किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास सुरुवात होईल

आठवड्याचे हवामान
आठवड्याचे हवामान

महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहण्यामुळे थंडीचे प्रमाण कमी होईल. कोकणात कमाल व किमान तापमानात वाढ होईल. किमान तापमान १६ ते १७ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. उत्तर महाराष्ट्रात किमान तापमान १० ते १३ अंश सेल्सिअस राहील. मराठवाड्यात किमान तापमान १५ ते १७ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. पश्‍चिम विदर्भात ते १२ ते १४ अंश सेल्सिअस, मध्य विदर्भात १३ ते १५ अंश सेल्सिअस, पूर्व विदर्भात १२ ते १४ अंश सेल्सिअस तर पश्‍चिम महाराष्ट्रात १५ ते १८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. विदर्भात व मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात आकाश ढगाळ राहील. १८ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रासह संपूर्ण भारतावरील हवेचे दाब कमी होतील व ते १०१२ हेप्टापास्कल होतील. त्यामुळे हवामानातच बदल जाणवतील. उत्तर भारतातील हवेचे दाबही कमी होतील. जेव्हा १८ फेब्रुवारी रोजी संपूर्ण उत्तर भारतातील हवेचे दाब १०१२ हेप्टापास्कल इतके कमी होतील तेव्हा हवामान बदल वेगाने जाणवतील. पश्‍चिमी चक्रावाताच्या प्रभावाने राजस्थान, हरियाना, पंजाब या भागात वादळी वाऱ्यासह पाऊस होईल. २०, २१, २२ फेब्रुवारी रोजी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्‍यता राहील. ढगांची मालिका पूर्वे दिशेने सरकत जाऊन दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या भागातही पाऊस होईल. मध्य भारतातही पाऊस होईल. दक्षिण भारतातही हवामान बदल जाणवतील. सुरुवातीच्या काळात १०१४ हेप्टापास्कल, त्यानंतर १८ फेब्रुवारी रोजी १०१२ हेप्टापास्कल अशा प्रकारे हवेचे दाब कमी होतील. त्याचाच अर्थ असा की कमाल व किमान तापमानात वाढ होईल.

