किमान तापमानात घसरण ; थंडीचे प्रमाण वाढेल

आठवड्याचे हवामान
आठवड्याचे हवामान

उत्तर महाराष्ट्र व विदर्भावरील हवेच्या दाबात वाढ होईल व तो १०१६ हेप्टापास्कल राहील. तसेच पश्‍चिम महाराष्ट्र व मराठवाड्यावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. सहाजिकच उत्तर महाराष्ट्र व विदर्भातील किमान तापमानात घसरण होऊन थंडीच्या प्रमाणात वाढ होईल. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव व नाशिक भागात किमान तापमान ९ ते १० अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल. नगर जिल्ह्यातही तापमान ७ अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल. विदर्भातील बुलडाणा, वर्धा, नागपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यात किमान तापमान ११ अंश सेल्सिअस राहील. २७ व २८ जानेवारी रोजी मध्य व पूर्व विदर्भात व मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात अल्पशा पावसाची शक्‍यता राहील. मराठवाड्यात व विदर्भात आकाश अंशतः ढगाळ राहील. २७ जानेवारी रोजी राजस्थानवरील हवेच्या दाबात वाढ होऊन तो १०१४ हेप्टापास्कलपर्यंत वाढेल. काश्‍मीर, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाना, हिमाचल प्रदेश व मध्य प्रदेशावरील हवेच्या दाबात वाढ होईल व तो १०२२ हेप्टापास्कलपर्यंत वाढेल त्यामुळे थंडीत वाढ होईल. काही भागात बर्फवृष्टी होईल. गुजरातच्या सिमेवर १०२० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब वाढेल, त्यामुळे थंडीच्या प्रमाणात वाढ होईल. महाराष्ट्रात हवेचे दाब १०१८ हेप्टापास्कलपर्यंत वाढण्यामुळे किमान तापमानात घसरण होऊन थंडीचे प्रमाण वाढेल. कर्नाटक, तेलंगाना, आंध्र प्रदेश भागावर १०१६ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब वाढेल. त्यामुळे तेथेही किमान तापमानात घसरण होऊन थंडीचे प्राबल्य वाढेल. केरळ व तामिळनाडूवर १०१४ हेप्टापास्कलपर्यंत हवेचे दाब वाढतील आणि दक्षिण भारतातही थंडीच्या प्राबल्यात वाढ होईल. २८ जानेवारी रोजी राजस्थानवरील हवेच्या दाबात वाढ होऊन तो १०१६ हेप्टापास्कल होईल. त्यामुळे त्या ठिकाणी थंडीची लाट येईल. दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशवर १०२४ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे थंडीची लाट त्या भागात राहील. महाराष्ट्रावरील हवेचे दाब १०१८ हेप्टापास्कलपर्यंत वाढतील. थंडीच्या प्रमाणात वाढ होईल. २९ जानेवारीनंतर थंडीचे प्रमाण कमी होण्यास सुरवात होईल. कोकण रायगड व ठाणे जिल्ह्यात कमाल तापमान २७ ते २९ अंश सेल्सिअस इतके कमी राहील तर दक्षिण कोकणात कमाल तापमान ३२ ते ३३ अंश सेल्सिअस राहील. ठाणे व सिंधुदुर्ग जिल्ह्यात किमान तापमान १४ ते १५ अंश सेल्सिअस राहील. तर रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात किमान तापमान १६ अंश सेल्सिअस राहील. कोकणात आकाश निरभ्र राहील. उत्तर कोकणात सकाळची सापेक्ष आर्द्रता ता ८१ ते ८८ टक्के राहील. तर दक्षिण कोकणात ९२ ते ९६ टक्के इतकी अधिक राहील. रत्नागिरी रायगड व ठाणे जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आद्रता ६१ ते ६७ टक्के राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र दुपारची सापेक्ष आर्द्रता ५० टक्के राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ८ ते ९ किलोमीटर राहील तर रायगड व ठाणे जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १० ते १२ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा इशान्येकडून राहील. त्यामुळे थंडीचे सध्याचे प्रमाण कायम राहील. उत्तर महाराष्ट्र नाशिक जिल्ह्यात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. मात्र नंदूरबार, धुळे व जळगाव जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. नाशिक व जळगाव जिल्ह्यात किमान तापमान ९ ते १० अंश सेल्सिअस इतके कमी राहील. तसेच धुळे व नंदूरबार जिल्ह्यात ते १२ ते १४ अंश सेल्सिअस राहील. नंदूरबार व जळगाव जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आद्रता ५८ ते ६५ टक्के राहील. तसेच धुळे व नाशिक जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ७५ ते ९० टक्के राहील. धुळे व नंदूरबार जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता २७ टक्के राहील. नाशिक व जळगाव जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ३० ते ३२ टक्के राहील. जळगाव व नाशिक जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १३ ते १४ किलोमीटर राहील तर धुळे व नंदूरबार जिल्ह्यात ते ८ ते ११ किलोमीटर राहील. मराठवाडा बीड परभणी व जालना जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. हिंगोली जिल्ह्यात ते ३१ अंश सेल्सिअस राहील. मात्र उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यात ते ३० अंश सेल्सिअस आणि औरंगाबाद जिल्ह्यात ते २८ अंश सेल्सिअस राहील. परभणी व औरंगाबाद जिल्ह्यात किमान तापमान १२ अंश सेल्सिअस राहील. तसेच नांदेड, बीड व जालना जिल्ह्यात ते १३ अंश सेल्सिअस राहील आणि उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात १४ अंश सेल्सिअस राहील व केवळ हिंगोली जिल्ह्यात ते १५ अंश सेल्सिअस राहील. औरंगाबाद जिल्हा वगळता उर्वरीत सर्वच जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. उस्मानाबाद, औरंगाबाद व जालना जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ५६ ते ६८ टक्के राहील. लातूर, बीड, परभणी, जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ७२ ते ७६ टक्के राहील. लातूर, बीड, परभणी जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आद्रता ७२ ते ७६ टक्के राहील. नांदेड व हिंगोली जिल्ह्यात सकाळची सुापेक्ष आद्रता ८२ टक्के राहील. उस्मानाबाद व बीड जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ८२ टक्के राहील. उस्मानाबाद व बीड जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता २२ ते २८ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे दुपारी हवामान कोरडे राहील. लातूर, नांदेड व हिंगोली जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ३५ ते ४० टक्के राहील. परभणी, जालना व औरंगाबाद जिल्ह्यात ती ३० ते ३४ टक्के राहील. मराठवाड्यात वाऱ्याचा ताशी वेग अधिक राहील. बीड, परभणी व नांदेड जिल्ह्यात ताशी ११ ते १४ किलोमीटर तर लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्ह्यात तो १५ ते २० किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा इशान्येकडून राहील. दक्षिण विदर्भ बुलडाणा व वाशीम जिल्ह्यात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील व अकोला व अमरावती जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस राहील. बुलढाणा जिल्ह्यात किमान तापमान ११ अंश सेल्सिअस तसेच अकोला व वाशीम जिल्ह्यात ते १२ अंश सेल्सिअस व अमरावती जिल्ह्यात १३ अंश सेल्सिअस राहील. अकोला वाशीम व अमरावती जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७० ते ७५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता अमरावती जिल्ह्यात ६८ टक्के व बुलढाणा अकोला व वाशीम जिल्ह्यात ३५ ते ४५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते ९ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा बुलडाणा व वाशीम जिल्ह्यात पूर्वेकडून तर अकोला व अमरावती जिल्ह्यात इशान्येकडून राहील. अकोला व वाशीम जिल्ह्यात पावसाची शक्‍यता आहे. मध्य विदर्भ नागपूर जिल्ह्यात कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस राहील तर वर्धा व यवतमाळ जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता वर्धा व नागपूर जिल्ह्यात ७० टक्के व यवतमाळ जिल्ह्यात ८६ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ४२ ते ५६ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ८ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा पूर्वेकडून राहील. पावसाची शक्‍यता असून २ मिलीमिटर पर्यंत पाऊस होईल. पूर्व विदर्भ पूर्व विदर्भात गोंदिया व भंडारा जिल्ह्यात ३ ते ४ मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात १ ते २ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. भंडारा जिल्ह्यात किमान तापमान २९ अंश सेल्सिअस राहील तर उर्वरीत चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर जिल्ह्यात किमान तापमान १२ अंश सेल्सिअस राहील तर उर्वरीत जिल्ह्यात ते ११ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. गडचिरोली जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ९६ टक्के राहील. उर्वरित जिल्ह्यात ७५ ते ८० टक्के राहील. गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ५० ते ६२ टक्के राहील. गडचिरोली व भंडारा जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ४५ ते ४६ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ९ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत पूर्वेकडून, इतर जिल्ह्यात इशान्येकडून राहील. दक्षिण - पश्‍चिम महाराष्ट्र सातारा व सांगली जिल्ह्यात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर व पुणे जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील; तर नगर व सोलापूर जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यात किमान तापमान १४ ते १६ अंश सेल्सिअस राहील. सांगली, सातार व पुणे जिल्ह्यात १२ अंश सेल्सिअस राहील व नगर जिल्ह्यात ते ७ अंश सेल्सिअस राहील. सांगली जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सोलापूर जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ५८ टक्के तर उर्वरीत नगर जिल्ह्यात ६५ टक्के, सातार व पुणे जिल्ह्यात ७६ ते ७८ टक्के व सांगली व कोल्हापूर ८० ते ९४ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर, सातारा व सोलापूर जिल्ह्यात १७ ते १९ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे कोरडे हवामान राहील. सांगली व पुणे जिल्ह्यात ती ३० ते ३५ टक्के राहील. सांगली, सोलापूर या जिल्ह्यात १९ किलोमीटर, पुणे जिल्ह्यात ताशी १५ किलोमीटर व कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात ७ ते ८ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा इशान्येकडून राहील.     कृषी सल्ला

  • किमान तापमानात घसरण व थंडीत वाढ होण्याची शक्‍यता असल्याने फळबागांमध्ये पहाटे लहान लहान शेकोट्या करून बागेतील तापमान वाढवण्याचा प्रयत्न करावा.
  • जनावरे आणि कोंबड्यांची विशेष काळजी.
  • पाण्याचा वापर काटकसरीने करून बागायत क्षेत्रात शक्यतो ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करावा.
  • उन्हाळी हंगामात वांगी, टोमॅटो, मिरची, ढोबळी मिरची यांची लागवड करण्यासाठी गादीवाफे तयार करून बियांची पेरणी करावी.
  • (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ आणि सदस्य, संशोधन परिषद, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com