Agriculture story in marathi weekly weather advisary | Agrowon

किमान तापमानात घसरण, थंडीत चढ-उतार जाणवेल

डाॅ. रामचंद्र साबळे
शनिवार, 7 डिसेंबर 2019

महाराष्ट्राच्या समुद्र किनारपट्टीवर उत्तर दिशेने १०१४ हेप्टापास्कल हवेचा दाब राहील; तर उत्तर महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्याच्या पूर्व भागावर २०१८ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील. हवा जास्त दाबाकडून कमी दाबाच्या दिशेने वाहते. त्यानुसार हवेची दिशा ईशान्य व पूर्व बाजूने राहील.

महाराष्ट्राच्या समुद्र किनारपट्टीवर उत्तर दिशेने १०१४ हेप्टापास्कल हवेचा दाब राहील; तर उत्तर महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्याच्या पूर्व भागावर २०१८ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील. हवा जास्त दाबाकडून कमी दाबाच्या दिशेने वाहते. त्यानुसार हवेची दिशा ईशान्य व पूर्व बाजूने राहील.

संपूर्ण उत्तर भारतावर १०१८ इतका समान हवेचा दाब राहील. मात्र, ईशान्य भारतावर १०२० हेप्टापास्कल आणि राजस्थानवर १०२० हेप्टापास्कल हवेचा दाब राहण्यामुळे तिकडचे थंड वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहतील व सुरुवातीच्या काळात उत्तर महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्याच्या पूर्व भागात थंडीचे प्रमाण आणि प्राबल्य वाढेल. ८ डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या उत्तर भागात वाढीव हवेचे दाब विस्तारतील आणि थंडीचे प्रमाणही वाढेल आणि ते अधिक क्षेत्रात जाणवेल. ९ डिसेंबर रोजी संपूर्ण मराठवाड्यासह विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात थंडीचे प्राबल्य वाढलेले असेल. किमान तापमान वेगाने घसरेल. दिवसा व रात्रीही थंडीचे प्रमाण वाढेल. १० डिसेंबर रोजी हवेचे दाब संपूर्ण महाराष्ट्रावरील अचानक कमी होतील व थंडीही कमी होईल. याचाच अर्थ किमान व कमाल तापमानात अल्पशी वाढ होईल. ११ डिसेंबर रोजी थंडी कमी होईल. तशीच स्थिती दोन दिवस राहील.
उत्तर भारत - राजस्थानवर १०२० व ईशान्य भारतावरही तितकाच, तर मध्य उत्तर भारतावर १०१८ हेप्टापास्कल हवेचा दाब राहील.

थंडीचे प्रमाण वाढण्यास सुरुवात होईल. १० डिसेंबर रोजी उत्तर भारतात हवेचे दाब कमी होतील. उत्तर भारतातील काश्‍मीर भागात ११ डिसेंबर रोजी पाऊस व बर्फवृष्टी सुरू होईल. तसेच, त्यानंतर हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेशमध्ये १२ व १३ डिसेंबर रोजी पाऊस होईल.
दक्षिण भारत - कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेश भागात थंडीचे प्रमाण वाढेल. ७ व ८ डिसेंबर रोजी तमिळनाडू भागात पाऊस होईल.

कोकण

कोकणात कमाल तापमान अधिक राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात ते ३६ अंश सेल्सिअस राहील, तर रायगड व ठाणे जिल्ह्यात ते ३३ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. रत्नागिरी जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस राहील. तसेच, रायगड व ठाणे जिल्ह्यात ते २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. रत्नागिरी जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ६७ टक्के राहील. सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यात ७० ते ७८ टक्के राहील. तसेच, ठाणे जिल्ह्यात ती ८२ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ठाणे जिल्ह्यात ६८ टक्के राहील, रायगड जिल्ह्यात ५५ टक्के राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात ४३ ते ४५ टक्के राहील.

