Agriculture story in marathi, weekly weather advisary | Agrowon

कमाल, किमान तापमानात चढउतार

डॉ. रामचंद्र साबळे
शनिवार, 23 मार्च 2019

महाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहण्यामुळे सकाळी हवामान थंड तर दुपारी उष्ण राहील. मात्र २४ मार्च रोजी १०१० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब कमी होईल, याचाच अर्थ, की कमाल व किमान तापमानात वाढ होईल. उन्हाळा सुरू झाल्याची जाणीव होईल. मात्र अद्यापही वारे र्इशान्येकडून वाहत असल्यामुळे उन्हाळ्याची तीव्रता अद्याप कमीच राहील आणि तशीच स्थिती २५ मार्च रोजी राहील. २६ मार्च ते २८ मार्च रोजी तापमान घटेल आणि हवेचा दाब पुन्हा १०१२ हेप्टापास्कल इतका होईल. २५ मार्च रोजी जळगाव, बुलढाणा व २६ मार्च रोजी विदर्भ, उत्तरेकडील भागात अल्पशा पावसाची शक्‍यता आहे.

महाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहण्यामुळे सकाळी हवामान थंड तर दुपारी उष्ण राहील. मात्र २४ मार्च रोजी १०१० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब कमी होईल, याचाच अर्थ, की कमाल व किमान तापमानात वाढ होईल. उन्हाळा सुरू झाल्याची जाणीव होईल. मात्र अद्यापही वारे र्इशान्येकडून वाहत असल्यामुळे उन्हाळ्याची तीव्रता अद्याप कमीच राहील आणि तशीच स्थिती २५ मार्च रोजी राहील. २६ मार्च ते २८ मार्च रोजी तापमान घटेल आणि हवेचा दाब पुन्हा १०१२ हेप्टापास्कल इतका होईल. २५ मार्च रोजी जळगाव, बुलढाणा व २६ मार्च रोजी विदर्भ, उत्तरेकडील भागात अल्पशा पावसाची शक्‍यता आहे.

उत्तर भारत ः २५ मार्च रोजी राजस्थान व पूर्वेकडील भागात अल्पशा पावसाची शक्‍यता असून, २६ मार्च रोजी मध्य प्रदेश भागात अल्पशा पावसाची शक्‍यता आहे. ३० मार्च रोजी पंजाब, हरियाना, हिमाचल प्रदेश, काश्‍मीर, दिल्ली, उत्तराखंड या भागांत अल्पशा पावसाची शक्‍यता राहील. राजस्थानवर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहण्यामुळे सकाळी थंड व दुपारी उष्ण हवामान राहील. मध्य प्रदेश, गुजरातवर १०१२ हेप्टापास्कल हवेचा दाब राहण्यामुळे थंडी संपून उन्हाळी हंगाम सुरू झालेला असेल. तसेच हवामान २७ मार्चपर्यंत राहील. २८ मार्च नंतर उन्हाळी हंगामाची तीव्रता जाणवेल.

दक्षिण भारत ः तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू व केरळवर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. सौम्य उन्हाळ्याची जाणीव होईल. दिनांक २४ मार्च रोजी कमाल व किमान तापमानात वाढ होईल. मात्र २६ मार्च रोजी पुन्हा तापमानात किंचित घसरण होईल.

कोकण
कोकणातील सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान समान म्हणजे ३४ अंश सेल्सिअस राहील. रायगड व ठाणे जिल्ह्यांत किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहील. रायगड व ठाणे जिल्ह्यांत किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहील. तसेच रत्नागिरी जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील, तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. ठाणे जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ३१ टक्के, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४९ टक्के, रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांत ५१ ते ५३ टक्के राहील. ठाणे जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता २१ टक्के, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांत ३३ ते ३५ टक्के आणि रत्नागिरी जिल्ह्यात ४१ टक्के राहील. ठाणे व रायगड जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ९ किलोमीटर राहील. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १० ते १२ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा सिंधुदुर्ग जिल्ह्यात अग्नेयेकडून, रत्नागिरी जिल्ह्यात नैऋत्येकडून, रायगड जिल्ह्यात अग्नेयेकडून, ठाणे जिल्ह्यात र्इशान्येकडून राहील. पावसाची शक्‍यता नाही.

