आठवड्याचे हवामान
आठवड्याचे हवामान

किमान तापमानात घसरण, थंडीला सुरुवात

महाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील. १७ नोव्हेंबर रोजी हवेच्या दाबात वाढ होऊन महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब वाढेल त्यामुळे या आठवड्यात पावसाची शक्‍यता नाही. मात्र त्याच वेळी किमान तापमानात घसरण होईल. हवेचे दाब वाढताच तापमान कमी झालेले असेल. १८ नोव्हेंबर रोजी हवेचे दाब कायम राहून तापमान घसरणे सुरूच राहील. १९ नोव्हेंबर रोजी तीच स्थिती कायम राहील. मात्र २० नोव्हेंबर रोजी पुन्हा महाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. त्यामुळे थंडीचे प्रमाण थोडेसे कमी होईल. तिच स्थिती २० नोव्हेंबर रोजी राहील. मात्र २१ नोव्हेंबर रोजी उत्तर महाराष्ट्र, पश्‍चिम, मध्य व पूर्व विदर्भ मराठवाडा पूर्व भागावर १०१४ हेप्टापास्कल हवेचा दाब राहील व तेथे थंडी सुरू झाल्याची जाणीव होईल. नाशिक, लातूर, औरंगाबाद, नागपूर, भंडारा, गोंदिया, सातारा व पुणे जिल्ह्यांत किमान तापमान १६ ते १७ अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल. मात्र, नगर जिल्ह्यात ते १४ अंश सेल्सिअस पर्यंत घसरेल आणि थंडीचे प्राबल्य याच आठवड्यात सुरू होईल. आकाश अंशतः ढगाळ राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. राजस्थान, पंजाब, हरियाना, गुजरात, मध्यप्रदेशावर १०१४ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे थंडीचे प्राबल्य सुरू होईल. थंडी वाढण्यास व किमान तापमान घसरण्यास सुरुवात झालेली असेल. दिल्ली व उत्तरप्रदेश भागांतही थंडीचे प्रमाण वाढण्यास सुरवात होईल. दक्षिण भारतातील कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, केरळ, तमिळनाडूवर १०१२ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे किमान तापमानात घसरण होईल. १६ नोव्हेंबर रोजी दक्षिण भारतातील कर्नाटक किनारापट्टी, केरळ, तमिळनाडू भागांत पावसाची शक्यता आहे. कोकण सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. रायगड व ठाणे जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहील. तर रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यांत किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड व ठाणे जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९३ ते ९६ टक्के राहील तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७० ते ८२ टक्के राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अल्पशा पावसाची शक्‍यता आहे. उर्वरित रत्नागिरी, रायगड, ठाणे जिल्ह्यांत पावसाची शक्‍यता नाही. खरिपातील भात काढणीस हवामान अनुकूल. उत्तर महाराष्ट्र नाशिक व जळगाव जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील तर धुळे जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. तसेच नंदुरबार जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. नाशिक जिल्ह्यात किमान तापमान १७ अंश सेल्सिअस राहील. तसेच जळगाव जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस राहील. धुळे जिल्ह्यात किमान तापमान २१ अंश सेल्सिअस राहील. तर नंदुरबार जिल्ह्यात किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता नंदुरबार जिल्ह्यात सकाळची सापेत्र आर्द्रता ६८ टक्के राहील. तर उर्वरित जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ८३ ते ८८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ५६ ते ६७ टक्के राहील. पावसाची शक्‍यता नाही. मराठवाडा लातूर व जालना जिल्ह्यांत कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिस राहील. परभणी जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. तसेच नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद जिल्ह्यात किमान तापमान १५ अंश सेल्स्सि, औरंगाबाद जिल्ह्यात १६ अंश सेल्सिअस परभणी व हिंगोली जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता नांदेड जिल्ह्यात ९३ टक्के राहील. औरंगाबाद, परभणी व लातूर जिल्ह्यांत ८५ ते ८८ टक्के राहील. तसेच उस्मानाबाद व बीड जिल्ह्यात ७३ ते ७४ टक्के राहील व हिंगोली व जालना जिल्ह्यांत ६५ ते ६६ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता परभणी जिल्ह्यात ७७ टक्के राहील. तसेच नांदेड व लातूर जिल्ह्यांत ६४ ते ६८ टक्के राहील. उस्मानाबाद जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ५५ टक्के राहील. उर्वरित जिल्ह्यात ४१ ते ४७ टक्के राहील. पश्‍चिम विदर्भ बुलढाणा जिल्ह्यात कमाल तापमान २८ सेल्सिअस राहील, तर अमरावती जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील. अकोला व वाशीम जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. अकोला जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ८३ टक्के राहील. तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७० ते ७३ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ५८ ते ७० टक्के राहील. पावसाची शक्‍यता नाही. मध्यविदर्भ यवतमाळ जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील व वर्धा व नागपूर जिल्ह्यांत कमाल ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यात १७ ते १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६० ते ७५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ५८ ते ७२ टक्के राहील. पावसाची शक्‍यता नाही. पूर्व विदर्भ चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहील तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत किमान तापमान १७ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सूर्यप्रकाश चांगला राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७६ ते ८० टक्के राहील तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५५ ते ७० टक्के राहील. पावसाची शक्‍यता नाही. दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्र कोल्हापूर, सातारा व नगर जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. तसेच सांगली, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. अहमदनगर जिल्ह्यात किमान तापमान १४ अंश सेल्सिअस राहील. सातारा व पुणे जिल्ह्यांत किमान तापमान १७ अंश सेल्सिअस राहील. तसेच कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहील. सोलापूर जिल्ह्यात किमान तापमान २० अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० ते ९१ टक्के राहील. तर दुपारची ५५ ते ६५ टक्के राहील. कृषी सल्ला

  • कोकणातील हळव्या व निम गरव्या भाताच्या जाती परिपक्व होताच काढणी करावी. झोडणी करावी व धान्य उन्हात वाळवावे.
  • भुईमुगाची पाने पिवळी पडली असल्यास व शेंगाच्या आतील टरफलाच्या भागस काळे पट्टे दिसत असल्यास, दाण्याचा रंग लाल झालेला असल्यास काढणी करून शेंगा उन्हात वाळवाव्यात.
  • सोयाबीनची काढणी करून मळणी करावी. रिकाम्या शेताची मशागत करून हरभरा पिकाची पेरणी करावी. 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com