान उस्मानाबाद व जालना जिल्ह्यांत १२ अंश सेल्सिअस राहील, तसेच लातूर व बीड जिल्ह्यांत ते ११ अंश नांदेड व औरंगाबाद व परभणी जिल्ह्यांत किमान तापमान १० अंश सेल्सिअस राहील व हिंगोली जिल्ह्यांत ते ९ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. बीड जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ८४ ते ८६ टक्के राहील. औरंगाबाद व जालना जिल्ह्यांत मात्र ती केवळ ३९ टक्के राहील, त्यामुळे हवामान कोरडे राहील. उस्मानाबाद व हिंगोली जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ५१ ते ५२ टक्के राहील; तसेच लातूर व नांदेड जिल्ह्यांत ६३ ते ७० टक्के राहील. नांदेड जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ६५ टक्के राहील आणि बीड जिल्ह्यात ती ५६ टक्के राहील - तसेच जालना जिल्ह्यात ४४ टक्के राहील. उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली व औरंगाबाद जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता २३ ते २९ टक्के इतकी कमी राहील, त्यामुळे हवामान कोरडे राहील. लातूर जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ११ किलोमीटर राहील. औरंगाबाद जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ५ किलोमीटर व उर्वरित जिल्ह्यात तो ७ ते ९ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. मात्र लातूर व नांदेड जिल्ह्यांत अग्नेयेकडून राहील. पश्‍चिम विदर्भ वाशीम जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. बुलढाणा, अकोला व अमरावती जिल्ह्यांत ते ३० अंश सेल्सिअस राहील. बुलढाणा जिल्ह्यात किमान तापमान १२ अंश सेल्सिअस राहील, तर अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ते १० अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५० ते ७८ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३० ते ४० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ६ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. मध्य विदर्भ यवतमाळ जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत किमान तापमान ११ ते १२ अंश सेल्सिअस राहील व नागपूर जिल्ह्यात ते ८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता यवतमाळ व नागपूर जिल्ह्यांत ६४ ते ७० टक्के राहील. आणि वर्धा जिल्ह्यात ४० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ३० ते ३२ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ६ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. हवामान थंड व कोरडे राहील. पूर्व विदर्भ गोंदिया जिल्ह्यात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. गडचिरोली जिल्ह्यात ते ३१ अंश सेल्सिअस आणि चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत ते ३० अंश सेल्सिअस राहील. पूर्व विदर्भात किमान तापमान घसरेल व ते ७ अंश सेल्सिअस राहील. केवळ गडचिरोली जिल्ह्यात ते ११ अंश सेल्सअस राहील. आकाश निरभ्र राहील. गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ५५ ते ६० टक्के राहील, तर गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत ती ७० टक्के राहील. भंडारा जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ५५ टक्के, चंद्रपूर जिल्ह्यात ४० टक्के, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत ३० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ६ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र सोलापूर जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. सातारा व पुणे जिल्ह्यांत ते २८ अंश सेल्सिअस राहील. सांगली व नगर जिल्ह्यांत कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील व कोल्हापूर जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान कोल्हापूर जिल्ह्यात १५ अंश सेल्सिअस तसेच सांगली जिल्ह्यात १२ अंश सेल्सिअस आणि सातारा व सोलापूर जिल्ह्यांत ११ अंश सेल्सिअस राहील, तर नगर व पुणे जिल्ह्यांत किमान तापमान केवळ ७ ते ८ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सांगली जिल्ह्यात व धुळे जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ८८ ते ९० टक्के राहील, तर सातारा व नगर जिल्ह्यांत ती ७६ ते ७८ टक्के राहील व सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यांत ४८ ते ५९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २१ ते ३८ टक्के राहील. वाऱ्याची दिशा र्इशान्य व अग्नेयेकडून राहील व वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ९ किलोमीटर राहील.   कृषी सल्ला

  • पुणे, नगर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, नाशिक व जळगाव जिल्ह्यांत किमान तापमान ८ अंश सेल्सिअसपेक्षा कमी राहील. याठिकाणी फळबागेत पहाटे शेकोट्या पेटवल्यास बागेतील तापमान वाढेल व नुकसान-पातळी कमी करता येईल. या भागात पिकांना सायंकाळी पाणी दिल्यास नुकसान पातळी कमी करणे शक्‍य होईल.
  • जनावरे शेडमध्ये बांधावीत. झाप बांधून शेड बंदिस्त ठेवावीत. जनावरांना लाळ व खुरकूत रोगाची प्रतिबंधक लस टोचावी.
  • कुक्कुटपालन शेडमध्ये रात्री बल्ब लावावेत.
  • (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ आणि सदस्य संशोधन परिषद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com