उत्तर महाराष्ट्र
नाशिक जिल्ह्यात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस, जळगाव जिल्ह्यात ३७ अंश सेल्सिअस आणि धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत ३६ अंश सेल्सिअस राहील. नाशिक जिल्ह्यात किमान तापमान १४ अंश सेल्सिअश राहील. धुळे जिल्ह्यात १६ अंश सेल्सिअस तसेच नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत ते १७ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत १६ ते १७ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता केवळ ७ ते ९ टक्के राहील. याचाच अर्थ असा, की दुपारी हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ७ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा धुळे जिल्ह्यात अग्नेयेकडून राहील. उर्वरित जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा र्इशान्येकडून राहील. दिनांक २५ मार्च रोजी जळगाव जिल्ह्यात हवामान ढगाळ राहील व दिनांक २६ रोजी अल्पशा पावसाची शक्‍यता आहे.

मराठवाडा
परभणी जिल्ह्यात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत कमाल तापमान ३६ ते ३७ अंश सेल्सिअस राहील. बीड जिल्ह्यात कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस राहील. उर्वरित सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस राहील. औरंगाबाद जिल्ह्यात किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहील, तर जालना जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस राहील. लातूर, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांत किमान तापमान २१ अंश सेल्सिअस राहील. बीड, परभणी व उस्मानाबाद जिल्ह्यांत किमान तापमान २० अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांत १३ ते १४ टक्के इतकी कमी सकाळची सापेक्ष आर्द्रता राहील. हिंगोली जिल्ह्यात १६ टक्के तर उर्वरित जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता केवळ १५ टक्के राहील. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता केवळ ७ टक्के इतकी कमी राहील, त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ९ ते ११ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा र्इशान्येकडून राहील, त्यामुळे सकाळी थंड तर दुपारी अत्यंत उष्ण हवामान राहील.

पश्‍चिम विदर्भ
बुलडाणा जिल्ह्यात कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस राहील. अकोला व वाशीम जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस राहील तर अमरावती जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस राहील. बुलढाणा व वाशीम जिल्ह्यांत किमान तापमान २३ अंश सेल्सिअस आणि अकोला व अमरावती जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस राहील. बुलढाणा, अमरावती व अकोला जिल्ह्यांत हवामान अंशतः ढगाळ राहील, तर वाशीम जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता बुलढाणा जिल्ह्यात १४ टक्के तर अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत १५ टक्के राहील, त्यामुळे सकाळीही हवामान अत्यंत कोरडे राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता केवळ ८ टक्के इतकी सर्वच जिल्ह्यांत कमी राहील, त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ९ ते १२ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा र्इशान्येकडून राहील.

मध्य विदर्भ
यवतमाळ जिल्ह्यात कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस राहील तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस राहील. यवतमाळ जिल्ह्यात किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील. वर्धा व नागपूर जिल्ह्यांत किमान तापमान २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता १७ ते १८ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ९ ते १० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ९ ते १० किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा र्इशान्येकडून राहील.

पूर्व विदर्भ
गडचिरोली जिल्ह्यात कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस राहील, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ३९ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत किमान तापमान २५ ते २६ अंश सेल्सिअस राहील, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत किमान तापमान २० अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता गडचिरोली जिल्ह्यात २८ टक्के राहील. चंद्रपूर जिल्ह्यात २० टक्के आणि भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत २१ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत १२ टक्के तसेच भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ९ ते १० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ८ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा र्इशान्येकडून राहील. मात्र गडचिरोली जिल्ह्यात वाऱ्याची दिशा अग्नेयेकडून राहील.

दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र
सांगली व पुणे जिल्ह्यांत कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांत कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस राहील तर सातारा व नगर जिल्ह्यांत कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत किमान तापमान २१ अंश सेल्सिअस राहील. सातारा जिल्ह्यात किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहील. सोलापूर जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस तर पुणे व नगर जिल्ह्यांत किमान तापमान १७ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. पुणे व नगर जिल्ह्यांत आकाश निरभर राहील. कोल्हापूर जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ३२ टक्के राहील. सातारा जिल्ह्यात २७ टक्के राहील. पुणे जिल्ह्यात २२ टक्के राहील, तर नगर व सांगली जिल्ह्यांत १४ ते १६ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता पुणे, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत १२ ते १५ टक्के राहील. सांगली, सोलापूर व नगर जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ७ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते ११ किलोमीटर राहील.