उत्तर महाराष्ट्र

नाशिक व जळगाव जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील, तर धुळे व नंदुरबार जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत १७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. धुळे जिल्ह्यात ९० टक्के, नंदुरबार जिल्ह्यात ८६ टक्के, जळगाव जिल्ह्यात ६५ टक्के, तर नाशिक जिल्ह्यात ६० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता धुळे जिल्ह्यात ७८ टक्के राहील. नंदुरबार जिल्ह्यात ६९ टक्के तसेच जळगाव व नाशिक जिल्ह्यात ५५ ते ५८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ९ किलोमीटर आणि दिशा आग्नेय व पूर्वेकडून राहील.

मराठवाडा

नांदेड व बीड जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. परभणी, हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस, तर लातूर जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस राहील. हिंगोली व उस्मानाबाद जिल्ह्यांत तापमान १४ अंश सेल्सिअस राहील. औरंगाबाद जिल्ह्यात १६ अंश सेल्सिअस, बीड, परभणी व जालना जिल्ह्यांत ते १७ अंश सेल्सिअस; तर लातूर व नांदेड जिल्ह्यांत १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.

सकाळची सापेक्ष आर्द्रता हिंगोली जिल्ह्यात ४९ टक्के, औरंगाबाद जिल्ह्यात ६८ टक्के, बीड जिल्ह्यात ५७ टक्के व लातूर, नांदेड व परभणी जिल्ह्यात ७० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता परभणी व जालना जिल्ह्यात ६० ते ६५ टक्के राहील. तसेच, नांदेड व औरंगाबाद जिल्ह्यात ४५ टक्के राहील. उस्मानाबाद, लातूर, बीड व हिंगोली जिल्ह्यात ३३ ते ३९ टक्के राहील. वाऱ्याचा दाशी वेग ४ ते १० किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयकडून राहील.

पश्‍चिम विदर्भ  

बुलडाणा व अमरावती जिल्ह्यात कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस राहील, तर अकोला व वाशिम जिल्ह्यांत ते २९ अंश सेल्सिअस राहील. अमरावती व वाशिम जिल्ह्यात किमान तापमान १२ ते १३ अंश सेल्सिअस राहील, तर बुलढाणा व वाशिम जिल्ह्यात १४ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७० ते ८० टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता वाशिम जिल्ह्यात ४५ टक्के राहील. बुलडाणा, अकोला व अमरावती जिल्ह्यात ५५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग २ ते ३ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा आग्नेय व ईशान्येकडून राहील.

मध्य विदर्भ

यवतामाळ जिल्ह्यात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. वर्धा व नागपूर जिल्ह्यांत कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस राहील. वर्धा जिल्ह्यात किमान तापमान १२ अंश सेल्सिअस राहील, तर यवतमाळ व नागपूर जिल्ह्यांत ते १३ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता यवतमाळ जिल्ह्यात ७० टक्के राहील, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यात ८० टक्के राहील. नागपूर जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ६५ टक्के राहील. तसेच, यवतमाळ व वर्धा जिल्ह्यात ती ५० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग २ ते ३ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने पूर्वेकडून राहील.

पूर्व विदर्भ

गोंदिया जिल्ह्यात कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस राहील, तर गडचिरोली व भंडारा जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस राहील आणि चंद्रपूर जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस राहील. गोंदिया जिल्ह्यात किमान तापमान १२ अंश सेल्सिअस राहील. भंडारा जिल्ह्यात ते १३ अंश सेल्सिअस आणि चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत १४ ते १५ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर जिल्ह्यात ७० टक्के राहील, भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ७५ टक्के राहील, तर गडचिरोली जिल्ह्यात ७८ टक्के राहील. चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ६० टक्के राहील, तर गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत ५५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग २ ते ३ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा पूर्व व आग्नेयकडून राहील.

दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र

सातारा जिल्ह्यात व पुणे जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. सांगली, सोलापूर व नगर जिल्ह्यांत ते ३० अंश सेल्सिअस राहील. तसेच, कोल्हापूर जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस राहील. पुणे जिल्ह्यात किमान तापमान १३ अंश सेल्सिअस राहील. नगर जिल्ह्यात किमान तापमान १५ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर जिल्ह्यात किमान तापमान १८ अंश सेल्सिअस राहील. सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सोलापूर जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ६५ टक्के, नगर जिल्ह्यात ५४ टक्के, सातारा जिल्ह्यात ८३ टक्के तर उर्वरित जिल्ह्यात ७३ ते ७७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ३८ ते ५४ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते १२ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा पूर्व व आग्नेयकडून राहील.

कृषी सल्ला

  • गहू पिकाला मुकुटमुळे फुटण्याची अवस्था २१व्या दिवशी, फुटवे फुटण्याची अवस्था ४२व्या दिवशी, कांडे फुटण्याची अवस्था ६३व्या दिवशी, फुलोरा येण्याची अवस्था ८४व्या दिवशी आणि दाणे भरण्याची अवस्था १०५व्या दिवशी पाणी द्यावे. उत्पन्न चांगले येईल.
  • कोकणात रब्बी भुईमुगाची पेरणी लवकरात लवकर करावी. कोकण गौरव जात लागवडीसाठी निवडावी. 

इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ४३ हजार...सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सांगोल्यात डाळिंब व्यापाऱ्याला पुन्हा...सांगोला, जि. सोलापूर : सांगोल्यातील एका...
विजेबाबतच्या समस्या निकाली काढा : डॉ....बुलडाणा  : विजेच्या बाबत नागरिकांना अनेक...
चाळीसगाव : किसान सन्मानच्या लाभापासून...चाळीसगाव, जि. जळगाव ः शासनाकडून राबविण्यात...
जिल्हा परिषदांचे तलाव मासेमारीसाठी खुले...मुंबई : राज्यातील ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा...
खानदेशात तूर नोंदणीला प्रतिसादजळगाव  ः जिल्ह्यात तूर नोंदणीसंबंधी १०...
नागपूर जिल्ह्यात रब्बीच्या क्षेत्रात...नागपूर : मॉन्सूनोत्तर पावसाने खरीप पिकाचे चांगलेच...
मागासवर्गीयांपर्यंत फडणवीस सरकारच्या...मुंबई: राज्यात गत सरकारच्या कार्यकाळात...
सिंचन प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी निधी...मुंबई : जलसंपदा विभागाचे प्रलंबित प्रकल्प पूर्ण...
औरंगाबादेत पाणीप्रश्‍नावर भाजपचे उद्या...औरंगाबाद : नेहमी दुष्काळाशी सामना करणाऱ्या...
कापूस दर ५१०० वर स्थिर, खेडा खरेदी वाढलीजळगाव  ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
पलटी नांगर योजनेसाठीचा निधी अपुरा जळगाव  ः जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे...
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बॅंकांचे...जळगाव  ः महाविकास आघाडीने जाहीर केलेली...
जामनेरातील टेक्स्टाइल पार्क रखडलेजळगाव ः खानदेशातील कापसावर अधिकाधिक प्रक्रिया...
पुणे जिल्हा परिषद कृषी सभापतिपदी...पुणे : जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य...
पुणे बाजार समितीत कांद्याची विक्रमी ३२५...पुणे ः नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिक...
नियोजनात हिवरे बाजार देशाचे मॉडेल ः डॉ...नगर ः हिवरे बाजार हे दूरदृष्टी नियोजनाचे देशाचे...
वऱ्हाडात रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...अकोला  ः यंदा वऱ्हाडात रब्बीची लागवड बुलडाणा...
राज्यात आर. आर. पाटील स्मार्ट ग्राम...मुंबई : ग्रामविकास विभागामार्फत राज्यात कै. आर....
हृदयविकारामुळे होणारे मृत्यू...मुंबई : हृदयाला रक्तपुरवठा कमी झाल्याच्या...