कोरड्या हवामानासह थंडीच्या प्रमाणात चढ-उतार

डॉ. रामचंद्र साबळे
डॉ. रामचंद्र साबळे

महाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील, तर राजस्थानवर १०१६ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील. त्यामुळे वायव्येकडून येणारे थंड वारे सकाळी थंड हवामान राखतील. सकाळी पिकावर दब पडल्याचे त्यामुळे दिसून येईल. १० मार्च रोजी वायव्येकडून आणि ईशान्येकडून येणारे थंड वारे सकाळी थंड हवामानास उपयुक्त ठरतील. १० व ११ मार्च रोजी महाराष्ट्रावरील हवेचा दाब १०१२ हेप्टापास्कल कायम ठेवतील. १२ मार्च रोजी महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ होईल आणि तो १०१४ हेप्टापास्कलपर्यंत वाढेल. त्यामुळे किमान तापमानात घसरण होईल, रात्री व पहाटे तसेच सकाळी थंड हवामान आणि पिकावर गवतावर दवबिंदू साचल्याचे दिसून येईल. १३ मार्च रोजी हवामान स्थिती कायम राहील. पूर्व विदर्भात १३ मार्च रोजी हवामान ढगाळ राहील. उत्तर भारत ः- राजस्थानवर १०१६ हेप्टापास्कल तितकाच पंजाब, हरियाना तर आसाम भागावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहण्यामुळे त्या भागात थंड हवामान राहील. मात्र मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, झारखंड या भागावर १०१२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहण्यामुळे या भागात थंडीचे प्रमाण अत्यंत कमी होईल. मात्र सकाळी थंडी व दुपारी उष्ण हवामान जाणवेल. १० व ११ मार्च रोजी राजस्थान, पंजाब, हरियाना, हिमाचल प्रदेशवर १०१४ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब होईल व थंडीचे प्रमाण कमी होईल. किमान तापमानात वाढ होईल. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशावर १०१२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहण्यामुळे थंडीचे प्रमाण कमीच राहील. सकाळी थंड हवामान राहील. १२ मार्च व १३ मार्च रोजी उत्तर भारतात पुन्हा थंडीत वाढ होईल. ९ मार्च रोजी काश्‍मीर भागात, १२ व १३ रोजी पंजाब, दिल्ली भागात पावसाची शक्‍यता. दक्षिण भारत ः- दक्षिण भारतातील कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू, केरळ राज्यांवर १०१२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. त्यामुळे किमान तापमानात वाढ होऊन थंडी कमी होईल. सकाळी थंड तर दुपारी उष्ण हवामान जाणवेल. १० मार्चपासून हीच हवामान स्थिती कायम राहील. १२ व १३ मार्च रोजी संपूर्ण दक्षिण भारतावरील हवेचा दाब वाढेल व थंडीचे प्रमाण वाढेल. किमान तापमान घसरेल. सकाळी पिकावर दवबिंदू दिसतील. केरळ मध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होईल. कोकण सिंधुदुर्ग जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील तर रत्नागिरी, रायगड व ठाणे जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत किमान तापमान २० अंश सेल्सिअस राहील, तर रायगड व ठाणे जिल्ह्यात किमान तापमान १८ ते १९ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५१ ते ५९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ठाणे जिल्ह्यात २९ टक्के, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३६ टक्के, रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात ४३ ते ४४ टक्के राहील. ठाणे जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ५ किलोमीटर राहील. तर रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १० ते १२ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. उत्तर महाराष्ट्र जळगाव जिल्ह्यात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील. धुळे जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस तर नंदुरबार व नाशिक जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. नाशिक जिल्ह्यात किमान तापमान १७ अंश सेल्सिअस राहील. तर धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत ते १९ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. नाशिक जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ३६ टक्के राहील. तर जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात २२ ते २८ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता या सर्वच जिल्ह्यांत १२ ते १७ टक्के राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ९ किलोमीटर राहील. जळगाव जिल्ह्यात वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील, तर उर्वरित जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. मराठवाडा औरंगाबाद जिल्ह्यात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील. जालना जिल्ह्यात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस राहील. परभणी, बीड व लातूर जिल्ह्यांत कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस राहील. तर हिंगोली, नांदेड व उस्मानाबाद जिल्ह्यांत कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद, जालना व औरंगाबाद जिल्ह्यात किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहील. लातूर, बीड व परभणी जिल्ह्यांत किमान तापमान २० अंश सेल्सिअस राहील. तसेच नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत ते २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. लातूर व नांदेड जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ३० ते ३४ टक्के राहील. उर्वरित सर्वच जिल्ह्यांत हवामान अत्यंत कोरडे व सकाळची सापेक्ष आर्द्रता २२ ते २६ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ११ ते १३ टक्के राहील. उस्मानाबाद व जालना जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ११ किलोमीटर राहील. तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ८ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा औरंगाबाद जिल्ह्यात वायव्येकडून बीड व परभणी जिल्ह्यात नैर्ऋत्येकडून तर उर्वरित जिल्ह्यांत आग्येनेकडून राहील. पश्‍चिम विदर्भ वाशीम जिल्ह्यात कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस राहील, तर अमरावती जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस राहील. बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस राहील. अमरावती जिल्ह्यात किमान तापमान १८ अंश सेल्सिअस राहील. बुलडाणा, अकोला व वाशीम जिल्ह्यांत किमान तापमान २० अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता केवळ २१ ते २२ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ११ ते १२ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ९ किलोमीटर राहील. अकोला व बुलडाणा जिल्ह्यात वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील, तर वाशीम व अमरावती जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. मध्य विदर्भ वर्धा जिल्ह्यात व यवतमाळ जिल्ह्यात कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस राहील तर नागपूर जिल्ह्यात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस राहील. नागपूर जिल्ह्यात किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहील. तर यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत किमान तापमान २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता २१ ते २४ टक्के इतकी कमी राहील. तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ११ ते १२ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ६ किलोमीटर राहील. पूर्व विदर्भ चंद्रपूर जिल्ह्यात कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस राहील. गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील. गोंदिया जिल्ह्यात किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहील. भंडारा जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. गडचिरोली जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ५७ टक्के राहील. चंद्रपूर जिल्ह्यात ४२ टक्के राहील. भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता २५ टक्के इतकी कमी राहील. गडचिरोली जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता १८ टक्के राहील. चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत १२ ते १३ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ७ किलोमीटर राहील. दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र सातारा व पुणे जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. तर नगर जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांत कमान तापमान ३६ अंश सेल्सिअस राहील. पुणे व नगर जिल्ह्यांत किमान तापमान १७ अंश सेल्सिअस राहील. सातारा जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यांत किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ४१ टक्के राहील. पुणे जिल्ह्यात ३७ टक्के आणि सांगली, सोलापूर व नगर जिल्ह्यांत २५ ते २९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ११ ते २० टक्के इतकी कमी राहील. हवामान अत्यंत कोरडे राहील. सोलापूर व सांगली जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १० ते १२ किलोमीटर राहील. उर्वरित जिल्ह्यांत ४ ते ८ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत ईशान्येकडून, पुणे व नगर जिल्ह्यांत वायव्येकडून तर सोलापूर जिल्ह्यांत आग्नेयकडून राहील.   कृषी सल्ला

  • दुभत्या जनावरांसाठी हिरव्या चाऱ्याची लागवड करताना आफ्रिकन टॉल मक्‍याची निवड करावी.
  • कमाल तापमान, किमान तापमान, सापेक्ष आर्द्रता व बाष्पीभवनाचा वेग तसेच पिकाची वाढीची अवस्था लक्षात घेऊनपाणी पुरवठा करावा.
  • (ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ, सदस्य संशोधन परिषद, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com