उन्हाळी हंगाम सुरू, किमान, कमाल तापमानात वाढ

आठवड्याचे हवामान
आठवड्याचे हवामान

महाराष्ट्राच्या उत्तर भागावर १०१० हेप्टापास्कल तर दक्षिण भागावर १००८ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहण्यामुळे दक्षिण महाराष्ट्रात कमाल व किमान तापमान वेगाने वाढेल. तर उत्तर महाराष्ट्रात तुलनेने हळुवारपणे वाढेल अशी स्थिती आहे. ३ मार्च रोजी पुन्हा सर्व महाराष्ट्रावर १०१० हेप्टापास्कल इतका समान हवेचा दाब राहील. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात किमान व कमाल तापमानातील वाढ हळुवारपणे वाढत जाईल. ४ मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रावर १००८ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब होईल याचाच अर्थ असा की किमान व कमाल तापमान वाढण्यास प्रारंभ होऊन उन्हाळ्याची चाहूल सुरू होईल. ५ मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रावर १००८ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब झाल्यानंतर उन्हाळा सुरू झाल्याचे जाणवेल. ६ मार्च रोजी तापमान वाढीचा कल कायम राहील व उन्हाळी हंगाम सुरू झाल्याचे जाणवेल. उत्तर भारत ः संपूर्ण राजस्थान, पंजाब, हरियाना, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेशवर १०१४ ते १०१६ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. त्यामुळे थंडीची तीव्रता कमी होईल. सकाळी व पहाटे हवामान थंड राहील तर दुपारी हवामान उष्ण राहील. उन्हाळी हंगाम सुरू होत असल्याचे जाणवेल. गुजरातवर १०१२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहण्यामुळे कमाल व किमान तापमानात वाढ होईल आणि उन्हाळी हंगाम सुरू होत असल्याचे जाणवेल. उत्तर भारतातील राजस्थान, पंजाब, हरियाना, हिमाचल प्रदेश, काश्‍मीर भागात थंडी सौम्य प्रमाणात जाणवेल. मात्र ३ मार्च ते ६ मार्च काळात उत्तर भारतातील थंडी पूर्णपणे कमी होईल. उन्हाळी हंगाम सुरू झाल्याचे जाणवेल. दक्षिण भारत ः कर्नाटक राज्यावर १००८ हेप्टापास्कल तर आंध्र व तेलंगणावर १०१० हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहण्यामुळे उन्हाळी हंगाम सुरू होईल. कमाल व किमान तापमानात वाढ झालेली असेल. दक्षिण भारतावर १०१० हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब दिनांक ३ मार्च रोजी राहील. सकाळी थंड व दुपारी उष्ण हवामान संपूर्ण दक्षिण भारतात जाणवेल. ४ मार्च रोजी १०१० हेप्टापास्कल तर ५ मार्च रोजी १००८ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहण्यामुळे कमाल व किमान तापमान वेगाने वाढेल व उन्हाळी हंगाम सुरू झालेला असेल. कोकण ठाणे व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस कमाल तापमान राहील. तर रत्नागिरी जिल्ह्यात ते ३३ अंश सेल्सिअस आणि रायगड जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील. ठाणे जिल्ह्यात किमान तापमान २१ अंश सेल्सिअस, रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस आणि रत्नागिरी जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६० ते ६८ टक्के राहील. तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ठाणे जिल्ह्यात २० टक्के, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३० टक्के रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांत ३५ ते ३७ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते १० किलोमीटर राहील. रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा आग्नेयकडून, तर रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यात नैर्ऋत्येकडून राहील. पावसाची शक्‍यता नाही. हवामान सकाळी थंड व दुपारी उष्ण राहील. उत्तर महाराष्ट्र जळगाव जिल्ह्यात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअर राहील व नंदुरबार जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. तसेच नाशिक जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. नाशिक जिल्ह्यात किमान तापमान १६ अंश सेल्सिअस राहील. नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात किमान तापमान १७ अंश सेल्सिअस राहील. नाशिक जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. उर्वरित जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील. जळगाव व धुळे जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ३१ ते ३९ टक्के राहील, तर नाशिक व नंदुरबार जिल्ह्यांत ४६ ते ४८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ११ ते १३ टक्के राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ९ ते १२ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. मराठवाडा औरंगाबाद जिल्ह्यात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद व बीड जिल्ह्यात कमाल तापमान ३६ अंश सेल्स्सि तर लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यात तापमान ३७ अंश सेल्सिअस राहील. लातूर व जालना जिल्ह्यात किमान तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. तसेच हिंगोली जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. जालना व औरंगाबाद जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ३२ अंश टक्के राहील. तरबीड व परभणी जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ४० ते ४५ टक्के