आठवडाभर थंड, कोरड्या हवामानाची शक्यता

आठवड्याचे हवामान
आठवड्याचे हवामान

महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ होऊन तो १०१६ हेप्टापास्कल इतका वाढेल. याचाच अर्थ असा, की किमान तापमानात घसरण होऊन थंडीत वाढ होईल. उत्तर महाराष्ट्रात नाशिक व धुळे येथे ८ ते ९ अंश सेल्सिअस तर धुळे व जळगाव जिल्ह्यात ९ ते १० अंश सेल्सिअसपर्यंत किमान तापमान राहील. त्याचप्रमाणे मराठवाड्यात ९ ते १० अंश सेल्सिअसपर्यंत काही जिल्ह्यात तापमान राहील. पश्‍चिम महाराष्ट्रातील सातारा, पुणे व नगर जिल्ह्यात किमान तापमान ८ ते ९ अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल. विदर्भात ते १० अंश ते १२ अंश सेल्सिअस राहील. एकूणच हा थंडीचा आठवडा राहील. १० ते १२ फेब्रुवारीपर्यंत हीच स्थिती राहील. १३ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राच्या मध्य भागावर उत्तर दक्षिण दिशेने १०१८ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब वाढेल आणि पुन्हा तापमानात घसरण होऊन थंडीची तीव्रता वाढणे शक्‍य आहे. १४ फेब्रुवारी रोजी कोकणावर १०१६ तर उर्वरीत महाराष्ट्रावर १०१८ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब वाढेल. त्यामुळे किमान तापमानात घसरण होऊन कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात थंडीची तीव्रता वाढेल. मध्य महाराष्ट्र ते पूर्व महाराष्ट्रात थंडी अधिक राहील. उत्तर भारतातील राजस्थानवर १०२० हेप्टापास्कल इतका तर काश्‍मीर, पंजाब, हरियाना, हिमाचल प्रदेशवर तितकाच हवेचा दाब राहील. त्यामुळे थंडीची तीव्रता अधिक राहील. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली भागांवर १०१८ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे थंडीची तीव्रता कायम राहील. गुजरातवरदेखील तितकाच हवेचा दाब राहील, त्यामुळे थंडीचे प्रमाण अधिक राहील. दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यात मध्यम स्वरुपाची तसेच आंध्र तेलंगाना भागातही मध्यम स्वरुपाची थंडी राहील. तर केरळ राज्यात थंडीचे प्रमाण कमी राहील. उत्तर भारतात १० फेब्रुवारी रोजी संपूर्ण राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाना भागात थंडीत वाढ होईल. गुजरातमध्येही थंडीचे प्रमाण वाढेल. ११ फेब्रुवारी रोजी राजस्थानवर १०२२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब वाढेल. तेव्हा काश्मीर खोऱ्यात बर्फवृष्टी होणे शक्य असून महाराष्ट्रातही थंडी वाढेल. ही स्थिती १४ फेब्रुवारीपर्यंत राहील. कोकण ठाणे, रायगड व पालघर या कोकणातील जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील तर रत्नागिरी जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात किमान तापमान १५ ते १६ अंश सेल्सिअस राहील व ठाणे जिल्ह्यात ते २० अंश सेल्सिअस राहील तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात १३ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ४७ ते ४९ टक्के आणि सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यात ती ४३ ते ४५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यात ३० ते ३५ टक्के राहील तर रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यात २५ ते २८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग रत्नागिरी रायगड व ठाणे जिल्ह्यात ६ ते ८ किलोमीटर राहील. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ताशी १२ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा सिंधुदुर्ग जिल्ह्यात अग्नेयेकडून तर उर्वरीत जिल्ह्यात इशान्येकडून राहील. कोकणातील तापमानातही या आठवड्यात पुन्हा घसरण होणे शक्‍य आहे. उत्तर महाराष्ट्र जळगाव जिल्ह्यात कमाल तापमान २५ अंश सेल्सिअस राहील. नाशिक, धुळे व नंदूरबार जिल्ह्यात कमाल तापमान २५ अंश सेल्सिअस राहील. नंदूरबार व जळगाव जिल्ह्यात किमान तापमान १० अंश सेल्सिअस राहील तर नाशिक व धुळे जिल्ह्यात ते ८ ते ९ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील; धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता २९ टक्के राहील तर जळगाव व नाशिक जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता २१ ते २६ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यात १२ ते १४ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ९ ते ११ किलोमीटर राहील. नाशिक जिल्ह्यात वाऱ्याची दिशा पूर्वेकडून, धुळे व नंदूरबार जिल्ह्यात अग्नेयेकडून तर जळगाव जिल्ह्यात इशान्येकडून राहील. मराठवाडा जालना व औरंगाबाद जिल्ह्यात कमाल तापमान २६ ते २७ अंश सेल्सिअस राहील. बीड व परभणी जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस नांदेड व हिंगोली जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस तर उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आद्रता उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात १८ ते २० टक्के राहील; नांदेड व औरंगाबाद जिल्ह्यात २७ टक्के, बीड जिल्ह्यात २५ टक्के राहील तर परभणी व हिंगोली जिल्ह्यात २८ टक्के आणि जालना जिल्ह्यात २९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता केवळ ९ ते १२ टक्के राहील त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. जालना जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १४ किलोमीटर राहील. परभणी, हिंगोली व औरंगाबाद जिल्ह्यात ताशी १२ किलोमीटर राहील. उर्वरीत जिल्ह्यात ताशी ११ किलोमीटर राहील. हवामान थंड व कोरडे राहील. वाऱ्याची दिशा इशान्येकडून राहील. पश्‍चिम विदर्भ अकोला जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. तर बुलढाणा, वाशीम व अमरावती जिल्ह्यात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. अकोला जिल्ह्यात किमान तापमान १२ अंश सेल्सिअस राहील. बुलढाणा, वाशीम व अमरावती जिल्ह्यात किमान तापमान ११ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. अकोला व वाशीम जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ४५ टक्के राहील तर बुलढाणा व अमरावती जिल्ह्यात ५० ते ६० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यात २५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ८ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा इशान्येकडून राहील. मध्य विदर्भ यवतमाळ, नागपूर जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. नागपूर जिल्ह्यात किमान तापमान ११ अंश सेल्सिअस , यवतमाळ व वर्धा जिल्ह्यात ते १२ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता यवतमाळ जिल्ह्यात ६२ टक्के राहील. वर्धा व नागपूर जिल्ह्यात ६५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २८ ते ३८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ८ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा इशान्येकडून राहील. पूर्व विदर्भ भंडारा व गोंदिया जिल्ह्यात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. तर चंद्रपूर व गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यात किमान तापमान १० ते ११ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ५५ ते ६५ टरक्के राहील. भंडारा व गोंदिया जिल्ह्यात सकाळची आद्रता ७० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यात २५ टक्केचे जवळपास राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ८ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा इशान्येकडून राहील. दक्षिण - पश्‍चिम महाराष्ट्र नगर जिल्ह्यात कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस राहील, तर सातारा व पुणे जिल्ह्यात ते २८ अंश सेल्सिअस राहील. सांगली व सोलापूर जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील तर कोल्हापूर जिल्ह्यात ते ३१ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर जिल्ह्यात किमान तापमान १४ अंश सेल्सिअस राहील. सांगली व सोलापूर जिल्ह्यात ते ११ ते १२ अंश सेल्सिअस राहील. पुणे व नगर जिल्ह्यात किमान तापमान ८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरणे शक्‍य असून सातारा जिल्ह्यात ९ अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल. आकाश निरभ्र राहील. सांगली व सोलापूर जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता १७ टक्के राहील. कोल्हापूर व नगर जिल्ह्यात ती २४ टक्के राहील. सातारा व पुणे जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता २७ टक्के राहील. कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता १५ टक्के राहील. पुणे जिल्ह्यात १३ टक्के, सांगली व नगर जिल्ह्यात ११ टक्के आणि सोलापूर जिल्ह्यात ९ टक्के राहील. सांगली व सोलापूर जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १४ ते १६ किलोमीटर राहील. सातारा व पुणे व कोल्हापूर जिल्ह्यात ५ ते ८ किलोमीटर राहील. तर नगर जिल्ह्यात ताशी १० किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा इशान्येकडून राहील. हवामान अत्यंत कोरडे व थंड राहील.   कृषी सल्ला

  • उन्हाळी हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी जमिनीची पूर्वमशागत करून हेक्‍टरी ६ ते ७ टन शेणखत घालून कुळवाची पाळी देऊन जिमिनीत मिसळावे.
  • पिकांच्या पेरण्या थंडी कमी होताच म्हणजे १५ फेब्रुवारी नंतर कराव्यात.
  • फळबागा, फळभाज्या तसेच ऊस पिकास ठिबक सिंचनाने पाणी द्यावे. त्यामुळे ५० टक्क्यांपर्यंत पाणी बचत होते.
  • (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ आणि सदस्य संशोधन परिषद, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com