कृषी सल्ला

  • महाराष्ट्रातील बहुतांशी भागात सकाळची व दुपारची सापेक्ष आर्द्रता अत्यंत कमी झाली असल्याने हवामान अत्यंत कोरडे राहील, त्यामुळे पिकांची, जनावरांची, पक्ष्यांची पाण्याची गरज वाढेल. पिकांना अवस्थेनुसार ठिबक सिंचनाने पाणीपुरवठा करावा. जनावरांना व पक्ष्यांना दिवसातून ४ ते ५ वेळा पाणी पिण्यास द्यावे.
  • भुईमुगाचे पीक ४५ दिवसांचे झाले असल्यास पिकावरून मोकळा ड्रम फिरवावा व एकरी १ क्विंटल जिप्समची मात्रा द्यावी.
  • फळबागांमध्ये झाडाचे बुंध्याशी गवताचे अच्छादन करावे.

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य संशोधन परिषद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी) 


इतर बातम्या
राज्यात २३ लाख क्विंटल अन्नधान्याचे वाटपमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या...
दुधासाठीचा हमीभाव आम्हाला लागू नाही;...पुणे : राज्यातील जादा दूध खरेदी अनुदान योजना फक्त...
कोरोनाच्या जनुकीय आराखड्यासाठी प्रयत्न...नवी दिल्ली : ‘कोविड -१९' (कोरोना) विषाणूचा जनुकीय...
...अन् तामिळनाडूत महाराष्ट्रातील ऊसतोड...नवी दिल्ली : पोटाची खळगी भरण्यासाठी थेट...
‘लॉकडाउन’मध्ये कमाल... शेतकऱ्याच्या...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : लॉकडाउन न सारच थांबल......
हापूसची १०५ टन निर्यातरत्नागिरी ः हापूसच्या निर्यातीला चालना देण्यासाठी...
कोठारी ग्रुपतर्फे पंधरा लाखांचा मदत...सोलापूर ः कोरोना संकटात प्रशासनाला मदत व्हावी,...
यूपीएल लिमिटेडकडून पंतप्रधान मदत निधीला...पुणे : भारतातील सर्वात मोठी पीक संरक्षण...
मदतीच्या झऱ्याने ओलावले शिवार; अतिरिक्त...कोल्हापूर: दररोज निघणारा व बाजारपेठेत उठाव...
कृषीशास्त्रज्ञांचा व्हिडीओ...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
वरूडमध्ये ‘कोरोना’मुळे बागांतील...जालना : जवळपास दीडशे एकरवर विस्तारलेल्या...
वर्धा जिल्ह्यात दूध, भाजीपाल्यावर आयात...वर्धा ः विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात ‘कोरोना’...
राज्यात कापूस खरेदी सुरू करण्याची मागणी वर्धा ः शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्याबाबत सीसीआय...
हरभरा, तूर विक्रीसाठी गावातच नोंदणीची...अर्धापूर, जि. नांदेड : ‘‘‘कोरोना’च्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ८५ व्यक्ती ‘होम...सिंधुदुर्ग : ‘‘‘होम क्वारंटाईन’ केलेल्या ८५...
घरातील कापूस खरेदी करा, महिला...परभणी : उन्हाळा सुरु झाला आहे. तापमानात वाढ...
सोलापुरात १२७ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह सोलापूर : ‘कोरोना’चे संशयित असलेल्या जिल्ह्यातील...
‘उजनी’तून सोडले सोलापूरसाठी पाणी सोलापूर : सोलापूर शहरातील लोकांना पिण्याच्या...
बीड जिल्ह्यातील तूर, हरभऱ्याची केवळ...बीड : ‘‘जिल्ह्यात हमी दराने तूर व हरभरा खरेदीसाठी...
सांगली जिल्ह्यात डाळिंबांच्या विम्याचे...सांगली : जिल्ह्यातील आटपाडी, जत, कवठेमहांकाळ,...