राहील. उस्मानाबाद, लातूर, नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ५२ ते ५८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता जालना व औरंगाबाद जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता १५ ते १८ टक्के राहील. तसेच उर्वरित उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता २२ ते २५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग जालना व औरंगाबाद जिल्ह्यात ५ ते ८ किलोमीटर राहील. बीड व परभणी जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ८ किलोमीटर, लातूर जिल्ह्यात ताशी १४ किलोमीटर, उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्यांत ताशी ११ किलोमीटर व हिंगोली जिल्ह्यात ताशी १० किलोमीटर राहील. उस्मानाबाद, बीड, जालना, औरंगाबाद जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा वायव्येकडून तर लातूर, नांदेड, परभणी या जिल्ह्यांत नैर्ऋत्येकडून राहील. पश्‍चिम विदर्भ अकोला व अमरावती जिल्ह्यात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस राहील. बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअस राहील. अमरावती जिल्ह्यात किमान तापमान १९ अंश सेल्सिअस तर अकोला जिल्ह्यात किमान तापमान १८ अंश सेल्सिअस आणि बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत १७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. परंतु अमरावती जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता बुलडाणा जिल्ह्यात ५० टक्के, वाशीम व अमरावती जिल्ह्यात ३२ ते ३५ टक्के व अकोला जिल्ह्यात २७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १२ ते २० टक्के इतकी कमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ९ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयकडून राहील. मध्य विदर्भ नागपूर जिल्ह्यात कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस राहील, तर वर्धा व यवतमाळ जिल्ह्यात कमाल तापमान ३५ ते ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान १७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ३२ ते ३८ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २० ते २४ टक्के इतकी कमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग ९ ते १० किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयकडून राहील. पूर्व विदर्भ चंद्रपूर जिल्ह्यात कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस राहील. भंडारा जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता गडचिरोली जिल्ह्यात ४३ टक्के राहील, तर गोंदिया जिल्ह्यात ४० टक्के राहील. भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ३० ते ३२ टक्के राहील. गडचिरोली जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता २५ टक्के राहील. चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता १३ ते २० टक्के इतकी कमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते ९ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयकडून राहील. तर गोंदिया जिल्ह्यात ईशान्येकडून राहील. दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र पुणे जिल्ह्यात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांत ३६ अंश सेल्सिअस राहील. सांगली व सोलापूर जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस राहील, तर नगर जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर जिल्ह्यात किमान तापमान १९ अंश सेल्सिअस तर सोलापूर जिल्ह्यात किमान तापमान १८ अंश सेल्सिअस, नगर जिल्ह्यात १५ अंश सेल्सिअस राहील तर उर्वरित सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यांत १६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रतानगर व सातारा जिल्ह्यात ३८ ते ३९ टक्के राहील. कोल्हापूर जिल्ह्यात ५१ टक्के तसेच सांगली, सोलापूर व पुणे जिल्ह्यात ४० ते ४३ टक्के राहील. सोलापूर जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता २३ टक्के राहील. तर उर्वरित कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे व नगर जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता १४ ते १९ टक्के राहील. नगर व सोलापूर जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १० ते ११ किलोमीटर राहील. कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात वाऱ्याची दिशा आग्नेयकडून राहील. उर्वरित जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. कृषी सल्ला

  • या आठवड्यापासून कमाल व किमान तापमान वाढत जाईल. बाष्पीभवनाचा वेग वाढेल. उन्हाळी पिकांची पाण्याची गरज या पुढे वाढत जाईल. त्यानुसार पाण्याची गरज लक्षात घेऊन उन्हाळी भुईमूग, भाजीपाला, सूर्यफूल, फळभाज्या पिकांना ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
  • ठिबकद्वारे पाणी देत असल्यास ठिबक सिंचनाचा कालावधी वाढवावा.
  • जमिनीचे सपाटीकरण व बांध बंदिस्तीची कामे करावीत.
  • शेततळे तयार करावयाची असल्यास मागेल त्याला शेततळे योजनेचा फायदा घ्यावा.
  • जनावरांना सावलीत बांधावे व स्वच्छ पाणी पिण्यास द्यावे.
  • (ज्येष्ठ कृषी हवामन तज्ज्ञ आणि सदस्य संशोधन परिषद, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com