डॉ. रामचंद्र साबळे
डॉ. रामचंद्र साबळे

किमान तापमानात वाढ, थंडी कमी होईल

महाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. जेव्हा हवेचे दाब कमी होतात तेव्हा तापमानात वाढ झालेली असते. उत्तर महाराष्ट्रात मात्र हवेचे दाब थोडे अधिक राहतील, त्यामुळे थंडीचे प्रमाण जाणवेल. किमान तापमानातील घसरण या आठवड्यात सुरू होऊन या आठवड्याच्या सुरवातीस तापमान वाढण्यास सुरवात होईल. उत्तर महाराष्ट्राच्या सीमेवर १०१६ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे किमान तापमान ८ ते ११ अंश सेल्सिअसपर्यंत राहील, मात्र थोड्याच दिवसांत त्यात वाढ होईल. मराठवाड्यात किमान तापमान १२ ते १४ अंश सेल्सिअसपर्यंत राहील. पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे व नगर जिल्ह्यांत या आठवड्याच्या सुरवातीस किमान तापमान १० ते ११ अंश सेल्सिअस राहील आणि थोड्याच दिवसांत ते वाढेल.

पूर्व विदर्भात किमान तापमान १२ ते १४ अंश सेल्सिअस, मध्य विदर्भात १३ ते १४ अंश सेल्सिअस तर पश्‍चिम विदर्भात १३ ते १५ अंश सेल्सिअस राहील. एकूणच थंडीचे प्रमाण कमी होण्यास सुरवात होईल. राजस्थानवर १०२० हेप्टापास्कल तसेच काश्‍मीर, पंजाब, हरियाना, हिमाचल प्रदेशवर तितकाच हवेचा दाब राहण्यामुळे थंडीची तीव्रता तेथे अधिक राहील. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, बिहार भागांवर १०१६ हेप्टापास्कल हवेचा दाब राहील तेथे थंडीची तीव्रता कमी होईल. थंडीचे प्रमाण ३ फेब्रुवारी रोजी वाढेल, किमान तापमानात घसरण होईल. हिमालयाच्या पायथ्याशी व राजस्थान भागात थंडी अधिक राहील. ४ फेब्रुवारी रोजी उत्तर महाराष्ट्र व पश्‍चिम महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल तर विदर्भावर १०१६ व मराठवाडावर तितकाच अधिक हवेचा दाब राहण्यामुळे थंडीचे प्रमाण अधिक राहील. ५ फेब्रुवारीला महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ होऊन तो १०१६ हेप्टापास्कल इतका वाढेल याचाच अर्थ असा, की थंडी वाढेल. मात्र फार मोठी तीव्रता नसेल. ६ फेब्रुवारीला पुन्हा हवेचा दाब कमी होईल. किमान तापमानात वाढ होर्इल व थंडी कमी होईल. ७ फेब्रुवारी रोजी थंडीचे प्रमाण सर्व भारतात कमी होईल. कोकण रत्नागिरी जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ते ३२ अंश सेल्सिअस राहील. रायगड व ठाणे जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात किमान तापमान १४ अंश सेल्सिअस राहील. रत्नागिरी जिल्ह्यात किमान तापमान १९ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. मात्र रायगड व ठाणे जिल्ह्यांत किमान तापमान १७ अंश सेल्सिअस राहील. ठाणे जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील, तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ५३ ते ६० टक्के राहील तर ठाणे व रायगड जिल्ह्यांतील सकाळची सापेक्ष आर्द्रता ४२ ते ४७ टक्के राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ३५ टक्के, रत्नागिरी जिल्ह्यात २९ टक्के तर ठाणे व रायगड जिल्ह्यांत २२ ते २५ टक्के राहील. उत्तर महाराष्ट्र नाशिक, धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत कमाल तापमान २५ अंश सेल्सिअस राहील. त्यामुळे दुपारीही वातावरण थंड राहील. जळगाव जिल्ह्यात कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस राहील. नाशिक जिल्ह्यात या आठवड्याचे सुरवातीच्या काळात किमान तापमान ८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल. तसेच जळगाव जिल्ह्यात ते ९ अंश सेल्सिअसपर्यंत राहील. धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत किमान तापमान १० ते ११ अंश सेल्सिअसपर्यंत राहील. जळगाव जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील तर उर्वरित जिल्ह्यांत ते अंशतः ढगाळ राहील. सकाळचे सापेक्ष आर्द्रतेत घट होईल आणि ती ३० ते ३३ टक्के इतकी कमी राहील तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १३ ते १९ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ७ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा नाशिक, धुळे व जळगाव जिल्ह्यांत नैर्ऋत्येकडून नंदूरबार जिल्ह्यात अग्नेयेकडून राहील. हवामान थंड व कोरडे राहील. मराठवाडा लातूर व औरंगाबाद जिल्ह्यांत कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस राहील. नांदेड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. तसेच बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत कमाल तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअस पर्यंत वाढेल. लातूर व बीड जिल्ह्यांत किमान तापमान १४ अंश सेल्सिअस राहील. नांदेड जिल्ह्यात मात्र किमान तापमानात वाढ होईल. आणि ते १६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. उस्मानाबाद, लातूर, नांदेड या जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ६५ ते ६८ टक्के राहील, तर औरंगाबाद जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ३९ टक्के राहील. बीड, परभणी, हिंगोली, जालना जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ५२ ते ५५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता परभणी, हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्ह्यात २२ ते २९ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. तसेच उस्मानाबाद, लातूर, बीड जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ३० ते ३२ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १० ते ११ किलोमीटर राहील, तर उर्वरित जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ९ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा अग्नेयेकडून राहील. पश्‍चिम विदर्भ बुलडाणा जिल्ह्यात कमाल तापमान २६ अंश सेल्सिअस राहील. अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. बुलढाणा व वाशीम जिल्ह्यांत किमान तापमान १३ अंश सेल्सिअस राहील, तर अकोला व अमरावती जिल्ह्यांत किमान तापमान १५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता बुलढाणा जिल्ह्यात ८७ टक्के राहील. अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ७० ते ७५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ५० ते ५७ टक्के राहील. वाऱ्याची दिशा ६ ते ९ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा अग्नेयेकडून राहील. मध्य विदर्भ मध्य विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांत कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. यवतमाळ जिल्ह्यात किमान तापमान १५ अंश सेल्सिअस राहील, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत किमान तापमान १३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. यवतमाळ जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ७४ टक्के राहील. वर्धा व नागपूर जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ६४ टक्के राहील. यवतमाळ जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ५५ टक्के राहील तसेच वर्धा व नागपूर जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता २५ ते ३० टक्के राहील. पूर्व विदर्भ चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील, तर गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ ते ३२ अंश सेल्सिअस राहील. गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत किमान तापमान १२ अंश सेल्सिअस राहील, तर भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांत किमान तापमान १३ ते १४ अंश सेल्सिअस राहील. गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ७० टक्के राहील, तर चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० टक्के राहील. पूर्व विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ५० ते ५७ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ७ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा अग्नेयेकडून राहील. दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र कोल्हापूर जिल्ह्यात कमाल तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यांत कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. सोलापूर व नगर जिल्ह्यांत कमाल तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर जिल्ह्यात किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहील तर सोलापूर जिल्ह्यात किमान तापमान १६ अंश सेल्सिअस राहील. सांगली व सातारा जिल्ह्यांत किमान तापमान १४ अंश सेल्सिअस राहील, तर नगर व पुणे जिल्ह्यांत किमान तापमान १० ते ११ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सोलापूर जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ६० टक्के राहील; पुणे, नगर व सातारा जिल्ह्यांत ३९ ते ४७ टक्के राहील व सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत ५५ ते ५८ टक्के राहील. पुणे व नगर जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता २३ टक्के राहील. उर्वरित जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ३१ ते ३४ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते १० किलोमीटर राहील. कोल्हापूर जिल्ह्यात वाऱ्याची दिशा र्इशान्येकडून तर इतरत्र अग्नेयेकडून राहील. कृषी सल्ला

  • बागायत क्षेत्रात उन्हाळी हंगामात लागवडीसाठी कमी कालावधीची व कमी पाणी लागणारी पिके घ्यावीत. तृणधान्यांपैकी उन्हाळी बाजरी तर कडधान्यांपैकी मूग अशी पिके निवडावीत. पालेभाज्यांमध्ये मेथी, कोथिंबीर, पालक, चाकवत अशी पिके घ्यावीत. जेणेकरून कमी पाण्यात व कमी कालावधीत उत्पादन मिळेल.
  • बांधबंदिस्ती करणे तसेच जमिनी समपातळीत करणे ही कामे सुरू करावीत.
  • मशागतीची कामे करताना शक्‍यतो ती सकाळी करावीत.
  • नारळाच्या लहान रोपांना सावली करावी.
  • (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य संशोधन परिषद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com