दक्षिण भारतातील पूर्व किनारी भागातही ढगाळ वातावरण तयार होऊन १८ रोजी पाऊस होईल. तसेच आकाश ढगाळ राहील. २० फेब्रुवारी रोजी उत्तर महाराष्ट्र व विदर्भातही हवामान बदल जाणवतील आणि पावसाची शक्यता निर्माण होईल. त्यामुळेच विदर्भात हवामान ढगाळ राहील. कोकण सिंधुदुर्ग जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील तर रत्नागिरी, रायगड व ठाणे जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात किमान तापमान १६ अंश सेल्सिअस राहील तर ठाणे व सिंधुदुर्ग जिल्ह्यात ते १७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ५४ ते ५७ टक्के राहील तर ठाणे व रायगड जिल्ह्यात ४३ ते ४९ टक्के राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता २१ ते २३ टक्के राहील. तर ठाणे व रायगड जिल्ह्यात १३ ते १८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ७ किलोमीटर इतका कमी राहील. रत्नागिरी जिल्ह्यात वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील तर सिंधुदुर्ग, रायगड व ठाणे जिल्ह्यात वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. उत्तर महाराष्ट्र नाशिक व जळगाव जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. धुळे जिल्ह्यात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस तर नंदूरबार जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस राहील. जळगाव जिल्ह्यात किमान तापमान १३ अंश सेल्सिअस तर नाशिक, धुळे व नंदूरबार जिल्ह्यात किमान तापमान १० ते ११ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील, मात्र दिनांक १८ फेब्रुवारीनंतर हवामान बदल जाणवतील व अल्पशा पावसाची शक्‍यता उत्तरेकडील व विदर्भाकडील भागात राहील. जळगाव व नाशिक जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ३१ ते ३२ टक्के राहील. धुळे व जळगाव जिल्ह्यातच सकाळची सापेक्ष आर्द्रता २७ ते २८ राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यात १३ ते १६ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ७ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. मराठवाडा औरंगाबाद जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील तर उस्मानाबाद, नांदेड, परभणी या जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. जालना जिल्ह्यात ३३ अंश तर लातूर, बीड, हिंगोली जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान १५ ते १७ अंश सेल्सिअसपर्यंत वढेल. नांदेड जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. उस्मानाबाद, बीड व औरंगाबाद जिल्ह्यात साकळची सापेक्ष आर्द्रता तर उर्वरित जिल्ह्यात सापेक्ष आर्द्रता ३० ते ३५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २८ ते २९ टक्के राहील. केवळ ९ ते १४ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. लातूर व उस्मनाबाद जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १२ ते १४ किलोमीटर राहील. तर परभणी व औरंगाबाद जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ८ किलोमीटर राहील तर उर्वरित जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ९ ते ११ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. पश्‍चिम विदर्भ बुलढाणा जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील तर अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. बुलढाणा जिल्ह्यात किमान तापमान १२ अंश सेल्सिअस राहील. वाशिम जिल्ह्यात किमान तापमान १४ अंश सेल्सिअस राहील. अकोला व अमरावती जिल्ह्यात किमान तापमान १३ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता अकोला जिल्ह्यात ५० टक्के राहील. तसेच बुलडाणा व वाशिम जिल्ह्यात ६० टक्के व अमरावती जिल्ह्यात ७० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता बुलडाणा जिल्ह्यात ३३ टक्के तर उर्वरित जिल्ह्यात ३५ टक्के राहील. बुलडाणा जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ६ किलोमीटर राहील तर उर्वरित जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ६ किलोमीटर राहील तर उर्वरित जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ८ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. मध्य विदर्भ यवतमाळ जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील तर वर्धा व नागपूर जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान वर्धा व नागपूर जिल्ह्यात १३ अंश सेल्सिअस राहील तर यवतमाळ जिल्ह्यात १५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७० टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३५ ते ४५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ८ किलोमीटर राहील. नागपूर जिल्ह्यात वाऱ्याची दिशा आग्नेयकडून राहील तर यवतमाळ व वर्धा जिल्ह्यात वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. पूर्व विदर्भ गोंदिया जिल्ह्यात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील तर चंद्रपूर जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. गडचिरोली व भंडारा जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यात किमान तापमान १२ अंश सेल्सिअस राहील तर गडचिरोली व भंडारा जिल्ह्यात किमान १४ अंश सेल्सिअस तापमान राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता गोंदिया जिल्ह्यात ५५ टक्के राहील, तर चंद्रपूर, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ३५ ते ४० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ९ किलोमीटर राहील. चंद्रपूर जिल्ह्यात वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील तर गोंदिया जिल्ह्यात नैऋत्येकडून राहील. पूर्व विदर्भात दिनांक १८ नंतर पावसाची शक्‍यता राहील. दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्र कोल्हापूर जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. सांगली, सोलापूर व नगर जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. सातारा, पुणे व नगर जिल्ह्यात किमान तापमान १५ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यात किमान तापमान १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. कोल्हापूर जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ४२ टक्के राहील, सोलापूर व नगर जिल्ह्यात ३१ टक्के राहील आणि सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यात ३५ ते ३६ टक्के राहील. कोल्हापूर जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता १६ टक्के राहील तर उर्वरित जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता १० ते १३ टक्के राहील. सोलापूर जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ११ किलोमीटर राहील. उर्वरित जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ७ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा कोल्हापूर, सातारा व सोलापूर जिल्ह्यात नैऋत्येकडून राहील; तर सांगली जिल्ह्यात वायव्येकडून व पुणे जिल्ह्यात दक्षिणेकडून राहील. उन्हाळी हंगामाची सुरुवात होईल.   कृषी सल्ला

  • किमान तापमान व कमाल तापमानात वाढ होईल. त्यामुळे उन्हाळी हंगाम सुरू झालेला असून उन्हाळी हंगामात बागायत क्षेत्रात वेलवर्गीय फळपिकांची व फळभाज्यांची लागवड करावी.
  • काकडी, कलिंगड, खरबूज लागवडीसाठी योग्य तापमान असून या आठवड्यात लागवडीचे काम पूर्ण करावे.
  • उन्हाळी भुईमुगाची लागवड पूर्ण करावी. सुरू उसाची लागवड पूर्ण करावी.
  • पालेभाज्यांची लागवड सपाट वाफ्यामध्ये करावी.
  • (ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ आणि सदस्य संशोधन परिषद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com